Wednesday, May 13, 2020

प्रधानमंत्र्यानी जाहीर केलेल्या वीस लाख कोटी रुपये संदर्भात कॉंग्रेसच्या सोनिया-राहुल प्रश्न करतील काय...? देशाचे आर्थिक तज्ञ मनमोहनसिंग व पी चिंदबरम शांत कसे...? राजेश खडके सकल मराठी समाज


        प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या भाषणाची सुरुवात जागतिक मानवकल्याणावर झाली...आणि संपूर्ण भारत या जागतिक मानवकल्याण अभियानात कसा सहभागी झाला हे त्यानी ठासून सांगत असताना त्यांनी देशातील गोरगरीब जनतेचे कसे हाल झाले आणि त्यानी हे हाल मानवकल्याण संदर्भात प्रामाणिकपणे कसे सोसले हे देखील आवर्जून सांगितलेले आहे.परंतु हे सांगत असताना त्यांनी जुमलेबाजी सोडली असल्याचे चित्र मात्र कोठे दिसले नाही हे मी आवर्जून सांगेन...त्याचे कारण असे आहे की देशातील जीडीपी शुन्यावरून खाली आलेला आहे....असे असताना नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला आत्मनिर्भर भारत अभियान योजना दिलेली आहे....आत्मनिर्भरता काय हे तुम्हाला सर्वांना माहित आहे असे मी मानतो.एखाद्या व्यक्तीला कोणेही मदत करत नाही तेव्हा तो आपल्या स्वत:ची कामे स्वत: करतो त्याला आत्मनिर्भरता म्हटले जाते.मग मला असा प्रश्न पडला आहे भारत देशाला जागतिक पातळीवर इतर देशांनी नाकरलेले आहे काय...? इतर देश भारताला सहकार्य करणार नाही काय...? म्हणून आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे काय...? असे बरेच प्रश्न तुम्हालाही उपस्थित होत असतील असे मला वाटते.
      भारताचा जीडीपी आज शून्याच्या खाली येऊन पोहचला आहे...अशा परीस्थित भारताला कोणीही कर्ज देऊ शकत नाही...भारताचे बजट हे साडेतेरा लाख कोटी आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहे असे असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारत अभियान योजनेसाठी वीस लाख कोटीचे पॅकेज कशाच्या आधारवर जाहीर करतात असा प्रश्न माझ्यासह अनेकाना पडलेला आहे.मग नरेंद्र मोदी वीस लाख कोटी रुपये आणणार कोठून...? हे त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे असे माझे म्हणणे आहे...आणि जनतेने असा प्रश्न केलाच पाहिजे....नाही तरी देशतील बऱ्याच सरकारी कंपन्या मोदी यांनी विकल्याच आहे हे तर सर्वांना माहित आहे....मग हे वीस लाख कोटी रुपयासाठी काय विकले....? आणि कोणाला विकले...? असा प्रश्न मला उपस्थित होत आहे.कारण त्या शिवाय तुम्हाल वीस लाख कोटी रुपये कोणी देणार नाहीये.मला तर कधी कधी असा प्रश्न पडतो की, मोदी यांनी देशातील सोन्याची खाण तर कोणाला विकलेली तर नाही नां...आता हा विचार जनतेने करायला हवा.अशा परिस्थितीत देशातील विरोधी पक्ष कॉंग्रेस शांत कसा काय बसला आहे...? सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रश्न विचारताना का दिसत नाही....? देशाचे वाटोळे होत असताना हे दोघे मायलेक आपला चेहरा कोठे दडवून बसले आहेत...? आता असा प्रश्न लोक विचारू लागलेले आहेत.
      भारतीय जनता पार्टीकडे यशवंत सिन्हा सारखा आर्थिक तज्ञ असणारा चेहरा होता त्याचा उपयोग मोदी सरकारने करवून घेतला नसल्याचे चित्र घसरलेल्या जीडीपीमुळे दिसत आहे.तसेच कॉंग्रेसमध्ये मनमोहनसिंग व पी चिंदबरम सारखे आर्थिक तज्ञ असताना या वीस लाख कोटी रुपये संदर्भात प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही.मग कॉंग्रेसने देशाला वाऱ्यावर सोडले आहे काय...? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.

Saturday, May 9, 2020

शरद पवार साहेब मलाही विधान परिषदेसाठी अर्ज करायचा होता....पण काय करू संचारबंदी असल्यामुळे मी घराच्या बाहेर पडू शकत नाही....!



