Thursday, June 4, 2020

आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि साथ रोगातून निर्माण झालेली अस्पृश्यता तसेच वर्ण व्यवस्थेकडे घेऊन जाणारा कोरोना वायरस.....! राजेश खडके बहुजन मोर्चा



इतिहास काळापासून साथ रोगांचा आभ्यास केला तर असे लक्षात येते की.मोठ मोठे बदल या साथ रोगातून निर्माण झालेले आपणास दिसतील.याठिकाणी मला आवर्जून सांगावे वाटते की,काही ठिकाणी या साथ रोगांचा फायदा घेऊन मोठा धार्मिक,राजकीय आणि सामजिक बदल देखील घडलेले आपल्याला इतिहासात पाह्यला मिळतील.यातून आपला भारत देश देखील या सामजिक बदलापासून वाचलेला नाही हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे असे मला वाटते.आजपर्यंत जगामध्ये बरेच साथ रोग आणि वायरस होऊन गेलेले आहेत.त्यामध्ये आपल्याला प्लेग,पटकी,कॉलेरा,कुष्ठरोग, एड्स, बर्ड फ्लू,स्वाईन फ्लू,इत्यादी वगैरे वगैरे आणि आज गाजत असलेला कोविड १९ (कोरोना वायरस) होय.
      यामध्ये जगात जर धार्मिक,सामजिक आणि राजकीय बदल जर कोणत्या रोगाने घडविले असतील तर त्या साथ रोगा मधील “प्लेग” या रोगाने घडविले असल्याचे दिसून येईल.सदर इतिहासाचे आपणास अवलोकन व्हावे यासाठी मी काही उदाहरण आपणास पुढील प्रमाणे देत आहे.प्लेग साथ रोगाची ओळख ही दुसऱ्या शतका मध्ये जगाला झालेली आहे.त्या नंतर तो सहाव्या शतकात रोमन साम्राज्यात उद्भवला होता रोमन साम्राज्याच्या विभाजनानंतरच्या बायझान्टाईन साम्राज्याच्या सम्राट हा जस्टिनाईन होता.त्याने इजिप्त प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडलेला होता त्यामुळे इजिप्त मधून हा प्लेग बायझान्टाईनची राजधानी कॉन्स्टेटिनोपल (इस्तंबूल) या शहरात पोहचला होता.त्याचा प्रसार संपूर्ण युरोप,आशिया,उत्तर अमेरिका तसेच आरबेरीया पर्यंत पोहचला होता.त्यामुळे विभागलेले रोमन साम्राज्य जस्टिनाईनला एकत्र करता आले नाही.या साथ रोगाने जवळ जवळ पाच कोटी लोकांचा बळी घेतला होता.याचा फायदा ख्रिश्चन धर्म (कॅथेलिक) प्रसारासाठी ख्रिश्चन धर्मियांनी मोठ्या प्रमाणात घेतला होता. त्यामुळे जगात या धर्माचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे आपल्याला विसरून चालता येणार नाही.त्यामुळे प्लेगच्या साथ रोगाने मोठ्या प्रमाणात धार्मिक बदल होण्यास मदत केल्याचे दिसून येते.
   त्यानंतर चौदाव्या शतकामध्ये पुन्हा प्लेग साथ रोग उद्भवला होता.या काळात चार वर्षात तब्बल वीस कोटी लोकांचा बळी गेला त्यामुळे या प्लेगाला “ब्लॅक डेथ प्लेग” असे म्हटले गेलेले आहे.त्यामुळे संपूर्ण जग हादरले होते.त्यामुळे याचा काही तरी बंदोबस्त झाला पाहिजे या विचारतून व्हेनिस या राज्यातील “रागुसा” नावाच्या शहराने एक उपाय शोधून काढला आणि तो उपाय म्हणजे शहरात येणाऱ्या जहाजांना बंदरापासून काही अंतरावर ३० दिवस नांगरून ठेवावे लागत होते.यालाच “क्वारंटाईन” म्हटले गेले आहे.त्यांनंतर जहाजावर कोणी आजारी पडले नसेल तर त्या जहाजाला बंदरात प्रवेश देण्यात येत होता.या काळात फ्रान्स आणि इंग्लड मधील सुरु असलेले युध्द थांबले आणि ब्रिटनची साम्राज्यशाही कोलमडून पडली एवढा मोठा राजकीय बदल घडलेला आहे.
