ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची तसेच रोजगाराच्या अधिकाराची माहिती करुन देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात दि. 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2012 या कालावधीत महात्मा गांधी नरेगा जागृती अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम 2005 व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कायदा 1977 (सुधारणा 2006) अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना संपूर्ण महाराष्ट्रात दि. 1 एप्रिल 2008 पासून राबविण्यात येत आहे. अकुशल काम करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रत्येक कुटूंबातील प्रौढ व्यक्तीला या योजनेंतर्गत कामाच्या माध्यमातून रोजगाराची हमी देऊन त्या माध्यमातून कायम स्वरुपी मालमत्ता निर्माण करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.
स्वयंपूर्ण ग्राम राज्याची उभारणी हा महात्मा गांधींचा संकल्प होता. तसेच खेड्याकडे चला असा त्यांचा संदेश आहे. त्या अनुषंगाने कृषी, ग्रामविकास, भूजल सर्वेक्षण, पाटबंधारे, महसूल, सार्वजनिक बांधकाम व जलसंधारण या राज्य शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितरित्या नियोजन केल्यास गावाच्या संपूर्ण विकासाला चालना मिळेल व त्याद्वारे गाव स्वयंपूर्ण करण्यास मदत होईल. ही बाब विचारात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एक व्यापक अभियान राबविण्याच्या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे.
या अभियानाद्वारे या योजनेची संपूर्ण माहिती देऊन रोजगार हमी योजनेद्वारे गावाचा विकास करण्यासाठी प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येईल. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत, ग्रामसभेचा सहभाग निश्चित करणे, गावाचा विकास आराखडा निश्चित करणे, कामांचे गुणवत्तापूर्ण नियोजन करणे, मजुरांची नोंदणी करणे, जलसाक्षरता अभियान राबविणे, योजनेशी संबंधित अभिलेख अद्ययावत करणे इत्यादी बाबींचा समावेश राहील.
महाराष्ट्रात 2011-12 या वर्षात या योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करणारी कार्यालये, अधिकारी व कर्मचारी यांना अभियान कालावधीत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
Friday, September 28, 2012
Wednesday, September 26, 2012
अजित अनंतराव पवार
नाव:- अजित अनंतराव पवार
जन्म:- दिनांक २२ जुलै १९५९
जन्म:- ठिकाण देवळाली - प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर
शिक्षण:- बी. कॉम.
ज्ञात भाषा:- मराठी, हिंदी आणि इंग्रजी...
वैवाहिक माहिती विवाहित, पत्नी सौ. सुनेत्रा
आपत्ये २ मुले - कु. पार्थ व कु. जय
व्यवसाय शेती
पक्ष:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
मतदार संघ २०१ - बारामती, जिल्हा पुणे
◦विश्र्वस्तविद्या प्रतिष्ठान, बारामती.
संचालक छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा पुणे,
श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा पुणे,
माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे,
सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे,
वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक, पुणे,
महाराष्ट्र राज्य सह.दूध उत्पादक संघ, जिल्हा पुणे,
माजी संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – मार्च १९९१ ते ऑगस्ट १९९१ व डिसेंबर १९९४ ते डिसेंबर १९९८
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – ११ डिसेंबर १९९८ ते १७ ऑक्टोबर १९९९
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर २००५ पासून
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – १३ ऑगस्ट २००६ पासून
अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – २८ सप्टेंबर २००६ पासून
लोकसभा सदस्य १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१.
विधानसभा सदस्य १९९१ ते १९९५, १९९५ ते १९९९, १९९९ ते २००४, २००४ ते २००९ व नोव्हेंबर, २००९ मध्ये फेरनिवड.
राज्यमंत्री कृषी, फलोत्पादन आणि उर्जा २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२.
राज्यमंत्री जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३.
मंत्री पाटबंधारे(कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन – दि. २७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर, २००३.
मंत्री ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) – दि. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४.
मंत्री जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – दि.९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९.
मंत्री जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा – दि. ७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१०
उप मुख्यमंत्री वित्त व नियोजन, ऊर्जा – ११ नोव्हेंबर २०१० पासून
परदेश प्रवास बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड व स्वीत्झर्लंड, ब्राझील, इस्त्रायल, मेक्सिको तथा अर्जेंटीना इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.
छंद क्रिकेट, टेनिस व समाजकार्य.
कायमचा पत्ता मु.पो.काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. ‘सहयोग’ बंगला, बारामती, जिल्हा पुणे. दुरध्वनी : ०२११२ – २२६०००
शासकीय निवासस्थान ‘देवगिरी’, नारायण दाभोळकर मार्ग, मलबार हिल, मुंबई ४००००६. दुरध्वनी : २३६३१६०६ / २३६३४८७७ फॅक्स : २३६२१६१२
कार्यालयीन पत्ता उप मुख्यमंत्री कार्यालय, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दुरध्वनी : २२०२२४०१ / २२०२५०१४ फॅक्स : २२०२४८७३

कथा आधुनिक बळीराजाची
प्रत्येक
शेतक-याने आधुनिक शेतीतंत्र आणि कृषी विभागाच्या योजनांच्या मदतीने आधुनिक
शेती करावयाचे ठरविले तर नक्कीच पुन्हा एकदा हरितक्रांती होण्यास वेळ
लागणार नाही. हो याचे जीवंत उदाहरण म्हणजे माळशिरस तालूक्यातील सोपान शंकर
घुले हे आहेत. या आधुनिक बळीराजाने फळपिक योजनांचा फायदा घेत आणि अद्ययावत
तंत्रांची मदत घेत प्लॉस्टिक पेपरचे अच्छादन करुन कलिंगडाची लागवड केली आणि
एकरी 35 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतले आहे.
सोपान शंकर घुले हे प्रयोगशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक दिनकर जाधव यांच्या मार्गदर्शनाने फळपिक योजनेतंर्गत अनुदान घेतले. आपल्या शेतातील डाळिंब काढून त्या शेतात 20 ऑक्टोंबर रोजी कलिंगडाची लागवड केली. कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेमधून त्यांनी कलिंगडाची रोपे घेतली. जमिनीवर पूर्व-पश्चिम दिशेने मातीचे बेड तयार करुन दोन फूट अंतरावर एक रोप याप्रमाणे प्लास्टीक पेपर अंथरुन एकरात 10 हजार रोपे लावली. प्रत्येक रोपावर व्यवस्थित लक्ष ठेवण्याची तसदी सोपान घुले यांनी घेतली. याकामी त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक बापूराव खरात व अयाज शेख यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
ऑक्टोंबर-नोव्हेंबर हा हवामान संक्रमणाचा काळ असल्याने विशेष लक्ष देत ठिंबक सिंचन यंत्रणेद्वारे पाणी दिले. त्यामुळे सध्या त्यांच्या शेतात तीन किलोपासून 8 किलोपर्यतची कलिंगडे तयार झाली आहेत. प्रति वेलास 2 ते 3 कलिंगडे आहेत. कलिंगड अगदी आठ किलोपर्यत वाढल्याने आढळले आहे.. त्यांना एकरी सुमारे 35 मे.टन कलिंगडाचे उत्पादन मिळत आहे. या वाणाच्या कलिंगडासाठी सध्या प्रतिटनास 7 ते 8 हजार रुपये असा दर आहे. या दराप्रमाणे ही कलिंगडे विकल्याने केवळ तीन महिन्यात सुमारे दोन ते सव्वादोन लाखाचे उत्पन्न मिळाले असल्याचे घुले यांनी सांगितले. या आधुनिक बळीराजाच्या कष्ट आणि प्रयत्नांच्या जोरावर प्लॉस्टीक पेपरवर कलिंगड लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