          विषय असा आहे की,संपूर्ण देशात आज लॉक डाऊनचा सत्तेचाळीसावा दिवस आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची २८ मे ला मुदत संपत आहे.त्यामुळे घटनेप्रमाणे मुख्यमंत्री पदावर त्यांना राहण्यासाठी आमदार होणे गरजेचे आहे.परंतु लॉक डाऊन असल्यामुळे जनतेमधून त्यांना निवडणूक लढविता आलेली नाही म्हणून राज्यपाल नियुक्त जागेसाठी मंत्री मंडळाकडून ठराव करण्यात येऊन उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून नियुक्ती करावी अशी विनंती राज्यपाल महोदय यांना करण्यात आलेली होती.परंतु राज्यपाल महोदयांनी त्यांची निवड न करण्याचा निर्णय घेऊन निवडणूक लढवून येण्यास सांगितलेले होते.त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अमित शहा व नरेंद्र मोदी यांचे बरोबर चर्चा करून मार्ग काढण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले आणि नऊ विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने लॉक डाऊनच्या काळात जाहीर केला आहे.मग या नऊ जागासाठी महाविकास आघाडीचे....तर नऊ जागासाठी भाजपाचे उमदेवार जाहीर झालेले नाहीत.जर भाजपाने संपूर्ण नऊ जागेसाठी उमेदवार दिले आणि महाविकास आघाडीने संपूर्ण नऊ जागेसाठी उमेदवार दिले तर ही निवडणूक संविधानास अनसरून लोकशाही पद्धतीत होईल अन्यथा भाजप व कॉंग्रेस एकत्र येऊन देश चालवीत आहेत असे दिसून येईल.
   निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम लॉक डाऊनमुळे माझ्या पर्यंत येऊन पोहचला नाही.कारण मलाही विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा होता.परंतु संचारबंदी लागू असल्यामुळे मी उमेदवारीचा अर्ज दाखल करू शकत नाही.म्हणून मी म्हणतो शरद पवार साहेब मलाही विधान परिषदेसाठी अर्ज करायचा होता....पण काय करू संचारबंदी असल्यामुळे मी घराच्या बाहेर पडू शकत नाही....!

Thursday, May 7, 2020

जनेऊधारी राहुल गांधीने केले देशाचे वाटोळे....! संविधान विरोधी कॉंग्रेसच्या विरोधात आता शंख फुकला पाहिजे....! राजेश खडके सकल मराठी समाज



             विषय असा आहे की २०१४-२०१९ ची लोकसभा-विधानसभा निवडणूक पाहिली तर काही गोष्टी समोर येताना दिसत आहे.आणि त्या समोर येणाऱ्या गोष्टीकडे पाहिले तर आश्चर्याचे धक्के आपल्याला बसल्या शिवाय रहात नाही.त्याचे कारण असे आहे की पुरोगामी असणाऱ्या कॉंग्रेसचा चेहरा हिंदुत्ववादी वाटण्यासाठी राहुल गांधी यांनी आरएसएस कॉंग्रेसचे सल्लागार यांचे एकूण आपण धर्माने हिंदू धर्मीय असल्याचे साऱ्या जगाला दाखविण्यासाठी त्यांनी जानवे प्रधान केले होते.त्यानंतर राहुल गांधी यांचे नाव जनेवूधारी राहुल गांधी पडले होते.त्यामुळे राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे पुरोगामित्व संपविण्यासाठी तसेच देशातील लोकशाही प्रदान संविधान संपविण्यासाठी नव्याने मनुस्मृतीचा कायदा अमलात येण्यासाठीच राहुल गांधीने जानवे धरण केले असल्याचे जाणकार यांचे म्हणणे आहे.परंतु जाणकार यांचे म्हणणे सत्य आहे काय...? असा विचार केला तर ते नाकारता येत नाही. २०१९ ची लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसने घडविलेल्या घटना जर आपण पाहिल्या आणि त्या जर समजून घेतल्या तर निश्चितच भारताची लोकशाही धोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न जनेवूधारी राहुल कॉंग्रेसने केल्याचे दिसून येते.जनेवूधारी राहुल कॉंग्रेसने कोणत्याही प्रादेशिक पक्षाला बरोबर न घेता या निवडणूक लढविलेल्या आहेत आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या राज्यातील शेवटच्या क्षणा पर्यंत वंचित बहुजन आघाडी बरोबर राहुल कॉंग्रेसने युती केली नाही.त्याचा परिणाम संपूर्ण देशात बहुमतात पुन्हा मोदी सरकार निवडून आणण्यात जनेवूधारी राहुल गांधी यांनी महत्वाची भुमिका बजाविलेली आहे.२०१४ चे मोदी सरकार आणि २०१९ चे मोदी सरकारच्या माध्यमातून इथली लोकशाही धोक्यात आणून इथले संविधान संपविण्याच्या कटातील मुख्य सूत्रधार जनेवूधारी राहुल गांधी असल्याच्या आता चर्चा जनतेमध्ये घडू लागल्या आहेत.आता देशाला गरज असताना जनेवूधारी राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन देशाला व देशाच्या जनतेला संकटात टाकून पळून गेल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.म्हणून मी म्हणतो जनेऊधारी राहुल गांधीने केले देशाचे वाटोळे....! संविधान विरोधी कॉंग्रेसच्या विरोधात आता शंख फुकला पाहिजे....!(क्रमश😊

