Sunday, March 4, 2018

आज अटकेचा तेह्तीसावा दिवस (३३) ५ मार्च १६८९ बहादुरगडावरून शंभूराजे यांचा तुळापुर कडे म्हणजे त्यांच्या हत्येकडे प्रवास सुरु.....!



शंभूराजे १६ तारखेपासून बहादूरगड याठिकाणी औरंगाजेबाच्या कैदेत होते त्यांचे २१ मार्च रोजी डोळे फोडले होते.आज तेथून ते तुळापुरच्या वाटेला लागले आहेत म्हणजे त्यांच्या हत्येचा प्रवास सुरु झालेला आहे.आत्ता हळूहळू महाराणी येसूबाई यांना गद्दारांची ओळख होऊ लागली होती.आता स्वराज्यासाठी प्रामाणिक मराठा सरदार यांची कमतरता स्वराज्याला भासू लागली होती.जो तो स्वत: राजा बनण्याचे स्वप्न रंगू लागला होता.महाराणी येसूबाई यांचा भाऊ गणोजी शिर्के गद्दार असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते.स्वार्थापायी आपल्या बहिणीचा संसार उध्वस्त करायला त्याचे मन कसे झाले त्याची छाती पुढे कशी धजावली असे अनेक प्रश्न महाराणी येसूबाई यांचे समोर आ वासून उभे राहत होते.गणोजी शिर्के असा का वागला याचा शोध महाराणी येसूबाई आता घेत होत्या.

No comments:

Post a Comment