Sunday, February 23, 2020

आरएसएसवाल्या प्रशिक्षित गुंडाना ठोकण्यासाठी आम्ही तयार आहोत....! प्रकाश आंबेडकर



      विषय असा आहे की आज कोणाताही समाज असो त्याला सीएए – एनपीआर – एनआरसी ची दहशत आरएसएस निर्माण करू पहात आहे.त्यामध्ये सर्वात जास्त दहशत कोणाला झाली असेल तर ती इथल्या मुस्लीम समाजाला झालेली आहे. आज जन्म आणि मृत्यू नोंद कार्यालयात मोठ्या प्रमाणात हा समाज गर्दी करू लागला आहे.कारण त्याला स्पष्टपणे कळाले आहे की,शेवटी या कायद्याचा आपल्यावर हल्ला हा ठरलेला आहे.आणि तो हल्ला होणारच आहे अशी मानसिकता त्यांची झालेली आहे.त्यामुळे इथल्या भारत देशाचे संविधान धोक्यात आलेले आहे यात कोणालाही दुमत असायचे कारण नाही असे मी मानतो.ही आरएसएसची व्दिराष्ट्र संकल्पना होती आणि ती १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र देश झाल्यामुळे आणि त्यांचा ध्वज फडकल्यामुळे यशस्वी झाल्याने त्यावेळच्या आरएसएस वाल्यांनी आपल्या घरी खीर बनवून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला होता.आणि १५ ऑगस्ट १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाल्यामुळे आणि त्याला डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू होणार हे माहित झाले असल्यामुळे त्याने तो स्वतंत्र दिवस काळा दिवस म्हणून पाळला असल्याचे पुरावे असल्याचे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेली आहे.आणि असे लोक सध्या भारताचे संविधान बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात सीएए – एनपीआर – एनआरसी कायद्याचा अमल व्हावा म्हणून दहशत माजवीत आहेत.प्रश्न असा आहे की इथला हिंदू असणाऱ्या समाजाची हे लोक दिशाभूल करीत असताना दिसत आहे.नेहमी अंधश्रध्दा म्हणून जीवन व्यथित करणारा हा समाज त्याचा बळी पडत आहे.त्याला एनपीआर कायद्याच्या माध्यमातून त्याचे स्वत:चे नागरिकत्व सिध्द करावे लागणार आहे याची जाण त्याला होण्यास तयार नाही.ज्यावेळी त्याला याची जाण होणार आहे तो पर्यंत त्याच्या हातातून वेळ निघून गेलेली असणार आहे.आज तो या आरएसएस वाल्यांचे समर्थन करीत फिरत जरी असला तरी या हल्ल्याचा तो उद्या बळी ठरणार आहे याची त्याला कल्पना नाहीये.परंतु विश्वास देण्यास इतिहासापासून वैदिक धर्म पंडीत हे हुशार आहेत याची त्याला जाण होत नाही.
                हिंदू राष्ट्र संकल्पना ही बाळकृष्ण गंगाधर टिळक यांची होती त्यामुळेच त्यांनी साल १८८४ मध्ये पहिली हिंदू महासभा बोलाविलेली होती.कोकणस्थ ब्राह्मणानी घाटाखालची गणपती ही देवता घाटावरती आणलेली आहे.आणि त्या देवतेला बहुजनांच्या माथावरती साल १९९२ ला भाऊ रंगारीच्या माध्यमातून बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी बसविलेली आहे.तेव्हापासून मुस्लीम व्देष पेरण्याचे कार्य जोरात सुरु झाले होते या संदर्भात इतिहासकार आणि संशोधक यांचे दाखले उपलब्ध होत असतात.यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव प्रामुख्याने आदराने पुढे येते. प्रबोधनकार ठाकरे यांनी कधीही गणपती ही देवता बहुजन समाजाने पुजली नाही किंवा भजली नाही असे सांगितलेले आहे.त्या प्रमाणे त्यानीही कधी गणपती ही देवता पुजली नाही किंवा भजली नाही.कार्ल्याच्या लेणी मधील महामायेला एकविरा म्हणून आपले कुलदैवत निर्माण करून तिचे पूजन केले आहे.
               महात्मा ज्योतिबा फुले यांनी वैदिक धर्म पंडितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची लपविलेली समाधी शोधून स्वराज्य समोर आणले आहे.विषमतेच्या मनुस्मृतीच्या विषात डुबविलेली समता बाहेर काढून त्याची पेरणी जन सामान्य माणसात केलेली आहे.अशा विषमतेच्या मनुस्मृतीचे दहन केली पाहिजे असे ते म्हणाले होते.अशी समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी साल १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून समोर आलेले स्वराज्य आणि स्वराज्यातील समतावादी बुध्दप्रेमी छत्रपती संभाजी महाराज यांची विषमतेच्या मनुस्मृती प्रमाणे झालेली हत्या आणि त्या हत्येचा घेतलेला बदला म्हणजे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास भेट देऊन त्या विषमतेच्या मनुस्मृतीचे दहन करून स्वतंत्र भारताला संविधान दिलेले आहे.
               अशा स्वतंत्र भारताला दिलेली समता टिकविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्द धम्माची (विचार) दीक्षा घेऊन ही समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी ही २२ प्रतिज्ञातील क्रमांक ९ व १० प्रमाणे बौध्द धम्मीय व्यक्तीला दिलेली आहे.आणि तो बौध्द धम्मीय व्यक्ती ही समता टिकविण्यासाठी आजही संघर्ष करीत असताना आपल्याला पाह्यला मिळत आहे.
            डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेली समता उध्वस्त करण्याचा कायदा या आरएसएस वाल्यांनी सीएए – एनपीआर – एनआरसी च्या माध्यमातून बेकायदेशीरपणे आणलेला आहे.आणि तो लागू करण्यासाठी आरएसएस चे गुंड दशहत माजवीत आहेत.त्या प्रकारचे ट्रेनिंग त्यांना आरएसएसच्या माध्यमातून देण्यात येत आहे.परंतु तो आरएसएसवादी हे विसरत आहे की,इतिहास हा नेहमी महार योध्यानी गाजविलेला आहे.आणि आजही या महार योध्यांचा भीमा कोरेगावचा विजयस्तंभ प्रेरणा देत आहे.त्यामुळे स्वराज्य हे अलुतेदार लढवय्या योध्याचे आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीर मावळ्यांचे आहे.एखाद्या गुंडाने समाजात दहशत माजविली तर समाज एकत्र येऊन त्या गुंडाला ठोकून टाकतो.त्या प्रमाणे या आरएसएसवाल्या प्रशिक्षित गुंडाना ठोकण्यासाठी आम्ही तयार आहोत असे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी नुकत्याच एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.त्यामुळे लढाई ही समतेची आहे आणि शेवटच्या वळणावर आलेली आहे याची जाण आज इथल्या वीर योद्ध्यांच्या वंशजांना झालेली आहे.