सोनिया-राहुल गांधीच्या माध्यमातून देशात पुरोगामी विचारांची कॉंग्रेस संपुष्टात आणली जात आहे...? राजेश खडके सकल मराठी समाज


       प्रथम आपणा सर्वांना बुध्द पौर्णिमेच्या हाद्रिक हार्दिक शुभेच्छा.....! आज आपल्यासाठी सिंधूसंस्कृती पासून ते आजचा भारतातील विद्वानांचा विशेष सन्मान करण्यासाठीचा दिवस आहे असे मी मानतो.त्या सर्वांचा सन्मान करून पुढे मी माझे मत व्यक्त करीत आहे आणि ते म्हणजे भारताचे संविधान आणि लोकशाही ही आरएसएस काँग्रेसी लोकांनी धोक्यात आणली आहे असे आता जवळ जवळ भारत सोडून गेलेल्या सोनिया-राहुल गांधी यांचेवरून स्पष्ट दिसत आहे.त्याला तसे कारणही आहे आपण जर कॉंग्रेसचा इतिहास तपासला तर ते आपल्याला संदर्भांसहित उदाहरणासह दिसत आहे.पण आज विचार केला तर आता आरएसएसची कॉंग्रेस अस्तित्वात राहिली आहे काय...? तर मी म्हणेन बिलकुल नाही.कारण आरएसएसची कॉंग्रेस आता संपूर्ण भाजपात विलीन झालेली आहे असे मी मानतो.मग आता देशात कॉंग्रेस शिल्लक आहे काय..? तर मी म्हणेन आहे परंतु ती पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांची कॉंग्रेस शिल्लक आहे जिथे कार्यकर्ता आहे आणि जिथे मतदार आहे परंतु देशात त्याचे नेतृत्व शिल्लक नाही अशी आजच्या कॉंग्रेसची परिस्थिती आहे.देशातील कॉंग्रेसचे सोनिया-राहुल गांधी यांचे नंतर नेतृत्व करण्याची क्षमता कोणाची होती काय..? असा जर प्रश्न कोणी मला विचारला तर मी म्हणेन हो होती आणि ती क्षमता जोतीरादित्य सिंदिया यांचेमध्ये होती मग तुम्ही म्हणाल मग ते भाजपात का गेले तर याचे एकच उत्तर वरील प्रमाणे आहे आणि ते म्हणजे आंरएसएसची कॉंग्रेस भाजपात विलीन झालेली आहे.ज्यांना ज्यांना कॉंग्रेसचा इतिहास माहित आहे आणि ज्यांना ज्यांना जोतीरादित्य सिंदियाचा इतिहास माहिती आहे.त्यांना मी व्यक्त केलेले मत मान्य होईल अन्यथा तुम्हाला कॉंग्रेस समजलीच नाही असे मी म्हणेन.एकंदरीत देशाची परिस्थिती पहाता भाजपाने जे जे निर्णय २०१४ पासून ते आज पर्यंत घेतले आहे ते सर्व निर्णय कॉंग्रेसने पूर्वीच कागदावर उतरविलेले होते.आता जे निर्णय झालेत आणि आपल्याला ते दिसत आहेत.असे निर्णय संविधान विरोधी आणि लोकशाही संपुष्टात आणणारे विषय आहे.त्यामुळे देशात आता प्रबळ असा विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही.आणि मोदी-शहा यांच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष नेतृत्वावर हल्ला करून प्रादेशिक पक्ष देखील पराभवखाली आणून ठेवलेले आहेत.दलित मुस्लीम बहुजनांचे पक्ष आरएसएस कॉंग्रेसने २०१४ च्या लोकसभा-विधानसभा आणि २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत संपविलेले आहेत यातून नव्याने उभा राहिलेला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष देखील आरएसएस कॉंग्रेसने उभा राहू दिलेला नाही.दोष आरएसएस-भाजपच्या मोदी-शहा जोडीला देऊन चालणार नाही कारण हे एक आरएसएस कॉंग्रेसचे मोहरे आहेत.(क्रमश😊