     त्यांनंतर इंग्लडला या साथ रोग प्लेगचा सामना दर वीस वर्षाने करावा लागत होता.सोळाव्या शतकात मोठ्या प्रमाणात या रोगाचा परिणाम ब्रिटनला भोगावा लागला.त्यामुळे याकाळात त्यांनी प्लेग रुग्णांना समाजातून वेगळे ठेवण्यासाठीचा कायदा तयार केला आणि तो कायदा म्हणजे “विलगीकरण” होय.या प्लेगचा प्रसार रोखण्यासाठी प्लेगच्या रुग्णाला बळजबरीने त्याच्या घरात कोंडण्यात येत होते.आणि त्याच्या घरावर लाल फुली मारून त्याच्या घराच्या दरवाज्यावर “देवाची आमच्यावर दया आहे” असे लिहिले जात होते. त्यामुळे याठिकाणी मोठा सामाजिक बदल आपल्याला पाहिला मिळत आहे.त्यामुळे प्लेगच्या साथीने सहाव्या शतका पासून ते सोळाव्या शतका पर्यंत धार्मिक,राजकीय आणि सामजिक बदल घडविलेले आहेत.या साथ रोगाने भारतात असे बरेच सामाजिक बदल घडविलेले आहेत असे समाजशास्त्री विद्वानांचे म्हणणे आहे.मग असे कोणते बदल या प्लेगच्या साथ रोगाने घडविलेले आहेत याचे संशोधन देखील झाले पाहिजे असे मला वाटते.
    विषय असा आहे की,आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची कोरोनाच्या पार्शभूमीवर “जय महाराष्ट्र” या टीव्ही मिडीयाने मुलाखत घेतली होती.या मुलाखतीमध्ये संपादक प्रसाद काथे यांनी प्रकाश आंबेडकर यांना असा प्रश्न केला होता की, कोरोनाच्या माध्यमातून पुन्हा वर्ण व्यवस्था प्रस्थापित होताना आपल्याला दिसत आहे काय...? या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वी आलेल्या महारोगाचे उदाहरण देऊन सदरचा विषय पुढे नेला आहे.यावरून स्पष्ट होते की,जर जगात प्लेग साथ रोगाने जर धार्मिक,राजकीय आणि सामजिक बदल जर घडविले असतील तर नक्कीच भारतात असा बदल घडलेला आहे हे नाकारता येत नाही.मग असा बदल कोणता असेल याचा विचार केला तर इतिहास आपल्याला बऱ्याच प्रश्नाची उत्तरे देताना दिसत असतो.पूर्वीपासून भारतात मनुच्या मनुस्मृतीच्या कायद्याचा अंमल होता आणि त्याला नेहमी इथल्या महापुरुषांनी विरोध करून तो  कायदा मोडीत काढण्याचे कार्य केलेले आहे.....परंतु मनुची चातुर्वर्ण व्यवस्था होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे.......म्हणजे ब्राह्मण-वैश्य-क्षत्रिय-शुद्र असे चार वर्ण होते.इतिहास साक्षीला आहे की मनूच्या शूद्राला इतिहास काळापासून नेहमी वंचित रहावे लागले आहे. इथली ”वर्ण व्यावस्था” ही “जात व्यवस्था” कशी झाली आणि केव्हा झाली याचे आकलन येथील शूद्रांना कधी झालेच नाही....मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शुद्रांची ओळख “शुद्र पूर्वी कोण होते” या लिखाणातून दिलेली आहे...त्यामध्ये “अस्पृश्य पूर्वी कोण होते” असे आशयाचे लिखाण दिसून येत नाही.इतिहास लेखनात नेहमी “शुद्र” या शब्दाचे लेखन केल्याचे दिसून येते.गोलमेज परिषदेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या शूद्रांना प्रतिनिधित्व मिळावे असेच होते.त्यामुळे वर्गवारी नुसार “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” नावाची संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली असल्याचे दिसून येते.
