Tuesday, March 6, 2018

आज अटकेचा पस्तीवासा दिवस (३५) ७ मार्च १६८९ स्वराज्याने शंभूराजे यांना मरणाच्या दारी सोडले होते काय....?



आज संभाजीराजे यांच्या अटकेचा ३५ सावा दिवस होता.एकंदरीत या दिवसांचा जर विचार केला तर असे दिसून येते की,पस्तीस दिवसांचा काळ खूप मोठा काळ होता.शंभूराजे यांना जर स्वराज्याला वाचवायचे असते तर त्यांना वाचविता आले असते.पण आता स्वराज्य असे राहिले नव्हते.ज्या सरंजामशाही विरुध्द शिवराय लढले होते त्या सरंजामशाहीने पुन्हा एकदा डोके बाहेर काढले होते.प्रत्येकाला स्वराज्यात वतनदार व्हायचे होते स्वत:चे राज्य उभारायचे होते.स्वत:ची संस्थाने उभी करायची होती अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली होती.आम्ही स्वराज्य निर्माण केले आणि त्याचा उपभोग आम्हीच घेणार अशी प्रत्येकाला लालसा निर्माण झालेली होती.प्रत्येक सरदार स्वराज्य माझ्या हातात कसे येईल याची तजवीज करीत होता.गणोजी शिर्के यालाही वतनदारी हवी होती.परंतु संभाजी महाराज यांनी कोणासही स्वराज्य देणार नाही कारण हे रयतेसाठी उभे राहिलेले स्वराज्य आहे असे ठणकावून त्यानी सर्वांना सांगितले होते.पूर्वीपासून ब्राह्मण मंत्री आणि सरंजामशाह ऐयाशी होते.परंतु स्वराज्यात याला गोष्टी करायला मुभा नव्हती कारण रांझाच्या गुजर पाटलाचे उदाहरण सर्वा समोर होते.त्यांना स्त्री लंपटपणा करता येत नव्हता कारण संभाजीराजे आक्रमक स्वभावाचे होते ते या गोष्टी कधीही खपवून घेऊ शकत नव्हते.कारण संभाजीराजे हे समतावादी स्वराज्य रक्षक होते.जो पर्यंत शंभूराजे संपणार नाही तो पर्यंत स्वराज्य आपल्या हातात येणार नाही.याची पूर्ण कल्पना  या मराठा सरदार मध्ये निर्माण झाली होती.आणि ही अशी संधी पुन्हा मिळणार नव्हती.म्हणून शंभूराजे यांना वाचविण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही.रयत अशा कारस्थानापासून अनभिज्ञ होती.त्यांना या गोष्टीची काही ऐक कल्पना नव्हती.म्हणून स्वराज्य ज्या सरदारांच्या हातात होते त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांना मरणाच्या दारी सोडले होते.म्हणून मी म्हणतो स्वराज्याने शंभूराजे यांना मरणाच्या दारी सोडले होते काय....?

No comments:

Post a Comment