Saturday, May 2, 2020

RRS संदर्भात आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी कोरोना रेड झोन मधील दलित मुस्लीम बहुजनांना मार्गदर्शन करावे....! राजेश खडके सकल मराठी समाज


        विषय असा आहे कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशात असताना आणि इथला नागरिक त्या विरोधात लढत असताना रोज रोज नव नवीन खेळ उभे रहाताना आपल्याला दिसत आहे.त्याचे कारण असे आहे की, रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराजन यांनी कोरोना विषया बाबत देशात सुरू असलेला लॉक डाऊन संदर्भात खूप मोठे विधान केलेले आहे ते असे म्हणतात की, कोरोना ह्याला सर्दी खोकल्या सारखा आधार देऊन देशातील सुरु असलेला लॉक डाऊन उठ्विण्यातात यावा जेणेकरून इथला गरीब कामगार मजूर यांचा भविष्यात भूकबळी सारखा प्रश्न उपस्थित होणार नाही.जर असा प्रश्न उपस्थित झाल्यास कोरोनाच्या आजाराने मारणाऱ्या जनसंख्येपेक्षा भूकबळीने मरणाऱ्याची संख्या मोठी असेन.रघुराजन यांनी उपस्थित केलेला प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही. कोरोना साथ रोगाच्या विरोधात आरोग्य यंत्रणा मजबूत करायला हव्यात त्याला लॉक डाऊन सारखा पर्याय योग्य राहणार नाही.त्यामुळे देशहितासाठीचा २१ दिवसांचा आणि समाजहितासाठीचा १९ दिवसांचा जनता कर्फ्यू म्हणून सर्व जात धर्माच्या लोकांनी प्रामाणिकपणे पाळला आहे.असे असताना कामगार दिनाच्या दिवशी म्हणजे १ मे रोजी महाराष्ट्र राज्यातील १४ जिल्हे कोरोना रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.राज्याची आर्थिक राजधानी मुंबई एक नंबर तर सांस्कृतिक राजधानी दोन नंबर क्रमांकावर जाहीर करून केंद्रीय गृहखात्याचा कोणताही जबाबदार मंत्री किंवा अधिकारी समोर न येता इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून दोन आठवड्यांचा लॉक डाऊन वाढविण्यात आलेला आहे.आता हा लॉक डाऊन जनतेने पाळायचा का नाही पाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.परंतु या गृहखात्याने जाहीर केलेल्या कोरोना रेड झोनमध्ये लॉक डाऊनच्या काळात RRS चे कार्यकर्ते घरो घरी तपासणी ( Screening) करणार आहेत.माझा प्रश्न एवढाच आहे की या केंद्रीय गृहखात्याच्या लॉक काळात कोरोना रेड झोन म्हणजे दलित मुस्लीम समाजाच्या घरोघरी हे कार्यकर्ते जाणार आहेत हा विषय माझ्यासाठी गंभीर आहे.कारण आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी या RRS संदर्भात वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून इथला दलित मुस्लीम बहुजन समाजाला या संघी लोकांचा कसा त्रास होणार आहे आणि होत आहे यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.त्यामुळे माझे असे म्हणणे आहे की, सध्या मुस्लीम बांधवांचा उपवासाचा म्हणजे रमजानचा महिना आहे.या काळात त्यांच्या घरात तपासणी ( Screening) च्या माध्यमातून RRS चे कार्यकर्ते घरोघरी जाणार ही बाब योग्य नाही याचा पुढे गंभीर परिणाम होऊ शकतो.म्हणून मला असे वाटते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी दलित मुस्लीम बहुजन समाजाला योग्य ते मार्गदर्शन करावे अशी माझी मनपूर्वक विनम्रतेची विनंती आहे.