     महात्मा ज्योतिबा फुले यांनी शुद्रासाठी आपल्या वाड्यातील पाण्याची विहीर खुली करून दिली असल्याचे म्हटले आहे.एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यात “अस्पृश्य महार” या शब्दाचा उल्लेख कुठेही आढळत नाही...तसेच पेशवाईमध्ये सुध्दा “अस्पृश्य महार” हा शब्द आढळ होत नाही.मात्र इतिहास काळापासून “महार” हा शब्द आढळ होताना आपल्याला दिसत आहे.भीमा कोरेगावचे युध्द जरी पाहिले तरी तिथे “अस्पृश्य महार” ह्या शब्दाचा उच्चार देखील दिसत नाही.एकंदरीत सैन्या मध्ये सुध्दा आपल्याला “महार बटालियन” असेच वाचायला मिळते. असे असताना ब्रिटीश वतन अॅक्ट १८७४-१८८४ मध्ये देखील “महार वतन” असे आढळते मात्र “अस्पृश्य महार” असे कुठेही आढळ होताना दिसत नाही.
        शेड्युल्ड कास्टमध्ये ५९ जाती असताना केवळ अस्पृश्य शब्दाचा प्रयोग फक्त “महार” या जमातीलाच केल्याचे दिसून येते.याचा उहापोह केल्याशिवाय जय महाराष्ट्र टीव्ही मिडियाचे संपादक प्रसाद काथे यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना केलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडणार नाही असे मला वाटते......म्हणून काही गोष्टी या लेखाच्या माध्यमातून मी चर्चेमध्ये आणीत आहे. भीमा कोरेगावच्या १८१८ च्या युध्दानंतर महार योध्यांचे पुढे काय झाले याचे उत्तर आजपर्यंत कोणी इतिहासाला विचारलेला नाही. मात्र त्यानंतर राजे उमाजी नाईक यांनी १८२२ मध्ये पुरंधर किल्ल्यावर स्वत:चा राज्याभिषेक करून “प्रतिशिवाजी” म्हणून ओळख करून घेतेली होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यानंतर मामलेदार कचेरी पुणे येथे त्यांचा १८३४ मध्ये मृत्यू झालेला आहे.मामलेदार कचेरी जवळच “फुले वाडा” आहे.राजे उमाजी नाईक यांच्या मृत्यू समयी महात्मा ज्योतिबा फुले यांचे वय वर्षे ७ होते.त्यानंतर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात १८५७ चा “स्वतंत्र लढा” उभारण्यात आलेला होता...परंतु या लढ्यात महार योध्यानी सहभाग घेतलेला दिसून येत नाही.त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी याच महार समाजाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची १८६९ मध्ये पहिली शिवजयंती साजरा केली.त्यापूर्वी शिवजयंती साजरा होत असल्याचे कोठेही पुरावे उपलब्ध होत नाही.त्यानंतर याच महार समाजाला बरोबर घेऊन १८७४ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी “सत्यशोधक समाजाची” स्थापना केली असल्याचे इतिहास आपल्याला दाखले देत आहे.त्यामुळे १८९० पर्यंत “महार” या जमातीला “शुद्र” म्हटलेले आहे....परंतु अस्पृश्य म्हटले असल्याची नोंद इतिहासात सापडत नाही.त्यानंतर स्वराज्याच्या  इतिहासाचे पुर्नवलोकन करण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते.
     महार या जमातीचा नेहमी इतिहासात परिवर्तनाकडे कल राहिला असल्याचे दिसून येते.टिळक-गोखले-आगरकर यांनी १८८४ मध्ये पहिली हिंदू महासभा आयोजित करून त्याचे रुपांतर “कॉंग्रेस” मध्ये केले होते.....म्हणून यांना कॉंग्रेसचे संस्थापक म्हटले गेले आहे.परंतु तशी नोंद कॉंग्रेसमध्ये आढळून येत नाही.समाजात एकसूत्रीपणा आणून कॉंग्रेसला बळकटी मिळावी.......यासाठी टिळकांचे कर्टर समर्थक असणारे भाऊ रंगारी यांच्या माध्यमातून १८९२ मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव सुरु करण्यात आला होता.त्यानंतर टिळकांनी १८९४ मध्ये सदरचा गणेश उत्सव आपल्या हातात घेऊन पुढे त्याला भगवे निशाण देऊन त्याचे स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढविले आहे.