छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शंभूराजे
आमचे होते हे आम्हाला माहित नव्हते.कारण आम्ही “महार योध्दा” असताना आम्ही
अस्पृश्य महार झालो होतो.म्हणे आमच्या गळ्यात गाडगे मडके होते....परंतु संपूर्ण
इतिहास शोधला तर आमच्या गळ्यात गाडगे मडके असल्याचा आम्हाला तरी कोठेही पुरावा
आढळला नाही.मात्र इतिहासात आमच्या कमरेला तलवार आणि पाठीला ढाल असल्याचे पुरावे
आमच्या समोर आलेले आहेत.इतिहासात आम्ही “योध्दा” असल्याचे पुरावे समोर आले आहेत.असे
असताना आमच्या गळ्यात हजारो वर्षापासून गाडगे मडके होते असे आम्हाला आम्हाला सांगितले गेले आहे.जर असे जर होते तर साडे
तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे
स्वराज्य समतावादी होते काय....? असा प्रश्न साहजिकच आम्हाला निर्माण होतो.आणि
दुसरा प्रश्न आम्हाला असा निर्माण होतो की,महात्मा
ज्योतिबा फुले यांनी दीडशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून
पहिली शिवजयंती १८६९ मध्ये साजरी केली म्हणून आपण जाहीरपणे का बोलतो....? जर आपल्या
गळ्यात गाडगे मडके होते....तर आपण १८१८ चा भीमा कोरेगाव येथील महार योध्यांचा
इतिहास उजागर करण्यासाठी आणि त्यांना
मनवंदना देण्यासाठी का जातो....? असे असंख्य प्रश्न आमच्या मनात वारंवार उपस्थित होत
आहे.त्यामुळे येथे मला एकच उत्तर सापडले आहे ते म्हणजे “आमची मानसिकता
गुलामगिरीच्या वाटेला नेली आहे” आपण सर्वानी एकच लक्षात ठेवले पाहिजे की,इतिहासात एकच वाडा होता आणि तो म्हणजे “महार वाडा” या
वाड्यातून गावची प्रशासन व्यवस्था चालत असायची हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.महार
राजाची प्रशासन व्यवस्था प्रामाणिक असल्यामुळे स्वराज्यातील रयत अत्यंत आनंदित
होती.परंतु परदेशातून आलेले आर्य म्हणजे वैदिक धर्म पंडितांना ही प्रशासन व्यवस्था
आपल्या ताब्यात घ्यायची होती.म्हणून या लोकांनी येथे धार्मिक व्यवस्था निर्माण
केली होती.या महार वाड्याच्या अठरा प्रशासन व्यवस्थेचे पूर्वज म्हून खंडोबा
ज्योतिबा जगदंबा म्हणून त्यांचे पूजन करीत असे.या महार वाड्याच्या ताब्यात मोठ्या
प्रमाणात जमीन क्षेत्र असायचे आणि त्यांच्या जमीन क्षेत्राचे संरक्षण “म्हसोबा”
करीत असायचे तेव्हा हे सर्व आपल्या जमीन क्षेत्रात “म्हसोबा” याचे पूजन करीत “मरी
आईला” मान सन्मान देत असत आणि आजही तो मान सन्मान देताना आपल्याला पाहिला मिळतो.त्यामुळे
आपल्या गळ्यात गाडगे मडके होते याला काही आधार नाही.काहींनी याबाबत आपल्या
सांगितले आहे की,आपण गावचे नोकर होतो त्यामुळे आपले
गळ्यात गाडगे मडके होते त्याला काही आधार नाहीये.कारण ब्रिटिश काळात गावचे नोकर
वर्ग चार होते त्यामध्ये महार मांग चांबार आणि रामोशी असे होते.मग मांग चांबार आणि
रामोशी यांच्या गळ्यात गाडगे मडके का नव्हते...? असा माझा प्रश्न आहे जसे यांच्या गळ्यात
गाडगे मडके नव्हते तसे आपल्याही गळ्यात गाडगे मडके नव्हते हे आपण लक्षात घेतले
पाहिजे.आपल्या गळ्यात गाडगे मडके होते ही एक मानसिकता आहे आणि ती आपल्या
मानसिकतेवर लादण्याचा प्रयत्न करून आपल्यातला लढवय्यापणा काढून टाकण्याचा त्यांचा
एक प्रयत्न होता.१ जानेवारी १८१८ मध्ये आपण समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती
संभाजी महाराज यांची ज्या मनुस्मृती प्रमाणे हत्या झाली होती त्या हत्येचा बदला
आपल्या पूर्वजांनी घेतला आहे.कारण महार योध्यांचे शंभूराजे यांचेवर अतोनात प्रेम
होते त्याची ऐतिहासिक उदाहरणे द्यायची झाली तर मी असे देईन की,रायप्पा महार हा शंभूराजे यांचा बालपणीचा मित्र होता
शंभूराजे यांचे वरील जीवघेणे हल्ले त्याने स्वत:वर घेतले आहे.अर्जुना महार ह्याचे
शंभूराजे यांची अटक टाळण्यासाठी बलिदान गेले आहे.तर रायप्पा महार आणि त्याचा भाऊ देवाप्पा
महार बहादूरगडावर शंभूराजे यांची ज्या फलटणच्या महातजी निंबाळकर याने धिंड काढली
होती.त्यांच्यावर तुटून पडले होते तेथे ते वीरगतीला प्राप्त झाले आहेत.तुळापुर
येथे शंभूराजे यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या करून त्यांचे तुकडे तुकडे करून फेकून
टाकले ते तुकडे गोळा करून रायप्पा महार याचा मावस भाऊ वढू गोविंद महार याने
गावातील दामाजी पाटील यांचेकडे गेला होता तेव्हा त्याच्या घरामध्ये झोपलेला तो
दामाजी पाटील म्हणाला बादशहाचा नागर माझ्या घरावर मला फिरवून घ्यायचा नाही.तेव्हा
दामाजी पाटलाची पाटलीनबाई त्या दामाजीला म्हणाली की,आपल्या शिवाजीचे पोर आहे ते तुम्ही असे का करताय
तरीही त्या पाटलाने काही एक एकले नाही.तेव्हा त्या पाटलीन बाईला गोविंद महार
म्हणाला माझी जागा आहे त्या जागेत आपण शंभूराजे यांचे अंत्यसंस्कार संस्कार करू माझ्या
जागेवर बादशाहने जरी नांगर फिरवला तरी चालेल मी माझे कुटुंब घेऊन कोठेही पोट
भरायला जाईन.तेव्हा त्या गोविंद महाराने आणि त्या पाटलीन बाईने गावातील पन्नास
महिला गोळा करून त्या गोविंदा महार याच्या कुटुंबा बरोबर शंभूराजे यांचेवर त्याच्या
जागेत अंत्यसंस्कार केले.संपूर्ण उपस्थित महिला भगिनी हंबर्डे फोडून रडू लागले.यातून
स्त्री शक्तीचे रूप पुन्हा एकदा आम्हाला पाहिला मिळाले आहे.शंभूराजे किती मोठ्या
प्रमाणात समतावादी होते हे समोर आले आहे.शेवटच्या घटके पर्यंत “महार योध्दा”
शंभूराजे यांचे बरोबर होता.तर मराठा सरदार हे वैदिक धर्म पंडित यांचा गुलाम झालेला
पाहिला मिळाला.
No comments:
Post a Comment