Tuesday, September 25, 2012
पुणे। दि. २४ (प्रतिनिधी)
सहकारनगरजवळ तळजाई पठार येथील बांधकाम सुरू असलेली ४ मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १0 जण ठार झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. पुण्यातील अशा प्रकारची ही पहिलीच दुर्घटना आहे.
दुपारी पावणदोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कोसळलेली इमारत अनधिकृत असून, निकृष्ट बांधकामामुळेच हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. माजी नगरसेवक संजय नांदे आणि बांधकाम व्यावसायिक लहुजी सावंत यांची ही इमारत आहे. दुपारी पावणेदोनला मजुरांची जेवणाची सुट्टी झाली होती. त्यांची मुले शाळेतून जेवणासाठी घरी आली होती त्याच वेळी इमारत कोसळल्याने मृतांचा आकडा वाढला. इमारत पत्त्याप्रमाणे कोसळल्याने मोठय़ा ढिगार्याखाली मजूर अडकले गेले. ढीग उचलण्यासाठी रॅपिड अँक्शन फोर्सच्या जवानांसह पोलीस व पालिका कर्मचारी ७ ते ८ जेसीबीच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत काम करीत होते.
भारत विष्णू शिंदे (वय ६५, रा. खोली क्र. १0, अप्पर ओटा), अर्जुन नामदेव गोपाळ (३२, रा. सर्वे क्र. १६, आंबेगाव पठार), राजाराम पांडुरंग खाडे (५0, रा. संजयनगर, धनकवडी), देविया उर्फ सोनूचंद राठोड (२), नयना नागेश कांबळे (१२), राजू भिमलाल पवार (१५), मिता देवकाते, अण्णा देवकाते अशी मृतांची नावे आहेत. मृतांमधील एक महिला व पुरुषाची ओळख पटलेली नाही. ढिगार्यातून काढलेल्या ४ जखमींना ससून, भारती, राव रुग्णालय, पुरोहित व सिद्धी रुग्णालयात हलविले आहे.
ढिगार्याखाली अडकलेल्या सायली कांबळे (५), नम्रता नागेश कांबळे (७), समाधान गोपाळ, दीपक देवकाते तसेच तीन महिला व एका मजुराला वाचविण्यात यश आले.
नांदे, सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करणार
दुर्घटनेप्रकरणी जागामालक काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय नांदे आणि विकसक लहुजी सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच या घटनेतील जखमींचा खर्च महापालिका करेल. या बांधकामासाठी कोणतीही परवानगी पालिकेकडून घेण्यात आली नव्हती. हे बांधकाम थांबविण्याची नोटीस जागामालक आणि विकसक यांना १ सप्टेंबर रोजीच देण्यात आली होती. मात्र, तरीही संबधितांनी काम सुरूच ठेवले होते. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत अतिक्रमण कारवाई बंद असल्याने गडबडीत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेल्यानेच ते कोसळले. शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईत आत्तापर्यंत २३00 बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ८५0 बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. - महेश पाठक, महापालिका आयुक्त
घाईघाईत उरकले बांधकाम
तळजाई पठारावरील तळजाई माता मंदिराजवळ ही अनाधिकृत इमारत उभारण्याचे काम सुरू होते. ही मिळकत संजय नांदे व लहुजी सावंत यांच्या नावे असून महापालिकेने या दोघांना १ सप्टेंबरला नोटिस पाठविली होती. बांधकाम बंद ठेवण्यासही सांगितले होते. गणेशोत्सवामुळे गेल्या पाच दिवसांपासून ही मोहिम बंद ठेवण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या काळात कारवाई होणार नसल्याने घाईघाईने या इमरातीचे बांधकाम उरकण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. इमारतीचे काम पूर्ण झालेले नसतानाही तेथे सुरक्षा रक्षक कुटुंबासह रहायला होता. इमारत कोसळली तेव्हा तेथे या कुटुंबासह कामगार होते.
या इमारतीला जाण्यासाठी केवळ ५ ते १0 फुटांचा अरुंद रस्ता असल्याने त्याठिकाणी मदतीसाठी अग्निशमक दलाची गाडी व जेसीबी जाण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. इमारत कोसळल्याने परिसरातील धुरळा उडाला होता. आजुबाजूचे नागरिक तातडीने मदतीस धावले. तिस-या मजल्यावर ढिगाखाली मृतावस्थेत असलेल्या ५ मजुरांना दुपारी तीन वाजता बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सायंकाळी चार वाजता २ मजुरांना जीवंत बाहेर काढण्यात अग्निशमक दलांच्या जवांनांना यश आले. तब्बल पाच तासाने रॅपीड फोर्स मदतीसाठी दाखल झाला. सायंकाळी सायली व नम्रता नागेश कांबळे या दोन चिमुकलींना बाहेर काढण्यात आले.
याबाबत अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर म्हणाले, महापालिकेचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहिम सध्या सुरू आहे. गणेशोत्सवामुळे ही मोहिम बंद ठेवण्यात आली होती.
घटनास्थळी महापौर वैशाली बनकर, खासदार सुरेश कलमाडी, सुप्रिया सुळे, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. अभय छाजेड, नगरसेवक शिवलाल भोसले, वर्षा तापकीर, राष्ट्रवादीचे गटनेते सुभाष जगताप, महापालिका आयुक्त महेश पाठक, जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी भेट दिली.
महापौर बनकर म्हणाल्या, ही इमारत अनाधिकृत असल्याने काम थांबविण्याची नोटिस देण्यात आली होती. गणेशोत्सवामुळे पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यात आली होती.
खासदार सुळे म्हणाल्या, ही घटना दुर्देवी आहे. या इमारतीच्या अनाधिकृत बांधकामाबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने येथील नगरसेवकांनी पालिका अधिकार्यांकडे तक्रार केली होती. सध्या शहरातील ८२५ अनाधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. राजकारण्यांशी संगतमत करून अनाधिकृत बांधकामे सुरू असलेल्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.
स्थानिक नगरसेवक शिवलाल भोसले म्हणाले, हे अनाधिकृत बांधकाम आम्ही पालिका अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. अधिकार्यांनी लवकर पहाणी करून इमारत पाडली असती तर ही दुर्घटना घडली नसती.
अधिकार्यांच्या दूर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप वर्षा तापकीर यांनी केला.
इमारत मालकाला काम बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. १ सप्टेंबर रोजीच त्याप्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात कारवाई होणार नसल्याने घाईघाईने बांधकाम उरकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळेच हे बांधकाम कोसळल्याची शक्यता आहे.
-विवेक खरवडकर,
बांधकाम विभागप्रमुख
माननीयांचा मदतीपेक्षा अडथळाच..
बांधकाम कोसळल्याचे वृत्त समजताच स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांनी जागेवर पाहणी केली. त्यामुळे जमलेल्या कार्यकत्या्र्रंमुळे मदत करणा-या पोलीस व अग्निशमक दलाच्या जवांना मदत होण्यापेक्षा अडथळा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
नगरसेवक विसरले ‘आदर्श’शपथ..
अनाधिकृत बांधकामांमुळे धनकवडी अगोदरच बदनाम झाली आहे. त्यामुळे परिसरातील आदर्श मित्र मंडळाने महापालिका निवडणुकीपूर्वी या परिसरातील इच्छुक उमेदवारांकडून आपला परिसर स्वच्छ व पर्यावरण पूरक ठेवणार. कोणतेही अनाधिकृत बांधकाम व अनाधिकृत नळजोड घेण्यासाठी मदत करणार नसल्याची शपथ घेतली होती. परंतु, निवडून आल्यानंतर सर्व नगरसेवकांना घेतलेल्या शपथीचा विसर पडल्याचे चर्चा आहे.
..अन् गणपती बाप्पा मोरया !
अग्निशमक दलाचे जवान व पोलीसांच्या मदतीने सायंकाळी तीन मजूर, दोन मुली, तीन महिला व दोन चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश आले. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्य़ा वाजवून व गणपत्ती बप्पा मोरयाच्या घोषणा दिल्या. डॉ. राजेंद्र जगताप व डॉ. विजय वारद यांनी लाईफसेव्हर म्हणून अनेकांचे जीव वाचविण्यासाठी तातडीने मदत केली.
माननीयांच्या इमारतीकडे काणाडोळा भोवला
या अनाधिकृत बांधकामाला महिन्यांभरापूर्वी नोटीस देण्यात आली. सामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई करणा-या महापालिका प्रशासनाने माननीयांचे बांधकाम असल्याने कानाडोळा केला. प्रशासनाने तातडीने कारवाई केली असतीतर मजूरांचे जीव वाचले असते, अशी हळहळ परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
इमारतीचा पायाच तकलादू
इमारतीचे कॉलम कमकुवत असल्याचे माहीत असूनही बांधकाम मालकाच्या हट्टामुळे तकलादू कॉलम सांधण्याचे धोकादायक काम हाती घेतल्याची माहिती समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वीच अशा पद्धतीचे काम झाले होते. आणखी एका कमकुवत कॉलमला बाहेरून मलमपट्टी करण्याचे काम सोमवारी हाती घेतले होते. यामुळेच तळजाई पठारावरील इमारत कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक रहिवासी व घटनेचे प्रत्यक्षदश्री सचिन वरखडे म्हणाले, ‘‘या इमारतीचा चारमजली सांगाडा दीड वर्षापूर्वीच तयार झाला आहे. इमारतीचे बांधकाम तकलादू असल्याचे सहा महिन्यांपूर्वीच लक्षात आले होते. इमारतीच्या दर्शनी बाजूकडील मधल्या कॉलमला तडे गेले होते. हा कॉलम डागडुजी करून पुन्हा दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतर आणखी एका कॉलमला तडा गेल्याने तो सांधण्याचे काम सोमवारी सुरू होते. यासाठी कामगारांनी सकाळी तयारी केली. त्यानंतर दुपारी ते जेवायला बसले होते. इतक्यात माझ्यासमोरच इमारतीच्या तळमजल्यावरील उजव्या बाजूचा कॉलम तुटला. त्यानंतर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इमारत उजव्या बाजूकडे कोसळली.’’
कलाजगत मंडळाचे कार्यकर्ते तत्काळ मदतीला आले. त्यांनी एका महिलेला ढिगार्यातून बाहेर काढले. जखमी महिलेला धनकवडीतील पुरोहित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या महिलेबरोबरचा एक माणूस मरण पावला. कॉलमखाली गाडला गेल्यामुळे त्याला बाहेर काढता आले नसल्याचे वरघडे यांनी सांगितले.
महिनाभरापासून या इमारतीत वीट, प्लॅस्टर, पेंटिंग, सेंट्रींग व ग्रिल बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पार्किंगमध्ये २ खोल्या काढण्यात आल्या होत्या. ३ मजल्यांवर वन बीएचकेचे प्रत्येकी २ फ्लॅट होते. चौथ्या मजल्यावरही खोल्या काढल्या असल्याचे एकाने सांगितले.
दिगंबर स्वामी म्हणाले, ‘‘मोठय़ाने आवाज आला म्हणून बाहेर आलो. समोरची इमारत क्षणात कोसळली. सगळीकडे धुराळाच.. धुराळा. काही समजलेच नाही.’’ रजनी नाईक म्हणाल्या, ‘‘बाहेरून घरातच पाऊल ठेवले तोच मोठा आवाज आला. सुरुवातीला बॉम्बस्फोट झाल्यासारखे वाटले. बाहेर येऊन पाहिल्यावर इमारत जमीनदोस्त लेकरांना आवाज तरी द्या.
पुणे। दि. २४ (प्रतिनिधी)
पोटच्या तिनही लेकी ढिगार्याखाली गाडल्या गेलेल्या.पती गावी गेलेला..आपल्या लेकरांचे नक्की काय झाले असेल या भावनेने माता स्तब्ध झालेली. नातेवाईक व शेजार्यांना ढिगार्याकडे बोट दाखवून तुम्ही जरा आवाज द्या ना अशी विनवणी ती माता करीत होती. मुलींच्या चिंतूने व्याकूळ झालेल्या या मातेचे हाल पाहून सारेच हेलावून गेले होते. अखेर तब्बल साडेचार तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दोन मुलींना सुखरुप बाहेर काढण्यात जावानांना यश आले. मात्र तिच्या एका मुलीचा यात दुर्देवी मृत्यू झाला.
तळजाई पठार येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीत एकाच कुटूंबातील तीन मुली गाडल्या गेल्या होत्या. त्यातील सायली (वय ५), नम्रता कांबळे (वय ७) यांना वाचविण्यात जवानांना यश आले. नयनाचा (वय १२) यात दुर्देवी मृत्यू झाला. चौथी मुलगी नीलम शुक्रवार पेठेतील जिजामाता शाळेत इयत्ता नववीत शिकते. दुर्घटना घडली तेव्ही ती शाळेत गेली होती. नागेश व लक्ष्मी कांबळे हे दाम्पत्य या इमारतीच्या तळमजल्यावर बांधलेल्या दोन रुममध्ये दहा सप्टेंबरलाच रहायला आले होते. नागेश मार्केट यार्डात हमालीचा व्यावसाय करतात. तसेच सायंकाळी भाजीची गाडी लावतात. तर लक्ष्मी सहकार नगर येथील रिलायन्स फ्रेश या दुकानात काम करतात. नागेश सांगली जिल्ह्यातील धामवडे या गावी गेले होते. तर लक्ष्मी कामास गेल्या होत्या. सायली व नम्रताची काळजी घेण्यासाठी नयना शाळेला सु्टटी घेऊन घरीच थांबली होती. दुपारची घटना घडल्यानंतर लक्ष्मी अक्षरश: कावर्या बावर्या झाल्या होत्या. शेजारी त्यांची समजूत काढत होते. मात्र दुपारी शाळेत गेलेली नीलम घरी आली. आणि तिने बहिणी कोठे आहेत अशी आर्त हाक दिली, अन दोघींच्या भावनेचा बांध फुटला. दुपारी साडेचारच्या सुमारास एका इसमाला सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश आल्याने लक्ष्मीच्या जिवात जीव आला.
‘लाईफ सेव्हर’ टीमने वाचविले जीव
तळजाईची बहुमजली इमारत कोसळल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत वाहतूक पोलीस व वैद्यकीय ्अधिकार्यांची आपत्कालीन टीम घटनास्थळी पोहचली. त्या टीमने लाईफ सेव्हर कीटचा वापर करून तब्बल ११ जीव वाचविले.
वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक बळवंत काशीद यांच्या समन्वयाखाली आपत्कालीन टीम दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आली. सप्टेंबर २0१0 ला गणेश विसर्जन मिरवणुकीत चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रशेखर लुनिया यांच्या वडिलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्या वेळी लुनिया यांनी वाहतूक पोलिसांना आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची विनंती केली. त्या वेळीपासून वाहतूक पोलीस व डॉक्टरांची आपत्कालीन टीम तयार करण्यात आली. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत ही यंत्रणा यशस्वी ठरली.
या वर्षीसाठी दोन दिवसांपासून तयारी सुरू आहे. हीच तयारी आजच्या घटनेवेळी कामी आली, असे डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले. डॉ. विजय वारद, डॉ. जगताप, डॉ. सुनील केलगणे,
डॉ. प्रशांत चिपाडे, सहायक
पोलीस निरीक्षक विठ्ठल
चव्हाण यांच्या टीमने घटनेत सापडलेले मजूर, महिला व
मुलांना लाईफ सेव्हर कीटचा उपयोग करून प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अँम्ब्युलन्सचा उपयोग करून तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये हलविले जात होते.
महापौरांच्या गाडीची ‘अँम्ब्युलन्स’..
महापौर वैशाली बनकर घटनास्थळी आल्या. त्या वेळी अनेक जणांना ढिगार्याखालून काढण्यात आले. अँम्ब्युलन्सला जाण्यासाठी मार्ग नसल्याने पोलिसांनी महापौरांना विनंती केली. महापौर बनकर यांनीही तातडीने दिलेली गाडी सायरन वाजवीत अम्ब्युलन्सप्रमाणे एकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली.