पुढे काय काय झाले हे सर्व आपल्याला माहित आहेत.परंतु टिळकांनी कॉंग्रेसचे नेतृत्व हातात घेतले....याच दरम्यान १८९७ मध्ये प्लेग या साथ रोगाने भारतावर मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला होता.त्याकाळी पुण्यामध्ये या साथ रोगाचा मोठा परिणाम आपल्याला पुण्यात दिसतो आहे.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुत्र यशवंत फुले हे डॉक्टर होते.....त्यांनी हडपसर येथील ससाणे नगर येथे दवाखाना सुरु केला होता.महात्मा फुले यांचे बरोबर असणारा महार समाज सावित्रीबाई यांच्या सोबत प्लेग साथ रोग रुग्णांची सेवा करू लागला होता......ब्रिटीशांना या रोगाचा चौदाव्या शतकात आलेला अनुभव माहित होता.त्यामुळे याठिकाणी हा साथ रोग निपटून काढण्यासाठी त्यानी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला.या साथ रोगाची एवढी दहशत झालेली होती की ब्रिटीश यांचे बरोबर मदतीला कोण उभे रहात नव्हते.......त्याकाळी महार समाज तो साथ रोग रोखण्यासाठी पुढे आलेला होता.पुणे शहरातील प्रत्येक घरात जबरदस्तीने बळजबरीने ब्रिटीश शिरत होते आणि तिथली साफ सफाई हा महार योध्दा करीत होता.मुंढवा येथील एका दहा वर्षाच्या मुलाला प्लेग झालेला होता त्याला औषध उपचार व्हावे यासाठी सावित्रीबाई फुले यांनी त्या मुलाला बैलगाडीत घालून ससाणे नगर येथील आपल्या मुलाच्या दवाखान्यात आणलेले होते...त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने तो वाचला गेला परंतु त्याचा संसर्ग सावित्रीबाई यांना झाल्याने त्या प्लेग साथ रोगाने त्यांचा बळी घेतला आहे.
    ब्रिटीश आणि सावित्रीबाई फुले यांचे बरोबर प्लेग रुग्णांची सेवा करण्यासाठी महार समाज त्याकाळी “प्लेग योध्दा” झालेला होता.त्यामुळे हा रोग आपल्याला होईल ही भीती इतर समाजातील लोकांना होवू लागली.त्यामुळे या प्लेग योध्या पासून इतर समाज दूर होऊ लागला म्हणजेच सोशल डीस्टटिंग पाळू लागला.....पुढे त्याची तो सावली देखील घ्यायला घाबरू लागला.यातूनच या समाजाला “अस्पृश्य महार” असे संबोधण्यात येऊ लागली.याचा प्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की जेवढ्या प्रमाणात आजचा कोरोना पोहचला नसेल.त्यामुळे मनुस्मृतीमध्ये “अस्पृश्यता” हा शब्द दिसत नाही...मात्र “शुद्र” हा शब्द दिसून येतो.त्यामुळे महार ही जात नसताना त्याला जातीवाचक शब्द प्रयोग सुरु झाला असल्याचे काही समाजशास्त्री सांगत आहेत.
     एकंदरीत पहाता सहाव्या शतकातील प्लेगची साथ रोगाने धार्मिक बदल घडवून कॅथेलिक धर्माचा प्रचार होण्यास मदत केली.तर चौदाव्या शतकातील प्लेगची साथ रोगाने राजकीय बदल घडवून सरंजामशाही कोलमडून टाकण्यास मदत केली तर सोळाव्या शतकातील प्लेगची साथ रोगाने समाजातील लोकांना वेगळे करून सामजिक बदल घडविण्यास मदत केली...तर भारतात एकोणीसाव्या शतकात सामाजिक बदल म्हणून अस्पृश्यता निर्माण केली असल्याचे जाणकार सांगत आहेत.त्यामुळे कोरोना वायरसमुळे पुन्हा एकदा वर्ण व्यवस्था उभी राहणार काय...? असा प्रश्न जय महाराष्ट्र टीव्ही मिडीयाचे संपादक प्रसाद काथे यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना विचारलेला तो प्रश्न मला महत्वाचा वाटतो.