Saturday, January 4, 2020

समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी हि बौध्द धम्मिय व्यक्तीचीच...आज मला भीमा कोरेगावचा लढा आठवतोय.....! राजेश खडके बहुजन मोर्चा


डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटले की भारताच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या मुलभूत अधिकाराची आठवण होते हे सत्य कोणीही लपवून ठेवू शकत नाही.समता बंधुता न्याय यावर आधारित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली आहे हे कोणाला सांगायची गरज नाही असे मला वाटते.परंतु हे अधिकार देत असताना त्यांना किती कष्ट करावे लागले आहे आणि किती मोठा त्याग करावा लागला आहे याची कल्पना आज प्रत्येक भीम अनुयायांना आहे.त्यांचे अनंत उपकार या भारताच्या प्रत्येक नागरिकावर आहेत हे विसरून चालणार नाही.परंतु या सर्व बाबीचा उपभोग आपण घेत आहोत हे इथल्या मनुस्मृती समर्थकांना कधीच रुचले नाही आणि रुचत नाहीये.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टातून आणि त्यागातून उभी राहिलेली राज्यघटना आणि त्या राज्यघटनेतून उभे राहिलेली लोकशाही बुडविण्याचे षड्यंत्र सुरु करून पुन्हा मनुस्मृती आणण्याचा घाट इथल्या वैधिक धर्म पंडित यांनी सुरू केलेला आहे.आणि त्याचे उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे नव्याने लागू झालेला एनपीआर आणि एनआरसी कायदा होय.ह्या कायद्याची अमलबजावणी झाल्यास इथला एससी,एसटी आणि ओबीसी हा व्दितीय श्रेणी मध्ये मोडला जाईल आणि राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार म्हणजे “माणूस” म्हणून त्याचे अस्तित्व नष्ट होऊन जाईल.आणि पुन्हा मनुस्मृती लागू होऊन तो गुलाम बनणार आहे याची मला जाणीव झाली आहे.म्हणून आज मला भीमा कोरेगावच्या लढ्याची आठवण होत आहे.
        काय आहे भीमा कोरेगावचा लढा आणि या विजयस्तंभाच्या महार योद्ध्यांना का दिली  जाते “मानवंदना” हे समजून घ्यायची पुन्हा वेळ आलेली आहे.भीमा कोरेगाव हा ऐतिहासिक लढा आहे त्याला खूप मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला स्वराज्याची आठवण करून देतो आणि बुध्दप्रेमी छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण करून देत्तो म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी भेट देऊन म्हणाले होते  की “जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही” या त्यांच्या वाक्याला आपण स्वीकारून दरवर्षी या महार योद्ध्यांना मानवंदना द्यायला येतो.
      छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहून विद्वानांचा सन्मान केला आहे.वैदिक धर्म पंडित यांचेकडून केलेला वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथ पद्धतीत आपले वडील छत्रपती शिवाजी महाराज यांना करावयास लावून वैदिक धर्म पंडितांचे धार्मिक अस्तित्व झुगारून लावले आहे.वेरूळ गाव असल्यामुळे संभाजी महाराज यांनी बुध्द विचार (धम्म) स्विकारलेला होता.त्यामुळे त्यांनी स्वराज्यात बुद्धांचे विचार पोहचविण्याचे कार्य केले आहे.त्याच्या या कार्यास छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केल्याची इतिहासात नोंद आहे.याची धास्ती वैधिक धर्म पंडितांनी घेतली होती म्हणून त्यांनी स्वराज्याच्या गद्दारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची विषप्रयोग करून हत्या करून शंभूराजे यांना जेरबंद करून त्यांना मृत्यूदंड देण्याची त्यांची योजना फसली होती.शंभूराजे यांनी बुध्द विचाराने (धम्म) शाक्त पंथ पद्धतीत राज्यभिषेक करून त्यानी त्यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानवर कोरून घेतली.आणि त्या गद्दारांना आणि दीडशे वैदिक धर्म पंडितांना मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे याचीही इतिहासात नोंद आहे.
