अवघ्या साडेतीन
महिन्यात कोरोना म्हणजे काय हे देशातील प्रत्येक गाववस्तीच्या शेवटच्या घरा पर्यंत
माहित झालेले नाव आहे.आणि त्या शेवटच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्या कोरोनाची दहशत
बसलेली आहे.परंतु या कोरोनाची एवढी दहशत घेणे गरजेचे आहे काय काय...? असा प्रश्न
आज प्रत्येक बुद्धीजीवी व्यक्तीला पडलेला आहे.तर त्याचे कारण साधे आहे आणि ते
म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री असणारे नरेंद्र मोदी यांनी कोरोना संदर्भात भारतीय
जनतेला केलेले आवाहन येथे महत्वाचे आहे.आणि त्यांनतर न्यूज मिडीयाने कोरोना
संदर्भात चालविलेल्या बातम्या येथे महत्वाच्या आहेत असे मी मानतो.एकंदरीत कुटुंब
व्यवस्थेमध्ये आपल्या मुलांची आईबाप काळजी घेत असतात त्यामुळे ते त्याच्या शिक्षणावर
जोर देत असतात.कोरोना वायरस हा नवीन असल्यामुळे या विषाणूचा प्रार्दुभाव जगातील
मोठमोठ्या देशांना रोखता आलेला नाही.परंतु काही वैज्ञानिक संशोधक आणि डॉक्टर मंडळी
यांनी असे सांगितलेले आहे की,विषाणू मुळे होणाऱ्या आजारावर उपचार पद्धत्ती अद्याप
तरी विकसित झालेली नाही.त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव लहान मुलावर लवकर
होतो त्यामुळे शासनाने शाळा बंद करण्याचा पहिला निर्णय घेतल्या मुळे कोरोना
संदर्भातील माहितीचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक कुटुंबात लवकर झाला.त्यांनंतर
घोषित केलेला २१ दिवसांचा देशहितासाठीचा पहिला लॉक डाऊन प्रधानमंत्री यांनी जाहीर
केला आणि तो भारतीय जनतेने प्रामणिकपणे पाळला देखील आहे.आवश्यक सेवा पुरविणाऱ्या
प्रशासन व्यवस्थेचे थाळी वाजवून,टाळी वाजवून,घंटा वाजवून स्वागत करण्याचे आवाहन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले असता त्याचे भारतीय जनतेने मनापसून स्वागत
केले आहे.परंतु नंतर दीप प्रज्वलित करावे असेही आवाहन करण्यात आल्यानंतर यामध्ये
काही जणांना राजकारण दिसले असो.जनतेला वाटले की, लॉक डाऊन २१ दिवसा नंतर उठेन आणि
आमची कामधंदे आणि रोजी रोटी पुन्हा सुरु होत्तील या आशेने होणारा त्रास भोगून
त्याने या आवाहानाला साद देखील घातली.परंतु आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडणारा
समाज आणि त्यांना सेवा पुरविणारी लोक यांच्या बद्दल पुन्हा मिडीयाने गरळ ओकून
ज्यांनी प्रामणिकपणे लॉक डाऊन पाळला आहे त्यांचेवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले
आहे.त्यामुळे २१ दिवसांत संपुष्टात येणारा लॉक डाऊन पुन्हा मिडीयाच्या या
धोरणामुळे १९ दिवसांनी वाढविला गेलेला.त्यामुळे लॉक डाऊनमध्ये शांत बसलेला समाज
अस्वस्थ झाला आणि सरळ तो रस्त्यावर उतरला गेला.आता त्यामागे काही ठिकाणी
मिडीयाच्या चुकीच्या बातम्यांचा दूषपरिणाम आपल्याला दिसून आलेले आहेत.काही लोकांनी
तर रस्यावर धुमाकूळ करीत अक्षरशा लुट केली असल्याच्या बातम्या मिडीयाने प्रसिध्द
केलेल्या आहेत.त्यामुळे कोरोना वायरससाठी असणारा लॉक डाऊन आता लोकांना स्वत:ची कैद
वाटू लागलेली आहे हे मात्र तेवढे खरे आहे.लॉक डाऊनमुळे सर्वात प्रथम हातावर पोट
भरणाऱ्या गोरगरीब मजुरांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यांना मदत
करण्यासाठी काही लोक पुढे आले त्यांना अन्न पाणी वाटू लागले.परंतु ज्यांना अन्न
वाटत होते त्यांचे फोटो ते वायरल करू लागले त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानीपणाचा
प्रश्न निर्माण झाला आणि ते म्हणून लागले की “आम्ही मजबूर आहोत...परंतु भिकारी”
त्यामुळे अन्न वाटप कमी झाले कारण ज्यांना अन्न वाटायचे होते त्यांना
प्रसिद्धीसाठी फोटो हवा होता.अशातच पुन्हा मिडीयाच्या बातम्या उचल खाऊ लागल्या आज
इतके कोरोनाचे रुग्ण सापडले,तितके मेले,इथला एरिया सील केला,तिथला एरिया सील केला,
अक्षरशा लॉक डाऊनमुळे घरात बसलेला व्यक्ती भामावून गेली आहे.तो भ्रमित झाला त्यातच
पोलिसांच्या गाड्या सारख्या सारख्या सूचना देत वस्ती,वाड्यात,नगरात,गल्ली बोळात
फिरू लागल्याचे दृष्य पाहून लॉक डाऊनमुळे घरात बसलेला व्यक्ती अक्षरशा घाबरून
गेलेली आहे.या वेळेतच तुम्हाला जीवन आवश्यक वस्तू खरेदी करता येतील नंतर कोणीही
रस्त्यावर फिरायचे नाही.तुमच्या हद्दीत कोरोना रुग्ण आढळून आलेला आहे,प्रवासी
वाहतूक बंद केली आहे,खाजगी वाहनांना पेट्रोल देणे बंद केले आहे,शाळेमध्ये नवीन
विद्यार्थ्यांसाठी प्रवेश होणार नाहीत.अक्षरशा पर्यटन व्यवस्था कोलमडून गेली
आहे,अशा स्वरूपाच्या बातम्या रोज येऊ लागला त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपले लोक
आपल्या पासून हिरावून गेल्याचे वाटत असल्याची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण
झालेली आहे.आपल्या मुला बाळांचे भवितव्य काय याचा प्रशन पडल्यामुळे तो घाबरलेला
आहे.त्यातच ससून हॉस्पिटलच्या हलगर्जी कारभारामुळे तेथील कोरोना रुग्ण दगावले असल्याची
तक्रार कॉंग्रेसचे पुणेशहर नेते अरविंद शिंदे यांनी केल्यामुळे तेथील ससून प्रमुख
यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे. अरविंद शिंदे यांनी केलेल्या आरोपामुळे गंभीर
प्रश्न उपस्थित झालेला आहे.रक्त तपासणीचा अहवाल न येता मृत रुग्ण कोरोनामुळे दगावला
असे खोटे विधान ससून हॉस्पिटल यांनी जाहीर का केले असाही आरोप त्यानी लावलेला
आहे.त्यामुळे पोस्टमार्टम न करता रक्त तपासणी अहवाल प्राप्त न होता मृताचे निदान
कोरोना का दाखविले जाते असा आरोप करून तशी तक्रार त्यानी शासनाकडे केली
आहे.त्यामुळे लॉक डाऊनमुळे घरात बसलेला व्यक्ती अक्षरशा घाबरलेला आहे.
Saturday, April 18, 2020
Saturday, March 14, 2020
महात्मा ज्योतिबा फुले ते महार योध्दा भीमा कोरेगाव आणि जय भवानी..! जय शिवाजी...!!
पेशव्याने केलेल्या वसई तहामुळे १० डिसेंबर १८०२ साली भारतावर इंग्रजी राजवट
सुरु झाली आणि रयत गुलामीत गेली हे स्पष्टपणे दिसून येते..त्यामुळे छत्रपती शाहू
महाराज यांनी पेशव्यांना दिलेल्या राज्यकारभाराच्या अधिकाराचा गैरवापर करून
स्वराज्याची गद्दारी करून दुसरा बाजीराव याने रयतेचे हक्क व अधिकार १८०२ मध्ये
इंग्रजी राजवटीला देऊन टाकले.अशा इंग्रजांच्या मांडलिक असणारा दुसरा बाजीराव याचा
अंत करण्यासाठी सातारा गादीचे आदेश भोर प्रांतातील नागेवाडी गावचा महार योद्धा
सरदार सिद्धानक महार ही उपाधी प्राप्त असलेले सेदुबीन नागनाथ महार याला मिळाले
होते.वढू येथील शंभूराजे यांच्या समाधीचे दर्शन घेत भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी
१८१८ मध्ये पेशवाईचा अंत त्यांनी केला त्यांचे बरोबर उमाजी नाईक यांचे रामोशी
योद्धा आणि स्वराज्याचे अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार त्यांच्या सोबत होते.१८२२
मध्ये उमाजी नाईक यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्या
समोर ठेऊन पुरंधर येथे राज्याभिषेक करून ते राजे झाले होते.११ एप्रिल १८२७ मध्ये
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला होता.३ फेब्रुवारी १८३४ मध्ये मामलेदार कचेरी
पुणे येथे झाडाला लटकावून राजे उमाजी नाईक यांची हत्या करण्यात आली होती यावेळी
महात्मा ज्योतिबा फुले हे अवघे ७ वर्षाचे होते.इंग्रजी राजवटी मध्ये महार बटालियन
मोठ्या प्रमणात कार्यरत होती.आणि ही महार बटालियन जर ब्रिटीश सैन्यात मजबूत जर
झाली तर उद्याच्या स्वतंत्र भारताच्या राजकारणात मोठे अस्तित्व निर्माण करेन.आणि
पुन्हा एकदा १८१८ चे युध्द सारखी परिस्थिती निर्माण जर झाली तर भारत देश सोडून
पळून जाण्याची परिस्थिती निर्माण होईल.म्हणून यासाठी कोकणामध्ये रत्नागिरी
याठिकाणी ब्राह्मणी व्यवस्थेने इंग्रजा विरुध्द एक उठाव करून इथली महार बटालियन
बदनाम करून ती बंद करून महार योध्याचे अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी १८५७ चा
स्वतंत्र उठाव उभा केला गेला.आणि या उठावाचा फायदा घेत ब्रिटीश राजवटीच्या
प्रशासकीय कारभारात आपला शिरकाव ब्राह्मणी व्यवस्थेने करून घेतला.....आणि महार
बटालियन बंद करण्याचे एक राजकारण केले.१८५७ चा उठाव झाला म्हणून इंग्रजी राजवटी
कडून ब्रिटीश सैन्यात महार बटालियन बंद करून महार योध्यांची भरती बंद करण्यात
आली.त्यानंतर ब्रिटीश प्रशासन व्यवस्था आपल्या ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात
अस्पृश्यता निर्माण करण्यासाठी ब्राह्मणी व्यावस्थेने मोठी मोहीम उघडली.त्यानी या
महार योध्यांची उपासमार कशी होईल याची तजवीज सुरु केली.ब्रिटीश सैन्यातील पहिली
महार योध्यांची भरती बंद करण्यात येऊन त्यांच्या हजारो एकर जमिनी ब्रिटीश
सरकारच्या माध्यमातून काढून घेतल्या.महार योध्यानी स्वराज्यात मोठ्या प्रमाणात
योगदान दिले होते.छत्रपती संभाजी महाराज यांच्या शाक्त धर्माच्या प्रचारात मोठे
योगदान दिलेले होते आणि समतावादी स्वराज्यात मोठा वाटा निर्माण केला होता.जो
पर्यंत इथला महार योध्दा संपविला जात नाही तो पर्यंत आपल्याला संपूर्ण भारत आपल्या
प्रशासकीय व्यावस्थेच्या अमलाखाली आणता येणार नाही याची पूर्ण जाणीव ब्राह्मणी
व्यवस्थेला झाली होती.त्यामुळे त्यानी ब्रिटीश सरकार यांच्या बरोबर राहून महार
योद्ध्यांच्या जमिनी १००% काढून घेण्याचा कायदा १८७४ मध्ये पारित करण्यात
आला.त्यामुळे खंडावर जगणारा महार योद्धा यांना खंड बंद झाला आणि त्याच्यावर
उपासमारीची वेळ निर्माण झाली.ह्याची जाण महात्मा ज्योतिबा फुले यांना झाली होती
