संभाजीराजे यांनी समतावादी
स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांचा पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा
राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत २४ सप्टेंबर १६७४ मध्ये करावयास लावला
होता.त्यामुळे सर्व वैदिक धर्म व्यावस्था संभाजीराजे यांचेवर चिडली
होती.शिवरायांनी स्वराज्याचे कुलमुखत्यारपत्र संभाजीराजे यांची पत्नी येसुबाई
यांना दिले होते.स्वराज्याची जबाबदारी संभाजीराजे यांचेवर सोपविण्याची तयारी
शिवरायांनी केली होती त्यामुळे ब्राह्मण मंत्री आणखीनच बिथरले होते.त्यांनी
शिवरायांचे घराणे फोडण्यास सुरु केले प्रथम त्यांनी त्यांची पत्नी सोयराबाई यांना
फोडले त्यांचा पुत्र राजाराम याला गादीवर बसविण्याचे स्वप्न त्यांना दाखविले.वैदक
धर्म पंडितांनी घरातच पहिला स्वार्थ निर्माण केला.सोयराबाई यांचे मनात असे
बिंबविले की,शिवरायांचा जो पर्यंत मृत्यू
होत नाही तो पर्यंत राजाराम गादीवर बसू शकत नाही...आणि त्यांची हत्या सोयराबाई
यांना बरोबर घेऊन करण्यात आली.हीच नीती या ब्राह्मण मंत्र्यानी संभाजीराजे यांचे
बाबत केली होती.त्यांनी त्यांचे मेव्हणे गणोजी शिर्के आणि त्यांचे दाजी म्हणजे
त्यांची बहिण राणूबाई यांचे पती म्हतोजी निंबाळकर
(फलटणचे निंबाळकर) यांचेमध्ये स्वार्थ निर्माण करून यांना औरंगाजेबास फितूर केले
होते.छत्रपती शिवराय यांचे जवळ जवळ बरेच नातेवाईक फोडण्यास ब्राह्मण मंत्र्यांना
यश आले होते.याच गणोजी शिर्केने संभाजीराजे यांना संगमेश्वर कडे जाण्याचा आडमार्ग मुखर्बखान
याला दाखविला होता.त्यामुळेच गणोजी शिर्केने यांचा सरदार अर्जुना महार (कवठेकर)
त्यांच्यावर तुटून पडणार याची कल्पना गणोजी शिर्के याला होती.म्हणून त्याने मुखर्बखान
याला बरोबर घेऊन त्याला पेंढ्यामध्ये जाळून त्याची पहिली हत्या केली.गणोजी शिर्के
म्हतोजी निंबाळकर औरंगाजेबास फितूर झाले असल्याची खबर पन्हाळ गडावर असलेले
स्वराज्याचे सरसेनापती मालोजी घोरपडे यांना मिळाली होती.त्यामुळे ते पहिले संगमेश्वर
येथे संभाजीराजे यांना वाचविण्यासाठी आले होते.तेथे ते संभाजीराजे यांना
वाचविण्यासाठी वीरगतीला प्राप्त झाले होते.शिवरायांचे नातेवाईक स्वराज्याला गद्दार
झाल्यामुळे संभाजीराजे यांना मुखर्बखान याला अडीच हजाराची सेना घेऊन जेरबंद करण्यास
यश प्राप्त झाले त्याला संभाजीराजे यांना अकलूज पर्यंत नेण्यास धनगरांच्या २५ तरुणांचा
जर हल्ला सोडला तर काहीच अडचण झाली नाही.बहादूरगडावर छत्रपती संभाजीराजांची “धिंड”
काढण्याची मुख्य जबाबदारी ही म्हातोजी निंबाळकर यांचेवर होती.राजदूत म्हणून
गेलेल्या रायप्पा महार याने पाहिली आणि तो त्या म्हातोजी निंबाळकर यांचेवर तुटून
पडला ज्याने स्वराज्याची गद्दारी केली तो रायप्पा महार याची काय कदर करणार रायप्पा
महार याचे तुकडे तुकडे करून हत्या केली.याची सर्व माहिती महाराणी येसूबाई यांना आज
समजली होती.त्यांच्या आता लक्षात आले होते की,संभाजीराजे जिवंत राहणार नाही.त्यांनी स्वराज्याची
मुठ बांधण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली त्यांच्या लक्षात आले की,आता कोणतेही सरदार घराणे विश्वास ठेवण्यास पात्र नाही
त्यांनी अठरा अलुतेदार यांना बरोबर घेण्यास सुरुवात केली.
No comments:
Post a Comment