    छत्रपती संभाजी महाराज यांच्या अशा कार्यामुळे वैदिक धर्म पंडित घाबरले होते.वैदिक धर्म अडचणीत आला असल्याची त्यांची खात्री पटली आणि त्यानी औरंगाजेबाच्या सहकार्याने छत्रपती संभाजी महाराज यांना काही गद्दारांना बरोबर घेऊन त्यांची हत्या करून स्वराज्य संपवून पुन्हा वैदिक धर्म उभा करण्याचे षड्यंत्र त्यांनी आखले होते.आणि श्रुंगारपुरातून छत्रपती संभाजी महाराज यांना जेरबंद करून स्वराज्यातून ३८ दिवसांची धिंड काढीत ज्या ठिकाणी शहाजीराजे यांनी स्वराज्याच्या संकल्पनेची पेरणी केली.त्याठिकाणी म्हणजे पूर्वीचे नागरवास गाव स्वराज्याच्या संकल्पने नंतर त्याचे नामकरण तुळापुर झाले तेथे आणून त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते फेकून देऊन त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात बंदी घातली.परंतु वढू गावातील महार योध्दा गोविंद महार हे शाक्त पंथ (बुध्द) विचारांचे होते.त्यांनी तो बंदी आदेश मोडीत काढीत छत्रपती संभाजी महाराज यांचेवर अंत्यसंस्कार करून त्यांची समाधी बांधली आहे.अशा त्या गोविंद महार योद्ध्याची त्यांच्या मृत्यू नंतर त्याठिकाणी समाधी बांधली आहे.आज या  महार योद्ध्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पूर्वीचा महार योध्दा आणि आजचा बौध्द धम्म विचारांचा व्यक्ती १ जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना करून त्यांच्या समाधीचे दर्शन तर घेतोच मात्र छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन करण्यास तो विसरत नाही हे तेवढेच सत्य आहे.
   छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर वैदिक धर्म पंडित यांनी स्वराज्य संपवून टाकले.आणि लाल महालावर ताबा मारून त्याचा शनिवारवाडा करून स्वराज्य संपवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे शाक्त पंथीय (बुध्द विचार) यांचेपासून रयतेला दूर नेऊन जातीयव्यवस्था उभी करून पेशवाई निर्माण केली.मनुस्मृती प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाली होती त्याचा बदला म्हणून आणि जातीयवादी पेशवाई संपविण्यासाठी सातारा गादीचा सरदार वीर महार योध्दा सिद्धनाक महार याने पेशवाई बरोबर भीमा कोरेगाव याठिकाणी युध्द करून पेशवाईचा अंत केला आहे.अशा महार योध्यांची शौर्य गाथा म्हणून जो विजयस्तंभ उभारला आहे.त्याठिकाणी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन मानवंदना देऊन पुण्यातील गायकवाड वाड्यात बैठक घेऊन महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देऊन यशस्वी केला आहे.त्यानंतर त्यानी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात त्या मनुस्मृतीचे दहन करून स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून पुन्हा एकदा समतेचे राज्य डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी उभे केल आहे.आणि ती समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी बौध्द धम्म (विचार) स्विकारून बावीस प्रतिज्ञा घेतल्या आहेत.त्यांच्या बरोबर लाखो भीम अनुयायी यांनी त्या प्रतिज्ञा घेतल्या आहेत.त्यापैकी ९ वी आणि १० वी प्रतिज्ञा असे सांगते की,”माणूस हा समान आहे असे मी मानतो” म्हणून “मी समता प्रस्थापित करण्याचा करेन” त्यामुळे अशी समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी हि प्रत्येक बौध्द धम्मीय व्यक्तीची आहे.असे प्रकारचे मोठे कार्य आदरणीय राजरत्न आंबेडकर यांनी संपूर्ण देशात जगाच्या माध्यमातून केले आहे.असे कार्य त्यानी करू नये म्हणून आजचे वैदिक धर्म पंडित त्यांना अडसर निर्माण करीत आहे.
       आजची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण देशात भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे.एनपीआर आणि एनआरसी असंवैधानिक कायदा मंजूर करून तो भारतावर लादण्याचा प्रयत्न इथली वैदिक धर्म मंडळी करीत आहे.या कायद्याच्या माध्यमातून स्वराज्यातील अलुतेदार याला पुन्हा एकदा व्दितीय श्रेणीमध्ये टाकून गुलाम बनविण्याचे कार्य जोरात सुरु झाले आहे.छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करून स्वराज्य संपविताना आम्हाला औरंगाजेब दाखविला होता.आता हे आपल्याला दुसऱ्या जातीचा आणि दुसऱ्या धर्माचा मोदी-शहा यांच्या माध्यमातून मुसलमान दाखवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभे केलेले स्वराज्य संपवीत आहेत.त्यामुळे हा लढा मोदी-शहा यांच्या विरोधात नसून पुन्हा पेशवाईच्या विरोधात आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.म्हणून आज मला भीमा कोरेगावच्या लढ्याची आठवण होत आहे.