कारण याच ब्राह्मणी व्यावस्थेने लपविलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि
विचार त्यानी १८६९ मध्ये शोधून काढले होते.ते विचार पुन्हा स्वराज्याच्या रयतेमध्ये
पोहोचावे यासाठी त्यांची जयंती उत्सव १८६९ मध्ये सुरु केला होता तेव्हा त्यांच्या
लक्षात आले की,स्वराज्यात महार योद्ध्यांचे मोठे योगदान आहे.आणि
स्वराज्यातील त्याचे योगदान संपविण्यासाठीच त्यांना अस्पृश्य घोषित करण्यात आले
आहे.कारण पूर्वीपासून ब्राह्मणी व्यवस्था या देशात वर्णाश्रम धर्माच्या माध्यमातून
ब्राह्मण क्षत्रिय आणि इतर शुद्र म्हणून त्यांची ही वर्ण व्यवस्था निर्माण केली
होती.ही ब्राह्मणी व्यवस्था छत्रपती शिवराय यांना शुद्र म्हणीत असत त्यामुळे
शुद्रातून अति शुद्र म्हणून या महार योद्ध्यांना अस्पृश्य महार घोषित करून त्यांना
सार्वजनिक जीवन व्यवस्थेतून बाहेर करण्यात आलेले होते.जसे सार्वजनिक ठिकाणी त्यानी
जमायचे नाही सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भरायचे नाही.असे प्रकारे मनुस्मृतीचे कायदे
अमल करण्यात त्यानी सुरुवात केली.स्वराज्यात महत्वाचे योगदान असलेला महार योद्धा
आज शुद्रातून अति शुद्र म्हणजे अस्पृश्य झाला होता.तेव्हा महार योध्याचे छत्रपती
शिवरायांच्या स्वराज्यातील महत्वाचे योगदान विचारात घेता महात्मा फुले यांनी २४
सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना करून स्वराज्याचा भगवा ध्वज
हातामध्ये घेतला.या चळवळीच्या विरोधात ब्राह्मणी व्यवस्थेने १८७५ साली आर्य सनातनी
हिंदू धर्माची स्थापना केली होती.१८८० मध्ये आपल्या वाड्यातील विहीर ह्या अस्पृश्य
महार योद्ध्यांच्या वंशजासाठी महात्मा फुले यांनी खुली केली होती.आणि ब्रिटीश
सरकारने या महार योध्यांची ब्राह्मणी व्यवस्थेच्या सांगण्यावरून काढून घेतलेली
जमीन परत करावी अशी मागणी लावून धरली होती.तेव्हा महात्मा फुले यांच्या कार्याला
यश आले आणि १८८४ ला वतन कायदा पास करून त्याचा साडेबारा टक्के परतावा म्हणून जमिनी
परत देण्यात आल्या.परंतु इथल्या महसुली प्रशासनात ब्राह्मणी व्यावस्थेचा शिरकाव
असल्यामुळे इथले कुळकर्णी यांनी बेकायदा असा फेरफार तयार केला की,नोकर वतन म्हणून ही जमीन महार योद्ध्यांना देण्यात आली आहे.अशा प्रकारे इथला
भूमीपुत्र स्वराज्याचा महार योद्धा अस्पृश्य होऊन गावचा नोकर झाला.बाळकृष्ण गंगाधर
टिळकांचा साल १८५६ मध्ये जन्म झाला होता ते १८८४ मध्ये २८ वर्षाचे होते हे आपण
याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.त्यांनी गोखले - आगरकर यांना बरोबर घेऊन पहिली हिंदू
महासभा १८८४ मध्ये आयोजित केली होती.मात्र महात्मा फुले जो पर्यंत जिवंत होते तो
पर्यंत त्यांना त्यांच्या मनसुब्यात यश मिळत नव्हते.१९९० मध्ये महात्मा ज्योतिबा
फुले यांचा मृत्यू झाला.त्यांचे मृत्यूनंतर १४ एप्रिल १८९१ मध्ये डॉ बाबसाहेब
आंबेडकर यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ महार योद्धा
होते.भीमरावांचे १ ते ४ पर्यंतचे शिक्षण सातारच्या छत्रपती प्रतापसिह भोसले यांनी
स्थापन केलेल्या शाळेमध्ये झाले होते.शिक्षण करीत असताना त्यांनी महात्मा ज्योतिबा
फुले समजावून घेतले आणि त्यांना गुरु मानले.कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू
महाराज आणि बडोद्याचे गायकवाड यांचेकडून त्यांना काही शिवरायांच्या स्वराज्यातील
माहिती मिळाली होती. स्वराज्याच्या घराणेशाही बरोबर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे घरोब्याचे संबध
होते.त्यामुळे शिवरायंचे स्वराज्य आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य त्यानी
समजवून घेतले त्यामुळे त्यांना समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज
यांच्या कार्याचा आभ्यास झाला होता.परंतु देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेचे
षड्यंत्र त्यांना कळून चुकले होते.त्यांना कायस्थ प्रभू ब्राह्मणांची अवस्था देखील
माहित झाली होती.कायस्थ प्रभू ब्राहमणांना बरोबर घेऊन डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी
२४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले होते.समता सैनिक दलाच्या
सदस्याच्या डोक्यावर निळी टोपी प्रधान करून त्यांच्या हातामध्ये स्वराज्याचा भगवा
ध्वज देण्यात आला होता. डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना शिवराय आणि शंभूराजे यांचे
स्वराज्य माहित होते परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने महार योध्यांची केलेली हालाखीची
परिस्थिती आणि इथला अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांची शुद्र म्हणून दिलेली