Sunday, May 31, 2020

झोपडपट्टी पुर्नविकास म्हणजे...कॉंग्रेसच्या मतदार संघाचे उध्द्वस्तीकरण....तरीही कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा कार्यकर्ता शांत कसा....? राजेश खडके बहुजन मोर्चा


     विषय असा आहे की,काही दिवसापूर्वी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे वृत्तपत्रात स्टेटमेंट आले होते की,कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या भविष्यातील आरोग्याचा दृष्टीकोन ठेऊन झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रम राज्य सरकारच्या परवानगीने सुरु केलेला आहे.पुणे शहरात एकूण ५३८ झोपडपट्ट्या आहेत दाट वस्त्या असल्या कारणामुळे तेथे कोविड १९ चा प्रार्दुभाव रोखण्यास खूप मोठी कसरत प्रशासनास करावी लागत आहे.आणि त्यातील सार्वजनिक परिस्थीतीचा आढावा घेतल्यास सार्वजनिक शौचालयास येणाऱ्या नागरिक यांच्यामुळे कोविड १९ चा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य भवितव्याचा विचार केल्यास झोपडपट्ट्या ह्या विकसित कराव्या लागणार आहेत.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांनी ५३८ मधील एकूण २२ झोपडपट्ट्या पुर्नविकास योजनेखाली आणलेल्या आहेत.आणि या २२ झोपडपट्ट्या विकसित करण्यासाठी साधारणत: शंभर ते सव्वाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.सदरचा खर्च हा बांधकाम व्यावसायिकास मोबदला देऊन विकसित करण्याचा मानस असून त्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे असे त्यानी सांगितलेली आहे.एकंदरीत पहाता फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदार यांची संख्या झोपडपट्ट्यामध्ये नगण्य आहे.परंतु कॉंग्रेसला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे.आणि त्यानंतर आपल्याला भाजपाचा मतदार या झोपडपट्ट्यामध्ये आपल्याला दिसत असतो.भाजप कसेही वागले तरी इथला मतदार हा धर्माच्या नावाखाली भाजपालच मतदान करीत असतो.
     झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रमामुळे झोपडपट्ट्यातील कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार अस्थाव्यास्था अवस्थेत बाहेर पडणार आहे. झोपडपट्टी लाभधारक म्हणून त्याला लाभ मिळणार नाही. झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रमामुळे कॉंग्रेसचा मतदार संघाचे तुकडे तुकडे होऊन कॉंग्रेसचे तेथील राजकीय अस्तित्व संपणार आहे.असे असताना कॉंग्रेस कोणतेही स्टेटमेंट याबाबत करावयास तयार नाही.याचा अर्थ आता जसे केंद्रातील कॉंग्रेसचेनेते जेवढे गंभीर दिसत नाही तेवढ्याच प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते गंभीर दिसत नसल्याची परिस्थिती आपल्याला दिसत आहे.कोविड १९ चा प्रार्दुभाव संपूर्ण शहरात असताना केवळ कन्टेनमेंट झोनच्या माध्यमातून मुस्लीम-अनुसूचित वर्ग आणि ओबीसी वर्ग कोविड १९ चा प्रार्दुभाव म्हणून  टार्गेट करण्यात आलेला आहे काय...? असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.एकंदरीत झोपडपट्ट्या वरील प्रमाणेचा वर्ग हा रोजंदारीवर आपला उर्द्निर्वाह करीत असतो गेल्या अडीच महिन्यापासून त्याला रोजगार नसल्यामुळे त्याच्या अन्नधान्याची सोय काही बांधकाम व्यावसायिक यांनी केल्याचे काही लोक सांगत आहेत.
  झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रमामुळे कॉंग्रेस उध्वस्त होणार यात काही शंका नाही....आणि त्याठिकाणी भाजप प्रभावी ठरणार आहे यातही काही शंका नाही.मग असे असताना तेथील कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा कार्यकर्ता शांत कसा...? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रश्न असा आहे की काही तथाकथित आंबेडकर चळवळीचे लोक कॉंग्रेसचे समर्थन करीत तिला वाचविण्यासाठी आणि नव्याने उभारी घेण्यासाठी झटताना दिसत आहे.परंतु त्यांच्या या कष्टाला फळ काँग्रेसी नेत्यांना द्यायचे नाही कारण आता आरएसएसची कॉंग्रेस नरेंद्र मोदी यांनी मुक्त केली असल्याची घोषणा सुध्दा झालेली आहे.त्यामुळे कॉंग्रेसच्या माध्यमातून पुरोगामी विचारांना मानणारा कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार आता झोपडपट्ट्यातून मुक्त करायचा आहे.

