काका काका , चिमणी म्हणजे काय रे? माझी ७ वर्षांची पुतणी मघा मला विचारत होती, आता हिला काय सांगाव असा प्रश्न मलाच पडला.
"अग. चिमणी म्हणजे छोटा पक्षी असतो ,तो चिव चिव करतो." उत्तरादाखल एवढंच बोललो खर ,तोच मघा म्हणाली ,"मला दाखव ना रे चिमणी,मला
चिव चिव आवाज ऐकायचाय " मग काय तिला घेऊन बाहेर आलो .गच्ची, झाड, देऊळ सार पालथ घातल ,पण चिमणी काय दिसेना."काका चिमणी फिमणी काय नसत ,तू काही पण सांगतो."
काकाला च्यायलेंज ..! मग काय चिमणी शोध मोहीम सुरु केली .पण हाय हाय चिमणी काय दिसेना,मघा काही हसेना ..! मग रोज जाता येता चिमणी शोधायला सुरुवात केली .बागेत, शाळेत, रस्त्यात.झाडांवर पण अहं .. टाय टाय फिश! शेवटी तिला पुस्तकात आणि इंटरनेट वर फोटो दाखविला,तर म्हणते कशी,"पण काका मग या चिमण्या आता कुठ्येत ?" आता काय सांगू हीला?
पण मघाच्या या प्रश्नाने मीही विचार करू लागलो,या चिमण्या आता कुठ्येत ?"
थेट न घाबरता स्वयंपाक घरात वावरणाऱ्या .तांदूळ, धान्य निवडताना आईभोवती फेर धरणाऱ्या या चिमण्या आता कुठ्येत ?" कारण काहीही असो ,या चिमण्या लुप्त होऊ लागल्यात हे मात्र खर.
परवा रविवारी सकाळी निवांत ताणून दिली होती, तोच मघा ओरडत आली ,काका काका तुझं कॅमेरा घेऊन बाहेर ये, ताडकन उठलो कॅमेरा घेऊन बाहेर
आलो ,पाहतो तो काय ? आमच्या घरासमोरील अंगणात(अर्थात सिमेंटच्या) किमान १२ ते १५ चिमण्या धान्य टिपत होत्या ,काका ते बघ त्या चिव चिव पण करतायत ..! मघा आनंदाने ओरडत होती.मलाही नवल वाटल अंगणात चिमण्या कशा आल्या? मग आईने उलगडा केला म्हणाली ,अरे तुम्हा दोघांचा
चिमणी शोध सुरु झाला आणि मीही लागले रोज चिमणी शोधायला.मग मी रोज थोडे धान्य अंगणात टाकू लागले आणि हे बघ या चिमण्या...!
मंडळी, हीं संपूर्ण खरी घटना आहे. साधीच बाब आहे पण आपण थोड अंतर्मुख होऊन विचार कला तर त्या माग खूप काही दडलय. आजही आठवतंय
दहावीच्या परीक्षेवेळी कोकीळा ओरडायची त्या लिंबावरून , वडिलांनी बाहेर टाकलेला घास खायला कावळा हमखास यायचा, धान्य निवडताना आईभोवती चिमण्या फेर धरायच्या .आज ना ते लिंबाचे झाड राहिले ना ते सारवलेले आंगण. निसर्गावर आम्हीच मोठा घाला घातलाय.त्यामुळेच आज चिमण्या शोधायला लागतात.
एक करू या ना. एक प्रयोग म्हणून, या चिमण्यांना परत माघारी बोलवू या का? आपापल्या परीने प्रयत्न करू या. आपल्या लहान मुलांना, नातवांना
चिऊ ची साथ देऊ या ..!
NITIN U SONAWANE
Govt.Publicity
9422428585
No comments:
Post a Comment