वागणूक माहित होती.त्यामुळे इथल्या अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांच्यामध्ये
जातीयता निर्माण करून त्यांच्या अज्ञानपणाचा आणि भावनिक पणाचा फायदा ब्राह्मणी
व्यवस्थेने घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले.इथला अस्पृश्य महार हा इतिहासतील बौध्द
महार योद्धा असल्याचे आणि हा संपूर्ण भारत देश बौध्द असल्याचे त्यांचे लक्षात
आले.तेव्हा त्यानी अस्पृश्येतेच्या विरोधात आणि शुद्र्तेच्या विरोधात अठरा
अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांच्या स्वाभिमानाचा लढा त्यानी समतेचा लढा म्हणून
सुरु केला.परंतु या भगव्या चळवळीला कॉनटर करण्यासाठी कॉंग्रेस मधून हेगडेवार बाहेर
पडले आणि त्यांनी स्वयंसेवक (आरएसएस) ही संघटना स्थापन केली परंतु भगवा ध्वज हा
समता सैनिक दलाकडे होता तो त्यांच्याकडे गेला कसा असा प्रश्न मला उपस्थित झालेला
आहे.अस्पृश्य महार यांना स्वत:ची ओळख निर्माण व्हावी यासाठी डॉ बाबसाहेब आंबेडकर
१९२७ मध्ये भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास
भेट देऊन तेथील महार योद्ध्यांना अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार योद्ध्यांना
मानवंदना देऊन त्यानी “जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही” असे उद्गार काढून १९२७ मध्ये महाड येथे चवदार तळ्याचा
सत्याग्रहांच्या हातामध्ये स्वराज्याचा भगवा ध्वज हातामध्ये घेऊन जय भवानी जय
शिवाजी अशा घोषणा देण्यास सांगितल्या.कायस्थ प्रभू ब्राह्मण यांना बरोबर घेऊन
स्वराज्याची राजधानी असलेल्या परिसरात १९२७ मध्ये मनुस्मृतीचे दहन केले.ब्राह्मणी
व्यवस्थेने अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन
त्यांना या सत्याग्रही यांचेवर हल्ला चढविला पण हल्लेखोर यांचे हातामध्ये भगवा
ध्वज नव्हता हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण भगवा ध्वज सत्याग्रहांच्या
हातामध्ये होता त्यामुळे हा हल्ला स्वराज्याच्या भगव्या ध्वजावर करण्यात आलेला
होता त्यामुळे इथेही आम्ही देशप्रेमीच होतो.ब्रिटीश सरकारला ज्यावेळेस डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी चवदार तळ्या संदर्भात जे निवेदन दिले त्या लेटरहेड वर जय भवानी जय
शिवाजी असे लिहिले होते.त्यामुळे आम्ही इथही देशप्रेमीच होतो हे आपण लक्षात घेतले
पाहिजे.१९२७ काळामध्ये ब्रिटीश सरकारने भारत स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा करून
सायमन आयोगाची स्थापना केली होती आणि सायमन आयोगाच्या माध्यमातून १९३० ला इंग्लंड
मध्ये पहिली गोलमेज परिषद आयोजित केली होती.या परिषदेत डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी
प्रतिनिधित्व करून भारत स्वतंत्र चळवळीचे नेतृत्व करून भारतीयांच्या मागण्या
त्यानी ब्रिटीश सरकार ठेवल्या होत्या.यानिमिताने कॉग्रेसने लाहोर मध्ये भारत
स्वतंत्र उत्सव साजरा केला होता.त्यामुळे येथेही डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे
देशप्रेम दिसून येते.परंतु कॉंग्रेसचे नेतृत्व करीत असलेले मोहन करमचंद गांधी
यांना हे पटले नाही.त्यानी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना विरोध करीत संपूर्ण भारत देश
त्यांच्या विरोधात नेण्याचा प्रयत्न सुरू केले कारण स्वतंत्र चळवळीत त्यांना डॉ
बाबसाहेब आंबेडकर यांना श्रेठत्व द्यायचे नव्हते.अखेर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी
आपले कर्तुत्वाच्या जोरावर निवडणुकीच्या राजकारणात आपले यश प्राप्त करीत स्वतंत्र
भारताच्या घटना समितीमध्ये दाखल होऊन त्यानी राज्यघटना तयार करून ती १९४९ मध्ये
भारताला प्रधान करून संपूर्ण १९५० मध्ये भारतामध्ये समता प्रस्थापित केली.आणि
स्वतंत्र भारताचा ध्वज भगवा असावा असा प्रस्थाव त्यानी स्वतंत्र भारताकडे सादर
केला होता परंतु तो इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारला हेही आपण याठिकाणी लक्षात
घेतेले पाहिजे.यावरून असे दिसते की,बौध्द महार योद्धा देश्प्रेमीच होता.दुसरा बाजीराव
पेशव्याने रयतेचे अधिकार इंग्रजां १८०२ मध्ये देऊन त्यांना गुलाम केले होते.१५०
वर्ष इंग्रजांनी आपल्याला गुलाम केले होते.भारताच्या राज्यघटनेनुसार स्वराज्याच्या
रयतेला १९५२ च्या पहिल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले हक्क व अधिकार प्राप्त
झाल्यामुळे त्याने पहिले मतदान करून स्वत:चा स्वतंत्र झाल्याचा आंनद व्यक्त
केला.तेव्हा एकंदरीत संपूर्ण घडामोडी पहाता त्याच्या नोंदी पाहता इतिहासातील बौध्द
महार योध्दा देशप्रेमी होता....आणि आजही बौध्द महार योद्धा देशप्रेमीच
आहे.....!
