डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
२४ सप्टेंबर १९२४ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक
चळवळीचा २४ सप्टेंबर १८७३ चा दिवस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला
राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक दिन २४ सप्टेंबर १६७४ चा दिवसाचे औचित्य
साधून “समता सैनिक दल” स्थापन केले. “समता सैनिक दल” सदस्याच्या डोक्यावर निळी
टोपी धारण करून हातात भगवा ध्वज दिला होता.त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
१९२७ मध्ये भीमा कोरेगाव म्हणजे शंभूराजे यांची ज्या वैदिक धर्म पंडितांनी
मनुस्मृती प्रमाणे हत्या केली त्यांचा वंशज दुसरा बाजीराव पेशवा म्हणजे तळेगाव
भीमाचे ढमढेरे यांचा जावई याच्या जातीभेदाचा अंत करून शंभूराजे यांच्या हत्येचा
बदला घेणारे सातारा गादीचे सरदार महार योध्दा सिद्धनाक महार आणि त्याच्या
नेतृत्वात असणारे २५,५०० मावळे भीमा कोरेगाव याठिकाणी धारातीर्थ पडले.त्यामध्ये
ब्रिटीश बटालियन मधील ५०० महार सैनिक यांच्या विजयाची गाथा म्हणून विजयस्तंभ उभारलेला
आहे.अशा विजयस्तंभास १९२७ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन त्यांना
मानवंदना दिलेली आहे.आणि त्याठिकाणी त्यानी असे उद्गार काढले की,जो इतिहास वाचणार नाही....आणि
तो इतिहास घडविणार नाही.ब्रिटिशांना खडसावत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले
होते की,आमच्या पूर्वजांनी शिपाईगिरीच केलेली आहे.याचा
अर्थ सरळ सरळ आहे की,महार समाजाच्या गळ्यात कधीच
गाडगे मडके नव्हते होती ती अस्पृश्यता आणि अशा अस्पृश्य लोकांना पाण्यापासून वंचित
ठेवण्याचे काम वेदिक धर्म पंडित स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये आर्य
सनातनी हिंदू धर्माची स्थापना केल्यानंतर केली होती.महात्मा ज्योतिबा फुले यांनी
स्वत:च्या वाड्यातील विहीर १८८० मध्ये अस्पृश्यांसाठी खुली केली होती आजही ही
विहीर महात्मा फुले वाड्यामध्ये दिसून येते.रायगड ही स्वराज्याची राजधानी होती आणि
जो पर्यंत स्वराज्य होते तो पर्यंत अस्पृश्यता दिसून येत नव्हती त्यानंतर छत्रपती
संभाजी महाराज यांच्या काळात म्हणजे १६८९ पर्यंत पाण्यापासून कोणाला वंचित ठेवले असल्याचे
दिसून येत नाही.पुढे छत्रपती राजाराम यांच्या काळातही पाण्यापासून कोणाला वंचित
ठेवल्याचे आढळून येत नाही.त्यामुळे रायगडाच्या परिसरात इतिहास काळापासून
स्पृश्यांना पाण्यापासून वंचित ठेवले होते याला कोठेही मान्यता देता येत नाही.कारण
हे अठरा पगड जातीसाठी होते आणि येथे फक्त महारच अस्पृश्य होता याला मान्यता देता
येत नाही.कारण महार समाज हा स्वराज्यातील योध्दा होता आणि त्याने १८१८ मध्ये
कमरेला तलवार आणि पाठीला ढाल होती त्याच्या पाठीला झाडू आणि गळ्यात मडके नव्हते हे
आपण लक्षात घेतले पाहीजे.कारण आपण पेश्वाईचा अंत केलेली माणस आहोत ही एक मानसिकता
महार समाजाच्या डोक्यात बिंबविण्यात आलेली आहे.जर हजारो वर्षापासून आपल्या गळ्यात
गाडगे मडके असते आणि आपण हजारो वर्षापासून जर पाण्यापासून वंचित असतो तर डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या नसत्या आणि भीमा कोरेगावला महार
योद्ध्यांच्या विजयस्तंभास अभिवादन करायला गेले नसते.महाड याठिकाणी डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केली नसती हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे चवदार तळाच्या सत्याग्रही आंदोलनाच्या वेळी डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रहांच्या हातात भगवा ध्वज देऊन छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत.
No comments:
Post a Comment