Thursday, December 5, 2019

समता प्रस्थापित करणाऱ्या बौध्द धम्मीय व्यक्तीचे संरक्षण झाले पाहिजे.....! राजेश खडके सकल मराठी समाज



      आज डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे प्रथम त्यांना कोटी कोटी प्रणाम...! डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य समजून घेतले तर आपल्याला लगेच लक्षात येते की मानवकल्याणकारी कार्य त्यानी केले आहे.आणि स्वराज्याचा इतिहास खऱ्या अर्थाने त्यांनी अस्तित्वात आणलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्या वेरूळ गावचा जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला बौध्द लेण्यांच्या गावातच यांचे अस्तित्व दिसून येते त्यामुळे “समतेचे राज्य” ही शहाजी महाराज यांची संकल्पना होती आणि ती   शिवरायांनी अस्तित्वात आणलेली आहे.त्यामुळे हे दोघेही बौध्द विचारांचे होते हे आपल्या कोणाला नाकारता येत नाही.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखविलेल्या घटना आणि दाखविलेला मार्ग याचा जर खऱ्या अंतरमनाने विचार केला तर सिंध प्रांतातील सभ्यता आपल्याला देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे असे दिसून येते.भीमा कोरेगाव येथे इतिहासाची आठवण करून देताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीकडे बोट दाखविलेले आहे.बुध्द धम्माचा अभ्यास छत्रपती संभाजी महाराज यांचा झालेला होता आणि ते बौध्द विचारांचे होते याचा दाखला त्यांची पिंपळाच्या पानावर कोरलेले राजमुद्रा आणि बुधभूषण ग्रंथातून होते.कुलदैवत म्हणून जगदंब म्हणून नेऋतीचे पूजन इथल्या मूळ भारत वासियांनी मान्य केले आहे.याचाच अर्थ या दोन्ही महाराजांनी मनुस्मृती नाकारली असल्याचे दिसून येते.त्याचे उत्तम उदाहरण द्यावयाचे झाल्यास मी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर रोजी केला आणि या २४ सप्टेंबरच्या दिनाला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी खूप मोठे महत्व दिल्याचा इतिहास पुरावा देत आहे. डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रिंटींग प्रेसचे नाव बुध्दभूषण त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुध्द विचारानीच दिले आहे.त्यामुळे पिंपळाच्या पानाचे महत्व आपल्याला तेथूनच समजले आहे.म्हणून त्या मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आल्याचे इतिहास डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या कार्यावरून दाखला देतो.कारण भीमा कोरेगाव भेटी नंतर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा कायदा मोडीत काढण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा देऊन करतात आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन करून शिवरायांचे स्वराज्य समतेचे राज्य होते याचा दाखला आपल्याला दिला आहे.स्वराज्याचे संविधान होते म्हणून स्वतंत्र भारताचे संविधान मला लिहिता आले असे डॉ बाबसाहेब आंबेडकर संविधान सभेत सांगतात.
          मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.आणि त्यांनी असेही सांगितले की बौध्द धम्म स्वीकारल्यामुळे इथल्या हिंदुना कोणताही त्रास होणार नाही याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे.आणि संपूर्ण भारत बौद्धमय करीन त्यांच्या या बोलण्याला इतिहासात खूप महत्वाचे स्थान आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.या त्यांच्या म्हणण्याचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्यानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा याचा अभ्यास आणि त्याचे संशोधन करावे लागेल तेव्हा त्यानी सांगितलेले मार्मिक वाक्य आपल्या लक्षात येईल असो.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी २२ प्रतिज्ञाच्या माध्यमातून दिलेली १० वी प्रतिज्ञा म्हणजे “मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन” ही समुजन घेण्यासाठी ९ वी प्रतिज्ञा समजून घेतली पाहिजे.तेव्हा आपल्याला लक्षात येईल की, बौध्द हा धर्म नसून धम्म आहे.आणि या बौध्द धम्मीय व्यक्तीचे संरक्षण होणे किती महत्वाचे आहे हेही आपल्या लक्षात  येईल.म्हणून आमच्या बहुजन मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून “समता” हे केंद्रस्थानी ठेऊन प्रबोधन कार्यक्रम उभा केलेला आहे.जर या देशाची समता अबाधित ठेवायची असेल,जर या राज्याची समता अबाधित ठेवायची असेल तसेच इथली सामाजिक समता अबाधित ठेवायची असेल तर इथल्या  समता प्रस्थापित करणाऱ्या बौध्द धम्मीय व्यक्तीचे संरक्षण झाले पाहिजे.....!

Tuesday, November 26, 2019

शरद पवारांनी बौध्द धम्माचे तीन तत्वाचे पालन करीत “महाविकास आघाडी” स्थापन केली…! राजेश खडके सकल मराठी समाज