पेशवे-होळकर यांचे १८०२ मध्ये हडपसर येथे झालेल्या युध्दामुळे पेशव्याला ब्रिटीशांचे मांडलिक व्हावे लागले...!
मला दुसऱ्या बाजीराव पेशव्यापासून सापडलेला इतिहास आणि त्याच्या सनावळी नुसार घटनाक्रम मी आपल्या समोर मांडीत आहे --:
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे २७ आक्टोंबर १७९५ मध्ये निधन झाले.याकाळात खर्ड्याचे युध्द झाले होते मराठे हे युध्द हरले होते कळंब येथील महार योध्दा सिद्धनाक महार याने पटवर्धन याचा जीव वाचविला आणि मराठ्यांची हरलेली लढाई या सिद्धनाक महार याने जिंकून दिलेली होती याचीही इतिहासात नोंद आहे.पहिल्या बाजीराव पेशव्याच्या निधना नंतर ५ डिसेंबर १७९६ मध्ये श्रीमंत पेशवे बाजीराव रघुनाथ हे दुसरा बाजीराव पेशवेपदी विराजमान झाले होते.महिन्या भरातच त्यांची व्दितीय पत्नी सरस्वतीबाई यांचे ६ जानेवारी १७९७ मध्ये निधन झाले.नाना फडवनीस यांचा बाजीराव पेशवे अत्यंत आदर करीत होते.परंतु त्यांचे आणि शिंदे यांचे कधी जमले नाही तेव्हा त्याला ताब्यात घेऊन डांबून ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी त्यांचा फ्रेंच सेनापती मेजर फिलोज याला दिले होते त्याने ३१ डिसेंबर १७९७ मध्ये नाना फडवणीस याला अटक करून अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये तुरुंगात डांबून ठेवले होती..बाजीराव पेशव्यानी नाना फडवणीस यांची ८ जून १७९८ मध्ये सन्मानपूर्वक शिंदे यांचेकडून सुटका करून घेतली होती.२३ एप्रिल १८०० मध्ये बाजीराव यांनी अमृतरावांची “दिवाण” म्हणून नेमणूक केली होती परंतु बाजीराव यांचे बरोबर त्यांचे जमले नसल्याने २० जुलै १८०० मध्ये अमृतराव कारभार सोडून जुन्नरला निघून गेले.१६ एप्रिल १८०१ मध्ये बाजीराव यांनी शनिवार वाड्यामध्ये विठोजी होळकर यांची फसवणूक करून त्यांना जेरबंद करून २०० छड्या मारून हत्तीच्या पायी देऊन त्यांची हत्या केली होती.याची खबर यशवंतराव होळकर यांना मिळाली त्याचा त्यांना खूप राग आला आणि त्यानी बाजीराव पेशाव्यावर हल्ला करण्याचे ठरविले त्यानंतर २५ आक्टोंबर १८०२ मध्ये हडपसरच्या मैदानात पेशवे – होळकर असे मोठे युध्द झाले.बाजीराव हे युध्द हरला जीवाच्या भितेने तो पुण्यातून पळून गेला.बाजीराव पेशव्याच्या लक्षात आले की,आता आपले राज्य संपले आहे आणि आपला जीव वाचवायचा असेल तर नक्कीच काहीतरी दुसरा विचार करावा लागेल. तेव्हा तो ८ डिसेंबर १८०२ मध्ये वसईला आला तेथून तो मुंबईकडे रवाना झाला आणि १० डिसेंबर १८०२ मध्ये मुंबई मध्ये गव्हर्नर डंकन याला भेटला आणि स्वराज्य त्याच्या स्वाधीन केले.डंकन याने पुण्याचा रेसिडेंट लेफ्टनंट कर्नल बॅरी क्लोज याला बोलावून बाजीराव याचे बरोबर वाटाघाटी करण्यास सांगितले.३१ डिसेंबर १८०२ मध्ये वसई येथे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्या मध्ये तह झाला. मार्च १८०३ मध्ये यशवंत होळकर पुणे सोडून उत्तरेकडे रवाना झाले.१३ मे १८०३ मध्ये सर आर्थर वेलस्ली याने बाजीराव पेशव्यांना “हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहादर” अशी उपाधी देऊन पुन्हा पेशवाईच्या मनसदीवर बसविले....आणि आपले मांडलिक केले.मांडलिक पेशव्याने आपल्या सेनेची जबाबदारी ही बापू गोखले याचेवर सोपविली होती.Sunday, February 23, 2020
आरएसएसवाल्या प्रशिक्षित गुंडाना ठोकण्यासाठी आम्ही तयार आहोत....! प्रकाश आंबेडकर
विषय असा आहे की आज कोणाताही समाज असो त्याला
सीएए – एनपीआर – एनआरसी ची दहशत आरएसएस निर्माण करू पहात आहे.त्यामध्ये सर्वात
जास्त दहशत कोणाला झाली असेल तर ती इथल्या मुस्लीम समाजाला झालेली आहे. आज जन्म
आणि मृत्यू नोंद कार्यालयात मोठ्या प्रमाणात हा समाज गर्दी करू लागला आहे.कारण
त्याला स्पष्टपणे कळाले आहे की,शेवटी या कायद्याचा आपल्यावर हल्ला हा ठरलेला
