Saturday, March 24, 2018

होय मी सिधुतील हिंदू होते आणि आहे आणि भारतीय निवासी आहे....! माझे कुलदैवत खंडोबा - ज्योतिबा आणि जगदंबा आहेत आणि माझे महापुरुष शिवराय – शंभूराजे – फुले – शाहू – आंबेडकर आहेत आणि यांनाच मानणारा वर्ग माझा समाज बांधव आहे.

होय मी सिधुतील हिंदू होते आणि आहे आणि मी भारतीय निवासी आहे.मात्र वैदिक धर्म पंडितांनी स्थापन केलेला आर्य सनातनी हिंदु धर्मीय नाही.ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती माझे पूर्वज आणि माझे दैवत नाहीत.माझे कुलदैवत खंडोबा ज्योतिबा आणि जगदंबा आहेत.आणि माझे क्षेत्र रक्षक म्हसोबा आहेत.ज्याचे कुलदैवत आणि क्षेत्र रक्षक खंडोबा - ज्योतिबा – जगदंबा – म्हसोबा - मुंजोबा - धावजी बुवा - मरीआई वगैरे आहेत ते भारतीय निवासी आहेत आणि माझे महापुरुष शिवराय – शंभूराजे – फुले – शाहू – आंबेडकर आहेत आणि यांनाच मानणारा वर्ग माझा समाज बांधव आहे.माझी सिंधू संकृती सभ्यतेचे दर्शन देते आणि भगवा विचार हा सभ्यतेची निशाणी आहे.म्हणून गौतम बुध्द - सम्राट अशोक - वारकरी संप्रदाय आणि शहाजीराजे यांनी दिलेले भगवा ध्वज याचे प्रतिक आहे.त्यामुळे माझ्या दैवतांचे अधिष्टान गणपती असूच शकत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञामध्ये फक्त ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचाच स्पष्ट उल्लेख करून त्यांनाच नाकारलेले आहे.आपल्या कुलदैवतांना नाकारलेले नाही आजही आम्ही आमच्या कुलदैवतांचे पूजन करीत असतो.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे सिंधू संकृतीचे दिलेले सभ्यतेचे दर्शन होय.

No comments:

Post a Comment