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्माची तीन तत्व सांगितलेली आहेत.
त्याचप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे यांनी ब्राह्मणेतर देवता सांगून समतेचे भगवे निशाण म्हणजे स्वराज्याचा भगवा ध्वज सांगितलेला आहे.गौतमीपुत्र सिध्दार्थाने बौध्द धम्माची तीन तत्वे पाली भाषेत विकसित करून भगवे वस्त्र धारण करून भगवान गौतम बुध्द झालेले आहेत.
ज्यांना बौध्द धम्माचा आभ्यास आहे असी लोक हे तीन तत्वे कधीही नाकरू शकत नाहीत आणि बुध्दानी बौध्द धम्माची सांगितलेली तीन तत्वे कोणीही विसरू शकत नाहीत.या तीन तत्वांना आपल्या पर्यंत पोहचविणारे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर आहेत.म्हणून बुध्द तत्वज्ञानानुसार हे आपल्यासाठी बुध्द आहेत आणि यांच्या विचारावर चालणारा हा बौध्द धम्म समतेच्या विचारांचा आहे.बौध्द धम्माला धर्मात रुपांतर केल्यामुळे हा विचार धर्म म्हणून एका वर्गापुरता मर्यादित होताना दिसत आहे.परंतु अभ्यासू आणि जाणकार मंडळी याच तत्वानुसार चालत आहेत.त्यातले जिवंत उदाहरण द्यायचे झाले तर मी शरद पवार यांचे देईन.काही लोकांना आश्चर्य वाटेन परंतु बौध्द धम्माचा अभ्यासू व्यक्ती वैचारिक पातळीवर मी मांडलेले माझे वैचारिक मत खोडू शकणार नाही याची मला खात्री आहे.
               “शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हे बोध वाक्य आपल्याला  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच बौध्द धम्माच्या तीन तत्वानुसार दिलेले आहे आणि ते आपण सर्व भारतीयांनी स्वीकारलेले आहे म्हणून तर या भारतातील प्रत्येक व्यक्ती शिक्षण हक्कासाठी देशभर संघर्ष करताना दिसत आहे.इथल्या नागरिकासाठी विकास करणेसाठी आणि आपला हक्क मिळविण्यासाठी सत्ता हाती असणे गरजेचे आहे याची आपल्याला  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाण करून दिलेली आहे.आणि त्या तीन तत्वाचा अंगीकार केल्यास आपली हार कधीच होणार नाही,यासाठी ही तीन तत्वे आपण समजून घेतली पाहिजे.प्रत्येक अभ्यासू व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमासमोर ठेऊन आपली वाटचाल करीत असतो आणि त्यातील एक उदाहरण द्यायचे झाले तर मी शरद पवार यांचे देईन.सन २०१९ चा शरद पवार यांचा राजकीय आभ्यास केला तर तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत पूर्णत: या तीन तत्वांचे पालन केले आहे असे मी मानतो.२०१९ चे त्यांचे कार्य खूप मोठे आणि मोलाचे होते आणि आहे असे स्पष्टपणे माझे मत आहे आणि कोणताही जाणकार व्यक्ती हे नाकारणार नाही.
          आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही तीन तत्वे कोणती….? तर मी तुम्हास सांगतो आणि त्याचे वैचारिक विश्लेषणही देतो.शरद पवार हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.एक विचारांच्या वर्गाचा त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध असताना त्यांनी आपली वैचारिक पातळी कधीही ढासळू दिलेली नाही.आणि त्या विरोधात मोठ्या प्रमाणात ते उभे राहिलेले आहेत.आणि म्हणूनच एक अशी व्यावस्था आहे जी या महाराष्ट्रातील व्यक्तीला दिल्लीच्या तक्तावर बसून देत नाहीत असो.मग त्या तीन प्रमुख तत्त्वातील पहिले तत्व म्हणजे “बुद्धंम शरणं गच्छामी” असे आहे म्हणजे बुद्धांना शरण जा असे आपल्या स्वयं गौतम बुध्दानी सांगितलेले आहे.मग बुध्द म्हणजे कोण ज्याला सत्याचा ज्ञान प्राप्त झाले आणि त्यानी मानवकल्याणकारी धर्माचे पालन केले आहे.त्यामुळे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर हे आपल्यासाठी बुध्द आहेत म्हणून आपण त्यांना शरण जातो आणि या बुद्धांच्या प्रतिमा आपल्याला बौध्द विहारात पाहायला मिळतात.दुसरे तत्वज्ञान म्हणजे “धम्मंम शरणं गच्छामी” धम्म म्हणजे चांगले विचार म्हणजे मानवकल्याणकारी विचार होय.गौतम बुद्धांच्या समतेच्या विचारांचे पालन याच बुध्दानी म्हणजे शिव शंभू फुले शाहू आंबेडकर यांनी केले असल्यामुळे आपण यांच्या विचरांना शरण जातो.आणि तिसरे तत्वज्ञान म्हणजे “संघम शरणं गच्छामी” म्हणजे संघ आणि संघ म्हणजे एकत्रितपणा चांगली समाजव्यवस्था उभारण्यासाठी आपल्यातली एकी फार महत्वाची आहे.चांगली समाजव्यवस्था किंवा एखादे चांगले कार्य करण्यासाठी एकत्र येणे सर्व समाजातील लोकांना एकत्रित आणून शिव शंभू फुले शाहू आंबेडकर यांनी चांगले कार्य केलेले आहे.म्हणून यांनी उभारलेल्या संघाला आपण सर्व शरण जातो.जो या तीन तत्वाला शरण गेला तो नेहमी यशस्वी झालेला आहे.
              हेच विचार समोर ठेऊन शरद पवार यांनी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आणि इतर यांना एकत्रित आणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले स्वराज्याचे संविधान डोळ्यासमोर ठेऊन भाजपाच्या विरोधात लढा उभा केला आणि तो भारतीय संविधानाला समोर ठेऊन २६ नोव्हेंबर या दिवसांचे औचित्य साधून शिव शंभू फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर “महाविकास आघाडी” स्थापन करून याचे नेतृत्व शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले आहे.
           त्यामुळे हे तीन तत्व किती महत्वाचे आहेत याची पुन्हा आठवण शरद पवार यांनी आपल्याला या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून करून दिलेली आहे. म्हणून मी स्पष्टपणे म्हणतो “बौध्द धर्म नसून धम्म” आहे.म्हणून बौध्द धम्मीय लोकांचे आपण संरक्षण केले पाहिजे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली २२ प्रतिज्ञापैकी १० प्रतिज्ञा समता प्रस्थापित करण्यासाठीची आहे आणि हा बौध्द धम्मीय व्यक्ती समता प्रस्थपित करण्याचे कार्य करीत असतो.