आहे.आणि तो हल्ला होणारच आहे अशी मानसिकता त्यांची झालेली आहे.त्यामुळे इथल्या भारत
देशाचे संविधान धोक्यात आलेले आहे यात कोणालाही दुमत असायचे कारण नाही असे मी
मानतो.ही आरएसएसची व्दिराष्ट्र संकल्पना होती आणि ती १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान
स्वतंत्र देश झाल्यामुळे आणि त्यांचा ध्वज फडकल्यामुळे यशस्वी झाल्याने
त्यावेळच्या आरएसएस वाल्यांनी आपल्या घरी खीर बनवून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा
केला होता.आणि १५ ऑगस्ट १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाल्यामुळे आणि त्याला डॉ
बाबसाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू होणार हे माहित झाले असल्यामुळे त्याने तो
स्वतंत्र दिवस काळा दिवस म्हणून पाळला असल्याचे पुरावे असल्याचे आदरणीय प्रकाश
आंबेडकर यांनी सांगितलेली आहे.आणि असे लोक सध्या भारताचे संविधान बदलण्यासाठी
मोठ्या प्रमाणात सीएए – एनपीआर – एनआरसी कायद्याचा अमल व्हावा म्हणून दहशत माजवीत
आहेत.प्रश्न असा आहे की इथला हिंदू असणाऱ्या समाजाची हे लोक दिशाभूल करीत असताना
दिसत आहे.नेहमी अंधश्रध्दा म्हणून जीवन व्यथित करणारा हा समाज त्याचा बळी पडत
आहे.त्याला एनपीआर कायद्याच्या माध्यमातून त्याचे स्वत:चे नागरिकत्व सिध्द करावे
लागणार आहे याची जाण त्याला होण्यास तयार नाही.ज्यावेळी त्याला याची जाण होणार आहे
तो पर्यंत त्याच्या हातातून वेळ निघून गेलेली असणार आहे.आज तो या आरएसएस वाल्यांचे
समर्थन करीत फिरत जरी असला तरी या हल्ल्याचा तो उद्या बळी ठरणार आहे याची त्याला
कल्पना नाहीये.परंतु विश्वास देण्यास इतिहासापासून वैदिक धर्म पंडीत हे हुशार आहेत
याची त्याला जाण होत नाही.
हिंदू राष्ट्र संकल्पना ही बाळकृष्ण गंगाधर टिळक यांची होती त्यामुळेच
त्यांनी साल १८८४ मध्ये पहिली हिंदू महासभा बोलाविलेली होती.कोकणस्थ ब्राह्मणानी
घाटाखालची गणपती ही देवता घाटावरती आणलेली आहे.आणि त्या देवतेला बहुजनांच्या
माथावरती साल १९९२ ला भाऊ रंगारीच्या माध्यमातून बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी
बसविलेली आहे.तेव्हापासून मुस्लीम व्देष पेरण्याचे कार्य जोरात सुरु झाले होते या
संदर्भात इतिहासकार आणि संशोधक यांचे दाखले उपलब्ध होत असतात.यामध्ये प्रबोधनकार
ठाकरे यांचे नाव प्रामुख्याने आदराने पुढे येते. प्रबोधनकार ठाकरे यांनी कधीही
गणपती ही देवता बहुजन समाजाने पुजली नाही किंवा भजली नाही असे सांगितलेले आहे.त्या
प्रमाणे त्यानीही कधी गणपती ही देवता पुजली नाही किंवा भजली नाही.कार्ल्याच्या
लेणी मधील महामायेला एकविरा म्हणून आपले कुलदैवत निर्माण करून तिचे पूजन केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी वैदिक धर्म पंडितांनी छत्रपती शिवाजी महाराज
यांची लपविलेली समाधी शोधून स्वराज्य समोर आणले आहे.विषमतेच्या मनुस्मृतीच्या विषात
डुबविलेली समता बाहेर काढून त्याची पेरणी जन सामान्य माणसात केलेली आहे.अशा विषमतेच्या
मनुस्मृतीचे दहन केली पाहिजे असे ते म्हणाले होते.अशी समता प्रस्थापित करण्यासाठी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी साल १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले होते. महात्मा
ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून समोर आलेले स्वराज्य आणि स्वराज्यातील समतावादी
बुध्दप्रेमी छत्रपती संभाजी महाराज यांची विषमतेच्या मनुस्मृती प्रमाणे झालेली
हत्या आणि त्या हत्येचा घेतलेला बदला म्हणजे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास भेट
देऊन त्या विषमतेच्या मनुस्मृतीचे दहन करून स्वतंत्र भारताला संविधान दिलेले आहे.
