जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात असलेल्या व अमरावतीपासून १५ किलोमीटर अंतर असलेल्या मालखेड रेल्वे येथील पुरातन काळातील अंबामातेचे मंदिर म्हणजे एक जागृत शक्तीपीठच आहे. त्यामुळे अलीकडे भक्तांची संख्या वाढली असून घटस्थापनेपासून देवीच्या दर्शनासाठी रीघ लागत आहे.
येथे भानुमती नदीच्या किनाऱ्यावर अंबा मातेचे मंदिर असून भगवान शिवशंकर व माता अंबा यांचे एकाच परिसरात असलेले मंदिर हे या मंदिराचे वैशिष्ठय आहे. या मंदिराची आख्यायिका पुरातन आहे. सत्यव्रत मनु वंशातील वृषभदेव नावाचा राजा विदर्भात राज्य करीत होता. त्याला १० मुले होती. वृषभदेवने आपल्या पुत्रांना राजधानीच्या चारही बाजूने निवासस्थान बनवून दिले होते.
आपल्या मुलांचेच नाव त्या परिसराला दिले होते. त्यापैकी केतुमाल नावाचा पुत्र असलेल्या वस्तीला मालकेतु असे नाव देण्यात आले होते. याच शब्दाचा अपभ्रंश होऊन मालखेडा असे नाव गावाला पडले. या गावाचा उल्लेख श्रीमद् भागवत तथा देवी भागवतात आहे. याच गावापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या भानुमती नदीच्या किनाऱ्यावर बसून केतुमाल देवीची आराधना करीत असे. त्याची भक्ती पाहून मॉ भगवती प्रसन्न झाली व ितने साक्षात प्रगट होऊन केतुमालला इच्छित वर मागण्यास सांगितले. केतुमालने संपत्ती, किर्ती न मागता ज्या रुपात देवीने दर्शन दिले त्याच रुपात येथे निवास करुन सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्या असा वर त्याने मागितला.
मॉ अंबेने तथास्तु म्हणून स्वयंभू मुर्ती येथे प्रकट झाली. तिच मालखेड निवासी अंबादेवी होय. याचे दाखले आणि भानुमती नदीचा उल्लेख स्कंध पुराणात करण्यात आला आहे. या ठिकाणी स्वयंभू प्रगट झालेली आहे. या ठिकाणी स्वयंभू प्रगट झालेली महादेवाची पिंड व शंकरजींचे मंदिर आहे. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरील भक्तही या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
नवरात्रात अखंड ज्योत मंदिरात पेटविली जाते. अखंड ज्योतीचे हे आठवे वे वर्ष असून यावर्षी ३५० ज्योती लावण्यात आल्या आहे. श्री. देवेश्वर महाराज या मंदिराची देखरेख करीत असून नारायणभाऊ हेडा यांच्यासह अनेकांनी देणग्या देऊन मंदीराचे काय्र पुर्णत्वास नेले आहे.
No comments:
Post a Comment