नंदुरबारचे ग्रीन पोलीसिंग
पोलीस म्हटला की सर्व सामान्यांना धडकी भरविणारे व्यक्तिमत्व रुक्ष कामाच्या स्वरुपामुळे पोलीसाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा वेगळाच असतो. मात्र याच पोलीसानी जिल्हयात आठवडाभराच्या कालावधीत एक हजार 685 रोपे लावून त्यांच्यातील कोमल मनाचा परिचय करुन दिला आहे. एवढयावर हे पोलीस थांबले नाहीत, लावलेल्या रोपांचे संवर्धन आणि जोपासना करण्याची जबाबदारीही त्यांच्या कुटूंबियांनी स्वीकारली आहे.
या संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती यांनी सांगितले, की राज्य शासनाने शंभरकोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागाच्या माध्यमातून रोपांची लागवड करण्यात करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस दलातर्फेही आतापर्यंत जिल्हयात एक हजार 685 रोपे लावण्यात आली आहेत. जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यातंर्गत शनिवारी व रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. दोन दिवसा 826 रोपे लावण्यात आली. त्या त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय पोलीस पाटील,महिला दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.
एप्रिलच्या प्रांरभी येथील तत्कालीन पोलीस अधिक्षक चंद्रकांत कुंभार यांनी भेट दिली. या कालावधीत त्यांनी परिसराची पाहणी केली.आठ वर्षापूर्वी त्यांनी येथे 821 वृक्षाची लागवड केली होती. ती सर्व झाडे बहरलेली पाहून श्री कुंभार यांना विशेष आनंद वाटला त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून आपण ही काही तरी करावे या हेतूने प्रेरित झाल्याचे डॉ. अपरांती यांनी सांगितले.श्री. कुंभार यांनी ऐनवेळी वृक्ष लागवडीसाठी खड्डे न करता दोन महिने अगोदर नियोजन करावे तेथे पुरेसे खत टाकावे असे मार्गदर्शन केले. त्यानुसार वनविभागाच्या सहकार्याने व पोलीस दलाच्या मेहनतीने पूर्व तयारी करण्यात आली. परिसरात तात्पुरती नर्सरी विकसित करण्यात आली.
कोणत्या ठिकाणी कोणते झाड लावले व ते बहरु शकते, हवेचा वेग , जमिनीचा पोत आणि वृक्षाची स्थिती लक्षात घेवून विविध जातीच्या वृक्षांची निवड करण्यात आली. कोणते झाड कुठे लावायचे, कोणी दत्तक घ्यायचे याबाबतची ब्लू प्रिंट तयार करण्यात आल्याचे डॉ. अपरांती यांनी सांगितले. या रोपाभोवती बांबूच्या काठयांचे संरक्षण तयार करण्यात आले आहे.
पोलीस दलातर्फे जिल्हयात एक हजार 685 रोपांची लागवड करण्यासाठी शासकीय निधीतून एक रुपयाही खर्च करण्यात आलेला नाही. रोप तात्पुरत्या नर्सरित जोपासण्यात आले. कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून खडे्ड केले व त्यांचे रोपण करुन ती जोपासण्याची जबाबदारीही स्वीकारली.
पोलीस मुख्यालय परिसर 412, पोलीस वसाहत 397,एस.पी.बंगला 50, सारंगखेडा पोलीस स्टेशन 36,शहादा 150, म्हसावद 95,धडगांव 55,अक्कलकुवा 75, मोलगी 25, तळोदा 115,नंदूरबार शहर 10, नंदूरबार तालुका 160, विसरवाडी 15,नवापूर 80,एकता चौकी 10 असे एकूण 1 हजार 685 वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.
मेघ:शाम महाले, माहिती सहाय्यक नंदुरबार

Friday, September 21, 2012
या चिमण्यांनो परत फिरा रे ...!
काका काका , चिमणी म्हणजे काय रे? माझी ७ वर्षांची पुतणी मघा मला विचारत होती, आता हिला काय सांगाव असा प्रश्न मलाच पडला.
"अग. चिमणी म्हणजे छोटा पक्षी असतो ,तो चिव चिव करतो." उत्तरादाखल एवढंच बोललो खर ,तोच मघा म्हणाली ,"मला दाखव ना रे चिमणी,मला
चिव चिव आवाज ऐकायचाय " मग काय तिला घेऊन बाहेर आलो .गच्ची, झाड, देऊळ सार पालथ घातल ,पण चिमणी काय दिसेना."काका चिमणी फिमणी काय नसत ,तू काही पण सांगतो."
काकाला च्यायलेंज ..! मग काय चिमणी शोध मोहीम सुरु केली .पण हाय हाय चिमणी काय दिसेना,मघा काही हसेना ..! मग रोज जाता येता चिमणी शोधायला सुरुवात केली .बागेत, शाळेत, रस्त्यात.झाडांवर पण अहं .. टाय टाय फिश! शेवटी तिला पुस्तकात आणि इंटरनेट वर फोटो दाखविला,तर म्हणते कशी,"पण काका मग या चिमण्या आता कुठ्येत ?" आता काय सांगू हीला?
पण मघाच्या या प्रश्नाने मीही विचार करू लागलो,या चिमण्या आता कुठ्येत ?"
थेट न घाबरता स्वयंपाक घरात वावरणाऱ्या .तांदूळ, धान्य निवडताना आईभोवती फेर धरणाऱ्या या चिमण्या आता कुठ्येत ?" कारण काहीही असो ,या चिमण्या लुप्त होऊ लागल्यात हे मात्र खर.
परवा रविवारी सकाळी निवांत ताणून दिली होती, तोच मघा ओरडत आली ,काका काका तुझं कॅमेरा घेऊन बाहेर ये, ताडकन उठलो कॅमेरा घेऊन बाहेर
आलो ,पाहतो तो काय ? आमच्या घरासमोरील अंगणात(अर्थात सिमेंटच्या) किमान १२ ते १५ चिमण्या धान्य टिपत होत्या ,काका ते बघ त्या चिव चिव पण करतायत ..! मघा आनंदाने ओरडत होती.मलाही नवल वाटल अंगणात चिमण्या कशा आल्या? मग आईने उलगडा केला म्हणाली ,अरे तुम्हा दोघांचा
चिमणी शोध सुरु झाला आणि मीही लागले रोज चिमणी शोधायला.मग मी रोज थोडे धान्य अंगणात टाकू लागले आणि हे बघ या चिमण्या...!
मंडळी, हीं संपूर्ण खरी घटना आहे. साधीच बाब आहे पण आपण थोड अंतर्मुख होऊन विचार कला तर त्या माग खूप काही दडलय. आजही आठवतंय
दहावीच्या परीक्षेवेळी कोकीळा ओरडायची त्या लिंबावरून , वडिलांनी बाहेर टाकलेला घास खायला कावळा हमखास यायचा, धान्य निवडताना आईभोवती चिमण्या फेर धरायच्या .आज ना ते लिंबाचे झाड राहिले ना ते सारवलेले आंगण. निसर्गावर आम्हीच मोठा घाला घातलाय.त्यामुळेच आज चिमण्या शोधायला लागतात.
एक करू या ना. एक प्रयोग म्हणून, या चिमण्यांना परत माघारी बोलवू या का? आपापल्या परीने प्रयत्न करू या. आपल्या लहान मुलांना, नातवांना
चिऊ ची साथ देऊ या ..!
NITIN U SONAWANE
Govt.Publicity
9422428585
वसतिगृह विद्यार्थी विकास अभियान
हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी संगीता मकरंद यांच्या संकल्पनेतून तयार झालेले वसतिगृह विद्यार्थी विकास अभियान जिल्हयातील सामाजिक न्याय विभागातंर्गत चालणाऱ्या सर्व वसतिगृहांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण मिळावे, बदलत्या काळानुरुप आवश्यक असणारे कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे व शासकीय वस्तीगृहामध्ये सुधारणा होऊन दुर्लक्षित घटकातील हे विद्यार्थी उद्याचे सक्षम व जागरुक नागरिक व्हावे, हा उदेश या अभियानाचा आहे.
दि. 15 ऑगस्ट् 2011 रोजी या अभियानाचा शुभारंभ झाला. जिल्हयातील एकूण 45 वस्तीगृहांमध्ये हा कार्यक्रम राबविला जात आहे. सुमारे 1,608 विद्यार्थ्यांना या अभियानाचा लाभ झाला आहे. अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात भर पडली आहे. या अभियानातंर्गत शासकीय कार्यालय व अधिकाऱ्यांना सदिच्छा भेटी, विविध स्पर्धांचे आयोजन, योजनांची माहिती आपल्या गावी अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम, ग्रामसभा जन जागृती कार्यक्रम, वस्तीगृह आनंद मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता उपक्रम आदी उपक्रम राबविले जातात. या अभियाना अंतर्गत हिंगोली जिल्हयात विविध कार्यालयांना भेटी व आनंद मेळाव्याचे चाळीस पेक्षा अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचा आत्म्विश्वास वाढला आहे.
वसतिगृह विद्यार्थी विकास अभियान हे अभियान कल्याणकारी राज्य म्हणून गौरवण्यात आलेल्या महाराष्ट्रातील मागास घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याच्या शासनाच्या प्रयत्नातील एक महत्वाचे पाऊल ठरले आहे. महाराष्ट्रात प्रथमच हिंगोली जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या वसतिगृह विद्यार्थी विकास अभियानाबाबत सविस्तर् माहिती पुढीलप्रमाणे आहे.
वसतिगृह विद्यार्थी विकास अभियानाची संकल्पना - सामाजिक न्याय विभाग, हिंगोली जिल्हयात स्वयंसेवी संस्थांमार्फत 45 वसतिगृह कार्यरत असून या सर्व वसतिगृहात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक वसतिगृहात विद्यार्थी कल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या/ शैक्षणिक प्रगती करीता कार्य केल्या जाते व मुलांच्या बाल हक्काविषयी त्यांना जागृत करुन वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याने सोडविण्याचा या कार्यक्रमांतर्गत प्रयत्न केला जातो. तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमात सहभागी करुन घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीचे अनुकूल वातावरण तयार करण्यात येते. या सर्व समित्यांचा कालावधी एक वर्षाचा असतो व या कार्यक्रमाची अंमलबजावणी मोहिम स्वरुपात करण्यात येते. तसेच या समित्यांचे स्वंतत्ररित्या वार्षिक मूल्यमापन करुन त्यांच्याकरीता प्रोत्साहनपर बक्षीस योजनाही राबविले जाते.
अभियानाचे उदिष्टे- सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या या अभियानाची प्रमुख उददीष्टे खालील प्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असणारे वातावरण निर्माण करणे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक आव्हानांना स्वीकारण्याची क्षमता विकसित करणे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तीमत्व् विकास, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, विद्यार्थी हक्क व वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये समस्या व त्या समस्यावर उपाय योजना करणारी एक स्वतंत्र अशी सक्षम यंत्रणा निर्माण करणे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी घरगुती वातावरण निर्माण करणे.
अभियानाचे स्वरुप - सामाजिक न्याय विभागातंर्गत चालणाऱ्या सर्व वसतिगृहांमध्ये वसतिगृह विद्यार्थ्यांमध्ये विकास समितीची स्थापना करणे, वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांचा समितीमध्ये समावेश असेल. या प्रतिनिधींची निवड लोकशाही तत्वाने समाज कल्याण अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केल्या जाईल.
समितीची रचना - वसतिगृह विद्यार्थी विकास समिती प्रमुख-अध्यक्ष, वसतिगृह विद्यार्थी शैक्षणिक कार्यक्रम व शाळेशी सबंधित विषय प्रमुख- सदस्य, व्यक्तीमत्व विकास,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम प्रमुख-सदस्य,बाल हक्क व वसतिगृह सोयीसुविधा प्रमुख-सदस्य,वसतिगृह अधिक्षक-पदसिध्द सचिव
या समितीला आवश्यक सर्व सहाय्य व सहकार्य करण्याची जबाबदारी वसतिगृह अधिक्षकांची असेल व त्यांना या समितीमध्ये पदसिध्द सचिव पदावर कार्य करावे लागेल. या समितीच्या महिन्यातून किमान दोन बैठका होतील. या बैठकांमध्ये (HSDC) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व निर्णय घेण्यात येतील. प्रत्येक वसतिगृहामध्ये तक्रार पेटी असेल व सदरील पत्रपेटी वसतिगृह निरीक्षक किंवा समाजकल्याण अधिकारी यांच्या समक्ष उघडणे बंधनकारक असणार आहे. या तक्रार पेटी मधील तक्रारी/ मुद्यांच्या आढावा सुध्दा या बैठकांमध्ये घेण्यात येईल. वसतिगृह स्तरावरील समितीच्या निवडक प्रमुखांचा समावेश असणारी एक समिती जिल्हा स्तरावर असेल. या समितीमध्ये समाजकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव या पदावर कार्य करतील. या समितीची तीन महिन्यांतून किमान एकदा बैठक होईल. समाज कल्याण निरक्षक हे या समित्याच्या कामकाजात सूसुत्रता व प्रभावीपणा आणण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतील.
समित्यांच्या कार्याचा तपशील - सर्व स्तरावरच्या समित्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांना दर्जात्मक शिक्षण मिळवुन देण्यासाठी कार्य करणे अपेक्षित आहे. तसेच बाल हक्क व वसतिगृहातील सोईसुविधा या बाबतही कार्य करण्याची जबाबदारी समितीकडे असल्याने यासाठी अवाश्यक ते नियम तयार करुन त्याची अंमजबजावणी करण्याचे अधिकार समितीला असतील. या समित्यांना विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकास, सामाजिक व सांस्कृतिक विकासाचे विविध कार्यक्रम राबविता येतील. विद्यार्थी/ विद्याथिंनींच्या दैनंदिन अडचणीचे निराकरण या समित्यांना करावे लागणार आहे.
सचेतना उपक्रम व प्रोत्साहनपर बक्षीस योजना - जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प. हिंगोली यांच्या मार्फत वसतिगृह/ विकास समितीमधील विद्यार्थ्यांना या संकल्पनेविषयी परीपूर्ण माहिती देण्यासाठी सचेतना बैठक/ कार्यशाळा आयोजित केल्या जातील. आवश्यक ती माहिती छापील स्वरुपात उपलब्ध करुन दिल्या जाईल. या समितीच्या कार्याच्या अनुषंगाने वार्षिक कृती कार्यक्रम आराखडा समाजकल्याण अधिकारी, जि.प. हिंगोली यांच्या मार्फत स्वतंत्ररित्या तयार करण्यात येईल. या उपक्रमांर्गत उत्कृष्टरित्या कार्य करणाऱ्या तीन वसतिगृह विकास समित्यांना प्रशस्तीपत्र, स्मृती चिन्ह व बक्षीस देण्यात येईल. तसेच संबंधित वसतिगृहांना बक्षीस, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
प्रमोद धोंगडे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली
Tuesday, September 18, 2012
फेसबुकच्या जगात
संजना : काय गं गेले एक तास कुठे होतीस? एकही पोस्ट नाही, कमेंन्ट नाही आणि माझ्या फोटोला लाईक्स नाही.
रंजना : (मनातल्या मानात- झाल्या हिच्या शेजारणी सारख्या चौकश्या सुरु) अगं संजना रात्रीचे नऊ वाजलेत पोरं भुकेनं ओरडत होती म्हणून भाजी टाकायला उठले होते?
संजना : अय्या फक्त भाजीच खायला घालणारेस? by the way कुठची भाजी केलीस?
रंजना : अगं पोळ्या सकाळीच केल्या होत्या आणि भाजी भरलेलं वागं केलय.
संजना : अय्या भरलेलं वागं कित्ती छान, पटकन रेसिपी आणि फोटो पोस्ट कर ना फेसबुक वर.
संजना : (२च मिंनिटात) कित्ती सुंदर दिसतायेत भरलेली वांगी. उद्याच करून बघेन वेळ मिळाला तर. अगं तुला एक विचारायचे राहून गेले तु त्या मिसेस अग्रवालच्या रेसिपीला लाईक केलेस का ?
रंजना : कोणती वरण भाताची, शेंबडं पोरही सांगेल, त्यात कसलं आलय कौतुक?
संजना : तु म्हणजे अगदी बावळट आहेस. माहित असले तरी लाईक करायला काय जातंय. १ क्लिक केलं की मिसेस अग्रवाल खुष आणि most important तुझ्या टप्परवेअरच्या बिझनेस साठी तुला अशाच गिऱ्हाईकांची गरज आहे. एकदा लाईक कर अणि वर कमेंन्ट कर, मिसेस अग्रवाल हाच वरणभात तुम्ही तुमच्या मिस्टरांना रोज टिफीनला देऊ शकता टप्परवेअरच्या डब्यातुन वरण अजिबात बाहेर येणार नाही. मग बघ कमाल.
रजंना : काय ज्ञान पाजळलस गं धन्य झाले मी I mean to say धन्यवाद तुझ्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीबद्दल.