Friday, November 1, 2019

२८८ जागा लढवून शून्य मिळविण्यापेक्षा ४० जागा लढवून ५ मिळविल्या असत्या तर वंचिताना न्याय मिळाला असता…..! राजेश खडके सकल मराठी समाज



              गोलमेज परिषदेवर कॉंग्रेस पक्षाने बहिष्कार घातला होता...तेव्हा त्या गोलमेज परिषदेत जाऊन इथल्या शुद्र अतिशुद्राचे प्रतिनिधित्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी करून एक इतिहास रचल्याचे आपल्याला माहित आहे.त्या गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे कॉंग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवर राष्ट्रद्रोह-देशद्रोहाचे आरोप केले होते याचीही कल्पना आज जवळ जवळ सगळ्यानाच आहेच.असे असताना स्वतंत्र भारताचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार करावे या कॉंग्रेसच्या मागणीला त्यांनी विरोध केला नाही आणि मला राष्ट्रद्रोही -देशद्रोही का म्हटले याचा जवाबही कधी त्यांनी कॉंग्रेसला मागितला नाही.कारण या संधीचा फायदा घेऊन या देशातील शुद्र अतिशुद्रांना न्याय देण्याची भूमिका त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर जेवढे ताठर भूमिकेचे होते तेवढे वेळेला तडजोड कशी करायची आणि त्याचा फायदा इथल्या शुद्र आणि अतिशुद्रांना कसा द्यायचा त्यासाठीचे राजकीय चातुर्व त्यांच्यात होते याची जाण जगातील विद्वानांना आजही आहे.
                     इथल्या शुद्र अतिशुद्रांना संसदीय राजकारणात स्वतंत्र मतदार संघ मिळावे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ताठर भूमिका घेतली होती.त्याच्या या भूमिकेला मोहन करमचंद गांधी यांनी विरोध करून पुणे येथील येरवडा कारागृहात आमरण उपोषण केले होते.तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधी बरोबर तडजोड करून पुणे करार अस्तित्वात आणून इथल्या शुद्र अतिशुद्रांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे.आजही आपण या पुणे कराराचा अधिकार दिवस म्हणून साजरा करीत असतो.या दोन घटनांची इतिहासात नोंद झाली आहे.हे आपण विसरता कामा नये असे मला वाटते.ताठर भूमिका हे स्वाभिमानाचे प्रतिक आहे हे कोणी नाकारणार नाही आणि तडजोड हे राजकीय चाणाक्षपणा आहे हे कोणी नाकारणार नाही कारण कोणत्याही युध्दाचा शेवट हा तहातच होतो आणि असे तह छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले आहेत याच्या इतिहासात नोंदी आहेत ज्याने इतिहास वाचला आहे त्याला याही कल्पना आहे असे मी मानतो.
                      प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्यामुळे ते आपल्या सर्वांना आदरणीय आहेत यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही.परंतु ते एका राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ज्यावेळेस ते एखादी भूमिका मांडतात त्यावेळेस इतर राजकीय पक्षातून त्यांच्या त्या भूमिकेला विरोध हा होणारच आहे कारण या देशाला संविधान लागू आहे.निवडणुकीचे राजकारण सुरु झाले की राजकीय पक्ष एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात.एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतात.विचारवंत,अभ्यासू व्यक्ती आणि राजकीय विश्लेक्षक आपले मत मांडत असतात.टीकाकार आपल्या पद्धतीत टीका ही करीत असतो.आणि ज्या त्या पक्षाचे समर्थक हितचिंतक आपल्या पद्धतीत त्यांना ट्रोल करीत असतात यालाच तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली खरी लोकशाही म्हटले आहे.
                    छत्रपती शिवाजी महाराज यांनी अलुतेदार यांना बरोबर घेवून स्वराज्याचा (समतेचा) लढा उभारलेला होता आणि तो आपल्या बुद्धी चातुर्यावर यशस्वी करून दाखविला आहे.परंतु जशी त्यांची ताठर भूमिका होती तशी वेळेला त्यानी तडजोड भूमिकाही स्वीकारलेली आहे.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी याच स्वराज्यातील अलुतेदार यांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष वंचितांना न्याय देण्यासाठी उभारलेला होता.वंचितांनां न्याय देण्याची भूमिका घेऊन लोकसभेच्या ४८ जागा २६१ संघटना बरोबर घेऊन,एमआयएम बरोबर घेऊन,भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर यांच्या सोबत लढविल्या होत्या.एक जागा सोडली तर इतर ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला यश प्राप्त झाले नाही परंतु ४० लाख मतदान घेण्यास हा पक्ष यशस्वी ठरला.
                    देशात लोकसभेच्या ५४३ जागा आहेत….२0१४ ला मोदी लाट यशस्वी झालेली होती…..संपूर्ण देशात मोदी फॅक्टर असताना शासन प्रशासन आपल्या ताब्यात असताना सर्व यंत्रणा स्वत:कडे असताना त्यांनी २०१९ ला एकूण सर्वच्या सर्व ५४३ जागा स्वबळावर लढविण्याची हिम्मत दाखविली नाही.मित्र पक्ष आणि समविचारी पक्षासोबत युती आघाडी करून त्यानी ५४३ जागा लढविलेल्या आहेत.महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता त्यानी शिवसेना हा समविचारी पक्ष आणि इतर मित्र पक्ष सोबत घेऊन निवडणूक लढविलेल्या आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे राष्ट्रीय पक्ष आहेत यांनीही स्वबळावर निवडणूक न लढविता इतर मित्र पक्षांना बरोबर घेऊन २०१९ च्या लोकसभा निवडणूक लढविलेल्या आहेत.
