Thursday, March 1, 2018

छत्रपती शंभूराजे




शंभूराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना ६ जून १६७४ रोजीचा पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ मध्ये शाक्त धर्म पद्धतीत करावयास लावून समतावादी स्वराज्य निर्माण केले होते.शंभूराजे यांनी त्यांचा मित्र कविकलश याच्या बरोबर स्वराज्यात शाक्त धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू केला होता.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे ब्राह्मण मंत्री व इतर यांना समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी चार वर्ष सुनावणी चालवून मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती.स्वराज्यात समतावादी शाक्त धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वैदिक धर्म व्यावस्था पुरती हादरून गेली होती. समतावादी स्वराज्य जर संपवायचे असेल तर समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना संपविणे महत्वाचे होते.स्वराज्यात मराठा सरदार यांचेमध्ये मोठ्या प्रमणात स्वार्थ निर्माण करून शंभूराजे यांची अंगरक्षक सेना फोडून छत्रपती शिवराय यांची गुप्तचर यंत्रणा फोडून काढली.औरंगाजेब याचे बरोबर संधान बांधून त्याचा सरदार मुखर्बखान याला स्वराज्यातील वाटा दाखवून संगमेश्वर येथे केवळ अडीच हजार सेनेच्या माध्यमातून १ फेब्रुवारी १६८९ मध्ये जेरबंद करण्यात आले.त्यांना वाचविण्यासाठी स्वराज्याचे सरसेनापती मालोजी घोरपडे आणि अर्जुना महार (कवठेकर) विरगतीला प्राप्त झाले. म्हणून १ फेब्रुवारी हा “अर्जुना महार वीरगती दिन” म्हणून सकल मराठी समाज यांनी घोषित केला आहे.तेथून स्वराज्यातून ३८ दिवसांचा प्रवास सुरु झाला होता अकलूज येथे औरंगाजेबाच्या पाच लाखाच्या छावणीत शंभूराजे ११ फेब्रुवारी १६८९ मध्ये दाखल झाले.तेथून त्यांना बहादूरगड येथे नेऊन त्यांची १६ फेब्रुवारी १६८९ रोजी धिंड काढण्यात आली आपल्या राजाची अशी अवस्था पाहून त्यांचा लहानपणीचा मित्र स्वराज्याचा राजदूत रायप्पा महार औरंगाजेबाच्या पाच लाखाच्या सेनेवर तुटून पडला आणि वीरगतीला प्राप्त झाला.म्हणून १६ फेब्रुवारी हा “रायप्पा महार वीरगती दिन” म्हणून सकल मराठी समाज यांनी घोषित केला आहे.बहादूरगडाच्या कैदेत शंभूराजे यांचे २१ फेब्रुवारी १६८९  डोळे फोडण्यात आले होते. म्हणून २१ फेब्रुवारी हा “समतावादी स्वराज्य अंधकारमय दिवस” म्हणून सकल मराठी समाज यांनी घोषित केला आहे.बहादूरगड येथील १७ दिवसांच्या अंधकारमय कैदे नंतर ९ मार्च १६८९ मध्ये त्यांना शहाजीराजे संकल्पित स्वराज्य ठिकाण ”तुळापुर” येथे आणण्यात आले.पंचकृषित त्यांना मिरविण्यात आले ज्या ठिकाणी त्यांच्यावर फुले उधळण्यात आली त्या ठिकाणाला आज “फुलगाव” म्हटले जाते.अंधळे झालेले शंभूराजे उंटावरून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला आज “आपटी” असे म्हटले जाते.शंभूराजे यांना ज्या ठिकाणी मरगळ येईपर्यंत झाडाला बांधण्यात आले त्या ठिकाणाला आज “मरकळ” असे म्हटले जाते.शरीराने मरगळ आलेल्या आपल्या शंभूराजे यांना तुळापुर या ठिकाणी आणण्यात आले.११ मार्च १६८९ मध्ये मनुस्मृती प्रमाणे (वैदिक धर्म पंडित यांचा वध केला म्हणून) त्यांचे शीर कलम करून भीमा भामा इंद्रायणीच्या जागी भाला लावून लटकाविण्यात आले....आणि त्यांचे तुकडे तुकडे करून फेकण्यात आले.वढू येथील गोविंद महार यांनी त्यांचे तुकडे गोळा करून समस्त महार यांनी त्यांचे अंत्यसंस्कार शाक्त धर्म पद्धतीत केले म्हणून त्यांना “अस्पृश्य महार” असे नंतरच्या काळात म्हटले गेले.त्यांची मनुस्मृती प्रामाणे झालेल्या हत्येचा बदला सातारच्या गादीचा सरदार सेदुबिन नागनाथ महार उर्फ सिद्धनाक महार याने जातीयवादी पेशवाईचा १ जानेवारी १८१८ मध्ये वढू येथील शंभूराजे यांच्या समाधीला साक्ष ठेऊन घेण्यात आला आणि पेशवाईचा अंत करण्यात आला.भीमा कोरेगाव याठिकाणी पेशव्याचा सरदार बापू गोखले याचा मुलगा गोविंद गोखले मारला गेला तर पाठलाग मध्ये आष्टी जवळ स्वत: बापू गोखले आणि त्याचा दुसरा मुलगा गोपाळ गोखले मारला गेला आणि जातीयवादी पेशवाईचा अंत होऊन महार योध्यांचा विजय झाला.

No comments:

Post a Comment