बाप लेकाचा फेसबुक वरील संवाद..
बंडयाचे वडील : बंडया नालयका घरी ये आधी, दोन दिवस झालेत पत्ता नाही तुझा. फेसबुकवरचे तुझे पोस्ट ,कमेंन्ट पाहुन जीवात जीव आला. (जिंवंत असल्याची खात्री पटली)
बंडया : chill बाबा, फेसबुक सारखं मोहमायी जग असताना मी दुसरं कुठे जाणार? सो डोण्ट वरी.
वडिलांचे मित्र : काय दिवस आलेत आता मुलांना शोधण्यासाठी त्याच्या मित्रांकडे किंवा पोलिसात न जाता फेसबुक लॉग इन करावे लागते. नारायण.. नारायण..
बंडयाचे मित्र : ए बंडया कुठे होतास?
मित्र नंबर २ : बंडया लवकर घरी जा आणि घरी गेल्यावर होणारे माहाभारत पोस्ट कर. वी आर इगरली वेटिंग आणि प्रसाद मिळाला तर तोही शेअर कर फेसबुकवर.

टिपीकल नवरा बायकोच फेसबुकरचं भाडंण..
नवरा : आज जरा भाजीत मीठ कमी पडलं.
बायको : चुका काढायला काय जातयं, इथं सकाळपासून राब राब राबते पण कुणाला म्हणुन पर्वा नाही.
नवरा : अग असं काय म्हणतेस काल खाल्ली ना जळालेली पोळी. चकार शब्द काढला नाही.
बायको : खाल्ली तर काय उपकार केले इथं ढिग भर पोस्ट येवुन पडले होते फेसबुकवर, मी म्हणते लाइक्स आणि कमेंन्ट करायच्या नादात जळाली एखादी पोळी तर काय बिघडलं. मी कधी करते का तक्रार रात्री ढाराढुर घोरता तेव्हा.
नवरा : अग आपण फेसबुकवर आहोत जरा भान ठेव.
बायको : आता का? कळु देत सगळ्या जगाला. मी होते म्हणुन, माझ्याजागी दुसरी कुणी असती तर…….

भरारी टुर्स..
गाइड : चला चला आटपा लवकर नुसते फोटोच काय काढता आहत? पुढची पण ठिकाणं पाहायचीत आपल्याला.
टुरिस्ट : गप्प बसा हो जरा, फेसबुक वर अपलोड करायचेत हे फोटो लाईक्स मिळाले नाही तर नाक कापलं जाईल आमचं.
टुरिस्ट २: मी तर ठरवलं आहे या वेळी ५० हजाराहुन अधिक लाईक्स मिळाली तर मी पार्टी ठेवणार आहे.

प्रिसिला चान : मार्क पेशंटची वाट पाहुन माझे पेशन्स संपलेत. फेसबुकच्या या मोहमायी दुनियेत लोकांना त्यांच्या आजारपणाचा विसर पडलाय आणि कुणाला जाणीव झालीच तर फेसबुकवरच free consultation ची मागणी करतात. मला तर माझा दवाखाना बंद पडणार असं दिसतंय.
मार्क झुकरबर्ग : सॉरी प्रिसिला मी या सगळ्याचा स्वप्नातही विचार नव्हता केला. माझं उद्दिष्ट्य फक्त लोकांना एकमेकांशी जोडणं, त्यानां power of sharing देणं , जगाला ओपन करणं एवढंच होतं. फेसबुक मुळे जग ओपन झालं, लोक एकमेकांच्या संपर्कात तर आले पण ते फक्त एका किल्क पुरतेच.

'संगमेश्वरी' प्रसाद ..
रत्नागिरीतील गणेशोत्सवात मोदकांच्या प्रसादाची चंगळ असते. ढोलकीची थाप, लयबद्ध जाखडी आणि सोबत मोदकाचा प्रसाद...हे सर्व एकत्र आल्यावर उत्साहाला रंग चढतो. मोदकांचा प्रसाद घरोघरी असतो. तळलेले किंवा उकडीचे मोदक तसे कॉमनच. खवय्यांसाठी खास खव्याचे मोदक हलवायाकडे सजवून ठेवलेले असतात. मात्र या सर्वांच्या पलिकडे लक्षात राहते ती संगमेश्वरी मोदकांची चव. परदेशी भारतीयदेखील या चवीच्या प्रेमात पडले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे गणेशभक्त संगमेश्वरच्या अलिकडे 'गणेश कृपा' फलक पाहिल्यावर थांबतात आणि मोदकांची चव घेऊन पुढे जातात. या मोदकांना श्रीगणेशाच्या नावाने वैभव उभे करताना 'संगमेश्वरी मोदक' अशी ओळख मिळवून देण्याचे श्रेय जाते रंजना घडशी या 60 वर्षाच्या महिलेला.कल्पकता आणि परिश्रम यांचा सुंदर समन्वय करीत त्यांनी आपल्या उत्पादनाला नवी ओळख मिळवून दिली आहे.
रंजनाताईंचे मुळ गाव संगमेश्वर तालुक्यातील आंगवली. शिक्षक असलेल्या रघुनाथ घडशी यांच्याशी विवाह झाल्यावर त्या संगमेश्वर येथे आल्या. पतीचा पगार कुटुंबासाठी पुरेसा नसल्याने त्यांनी आरोग्य रक्षकाची नोकरी, चहा विक्री आदी विविध कामांपासून सुरूवात केली आणि शेवटी प्रयत्नपूर्वक हॉटेल व्यवसायात यश मिळविले. त्यांचे गोड बोलणे आणि चांगलीसेवा यामुळे व्यवसाय वाढत गेला. काही काळ एमटीडीसीच्या निवास-न्याहरी योजने अंतर्गत त्यांनी केंद्रही चालविले.
एरवी गणेशोत्सवात मोदक घरी होतातच. तसे गणेशोत्सवाच्यावेळी रंजनाताईंकडे घरात तांदळाचे मोदक केले जात असत. मात्र त्यातल्या केवळ पुरणाचा मोदक करण्याचा प्रयोग त्यांनी पाच वर्षापूर्वी केला आणि तो यशस्वी झाला. हेच मोदक त्यांनी विक्रीसाठी ठेवल्यावर ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. पुढे अशा मोदकांना मागणी येऊ लागली. मोदकांच्या रुपात आणि चवीत बदल करण्यात आला. आंबा, सीताफळ, किवी, स्ट्रॉबेरी, चॉकलेट अशा विविध चवीत हे मोदक विक्रीस उपलब्ध करून दिल्यावर मागणी वाढतच गेली. आकर्षक रंग आणि चवीमुळे या मोदकाला मागणी सातत्याने वाढते आहे. अगदी लालबागच्या राजालादेखील या मोदकांचा नैवेद्य असतो.
आज प्रत्येक दिवशी 500 ते 1000 नारळांचे मोदक तयार केले जातात. महामार्गावरून जाणारे बरेच पर्यटक इथे फराळासाठी आणि खरेदीसाठी थांबतातच. चविष्ट आणि काही दिवस टिकणारे असल्याने कोकणची आठवण म्हणून मोदक सोबतही घेऊन जातात. मोदकासाठी लागणारे नारळ स्थानिक बागायतदारांकडून खरेदी केले जातात. मोदक तयार करण्याच्या प्रक्रीयेमुळे दहा मुली आणि चार गड्यांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. पर्यटनाचा हंगाम आणि आंगणेवाडीसारख्या मोठ्या जत्रा असताना विक्री सर्वाधिक असते.
दोन वर्षापासून राज्य तसेच देशाबाहेरील पर्यटकदेखील सोबत मोदक नेत आहेत. मुंबईत दररोज मागणीप्रमाणे मोदक पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व यशामागे रंजनाताईंचे अविश्रांत परिश्रम आणि धैर्य आहे. मोठा मुलगा सुनिल यानेदेखील त्यांच्या या कामात लक्ष घातले आहे. मायलेकांनी विश्वासाने आपला व्यवसाय पुढे नेला आहे. पण त्याचबरोबर त्यांनी संगमेश्वरचे नाव देशाबाहेरही पोहचविले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या मोदकांची गोडी भक्तांना चाखायला मिळणार आहे.
-डॉ.किरण मोघे