अशा स्वतंत्र भारताला दिलेली समता टिकविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांनी बुध्द धम्माची (विचार) दीक्षा घेऊन ही समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी ही
२२ प्रतिज्ञातील क्रमांक ९ व १० प्रमाणे बौध्द धम्मीय व्यक्तीला दिलेली आहे.आणि तो
बौध्द धम्मीय व्यक्ती ही समता टिकविण्यासाठी आजही संघर्ष करीत असताना आपल्याला
पाह्यला मिळत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय
संविधानाच्या माध्यमातून दिलेली समता उध्वस्त करण्याचा कायदा या आरएसएस वाल्यांनी
सीएए – एनपीआर – एनआरसी च्या माध्यमातून बेकायदेशीरपणे आणलेला आहे.आणि तो लागू करण्यासाठी
आरएसएस चे गुंड दशहत माजवीत आहेत.त्या प्रकारचे ट्रेनिंग त्यांना आरएसएसच्या
माध्यमातून देण्यात येत आहे.परंतु तो आरएसएसवादी हे विसरत आहे की,इतिहास हा नेहमी
महार योध्यानी गाजविलेला आहे.आणि आजही या महार योध्यांचा भीमा कोरेगावचा विजयस्तंभ
प्रेरणा देत आहे.त्यामुळे स्वराज्य हे अलुतेदार लढवय्या योध्याचे आहे.छत्रपती
शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीर मावळ्यांचे आहे.एखाद्या
गुंडाने समाजात दहशत माजविली तर समाज एकत्र येऊन त्या गुंडाला ठोकून टाकतो.त्या
प्रमाणे या आरएसएसवाल्या प्रशिक्षित गुंडाना ठोकण्यासाठी आम्ही तयार आहोत असे
आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी नुकत्याच एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले
आहे.त्यामुळे लढाई ही समतेची आहे आणि शेवटच्या वळणावर आलेली आहे याची जाण आज
इथल्या वीर योद्ध्यांच्या वंशजांना झालेली आहे.
Saturday, January 4, 2020
समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी हि बौध्द धम्मिय व्यक्तीचीच...आज मला भीमा कोरेगावचा लढा आठवतोय.....! राजेश खडके बहुजन मोर्चा
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटले की भारताच्या
प्रत्येक नागरिकाला आपल्या मुलभूत अधिकाराची आठवण होते हे सत्य कोणीही लपवून ठेवू
शकत नाही.समता बंधुता न्याय यावर आधारित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना
तयार केली आहे हे कोणाला सांगायची गरज नाही असे मला वाटते.परंतु हे अधिकार देत
असताना त्यांना किती कष्ट करावे लागले आहे आणि किती मोठा त्याग करावा लागला आहे
याची कल्पना आज प्रत्येक भीम अनुयायांना आहे.त्यांचे अनंत उपकार या भारताच्या
प्रत्येक नागरिकावर आहेत हे विसरून चालणार नाही.परंतु या सर्व बाबीचा उपभोग आपण
घेत आहोत हे इथल्या मनुस्मृती समर्थकांना कधीच रुचले नाही आणि रुचत नाहीये.म्हणून
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टातून आणि त्यागातून उभी राहिलेली राज्यघटना आणि
त्या राज्यघटनेतून उभे राहिलेली लोकशाही बुडविण्याचे षड्यंत्र सुरु करून पुन्हा
मनुस्मृती आणण्याचा घाट इथल्या वैधिक धर्म पंडित यांनी सुरू केलेला आहे.आणि त्याचे
उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे नव्याने लागू झालेला एनपीआर आणि एनआरसी कायदा होय.ह्या
कायद्याची अमलबजावणी झाल्यास इथला एससी,एसटी आणि ओबीसी हा व्दितीय श्रेणी मध्ये
मोडला जाईल आणि राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार म्हणजे “माणूस” म्हणून त्याचे
अस्तित्व नष्ट होऊन जाईल.आणि पुन्हा मनुस्मृती लागू होऊन तो गुलाम बनणार आहे याची
मला जाणीव झाली आहे.म्हणून आज मला भीमा कोरेगावच्या लढ्याची आठवण होत आहे.
काय आहे भीमा कोरेगावचा लढा आणि या विजयस्तंभाच्या महार योद्ध्यांना का
दिली जाते “मानवंदना” हे समजून घ्यायची
पुन्हा वेळ आलेली आहे.भीमा कोरेगाव हा ऐतिहासिक लढा आहे त्याला खूप मोठा इतिहास
आहे आणि हा इतिहास तुम्हाला स्वराज्याची आठवण करून देतो आणि बुध्दप्रेमी छत्रपती
संभाजी महाराज यांची आठवण करून देत्तो म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या
ठिकाणी भेट देऊन म्हणाले होते की “जो
इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही” या त्यांच्या वाक्याला आपण स्वीकारून
दरवर्षी या महार योद्ध्यांना मानवंदना द्यायला येतो.
छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी “बुधभूषण” नावाचा
ग्रंथ लिहून विद्वानांचा सन्मान केला आहे.वैदिक धर्म पंडित यांचेकडून केलेला वैदिक
पद्धतीचा राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथ पद्धतीत आपले वडील
छत्रपती शिवाजी महाराज यांना करावयास लावून वैदिक धर्म पंडितांचे धार्मिक अस्तित्व
झुगारून लावले आहे.वेरूळ गाव असल्यामुळे संभाजी महाराज यांनी बुध्द विचार (धम्म)
स्विकारलेला होता.त्यामुळे त्यांनी स्वराज्यात बुद्धांचे विचार पोहचविण्याचे कार्य
केले आहे.त्याच्या या कार्यास छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना मोलाचे सहकार्य
केल्याची इतिहासात नोंद आहे.याची धास्ती वैधिक धर्म पंडितांनी घेतली होती म्हणून
त्यांनी स्वराज्याच्या गद्दारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची
विषप्रयोग करून हत्या करून शंभूराजे यांना जेरबंद करून त्यांना मृत्यूदंड देण्याची
त्यांची योजना फसली होती.शंभूराजे यांनी बुध्द विचाराने (धम्म) शाक्त पंथ पद्धतीत
राज्यभिषेक करून त्यानी त्यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानवर कोरून घेतली.आणि त्या
गद्दारांना आणि दीडशे वैदिक धर्म पंडितांना मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे याचीही
इतिहासात नोंद आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या अशा कार्यामुळे वैदिक धर्म पंडित घाबरले
होते.वैदिक धर्म अडचणीत आला असल्याची त्यांची खात्री पटली आणि त्यानी
औरंगाजेबाच्या सहकार्याने छत्रपती संभाजी महाराज यांना काही गद्दारांना बरोबर घेऊन
त्यांची हत्या करून स्वराज्य संपवून पुन्हा वैदिक धर्म उभा करण्याचे षड्यंत्र
त्यांनी आखले होते.आणि श्रुंगारपुरातून छत्रपती संभाजी महाराज यांना जेरबंद करून
स्वराज्यातून ३८ दिवसांची धिंड काढीत ज्या ठिकाणी शहाजीराजे यांनी स्वराज्याच्या
संकल्पनेची पेरणी केली.त्याठिकाणी म्हणजे पूर्वीचे नागरवास गाव स्वराज्याच्या
संकल्पने नंतर त्याचे नामकरण तुळापुर झाले तेथे आणून त्यांच्या शरीराचे तुकडे
तुकडे करून ते फेकून देऊन त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात बंदी घातली.परंतु वढू
गावातील महार योध्दा गोविंद महार हे शाक्त पंथ (बुध्द) विचारांचे होते.त्यांनी तो
बंदी आदेश मोडीत काढीत छत्रपती संभाजी महाराज यांचेवर अंत्यसंस्कार करून त्यांची
समाधी बांधली आहे.अशा त्या गोविंद महार योद्ध्याची त्यांच्या मृत्यू नंतर त्याठिकाणी
समाधी बांधली आहे.आज या महार योद्ध्याच्या
समाधीचे दर्शन घेण्यासाठी पूर्वीचा महार योध्दा आणि आजचा बौध्द धम्म विचारांचा
व्यक्ती १ जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना करून त्यांच्या समाधीचे दर्शन तर
घेतोच मात्र छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन करण्यास तो विसरत नाही हे तेवढेच सत्य
आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर वैदिक धर्म पंडित यांनी
स्वराज्य संपवून टाकले.आणि लाल महालावर ताबा मारून त्याचा शनिवारवाडा करून
स्वराज्य संपवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना आणि छत्रपती संभाजी
महाराज यांचे शाक्त पंथीय (बुध्द विचार) यांचेपासून रयतेला दूर नेऊन जातीयव्यवस्था
उभी करून पेशवाई निर्माण केली.मनुस्मृती प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची
हत्या झाली होती त्याचा बदला म्हणून आणि जातीयवादी पेशवाई संपविण्यासाठी सातारा
गादीचा सरदार वीर महार योध्दा सिद्धनाक महार याने पेशवाई बरोबर भीमा कोरेगाव
याठिकाणी युध्द करून पेशवाईचा अंत केला आहे.अशा महार योध्यांची शौर्य गाथा म्हणून
जो विजयस्तंभ उभारला आहे.त्याठिकाणी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन मानवंदना
देऊन पुण्यातील गायकवाड वाड्यात बैठक घेऊन महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देऊन यशस्वी केला आहे.त्यानंतर त्यानी
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात त्या मनुस्मृतीचे दहन करून स्वतंत्र
भारताची राज्यघटना लिहून पुन्हा एकदा समतेचे राज्य डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी उभे
केल आहे.आणि ती समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी बौध्द धम्म (विचार) स्विकारून
बावीस प्रतिज्ञा घेतल्या आहेत.त्यांच्या बरोबर लाखो भीम अनुयायी यांनी त्या
प्रतिज्ञा घेतल्या आहेत.त्यापैकी ९ वी आणि १० वी प्रतिज्ञा असे सांगते की,”माणूस
हा समान आहे असे मी मानतो” म्हणून “मी समता प्रस्थापित करण्याचा करेन” त्यामुळे
अशी समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी हि प्रत्येक बौध्द धम्मीय व्यक्तीची
आहे.असे प्रकारचे मोठे कार्य आदरणीय राजरत्न आंबेडकर यांनी संपूर्ण देशात जगाच्या
माध्यमातून केले आहे.असे कार्य त्यानी करू नये म्हणून आजचे वैदिक धर्म पंडित
त्यांना अडसर निर्माण करीत आहे.
आजची
परिस्थिती पाहिली तर संपूर्ण देशात भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे.एनपीआर आणि
एनआरसी असंवैधानिक कायदा मंजूर करून तो भारतावर लादण्याचा प्रयत्न इथली वैदिक धर्म
मंडळी करीत आहे.या कायद्याच्या माध्यमातून स्वराज्यातील अलुतेदार याला पुन्हा एकदा
व्दितीय श्रेणीमध्ये टाकून गुलाम बनविण्याचे कार्य जोरात सुरु झाले आहे.छत्रपती
संभाजी महाराज यांची हत्या करून स्वराज्य संपविताना आम्हाला औरंगाजेब दाखविला
होता.आता हे आपल्याला दुसऱ्या जातीचा आणि दुसऱ्या धर्माचा मोदी-शहा यांच्या
माध्यमातून मुसलमान दाखवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभे केलेले स्वराज्य संपवीत
आहेत.त्यामुळे हा लढा मोदी-शहा यांच्या विरोधात नसून पुन्हा पेशवाईच्या विरोधात
आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.म्हणून आज मला भीमा कोरेगावच्या लढ्याची आठवण होत
आहे.
Subscribe to:
Posts (Atom)




