Tuesday, September 25, 2012

नंदुरबारचे ग्रीन पोलीसिंग

पोलीस म्हटला की सर्व सामान्यांना धडकी भरविणारे व्यक्तिमत्व रुक्ष कामाच्या स्वरुपामुळे पोलीसाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा वेगळाच असतो. मात्र याच पोलीसानी जिल्हयात आठवडाभराच्या कालावधीत एक हजार 685 रोपे लावून त्यांच्यातील कोमल मनाचा परिचय करुन दिला आहे. एवढयावर हे पोलीस थांबले नाहीत, लावलेल्या रोपांचे संवर्धन आणि जोपासना करण्याची जबाबदारीही त्यांच्या कुटूंबियांनी स्वीकारली आहे. 

या संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. संजय अपरांती यांनी सांगितले, की राज्य शासनाने शंभरकोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागाच्या माध्यमातून रोपांची लागवड करण्यात करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस दलातर्फेही आतापर्यंत जिल्हयात एक हजार 685 रोपे लावण्यात आली आहेत. जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यातंर्गत शनिवारी व रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. दोन दिवसा 826 रोपे लावण्यात आली. त्या त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय पोलीस पाटील,महिला दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

एप्रिलच्या प्रांरभी येथील तत्कालीन पोलीस अधिक्षक चंद्रकांत कुंभार यांनी भेट दिली. या कालावधीत त्यांनी परिसराची पाहणी केली.आठ वर्षापूर्वी त्यांनी येथे 821 वृक्षाची लागवड केली होती. ती सर्व झाडे बहरलेली पाहून श्री कुंभार यांना विशेष आनंद वाटला त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून आपण ही काही तरी करावे या हेतूने प्रेरित झाल्याचे डॉ. अपरांती यांनी सांगितले.श्री. कुंभार यांनी ऐनवेळी वृक्ष लागवडीसाठी खड्डे न करता दोन महिने अगोदर नियोजन करावे तेथे पुरेसे खत टाकावे असे मार्गदर्शन केले. त्यानुसार वनविभागाच्या सहकार्याने व पोलीस दलाच्या मेहनतीने पूर्व तयारी करण्यात आली. परिसरात तात्पुरती नर्सरी विकसित करण्यात आली. 

कोणत्या ठिकाणी कोणते झाड लावले व ते बहरु शकते, हवेचा वेग , जमिनीचा पोत आणि वृक्षाची स्थिती लक्षात घेवून विविध जातीच्या वृक्षांची निवड करण्यात आली. कोणते झाड कुठे लावायचे, कोणी दत्तक घ्यायचे याबाबतची ब्लू प्रिंट तयार करण्यात आल्याचे डॉ. अपरांती यांनी सांगितले. या रोपाभोवती बांबूच्या काठयांचे संरक्षण तयार करण्यात आले आहे.

पोलीस दलातर्फे जिल्हयात एक हजार 685 रोपांची लागवड करण्यासाठी शासकीय निधीतून एक रुपयाही खर्च करण्यात आलेला नाही. रोप तात्पुरत्या नर्सरित जोपासण्यात आले. कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून खडे्‌ड केले व त्यांचे रोपण करुन ती जोपासण्याची जबाबदारीही स्वीकारली.

पोलीस मुख्यालय परिसर 412, पोलीस वसाहत 397,एस.पी.बंगला 50, सारंगखेडा पोलीस स्टेशन 36,शहादा 150, म्हसावद 95,धडगांव 55,अक्कलकुवा 75, मोलगी 25, तळोदा 115,नंदूरबार शहर 10, नंदूरबार तालुका 160, विसरवाडी 15,नवापूर 80,एकता चौकी 10 असे एकूण 1 हजार 685 वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.

मेघ:शाम महाले, माहिती सहाय्यक नंदुरबार 

No comments:

Post a Comment