Thursday, September 13, 2012
सिलींगच्या जमीनीवर कर्ज
एका सैनिकाला सरकारकडून कसण्यासाठी सिलिंग कायद्याखाली शेतजमीन मिळाली.जमीनीवर नविन शर्त असा उल्लेख आल्यावर सैनिक घाबरला. अनेकांना त्याने त्या शब्दाचा अर्थ विचारला.
गावातील सर्वांनी त्याला सांगितले की,जमीन तुला सरकारच्या परवानगीशिवाय विकता येणार नाही व गहाणही ठेवता येणार नाही. त्याला वाटले माळरान जमीनीत काहीही उगवत नाही. आणि सुधारणाही करता येणार नाहीत. त्यावर त्यांने फार विचार केला.
सरकारने जमीन दिली म्हटल्यावर तिच्यावर कर्ज काढून सुधारणा करायला तर नक्कीच परवानगी असणार असं त्याला वाटलं. त्याने कलेक्टर कचेरीत चौकशी केल्यावर त्याचा अंदाज खरा ठरला. नवीन शर्तीवर जमीन दिली असलीतरी कर्ज काढून त्याला जमीनीत सुधारणा करता येईल अशी तरतूद कायद्यात असल्याचे स्पष्ट झाले.
तात्पर्य – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कायद्यानुसार नविन शर्तीच्या जमीनीवर कर्ज काढायला कोणाच्याही पूर्व परवानगीची गरज नाही. या संदर्भातील कलम 36 (4) च्या कायदेशीर तरतूदी आवर्जुन माहीती करुन घेतल्या पाहिजेत.

नुकसान
शेजारी राहणा-या व जमीन कसणा-या दोन शेतक-यांमध्ये बांधावरुन जोरात भांडण झाले. भांडण मिटविण्यासाठी हर त-हेचे पर्यंत केले पण यश आले नाही. शेवटी वाद कोर्टात गेला. ज्याने दावा लावला होता त्याने प्रतिज्ञाच केली होती की, जोपर्यंत कोर्टाकडून निकाल माझ्या बाजूने होत नाही तोपर्यंत या जमीनीत पाऊल टाकणार नाही. त्यामुळे जमीन पडीक पडली. पहिला निकाल विरोधात गेल्यावर अपिल करुन त्याने भांडण पुढे चालू ठेवले. तब्बल पंधरा वर्षानी कोर्टाचा निकाल लागेपर्यत त्याने स्वत:ची चार एकर जमीन पडीक ठेवली! ती जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी त्याला हजारो रुपये खर्च करावे लागले. शिवाय वेळ व मनस्ताप किती झाला याची तर गणतीच नको!
तात्पर्य - व्यवहार आणि कायदा यांची सांगड घालतांना स्वत:चे एकंदरीत नुकसान किती होते याचा विचार पाहिजे. खटल्याचे अर्थशास्त्र आता शेतक-यांनी जाणले पाहिजे. एखादे भांडण आपल्या आर्थिक हिताचे आहे का याचा तरी किमान विचार केला पाहिजे. खटल्याबददलची आपली मानसिकता आता बदलली पाहिजे.

खटला
दत्तकपत्राचा एक वाद 1915 साली दोन शेतकऱ्यांत सुरु झाला. करण्यांत आलेले दत्तकविधान चुकीचे असून, वारस म्हणून आपलाच जमीनीत हक्क आहे असे हे भांडण सुरु होते. हा वाद तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालला. तोपर्यंत 1969 साल उजाडले. त्यानंतर जमीनीत कुळ असून कुळाचा हक्क ठरविल्याशिवाय हे भांडण सुटणार नाही असा नव्यानेच युक्तीवाद केला गेला व त्यानंतर हे भांडण कुळकायदया-खालील वाद म्हणून महसूल कोर्टात सुरु झाले. तहसिलदार, उपजिल्हाधिकारी, रेव्हेन्यू ट्रीब्युनल, उच्च न्यायालय व परत फेरतपासणी असे हे प्रकरण 30 वर्ष चालले.
नंतर पुन्हा दिवाणी न्यायालयात वाद सुरु झाला. एकूण70 वर्षाहुनही जास्त काळ चाललेल्या या वादातील एकूण जमीन होती फक्त 46 गुंठे. भांडणारे दोन्ही शेतकरी मात्र अंतिम निकालापर्यंत मयत झाले होते. त्याची मुलेही म्हातारी झाली होती. या सर्व प्रकरणात या दोन्ही शेतकऱ्यांनी जेवढा पैसा खर्च केला त्यात दोघेही प्रत्येकी 46 एकर जमीन खरेदी करु शकले असते!
तात्पर्य - जमीनीच्या भांडणात ज्याच्या ताब्यात जमीन आहे त्याचा उददेश नेहमी खटले लांबविण्याचा असतो तर, ज्याच्या ताब्यात जमीन येणार आहे त्यांचा उददेश खटला लवकर चालावा असा असतो. म्हणून डोळसपणे व हित पाहून निर्णय घेतले पाहिजेत.

भुसंपादन
एक गावातुन कॅनॉल जाणार होता. कॅनॅालसाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी येऊन गावात सर्व्हे करु लागले. एका जमीनीमध्ये मोजणीसाठी सर्व्हेअर गेल्यावर रामचंद्र नावाच्या शेतकऱ्यांने त्यांना विनंती केली की, साहेब कॅनॉल जरा वरच्या बाजुला घेतला तर आमच्या जमीनीचे नुकसान थोडे कमी होईल. त्यावर इंजिनिअरने कॅनॉलचे काम थोडे वरच्या बाजुने सरकावण्याचा निर्णय घेतला. वरच्या बाजुची जमीन आमचीच आहे असे सांगुन प्रत्यक्षात आपला चुलत भाऊ सखारामची जमीन कॅनॉलमध्ये जाईल अशी सोय रामचंद्रने केली होती. जिल्हयाच्या गावी नोकरी करणाऱ्या सखारामला आपल्या जमीनीतून कॅनॉल जाणार हे समजले तेव्हा फार उशीर झाला होता! शिवाय कॅनॉल हा लेव्हलप्रमाणे आपल्याच शेतातून गेला याबददल त्याला आश्चर्य वाटले नाही!
तात्पर्य : आम्ही एकत्र आहोत असे दाखवून भुसंपादनासाठी भावाचे क्षेत्र दाखविणारा माणूस कलीयुगात फारसा दुर्मिळ नाही!

साक्षीदार आणि पुरावा
एका साक्षीदाराने कोर्टासमोर साक्ष दिली व साक्षीमध्ये अनेक कागदपत्रांचा उल्लेख केला. या सर्व कागदपत्रांवर आपणासमोर सही झाली आहे व त्यातील दोन महत्वाच्या कागदपत्रांची प्रत आपणाजवळ देण्यात आली होती असे त्याने साक्षीत सांगितले. हे दस्तऐवज आज कोर्टात आणले आहेत काय असे वकीलाने विचारल्यावर रानातल्या झोपडीला आग लागल्यामुळे ही सर्व कागदपत्रे जळून गेल्याचे त्याने सांगितले. झोपडीला आग लागल्याबददल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल का केली नाही असे कोर्टाने विचारल्यावर, "मी महिनाभर यात्रेला गेलो होतो" असे त्यांनी सांगितले. यात्रेवरुन आल्यावर तरी फिर्याद का केली नाही असं विचारल्यावर "कुणाविरुध्द फिर्याद करणार? असा प्रश्न पडल्यामुळे तक्रार केली नाही", असे सांगितले.
तात्पर्य : असे बेरकी साक्षीदार आपल्याला समाजात सतत पाहायला मिळतात.
शेखर गायकवाड

वाटेकरी
एका शेतकऱ्याने आपली जमीन शेजारच्या शेतकऱ्याला वाटयाने कसायला दिली. अर्धा वाटा ठरला. दोन वर्षांनतर वाटयाने दयायला परवडत नाही म्हणून स्वत: मालकाने जमीन मी कसणार असे सांगितल्यावर वाटेकरी याने सांगितले, "मी कसा आता जमीन देईन? मी आता कुळ कायद्याप्रमाणे कूळ झालो आहे". त्यामुळे जमीनमालक शेतकरी घाबरला. पुढे अनेक वर्षे कुळकायद्याचा वाद दोघांमध्ये सुरु झाला.
तात्पर्य : जमीनी संबधीच्या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास न करता व्यवहार केल्यास संकटच ओढवणार. कायदेशीररित्या दुस-याची जमीन कसणारी व त्याबददल खंड देणारी व्यक्ती म्हणजे कूळ होय.