Sunday, May 24, 2020

प्रकाश आंबेडकर म्हणतात नरेंद्र मोदी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा...मग खुनाची परवानगी का द्यावी...? राजेश खडके सकल मराठी समाज


विषय असा आहे की, आदरणीय प्रकाश आंबेडकर म्हणतात नरेंद्र मोदी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा...आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, कोविड १९ चा पहिला रुग्ण उपचार घेऊन घरी गेला आहे...त्यामुळे आता पर्यंत जवळ जवळ पंधरा हजार रुग्ण उपचार घेऊन घरी गेलेले आहेत.असे असताना मिडीया आणि विरोधी पक्षातील लोक हे आजच्या कोविड १९ नोंद रूग्णाच्या संख्येत घरी गेलेल्या रुग्णाचा आकडा बेरीज करून वाढीव दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.आणि काही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ म्हणतात मुळातच कोविड १९ टेस्ट कीट ही बोगस आहे.त्यामुळे सदरचा व्यक्ती कोरोना रुग्ण ठरविणे चुकीचे आहे.त्यामुळे चांगले व्यक्ती असताना त्याला कोरनटाईन होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.इतर आजाराने व्याधीत असणारे रुग्णांना उपचार घेण्यासाठी त्रास होऊन तो दगावीत असल्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे.त्याला देण्यात येणारी उपचार पद्धत्ती चुकीची असल्यामुळे मरणार नसणारा रुग्ण इतर आजारामुळे मरत असताना दिसत आहे.त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री यांना नम्रतेची विनंती आहे की,ज्याला गरज आहे त्याचीच चांगली व विश्वासू कोविड १९ रुग्ण तपासणी यंत्रणा उभी करावी अन्यथा चुकीचा उपचार होऊन तसेच ज्याला इतर आजारा संदर्भात उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होईल आणि त्याला जीवास मुकावे लागेल.त्यामुळे हा मृत्यू एक प्रकारची हत्याच असेल असे जाणकार यांचे मत आहे.देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कोविड १९ मुळे दागाविलेल्या रुग्णांच्या नातेवाईकानी भा.द.वि. कलम ३०२ चा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करावा असा सल्ला आदरणीय प्रकाश आंबेडकर दिलेला आहे.त्यामुळे आता भारतातील नागरिकांचे म्हणणे असे आहे की,बोगस कोविड १९ टेस्ट कीट नुसार स्वॅब टेस्टची परवानगी देणे म्हणजे स्वत:च्या खुनाची परवानगी द्यायची का...? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

Wednesday, May 13, 2020

कॉंग्रेस कार्यकर्ते आणि मतदार यांनी आता मतदान करायचे कोणाला...? राजेश खडके सकल मराठी समाज


