Tuesday, September 18, 2012

फेसबुकच्या जगात

संजना : काय गं गेले एक तास कुठे होतीस? एकही पोस्ट नाही, कमेंन्ट नाही आणि माझ्या फोटोला लाईक्स नाही.
रंजना : (मनातल्या मानात- झाल्या हिच्या शेजारणी सारख्या चौकश्या सुरु) अगं संजना रात्रीचे नऊ वाजलेत पोरं भुकेनं ओरडत होती म्हणून भाजी टाकायला उठले होते?
संजना : अय्या फक्त भाजीच खायला घालणारेस? by the way कुठची भाजी केलीस?
रंजना : अगं पोळ्या सकाळीच केल्या होत्या आणि भाजी भरलेलं वागं केलय.
संजना : अय्या भरलेलं वागं कित्ती छान, पटकन रेसिपी आणि फोटो पोस्ट कर ना फेसबुक वर.
संजना : (२च मिंनिटात) कित्ती सुंदर दिसतायेत भरलेली वांगी. उद्याच करून बघेन वेळ मिळाला तर. अगं तुला एक विचारायचे राहून गेले तु त्या मिसेस अग्रवालच्या रेसिपीला लाईक केलेस का ?
रंजना : कोणती वरण भाताची, शेंबडं पोरही सांगेल, त्यात कसलं आलय कौतुक?
संजना : तु म्हणजे अगदी बावळट आहेस. माहित असले तरी लाईक करायला काय जातंय. १ क्लिक केलं की मिसेस अग्रवाल खुष आणि most important तुझ्या टप्परवेअरच्या बिझनेस साठी तुला अशाच गिऱ्हाईकांची गरज आहे. एकदा लाईक कर अणि वर कमेंन्ट कर, मिसेस अग्रवाल हाच वरणभात तुम्ही तुमच्या मिस्टरांना रोज टिफीनला देऊ शकता टप्परवेअरच्या डब्यातुन वरण अजिबात बाहेर येणार नाही. मग बघ कमाल.
रजंना : काय ज्ञान पाजळलस गं धन्य झाले मी I mean to say धन्यवाद तुझ्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीबद्दल.
बाप लेकाचा फेसबुक वरील संवाद..
बंडयाचे वडील : बंडया नालयका घरी ये आधी, दोन दिवस झालेत पत्ता नाही तुझा. फेसबुकवरचे तुझे पोस्ट ,कमेंन्ट पाहुन जीवात जीव आला. (जिंवंत असल्याची खात्री पटली)
बंडया : chill बाबा, फेसबुक सारखं मोहमायी जग असताना मी दुसरं कुठे जाणार? सो डोण्ट वरी.
वडिलांचे मित्र : काय दिवस आलेत आता मुलांना शोधण्यासाठी त्याच्या मित्रांकडे किंवा पोलिसात न जाता फेसबुक लॉग इन करावे लागते. नारायण.. नारायण..
बंडयाचे मित्र : ए बंडया कुठे होतास?
मित्र नंबर २ : बंडया लवकर घरी जा आणि घरी गेल्यावर होणारे माहाभारत पोस्ट कर. वी आर इगरली वेटिंग आणि प्रसाद मिळाला तर तोही शेअर कर फेसबुकवर.
टिपीकल नवरा बायकोच फेसबुकरचं भाडंण..
नवरा : आज जरा भाजीत मीठ कमी पडलं.
बायको : चुका काढायला काय जातयं, इथं सकाळपासून राब राब राबते पण कुणाला म्हणुन पर्वा नाही.
नवरा : अग असं काय म्हणतेस काल खाल्ली ना जळालेली पोळी. चकार शब्द काढला नाही.
बायको : खाल्ली तर काय उपकार केले इथं ढिग भर पोस्ट येवुन पडले होते फेसबुकवर, मी म्हणते लाइक्स आणि कमेंन्ट करायच्या नादात जळाली एखादी पोळी तर काय बिघडलं. मी कधी करते का तक्रार रात्री ढाराढुर घोरता तेव्हा.
नवरा : अग आपण फेसबुकवर आहोत जरा भान ठेव.
बायको : आता का? कळु देत सगळ्या जगाला. मी होते म्हणुन, माझ्याजागी दुसरी कुणी असती तर…….
भरारी टुर्स..
गाइड : चला चला आटपा लवकर नुसते फोटोच काय काढता आहत? पुढची पण ठिकाणं पाहायचीत आपल्याला.
टुरिस्ट : गप्प बसा हो जरा, फेसबुक वर अपलोड करायचेत हे फोटो लाईक्स मिळाले नाही तर नाक कापलं जाईल आमचं.
टुरिस्ट २: मी तर ठरवलं आहे या वेळी ५० हजाराहुन अधिक लाईक्स मिळाली तर मी पार्टी ठेवणार आहे.
प्रिसिला चान : मार्क पेशंटची वाट पाहुन माझे पेशन्स संपलेत. फेसबुकच्या या मोहमायी दुनियेत लोकांना त्यांच्या आजारपणाचा विसर पडलाय आणि कुणाला जाणीव झालीच तर फेसबुकवरच free consultation ची मागणी  करतात. मला तर माझा दवाखाना बंद पडणार असं दिसतंय.
मार्क झुकरबर्ग : सॉरी प्रिसिला मी या सगळ्याचा स्वप्नातही विचार नव्हता केला. माझं उद्दिष्ट्य फक्त लोकांना एकमेकांशी जोडणं, त्यानां power of sharing देणं , जगाला ओपन करणं एवढंच होतं. फेसबुक मुळे जग ओपन झालं, लोक एकमेकांच्या संपर्कात तर आले पण ते फक्त एका किल्क पुरतेच.

No comments:

Post a Comment