मागासवर्गियांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण योजना
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दर महिन्याला 'लोकराज्य' प्रकाशित केले जाते. या मासिकाचा जुलै महिन्याचा शिक्षण विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकात आदिवासी व अनुसूचित जाती, नवबौद्ध् यांच्याकरिता राज्य शासन राबवित असलेल्या शिक्षण विषयक योजनांसंदर्भात लेख प्रसिध्द करण्यात आला. या लेखात अनुसूचित जाती व नवबौद्ध् घटकातील तसेच आदिवासी युवक व युवतींसाठी सैन्य व पोलीस दलात भरती पूर्व प्रशिक्षण योजनेबद्दल माहिती देण्यात आली होती. विविध जिल्ह्यातील अनेक वाचकांचे या योजनेसंदर्भात माहिती, प्रशिक्षणाचे स्वरुप, आयोजनाचा कालावधी, प्रशिक्षणासाठी कोठे संपर्क साधायचा हे विचारण्यासाठी दूरध्वनी येत आहेत. इच्छुकांना या योजनेची सविस्तर माहिती आणि योजनेचा लाभ मिळण्यास मदत व्हावी याकरिता लेखाचे प्रयोजन आहे.
राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध् घटकांच्या लोकसंख्येमध्ये सुमारे 15 ते 20 लाख अनुसूचित जाती आणि नवबौद्ध् घटकांतील सुशिक्षित बेरोजगार लोकांची संख्या आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध् घटकातील युवकांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे बऱ्याचवेळा हे युवक सक्षम असतानादेखील त्यांना सैन्य व पोलीसदलात भरतीसाठी संधी मिळत नाही. ही उणीव भरुन काढण्यासाठी या युवकांना राज्य पोलीस व सैन्य दलातील अनुशेषांतर्गत संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने आदिवासी विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या सेवापूर्वक प्रशिक्षण केंद्राप्रमाणेच सामाजिक न्याय विभागातर्फे सैन्य व पोलीस दलात भरती सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र सन 2006 पासून सुरु करण्यात आली आहेत.
या योजनेमध्ये प्रशिक्षण सत्राचा कालावधी तीन महिन्याचा असून राज्यातील सर्व प्रमुख सैन्य व पोलिस भरती प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड समाजकल्याण संचालक पुणे यांच्यामार्फत करण्यात येते. प्रशिक्षणाच्या तीन महिन्याच्या कालावधीत उमेदवाराची रहाण्याची सोय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात येते. एका प्रशिक्षण सत्रात 100 युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करताना पात्र उमेदवारांची यादी जिल्हा सेवायोजन कार्यालयाकडून मागविण्यात येते व त्यातील उमेदवारांची निवड विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यामार्फत करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या युवक, युवतींना जेवण, रहाणे, खेळाचे साहित्य, बूट, मोजे, अंथरुण इ. सुविधा मोफत पुरविल्या जातात.
योजनेच्या अटी आणि शर्ती
उमेदवार हा अनुसूचित जातीं व नवबौद्ध् घटकातील असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 ते जास्तीतजास्त 25 वर्षे, शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वीं पास उत्तीर्ण, शारीरिक पात्रता - युवकाची उंची 165 सें.मी., छाती 79 सें.मी. फुगवून 84 सें.मी. युवतीची उंची 155 सें.मी. आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालय अंतर्गत नाव नोंदणी दाखला व ओळख पत्राची सत्यप्रत देणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणाचे स्वरुप
प्रशिक्षण कालावधीत धावणे, उंच व लांब उडी, गोळा फेक, पुल अप्स, अडथळा शर्यत, दोरीवरुन चढणे, मंकी रोप, बैठका, चीनअप, पद कवायत, रायफल फायरिंग, गिर्यारोहन इ. मैदानी चाचणीचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येते. या व्यतिरिक्त सामान्य ज्ञान, मानचित्र अध्ययन, अग्नीशमन, वहातूक नियंत्रण प्रशिक्षण, प्रथमोपचार, स्वास्थ्य शिक्षा, वायरलेस कम्युनिकेशन, व्यक्तिमत्व विकास, आपत्ती निवारण व्यवस्थापन, मुलाखत कौशल्य या बाबत प्रशिक्षण दिले जाते.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा
विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक
मुंबई (022)25275073, मुंबई उपनगर (022) 25222023, ठाणे (022) 25341359, रायगड (02141) 222288, रत्नागिरी (02352)230957, सिंधुदुर्ग (02362) 228882, नाशिक (0253)2412203, धुळे (02564), नंदूरबार (02564)226310, जळगांव (0257) 2263328, अहमदनगर (0241) 2329378, पुणे (020) 24456336, सातारा (02162) 234246, सांगली (0233)2374739, सोलापूर (0217)2734950,कोल्हापूर (0231)2651318, औरंगाबाद (0240)2331993,जालना (02482) 225172, परभणी (02452)220595,हिंगोली (02456)223702, बीड (02442)222672, नांदेड (02462) 224477, उस्मानाबाद (02472)222014,लातूर (02382) 258485, बुलढाणा (07262) 242245, अकोला (0724)2426438, वाशिम (07252)235399, अमरावती (0721)2661261, यवतमाळ (07232) 242035, वर्धा (01752) 243331,नागपूर (0712) 2555178, भंडारा (07184) 252608,गोंदिया (07182)234117, चंद्रपूर (07172)253198, गडचिरोली (07132)222329.
आदिवासी युवकांसाठी
राज्यातील अनुसूचित जमातीच्या युवकानांही राज्य पोलीसदल व लष्कर तथा तत्सम विविध सुरक्षा दलातील अनुषेशातंर्गत संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जिल्हा नाशिक इगतपुरी पेठ रोड, ठाणे-जव्हार(पळसुंडे), धुळे-नंदुरबार, पुणे-आंबेगांव (घोडेगांव), नांदेड-किनवट, चंद्रपूर-राजुरा, गडचिरोली-देसाईगंज, अमरावती-धारणी, अहमदनगर-अकोले (मवेशी) अशा एकूण नऊ ठिकाणी भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
पोलीसदल भरतीपूर्व प्रशिक्षण या योजनेंअतर्गत प्रशिक्षण सत्राचा कालावधी चार महिन्यांचा असून प्रथम सत्र 1 एप्रिल ते 31 जुलै, द्वितीय सत्र 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तृतीय सत्र 1 डिसेंबर ते 31 मार्च अशी तीन प्रशिक्षण सत्र एका वर्षात आयोजित करण्यात येतात.
पोलीस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक आदिवासी युवक युवतींनी संबंधित जिल्ह्यांचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
ठाणे विभाग
प्रकल्प अधिकारी डहाणू - श्री.एस.एस. सलामे- कार्यालय दूरध्वनी क्रमांक- (02528) 222066; निवास 9270073585; मोबाईल क्र.9422486806. जव्हार - श्री.नामदेव पाटील - कार्यालय दूरध्वनी क्र.- (02520) 222413 ; मो.क्र. 9273656310. शहापूर - ए.पी.म्हसे - कार्यालय दू.क्र. (02527) 272157; निवास 272048मो.क्र. 9220589090. पेण - एम.के. मोरे - कार्यालय दू.क्र. (02143) 252519; निवास 254569; मो.क्र.9960975988. घोडेगांव- श्री.यु.एस. शेरकर - कार्यालय दू.क्र.(02133)244266;निवास- 244271; मो.क्र.9371023601. गोरेगांव - श्री.एम.एन.शिरसाट - कार्यालयीन दू. क्र. (022) 28654023; मो.क्र.9763291041.
नाशिक
प्रकल्प अधिकारी नाशिक - श्रीमती संपदा मेहता - कार्यालय दूरध्वनी क्र.(0253) 2577410; मो.क्र. 9604302759. कळवण - श्री गजेंद्र केंद्रे - कार्यालयीन दू. क्र.(02592) 221084;निवास- 9420467777; मो.क्र. 9423245005. नंदुरबार- श्री.अण्णा थोरात - कार्यालयीन दू.क्र.(02564)222303; मो.क्र. 9420375883. तळोदा- श्री.एन.सी.रामदीन- कार्यालयीन दू.क्र.(02567)232220; मो.क्र.9423466640. राजूर- श्री.ता.बा.पावडे-कार्यालयीन दू.क्र.(02424); 251037 निवास- 223207; मो.क्र.9011500323. यावल- श्री.डी.एल.सोनावणे - कार्यालयीन दू. क्र. (02585), 261432; निवास -261240; मो.क्र. 8805775153.
अमरावती विभाग
प्रकल्प अधिकारी औरंगाबाद श्री.एम.जी. गायकवाड- कार्यालय दूरध्वनी क्र.(0240), 2486069; निवास- 2442959; मो.क्र.9421303007. पांढरकवडा- श्री.प्रशांत रुमाले कार्यालीयन दू.क्र.(07235)227436; निवास-227141;मो.क्र.9423786221. किनवट- एस.के.पवार- कार्यालयीन दू. क्र. (02469) 222015; निवास-222232.मो.क्र.9423692892.धारणी. श्री.पी.प्रदीप-कार्यालयीन दू.क्र.(07226)224217 निवास-224332; मो.क्र.9420486486; अकोला श्री.एन.पी.तायडे- कार्यालयीन दू. क्र.(0724) 2425068; मो.क्र. 94200783363.
नागपूर विभाग
प्रकल्प अधिकारी नागपूर- श्री.जी.एन.सरोदे- कार्यालय दूरध्वनी क्र.(0712) 2560726 निवास-2240622, मो.क्र. 9423358179; देवरी - श्री.एम.एन.मडावी-कार्यालयीन दू.क्र. (07199) 225144; निवास- 9423121503. चिमूर - श्री.विनोद पाटील-कार्यालयीन दू.क्र.(07170) 265524, मो.क्र.9422818176; चंद्रपूर - श्री.जी.एन.सरोदे-कार्यालयीन दू.क्र. (07172) 2512170; मो.क्र.9423358179 ;गडचिरोली - श्री.डी.बी.मेंडके-कार्यालयीन दू.क्र.(07132) 222286 निवास- 222363 , मो.क्र.8600108803; अहेरी-श्री.एम.एम.न्गुली- (07133) 272031; मो.क्र. 9619648395; भामरागड श्री.एम.एम.न्गुली- कार्यालयीन दू.क्र.(07133) 266465,निवास-266466; मो.क्र.9619648395.
मुक्ता पवार

स्कुल चले हम......
मी प्रियंका डोंगरे. लाखोरी येथील कनिष्ठ महाविद्यालयात 12 वी विज्ञान शाखेत शिकतेय. माझे गाव परसोडी. मी शिकत असलेल्या महाविद्यालयापासून परसोडी 10 किलोमीटर अंतरावर आहे. इयत्ता 8 वी पासून मी रोज या शाळेत सायकलने जाते. रोज 20 किलोमीटर सायकल चालवावी लागल्यामुळे माझा बराच वेळ जातो. भर पावसात, कडाक्याच्या थंडीत तर कधी रखरखत्या उन्हातही वेळेत शाळा गाठावी लागते. पण मी कधीही शाळा बुडवली नाही की, अभ्यासाचा कंटाळा केला नाही. मला इंजीनीयर व्हायचंय. त्यामुळे मी कितीही कष्ट घ्यायला तयार आहे. पण माझ्या आईला मात्र मी घरी जाईपर्यंत माझी काळजी लागलेली असते. कारण माझ्या गावातुन मी एकटीच या शाळेत जाते. इतर मुलींनी 7 वी नंतर शाळा सोडून दिली आहे. पण यावर्षी मात्र माझा हा सर्व त्रास कमी झाला आहे तो हया निळया बसमुळे ! मी आता अभ्यासाला सुध्दा जास्त वेळ देवू शकते. शिवाय आईला सुध्दा माझी काळजी राहत नाही.
भंडारा जिल्हयाच्या लाखनी तालुक्या तील परसोडी या छोटया गावातील प्रियंका डोंगरे या विद्यार्थींनीची ही प्रातिनिधीक प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी किती त्रास सहन करावा लागतो याची जाणीव करून देणारी. शासनाच्या मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत मुलींसाठी खास बससेवा सुरु करण्यात आली आहे.या बसमुळे प्रियंका सारख्या शिक्षणाची आवड असणा-या अनेक मुलींना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम या बसेस मुळे झाले आहे.
महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवित आहे. 12 वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा सुध्दा उपलब्ध करुन दिली आहे. तरीही ग्रामीण भागातील मुलींचे इयत्ता सातवी नंतर शाळा सोडण्याचे प्रमाण मोठे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागात 10 ते 15 गावांकरिता एक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळेपासून गावाचे अंतर साधारणत: 3 ते 15 किमी एवढे आहे. सर्वच गावांना एस.टी.ची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी कोणतेही साधन नाही. तसेच आईवडील मुलींना गावापासून दूर असणाऱ्या शाळेत एकटीला पाठवायला तयार नसतात. यामध्ये मुलींच्या सुरक्षेची काळजी हा त्यांच्या दृष्टीने अतिशय चिंतेचा विषय असतो. या दोन्ही कारणामुळे ग्रामीण भागातील बऱ्याचशा मुली 8 वी पासून पुढचे शिक्षण घेवू शकत नाहीत. म्हणुनच सर्व मुलींना इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या 22 जिल्हतयातील 125 तालुक्यांकरिता मुलींसाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या बसेस सुरु केल्या आहेत. या बसेस गाव ते शाळा या दरम्यान धावतात.
भंडारा जिल्हयात पाच तालुक्यांमध्ये अशा 25 बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. लाखनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर आणि साकोली या पाच तालुक्यातील वेगवेगळया 25 मार्गावरुन हया बसेस धावताहेत. ही बस सकाळी 9 वाजता मुलींना घेण्यासाठी निघते. ठरवून दिलेल्या मार्गावरील गावातून मुलींना घेवून बरोबर शाळेच्या वेळेवर त्यांना शाळेत सोडते. तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत त्या-त्या ठिकाणाहून मुलींना घेवून त्यांच्या गावांपर्यंत पोहचवते. यामुळे 208 गावातील 3405 मुलींना याचा फायदा मिळत आहे. मुख्य म्हणजे या मुलींना वेगवेगळया 125 शाळांमध्ये पोहचवण्यात येते. या बसमुळे यावर्षी अनेक मुलींची आठवीनंतरही शाळा सुरळीत सुरु आहे. तसेच सायकलने शाळेत जाणाऱ्या मुलींचे शारिरीक श्रम तर वाचले आहेतच पण त्यांच्या आईवडीलांना वाटणारी सुरक्षेची काळजीही मिटली आहे. ही निळी बस मुलींच्या शिक्षणाला दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.
मनीषा सावळे, जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा

Monday, September 10, 2012
कामधेनू योजना
पशुधनाची संख्या कमी होत असून गुणवत्ताही खालावते आहे. म्हणूनच आज पोळा साजरा करताना पशुधनाची आरोग्य तपासणी, लसीकरण असे उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहे. पशुधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागान सुरू केलेल्या 'कामधेनु दत्तक ग्राम योजनेत' सहभाग घ्यायला हवा.
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 'कामधेनू दत्तक ग्राम योजना' 2010-11 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जनावरांना जंतनाशक औषध पाजणे, गोचिड-गोमाशा निर्मुलन कार्यक्रम, निकृष्ठ चारा सकस करण्यासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन, दुग्ध स्पर्धांचे आयोजन, लसीकरण शिबीर, वंध्यत्व निवारण शिबीरे, रक्तजन व रोगनमुने तपासणी आदी कार्यक्रम दत्तक गावात एकत्रित रित्या मोहिम स्वरुपात राबविण्यात येतात.
दुध संकलन केंद्राच्या मार्गावरील आणि पैदासक्षम गाई/म्हशींची संख्या किमान 300 असलेल्या गावाची निवड या योजनेसाठी करण्यात येते. पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील दुधाळ जनावरांची संख्या जास्त असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येते. गावांची निवड करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पशुगणनेपासून योजनेच्या अंमलबजावणीस सुरूवात होते. विविध 12 टप्प्यांमध्ये पशुसंवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येतात. सहा महिन्याच्या कालावधीत योजना पुर्णपणे राबविल्यावर दुधाळ जनावरांचे दूध उत्पादनाबाबत पुन्हा सर्वेक्षण करण्यात येते. पशुपालकांशी संवाद साधण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. योजने अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी एका दत्तक गावाकरिता साधारण दीड लाख रुपयापर्यंत खर्च करण्यात येतो.
यावर्षीदेखील 'कामधेनु दत्तक ग्राम योजना' प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात झाली आहे. पशुपालकांनी स्वत: पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी केल्यास पशुधनाची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यास मदत होईल. केवळ योजना कालावधीसाठी असे प्रयत्न मर्यादीत न ठेवता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक म्हणून पशुसंवर्धनाकडे विशेष लक्ष दिल्यास येणार पोळा आणखी आनंददायी असेल.
-डॉ.किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी

तेजस" चा ठसका मुंबईपर्यंत
आजच्या धावत्या युगात मानवाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या असून मोठमोठी रेस्टॉरंट, मॉल्समधल्या चटकदार व चटपटीत अशा पदार्थांकडे सर्वांचा ओढा असल्याचे दिसून येते. परंतु या अशा चटपटीत पदार्थांना चटकदार बनवते तो मसाला. या मसाल्यांच्या गुणधर्मामुळे व त्याच्या दर्जामुळे पदार्थांची चव सर्वांच्या जिभेवर रेंगाळत राहते. चवदार मसाले निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आजघडीला जागतिक स्तरावरील मोठमोठ्या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून लोकांच्या मागणी व आवडी, निवडीनुसार या कंपन्या मालाची निर्मिती करुन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या मालाची गुणवत्ता व आकर्षक पँकीगमुळे या मालाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. या सर्व कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील महिला बचतगट मागे न पडता त्याच तोडीचा व गुणवत्तेचा आणि खवय्यांच्या जिभेला हव्या असलेल्या तसेच गावच्या मसाल्याची आठवण करुन देणाऱ्या उत्पादनांची निर्मिती बीड जिल्ह्यातील 110 बचतगटांच्या महिला "तेजस" या ब्रँडच्या नावाने करत असून या "तेजस"चा ठसका मुंबईपर्यंत पोहोचला आहे.
मागासलेला, ऊसतोड कामगार पुरविणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. अज्ञानामुळे दारिद्रय आणि दारिद्रयामुळे अज्ञान असं दुष्टचक्र पाठीशी कालचक्रासारखं लागलेले. महिलांचे प्रश्न तर अजुनही गंभीर. कोरड्या, ओल्या दुष्काळाला तोंड द्यायचं. एक ना दोन असंख्य समस्यांना तोंड देत कसेबसे जगायचे. सुख, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा व मान-सन्मान या शब्दांशी दुरान्वये संबंध नसलेल्या महिलाच बहुसंख्य दिसायच्या. अपवाद म्हणून कला-कौशल्यात निपुण, बुद्धीमान स्त्रीया जरी कमी नसल्या तरी सोनं करायला संधी उपलब्ध नसायच्या. काळ बदलत असतो, नव्हे तो बदलला. सबलीकरण, सक्षम, आत्मनिर्भर इत्यादी शब्दांशी महिलांचं नातं जडू लागलं. स्वर्णजयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचतगटाची योजना ही विकासाची गंगा घेऊन दारी आली. या संधीची वाट पाहणाऱ्या महिलांमध्ये मैत्रीपूर्ण हितगुज होऊ लागलं.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 11 तालुक्यात कार्यरत असलेल्या बचतगटापैकी 110 बचतगटांचा समावेश असेले एक तेजस महिला उद्योजकता मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती तारामती चंद्रसेन लाड या असून याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, घरची परिस्थिती जेमतेम व हालाखीची असल्याने कुटुंबाच्या एकूण उत्पन्नावर घर चालविण्यासह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न नेहमीच भेडसावत होता. त्याचप्रमाणे शिक्षण कमी असल्यामुळे बाहेर नोकरीची संधी नव्हती. कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी शिलाई कामातून मिळणाऱ्या मोबदल्यावरही कुटुंबाला मदत होत नव्हती. घरबसल्या काही उद्योग करता येईल का या विंवचनेत असतानाच सुनंदा घोंगडे यांच्याशी माझी भेट झाली आणि तोच दिवस माझ्या आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन आला.
बीड येथील वासनवाडी परिसरातील 10 महिलांना एकत्र करुन जय हनुमान बचतगटाची स्थापन केली. सर्व महिलांनी मिळून दरमहा ठराविक रक्कम बचत म्हणून जमा केली व एक वर्षानंतर आमच्या बचतगटास बँकेकडून 25 हजार रुपयांचे कर्ज प्राप्त झाले. या मिळालेल्या कर्जामधून प्रत्येक महिलेने विविध व्यवसाय यशस्वीपणे सुरु केले. परंतु एवढ्यावर समाधान न मानता मोठा व्यवसाय करण्याच्या शोधात असतानाच मसाला व मिर्ची पावडरची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून आमच्या गटाला कळविण्यात आले.
मसाला व मिरची पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिक करुन दाखविताना कुठल्या प्रकारची मिरची वापरायची, मसाल्यासाठी कोणता घटक किती प्रमाणात घालायचा, तो कोणत्या रंगामध्ये भाजायचा याबाबत सांगण्यात आले. परंतु माल चांगला असून चालत नाही तर त्याला उत्कृष्ट प्रकारची पॅकींगही असणे आवश्यक आहे. यासाठी प्लास्टीक पाऊचच्या पॅकींगची पद्धत, प्लॉस्टीक पाऊचवर बॅच नंबर, मालाची किंमत, माल तयार झालेला दिनांक, बाजारपेठ कशी काबीज करण्याबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करावा याबाबत सविस्तर माहिती देऊन उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये एकसंघता यावर भर देण्यात आला. आमच्या तेजस ब्रँडच्या उत्पादनांची चव देशातील सर्व राज्यामध्ये जावी अशी अपेक्षा अध्यक्षा श्रीमती तारामती लाड यांनी व्यक्त केली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या तेजस या ब्रँडनेमने नोंदणी प्राप्त झाल्यानंतर एकूण 110 महिला बचतगटांनी तयार केलेली मसाला, मिरची पावडर, पापड, शेवया, लोणचे या सारखी उत्पादने दि. 5 जून, 2010 रोजी बाजारामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली.
तेजस ब्रँडच्या नावाने उत्पादित केलेल्या मालाला स्थानिक बाजारपेठेबरोबर बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या गटातील महिलांनी उत्पादित केलेला माल औरंगाबाद, लातुर, नांदेडसह मुंबई येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये तेजस ब्रँडची उत्पादने मोठ्या प्रमाणात विक्री झाले. मुंबई येथील प्रदर्शनामध्ये महिलांसह अबालवृद्धांनी या उत्पादनांची चाखलेली चव त्यांच्या जीभेवर कायमस्वरुपी राहिली असून खवय्यांसाठी ही उत्पादने एक पर्वणीच ठरली असल्याची प्रतिक्रिया या प्रदर्शनातून पहावयास मिळाली. मुंबई येथील महिलांनी वर्षातून चार वेळेस तरी तेजस चे उत्पादन प्रर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या योजनेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला जणू प्रगतीचे पंख लाभलेले आहेत. तेजसमुळे जिल्ह्यातील 110 बचतगटातील जवळपास 1100 कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडली असून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. ही बाब निश्चितच वाखाण्याजोगी असून चुल आणि मूल एवढ्या मर्यादित कार्यक्षेत्रात अडकुन पडलेल्या माहिला आता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.
या खडतर परंतु प्रेरणादायी प्रवासाची या स्त्रीयांची कथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एवढीच या निमित्ताने अपेक्षा