             २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकी नंतर कॉंग्रेस देशातून संपली असल्याची परिस्थिती जवळ जवळ स्पष्टपणे पुढे येताना दिसत आहे.त्याची कारणेही तसेच आहेत देशाचे माजी प्रधानमंत्री आज भाजपाच्या गोठ्यातून खासदार झालेले आहेत.आर्थिक तज्ञ कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पी चिंदबरम यांना भाजपाने झेलची हवा दाखवून सोनिया-राहुल गांधी यांना बऱ्याच प्रकरणामध्ये अडचणीत आणले आहे.कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी अपयशी झाल्यामुळे त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेतल्या सारखी परिस्थिती दिसत आहे.देश संकटात असताना दोघे माय-लेक देश सोडून गेल्या सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.यातच गांधी नंतर कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे जोतीरादित्य सिंदिया भाजपवासी झालेले आहेत.जेवढे आरएसएस विचाराचे लोक कॉंग्रेसमध्ये होते ते आता भाजपात प्रवेश करीत आहेत.राहिले साहिलेले आता लॉक डाऊन उठल्यानंतर भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे जाणकार याचे असे म्हणणे आहे की, आता आरएसएस कॉंग्रेस संपलेली आहे.परंतु पुरोगामी विचारला मानणारी कॉंग्रेस आणि त्याचा कार्यकर्ता तसेच मतदार शिल्लक राहिलेला दिसत आहे.परंतु कॉंग्रेस पक्ष चालविणारे देशात नेतृत्व आपल्याला दिसत नाही....ज्या पक्षाला देशात नेतृत्व राहिले नाही त्या पक्षाचे राज्यस्तरावर नेतृत्व थंड झाल्याची परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री वडटीवार यांच्या शांत असलेल्या कार्य पद्धतीमुळे दिसत आहे.त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस ही नेतृत्वहीन झालेली कॉंग्रेस दिसत त्यामुळे इथला कार्यकर्ता भ्रमित झालेला असून आता कॉंग्रेसच्या मतदाराला प्रश्न पडला की, इथून पुढे मतदान करायचे कोणाला...?

नरेंद्र मोदीजी वेळीच कोरोना संदर्भात रघुराम राजन आणि नारायण मूर्ती यांचे ऐकले असते तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती....! राजेश खडके सकल मराठी समाज


               विषय असा आहे की, नेमका कोरोना वायरस आहे काय...? याचा प्रचार आणि प्रबोधन जनमाणसात करण्यात आलेले नाही....याउलट मिडीयाच्या माध्यमातून जनतेमध्ये दहशत निर्माण करून जन सामन्य माणसाची अधोगती केली असल्याचे कालच्या नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून दिसून आले आहे.काल ते असे म्हणाले की आता कोरोनाची चर्चा सोडून द्या आणि स्वत:ला उभे करण्यासाठी लढा असे त्यानी बोलून दाखविलेले आहे.परंतु जेव्हा रिजर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री रघुरामराजन आणि नारायणमूर्ती म्हणाले की, कोरोना माणसाला नेहमी होणाऱ्या आजारा सारखा आहे त्यामुळे त्याला भयभीत होण्यासारखे काही कारण नाही.परंतु त्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन करणे हे देशाच्या हिताचे नसून...देश डबघाईला जाईल आणि जितके लोक कोरोनाने मरणार नाहीत त्याचे काही पटीने लोक भूकबळीमुळे मरतील आणि ही भूकबळी रोकता येणार नाही.परंतु ऐकतील ते कसले मोदी त्यांनी ऐकले नाहे उलट लॉक डाऊन वाढवित गेले.काही दिवसापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की कोरोना या विषाणू वर कोणतीही लस तयार होणार नाही....आणि आमच्या देशातील कोरोना स्वत:हून संपुष्टात येणार आहे.त्यामुळे कोरोना विरोधात संघर्ष करायची आम्हाला गरज नाही असे त्यांनी म्हटले होते.त्यातच आपल्या आयुष मंत्रालयाने सांगितले होते की,कोरोना विरोधात लढण्यासाठी आपल्याला निसर्गाने दिलेली साधन संपत्ती पैकी आपण तुळसी-काळी मिर्च-सुंठ-दालचिनी यांचा काढा करून पिल्यास कोरोन बरा होतो म्हणून त्यानी या काढ्याला “आयुष काढा” असे नाव दिलेले आहे.असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉक डाऊन का राबविण्यात आला आहे असा प्रश्न आता इथले लोक करू लागले आहेत.