दारिद्र्य देषेखालील कुटूंबांना आरोग्याची हमी
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने आरोग्यविषयक अनेक योजना राबविण्यात येत आहे.
यासंदर्भातल्या विमा योजनाही आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याबाबत
दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाच्या श्रम विभागाच्यावतीने राष्ट्रीय
स्वास्थ विमा ही महत्वाकांक्षी योजना राज्यात महाराष्ट्र शासनाच्यावतीने
राबविण्यात येते. सदर योजना दारिद्र्य देषेखालील कुटुंबासाठी असून हजारो
नागरिकांना या योजनेमुळे आरोग्याची हमी मिळाली आहे.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये :
• या योजनेअंतर्गत कुटुंबातील 5 सदस्यांना विमा संरक्षण दिले जाते.
कुटुंबाचे मुख्य जीवनसाथी तसेच तीन आश्रितांचा यात समावेश होवू शकतो.
• विमाधारक कुटुंबांना 30 हजार रुपये खर्चा इतका औषधोपचार मिळु शकतात.
• सदर योजना कॅशलेस आहे. म्हणजेच उपचार किंवा औषधोपचारासाठी खिशातुन पैसे न
भरता जिल्ह्यातील नेटवर्कमध्ये असलेल्या रुग्नालयामध्ये उपचार केले जाऊ
शकतात.
• आधीपासूनच असलेल्या आजारांवरीही या योजनेव्दारे विम्याचे संरक्षण दिले जाते.
• रुग्नालयामध्ये दाखल होणाऱ्या एक दिवस अगोदर तसेच रुग्नालयामधुन सुटी दिल्यानंतर पाच दिवसांपर्यंत खर्चासाठी संरक्षण दिले जाते.
स्मार्ट कार्ड :
• विमाधारक व्यक्तींना स्मार्टकार्ड दिले जाते. हे एक बायोमेट्रीक कार्ड
आहे. यामध्ये विमाधारकांचे संपूर्ण वर्णन त्याच्या फिंगरप्रींटसह दिले
जाते. विमाधारकाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड सादर करावे लागते.
कार्ड खराब झाले असता डिस्ट्रिक्ट क्रिऑस्क मध्ये शुल्क भरुन नवीन कार्ड
मिळवता येईल. तर कार्डामध्ये उल्लेख असलेल्या तपशिलांमध्ये परिवर्तन करायचे
असेल किंवा कुटुंबाच्या सदस्याचे नाव कार्डात दाखल करायचे असेल तर
विमाधारक डिस्ट्रिक्ट क्रिऑस्क मध्ये संपर्क साधून तसे परिवर्तन करु शकतात.
प्रीमीयमचे तपशिल :
• कुटुंबातील पाच सदस्यांसाठी 30 हजार रुपयांपर्यंत विम्याची रक्कम.
• प्रीमियमचा भरणा शासनाव्दारे केला जातो.
• विमाधारकाला संपूर्ण कुटुंबासाठी केवळ 30 रुपये रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल.
• ज्यांची नावे दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या यादीत आहे, त्यांचाच केवळ विमा काढला जाईल.
योजनेचे फायदे मिळविण्याची पध्दत :
• पॅनेल / नेटवर्कमध्ये असलेल्या रुग्नालयामध्ये उपचारासाठी दाखल होण्यासाठी विमाधारकाला हे स्मार्टकार्ड दाखविणे अनिवार्य आहे.
• योजनेच्याअंतर्गत कार्ड रुग्नालयामध्ये सादर करावे लागतील.
• रुग्नालयामधील कर्मचाऱ्यांव्दारे दाव्याच्या रक्कमेसाठी कार्ड स्वाइप
केले जाईल. (कार्डामध्ये दावे, दाव्याची उर्वरीत रक्कम यासंबंधीचे आकडे
असतात) ही रक्कम कार्डातील एकूण / उर्वरित विम्याच्या रक्कमेतून कापून
घेतली जाईल.
योजनेत समाविष्ट नसलेल्या बाबी :
• ज्या शारिरीक समस्येसाठी रुग्नालयामध्ये दाखल होण्याची आवश्यकता नाही अशा बाबी योजनेत समाविष्ट नाही.
• जन्मजात बाह्य आजार.
• मादक औषधे आणि दारुमुळे निर्माण झालेले आजार.
• वंध्यीकरण आणि वांजपणा.
• लसिकरण
• युध्द, नाशिकीय आक्रमणातून निर्माण झालेल्या समस्या.
• निसर्गोपचार, युनानी, सिध्द, आयुर्वेदीक उपचार यांचा योजनेत समावेश नाही.
इशारा / दक्षता :
• स्मार्टकार्ड हे विमाधारक कुटुंब तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी आहे. हे
कार्ड भारत सरकारची संपत्ती असून ते व्यवस्थीत सांभाळुन ठेवणे आवश्यक आहे.
• स्मार्ट कार्ड रुग्नालयामध्ये दाखल करुन उपचार करुन घेण्यासाठी रुग्नांना
पात्र ठरविते, त्यामुळे उपचारासाठी नेटवर्क रुग्नालयामध्ये सदर कार्ड
कार्डधारकाच्या उपस्थितीत स्वाइन केले जायला हवे.
• स्मार्टकार्ड कोणत्याही स्थितीत मध्यस्थ, दलाल किंवा अन्य व्यक्तींच्या
हातात जाता कामा नये. एखादी व्यक्ती सरकार, इन्शुरन्स कंपनी व टीपीए किंवा
एखाद्या रुग्नालयाचा प्रतिनिधी असल्याचा दावा करुन गरजेच्यावेळी
विमाधारकाला फायद्यापासून वंचित ठेवू शकतो.
• कार्ड हस्तांतरणीय नाही. तसेच कार्डचा दुरपयोग केल्या जाऊ नये.
No comments:
Post a Comment