Thursday, September 6, 2012
संत तुकाराम वनग्राम योजना
ग्रामीण जनतेमध्ये वनाच्या महत्वाविषयी जागृती निर्माण करणे यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे काम असून त्यात सतत सुधारण घडवून आणण्यासाठी समित्यामध्ये एक चुरस निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणा-या समित्यांना संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट संयुक्त वन व वनव्यवस्थापन समिती पुरस्कार देवून गौरविण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना सुरु केली आहे.
वनसंरक्षण आणि वनविकासामध्ये स्थानिक लोकाच्या सहभागातून केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वनमंत्रालयाने मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिल 2003 पासून ग्रामीणांच्या सहभागातून वनव्यवस्थापन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार वनक्षेत्रामध्ये वनक्षेत्राच्या सीमेवर असणा-या 15 हजार 500 गांवापैकी 11 हजार 799 एवढया गावामध्ये संयुक्त व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. वनांचे संरक्षण करणे व अवैध वृक्ष्तोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण वनवणवा, अवैध चराई प्रतिबंध करणे व ग्रामीण जनतेमध्ये वनाचे महत्व यासबंधी जागृती निर्माण करणे आदि कामे या समित्याची आहेत.
ज्या संयुक्त वनव्यवस्थापन समित्या वनग्राम योजनेत सहभागी होतील त्यामधून जिल्हास्तरावर गुणानुक्रमे पहिल्या 3 समित्यांना व राज्यस्तरावरील उत्कृष्ट ठरणा-या गुणानुक्रमे पहिल्या तीन समित्यांना रोख स्वरुपात पारितोषिक देवून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
वन परिक्षेत्रस्तरावरील मुल्यमापन समिती डिसेंबर महिन्यात वनक्षेत्रांना भेटी देवून संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या कामाची तपासणी करुन तीन उत्कृष्ठ समित्यांची विभागीय वन अधिका-यामार्फत जिल्हास्तरावरील निवड समितीकडे प्रस्ताव करतील. प्रस्तावित समितीची आवश्यक ती तपासणी व आवश्यक असल्यास कामाची पाहाणी करुन जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्याकरीता प्रत्येक जिल्हयात तीन समित्यांची निवड करुन जाहीर करण्यात येतील.
राज्यस्तरीय मुल्यमापन समिती जिल्हास्तरावरील प्रथम बक्षीस प्राप्त समित्यापैकी तीन समित्यांची निवड फेब्रुवारी महिन्यात पूणे करेल व त्यामधील प्रथम तीन समित्याची राज्यस्तरीय बक्षिसासाठी निवड केली जाईल.
मुल्यमापन समित्यांचे गठण- वन परिक्षेत्रस्तरावरील निवड समितीत वनपरिक्षेत्र ज्यांच्या कार्यक्षेत्रात येते महसूल विभागाचे उप विभागीय अधिकारी अध्यक्ष, सहाय्यक वनसंरक्षक उपाध्यक्ष तर गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, वृक्ष लागवड अधिकारी, वा निकीशी निगडीत दोन सेवाभावी संस्थाचे सदस्य, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सदस्य म्हणून राहतील.
जिल्हास्तरीय निवड समितीमध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी, सदस्य सचिव उप वनसंरक्षक सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सहसंचालक सामाजिक वनीकरण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वानिकी क्षेत्राशी निगडीत एक सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य असतात.
राज्यस्तरावरील निवड समितीत वनमंत्री अध्यक्ष, उपाध्यक्ष वनराज्यमंत्री, सदस्य सचिव वनसंरक्षक (संयुक्त वनव्यवस्थापन), सदस्य वन विभाग प्रधान सचिव, मुख्य वनसंरक्षक, नागपूर, मुख्यसंरक्षक (वन्यजीव) नागपूर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) महाराष्ट्र राज्य नागपूर आहेत.
जिल्हास्तरावरील बक्षिस- जिल्हास्तरीय बक्षिसपात्र संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचा निकाल जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. तीन उत्कृष्ट वन व्यवस्थापन समित्यांना संत तुकाराम ग्राम उत्कृष्ट जिल्हास्तरीय संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारितोषिक प्रदान करण्यात येईल. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकचे बक्षीस 51 हजार, द्वितीय 31 हजार, तर तृतीय क्रमाकाचे बक्षीस 11 हजार आहे.
राज्यस्तरावरील गुणानुक्रमे तीन उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना संत तुकाराम वन ग्राम उत्कृष्ट राज्यस्तरीय संयुक्त वनव्यवस्थापन समिती पारितोषिक प्रदान करण्यात येईल. या प्रथम क्रमांकाचे 10 लाख, द्वितीय 5 लाख तर तृतीय 3 लाख अशी पारितोषिके देण्यात येतील.
नंदूरबार जिल्हयात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली उपवनसंरक्षक तथा सदस्य सचिव बी.टी.वानखेडे जिल्हा निवड समित्याचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर मूल्यमापन करुन त्या नंतर बक्षिसे जाहिर करण्यात येतात.
समितीस प्राप्त होणा-या बक्षिसाची रक्कम ही समतीच्या नावे असलेल्या बचत खात्यात जमा करण्यात येईल आणि त्याचा उपयोग मंजूर योजनेनुसार वनविकास कामासाठी केला जाईल. यामुळे जनतेमध्ये वनाच्या विषयी जागृती तर निर्माण होईल त्याचबरोबर वनांचे संरक्षण होईल हे मात्र निश्चित.
मेघश्याम महाले, माहिती सहाय्यक, नंदुरबार

केशर महाराष्टात व्हाया काश्मिर
केशर इतकं महाग का असतं याचा विचार आपण नेहमी करतो.एक ग्रॅम केशरसाठी पाचशे रूपये मोजतांना नेहमीच प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर अगदी अचानक मिळाले. मॅग्नम फाऊंडेशनच्या महासचिव ॲड. .पुष्पा शिंदे यांच्याशी चर्चा करतांना केशरची सर्व माहिती मिळाली.
मॅग्नम फाऊंडेशन ही राष्ट्रीय पातळीवरची आणि निवडक मान्यवरांचा आधार असणारी ख्यातनाम स्वयंसेवी संस्था. राज्याबाहेर जाऊन काम करणारी देशातील एकमेव संस्था. संत गोगले महाराजांनी १९३५ साली सुरू केली. ऍड.सुरेश ढोले यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे काम करत आहे. जमिनीचा कस वाढविणे, शेतकरीवर्गाचे हित आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी काम करणारी ही संस्था केवळ महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गापर्यतच मर्यादित नाही.तर महाराष्ट्राबाहेर ही संस्था यशस्वी ठरली आहे. या संस्थेच्या महासचिव ऍड पुष्पा शिंदे दिल्ली येथे एका परिषदेच्या निमित्ताने गेल्या होत्या त्यावेळी त्यांची काही काश्मिरी शेतक-यांशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून या शेतक-यांच्या पिकाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचे नक्की केले.
जगात केशराचे उत्पादन फक्त तीन ठिकाणी होते. स्पेन, इराण आणि काश्मीर. केशराच्या पिकासाठी भुसभुशीत जमीन आणि बर्फाचा पाऊस अत्यावश्यक असतो. तो केवळ या ठिकाणीच होत असल्यामुळे त्या पलिकडे अन्य कोठेही हे पीक घेता येत नाही.
काश्मिरातही श्रीनगर हायवे जवळ असणा-या पामपूर लगत ५० ते ६० किलोमीटर परिसरातच हे पीक घेतले जाते. या भागात प्रारंभी त्यांनी एक सर्व्हे केला. यावेळी त्यांच्याकडे 800 केशर उत्पादक शेतक-यांनी नोंदणी केली. या पैकी 300 शेतक-यांना सोबत घेउून त्यांनी केशरला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 2006 पासून सुरू झालेला हा उपक्रम महाराष्ट्रात चांगलाच जम बसवू लागला आहे. त्यामुळे काश्मिरातील केशर आता दरवर्षी शुद्ध स्वरूपात महाराष्ट्रात मिळते आहे.
केशराचे कंद जमिनीचे वाफे तयार करून त्यात लावले जातात. वर्षातून एकदा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फुले उमलतात. ती घरी नेऊन त्यातून अतिशय कौशल्याने हाताने केशर काढण्याचे काम शेतकरी करतात. हे केशराचे पुष्प १८ ते ३० सेमी. उंचीचे बहुवर्षायू क्षुप. पर्ण मूलीय, रेखाकर, द्विकोष्ठीय पुष्पध्वजाने वेढलेले व मुडपलेल्या कडा असलेले मोठे वांगी रंगाचे व सुगंधी असते. प्रत्येक फुलात तीन तांबूस पिवळे केशर असतात. नरसाळ्याच्या आकाराच्या परिपुष्पाच्या फांद्या बाहेरील बाजुस पसरलेल्या व नारंगी रंगाच्या टोकाशी अखंड किंवा खंडित असतात. कुक्षी सामान्यत: तीनच्या संख्येत, २.५ सेमी लांब, सुत्राकार व तांबूस रंगाची असते. त्यालाच केशर असे म्हणतात.
अशा प्रकारे एक फुलात तीन केशरतंतू असतात. फळ - आयताकार, गर्भाशय त्रिकोष्ठीय, त्यात गोलाकार बीज. केशराचे कंद लावल्यास १०-१५ वर्षे वनस्पती टिकून राहते. प्रत्येकवर्षी जुन्या कंदाचे जागी एक नवा कंद येतो हा क्रम चालू राहतो. शरद ऋतूत पानांबरोबर फुलेही येतात. मूळ दक्षिण युरोपातून आलेले. स्पेन, फ्रान्स, इटली, ग्रीस, तुर्कस्तान व पर्शिया, भारत व चीनमध्ये याची लागवड होते. भारतात केशराची काश्मीरातील पांपूर भागात व जम्मूमध्ये किश्तवार भागात लागवड करतात. केशर मिळविण्यासाठी फुलातील कुक्षीची टोके अगदी सकाळी खुडतात व ती उष्णतेने किवा उन्हात वाळवितात. सुमारे ४०,००० फुलांपासून अर्धा कि.ग्रॅ. केशर मिळते. यामुळे ते महाग असते. केशराचा दर्जा ठरविण्यासाठी ते पाण्यात टाकतात. तळाशी बसलेले केशर चांगल्या प्रतीचे, तर पाण्यावर तरंगणारे केशर हलक्या प्रतीचे मानतात. तरगंणारे केशर वाळवून झोडतात आणि त्याचा दर्जा ठरविण्यासाठी ते पुन्हा पाण्यात टाकतात. या सर्व प्रक्रियेनंतर तयार होते ते विक्रीसाठीचे केशर. या केशराच्या एक ग्रॅम वजनाच्या छोटय़ा डब्या तयार करण्यात येतात. शुध्द एक ग्राम केशराची किंमत असते ५०० रूपये. हे सर्व केशर महाराष्ट्रात वेगवेगळया ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जाते.
केशराचे हेक्टरी उत्पन्न एक किलो आहे. मात्र याला मागणी प्रचंड आहे. काश्मिरी केशराला तर उभ्या जगात मागणी आहे.. याचे प्रमुख कारण आहे त्याच्यातील औषधी गुणधर्म. यामुळेच त्याचे मोल सोन्याहूनही अधिक आहे.. चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये केशरावर आणि त्याच्या औषधी गुणधर्मांवर विशेष प्रकरणे आहेत. आपण केशर वापरतो ते श्रीखंडात, बासुंदीत, खिरीत.यामध्ये केशराची एक काडी जरी टाकली तरी त्याचा सोनेरी रंग आणि अनोखा स्वाद आपले खाद्यविश्व प्रमोदित करतो. गरोदर स्त्रियांसाठी आणि लहान मुलांच्या गुटीमध्ये केशराचा वापर आवर्जून केला जातो. कांतीमान त्वचेसाठी आणि मोहक रंगासाठी त्याची मागणी अधिक आहे.. केशर हे उष्ण असल्यामुळे . त्यामुळे बाधक गुणधर्म नाहिसे करण्यासाठी त्याचा वापर अटळ आहे. रोगप्रतिकारक शक्ती देणारं, दृष्टी दोषावर जालीम आणि मेंदूचं टॉनिक म्हणूनही त्याला विशेष मागणी आहे.
शेतकरी आणि ग्राहकांची सरळ भागीदारी असणा-या उपक्रमाचा लाभ घेवून आपणही घेवू शकतो काश्मिरी केशराचा आस्वाद.....
संपर्क व माहितीसाठी पत्ता : मॅग्नम फाऊंडेशन, ९०९, नववा माळा, ए विंग, लोकमत भवन, नागपूर. दूरध्वनी- ०७१२-२४२०७८२/ ९४२२१०४७५१.

Subscribe to:
Posts (Atom)