                               २०१४ मध्ये सर्वच पक्षांनी विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविल्या होत्या.महाराष्ट्र राज्यातील प्रमुख चार पक्ष असणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना यांचेकडे निवडूक यंत्रणा राबविण्याची क्षमता असताना सर्व साधन सामुग्री असताना संसाधन साधने असताना ह्या प्रमुख पक्षांनी २८८ मतदार संघात उमेदवार दिलेले नाहीत. कारण हे प्रमुख पक्ष आपल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील आणि जनतेचे प्रश्न विधानसभेत कसे मांडता येतील यावर त्यानी त्यांचे लक्ष केंद्रित केले होते….आणि त्यामध्ये हे सर्व पक्ष यशस्वी पण झाले परंतु सत्ता परिवर्तन झाले आणि आघाडीच्या हातातील सरकार हे युतीकडे गेले.२०१४ ची झालेली चूक २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत होऊ द्यायची नाही असे त्यानी ठरविले होते त्यामुळे त्यांनी युती आणि आघाडी करून २८८ जागा लढविण्याचे ठरविले होते.त्यामुळे २०१४ ला वेगवेगळे लढलेले पक्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र आले होते.
                           २३ मार्च २०१९ ला स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडी यांनी एमआयएम पक्ष आणि भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने,धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी एकत्र येऊन लोकसभेच्या ४८ जागा लढविल्या होत्या.कोणत्याही पक्षाला निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पक्षाची भूमिका पोचविण्यासाठी बोलणारी इतर वक्ते आणि प्रचारक असावे लागतात.लोकसभेला वंचित बहुजन आघाडीकडे एमआयएमचे असूउद्दीन ओवीसी आणि इम्तियाज जलील तसेच भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर असे लोक होते.त्यामुळे ४८ लोकसभा मतदार संघात एक खासदार आणि चाळीस लाख मते वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती.परंतु ज्या प्रमाणात यश मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही कारण साधन सामुग्रीचा प्रश्न निर्माण झालेला होता.संसाधन साधने कमी पडली होती आणि त्याची पूर्तता वंचित बहुजन आघाडी करू शकत नाही याची जाण वंचित बहुजन आघाडीच्या काही नेत्यांना झालेली होती.त्याबाबतची भूमिका पक्षाचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे समोर त्यांनी मांडलेली होती अशा चर्चा नंतरच्या काळात समोर आलेल्या होत्या.
                            महाराष्ट्रातील २८८ विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी पक्षाकडे तशी टीम असावी लागते यंत्रणा असावी लागते.परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून गेल्या ७० वर्षात काम करणाऱ्या पक्षांना आजपर्यंत २८८ जागा तेवढ्या ताकदीने लढविता आल्या नाहीत.आदरणीय प्रकाश आंबेडकर हे गेल्या ३५ ते ३७ वर्षापासून राजकारणात आहेत.दोन तीन वेळा ते खासदार राहिलेले आहेत.त्यामुळे संसदीय राजकारणाचा त्यांना चांगला अभ्यास आहे.ह्या सर्व राष्ट्रीय पक्षाचा २८८ विधानसभा मतदार संघातील घडामोडी त्यानी अनुभवलेल्या आहेत.पक्षाचा एक नेता सर्व भूमिका पार पाडू शकत नाही.वंचित बहुजन आघाडीकडे आदरणीय प्रकाश आंबेडकर सोडले तर त्या प्रमाणात २८८ मतदार संघात पक्षाची भूमिका मतदार यांचे पर्यंत पोहाविणारे दुसरे कोणीही नव्हते.प्रकाश आंबेडकर सोडले तर प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी दुसरे कोणीही नव्हते.कारण त्यांच्याकडे कोळसे पाटील नव्हते,भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने नव्हते ,धनगर नेते गोपीचंद पडळकर नव्हते,२६१ संघटना नव्हत्या आणि विशेष करून त्यांच्याकडे एमआयएम सुध्दा नव्हती.मग एवढी मोठी २८८ विधानसभेची यंत्रणा राबविण्यास आणि तेही १२ दिवसात आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना शक्य नव्हते याची जाण त्यांना होती व आहे.असे असताना २८८ विधासभेच्या जागा स्वबळावर लढविण्याची ताठर भूमिका आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी का…..? घेतली कोणतीही तडजोडीची भूमिका का स्वीकारली नाही असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
                                 २८८ विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडे कोणती यंत्रणा होती.पक्षाची भूमिका आणि पक्षाचा जाहीरनामा कितीही चांगला असला तरी तो मतदार यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी संसाधन साधने कोणती होती.पक्षाची भूमिका १२ दिवसात मतदार यांचे समोर पोहचविण्यासाठी कोणते नेते होते….? एकंदरीत पाहिले तर स्वत: आदरणीय प्रकाश आंबेडकर सोडले तर कोणतेही परिचयाचे चेहेरे किंवा नेते भूमिका मांडायला नव्हते.म्हणजे २८८ विधानसभेच्या जागा लढविण्यास वंचित बहुजन आघाडी सक्षम नव्हती.मग असे असताना वंचितांचा लढा यशस्वी करण्यासठी तडजोड करण्याची भूमिका आवश्यक होती.मग तडजोडीचे मार्ग भरपूर होते.त्या मार्गाचे अवलंबन करणे गरजेचे होते त्या तडजोडीत विधानसभेच्या ४० जागा लढविल्या असत्या तर त्यातील ५ जागा नक्कीच निवडून आल्या असत्या आणि वंचितांना न्याय देण्याची भूमिका विधानसभेत मांडता आली असती..रस्त्यावरच्या लढाई बरोबर संसदीय पटलावर भूमिका मांडणे गरजेचे असते तेव्हाच वंचितांना न्याय मिळेल.मी भूमिका फार मोठी मांडलेली आहे.परंतु जे दिसतय त्यावर मी बोललो माझे मत मांडले.जे आभ्यासलेले आणि जे दिसले ते मांडले आहे.त्यामुळे २८८ जागा लढवून शून्य मिळविण्यापेक्षा ४० जागा लढवून ५ मिळविल्या असत्या तर वंचिताना न्याय मिळाला असता…..!

Tuesday, October 29, 2019

त्या ५२ विधानसभा मतदार संघात मतदार यांना मतदान करण्यासाठी वंचितच उमेदवारच मिळाला नाही....!


वंचित बहुजन आघाडीने २८८ विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले होते.परंतु एमआयएम यांनी वंचित बहुजन आघाडीकडे ३० जागांची मागणी शेवट अखेर पर्यंत केली होती.त्यांची ती मागणी मान्य न करता प्रकाश आंबेडकर यांनी २८८ पैकी केवळ २३६ जागीच उमेदवार दिले.मात्र त्यातील ५२ जागी उमेदवार दिले नाहीत.जर वंचित कडे ५२ जागी उमेदवार द्यायला नव्हते तर त्या जागा एमआयएमला देऊन त्यांना आघाडीत सामावून घेणे गरजेचे होते.परंतु त्यांना सामावून घेण्यात आले नाही याचा सरळ अर्थ असा आहे की या ५२ जागी वंचित बहुजन आघाडीला उमेदवारच द्यायचे नव्हते.जर उमेदवारच द्यायचे नव्हते तर २८८ उमेदवार उभे करणार आहेत असा बागुलबुवा का करण्यात आला असा मतदार प्रश्न करीत आहे.साहजिकच त्यांना प्रश्न करण्याचा अधिकार आहे कारण या ५२ मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला मोठा मतदार तयार झाला होता.त्याने लोकसभेला आलेले अपयश विधानसभेला होऊ द्यायचे नाही असेच ठरविलेले होते.परंतु त्या ५२ मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या मतदार यांना मतदान करण्यासाठी वंचितच उमेदवारच मिळाला नाही.

1 – अक्कलकुवा एसटी  =========उमेदवार नाही
2 – शहादा एससी  एसटी ========उमेदवार नाही
7 – धुळे शहर  ============== उमेदवार नाही
10 – चोपडा ===============उमेदवार नाही
14 – जळगाव ग्रामीण  ========उमेदवार नाही
41 - मेळघाट ===============उमेदवार नाही
43 – मोर्शी ================उमेदवार नाही
56 – नागपूर पश्चिम ===========उमेदवार नाही
70 – राजुरा ===============उमेदवार नाही
109 – औरंगाबाद पूर्व =========उमेदवार नाही
114 – मालेगाव मध्य ==========उमेदवार नाही
115 – मालेगाव बाह्य ==========उमेदवार नाही
116 – बागलाण  ============उमेदवार नाही
117 – कळवण   ============उमेदवार नाही
118 – चांदवड   =============उमेदवार नाही
125 – नाशिक पश्चिम ==========उमेदवार नाही
143 – डोंबिवली ============उमेदवार नाही
148 – ठाणे ===============उमेदवार नाही
149 – मुंब्रा-कळवा ==========उमेदवार नाही
151 – बेलापूर -============उमेदवार नाही
152 – बोरीवली ============उमेदवार नाही
153 – दहिसर  =============उमेदवार नाही
154 – मागाठणे  ============उमेदवार नाही
162 – मालाड पश्चिम=========उमेदवारnनाही
165 – अंधेरी पश्चिम ==========उमेदवार नाही
172 – अनुशक्ती नगर  =========उमेदवार नाही
174 – कुर्ला ===============उमेदवार नाही
178 - धारावी ==============उमेदवार नाही
180 - वडाळा ==============उमेदवार नाही
181 - माहीम ==============उमेदवार नाही
183 - शिवडी===============उमेदवार नाही
184 - भायखळा ============उमेदवार नाही
185 - मलबार हिल ==========उमेदवार नाही
188 - पनवेल ==============उमेदवार नाही
193 -श्रीवर्धन ==============उमेदवार नाही
196 - आंबेगाव ============उमेदवार नाही
205 – चिंचवड  ===========उमेदेवार नाही
215 – कसबा पेठ ==========उमेदवार नाही
219 – कोपरगाव ==========उमेदवार नाही
220 – श्रीरामपूर ===========उमेदवार नाही
223 – राहुरी =============उमेदवार नाही
229 – माजलगाव ==========उमेदवार नाही
245 – माढा ==============उमेदवार नाही
246 – बार्शी  =============उमेदवार नाही
265 – चिपळूण   ==========उमेदवार नाही
267 – राजापूर ===========उमेदवार नाही
269 – कुडाळ  ==========उमेदवार  नाही
273 – कागल  ===========उमेदवार नाही
282 – सांगली ===========उमेदवार नाही
285 – पळूस खडेगाव  ======उमेदवार नाही
287 – तासगाव-कवठेमहाकाळ  -=उमेदवार नाही
288 – जत =============उमेदवार नाही