Thursday, January 31, 2019

मला राजगृहावर नेत्यांची गर्दी पहायची आहे...आणि तुम्हाला पण ना...! राजेश खडके सकल मराठी समाज

राजगृह हा चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आत्मा आहे म्हणजेच काळीज आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.कारण येथे प्रत्येक भीम अनुयायी यांच्या भावना जुडलेल्या आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जेव्हा दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते तेव्हा त्यांचे पार्थिव देह मुंबई येथील याच राजगृहावर आणले होते.याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील गावाच्या कान्याकोपऱ्यातून आपल्या घरची भांडीकुंडी विकून समाज बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लाखोच्या समुदायात आला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इथूनच भारतातील प्रत्येक अनुयायी यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला होता.१९२२ साली कोल्हापूर गादीचे आरक्षणाचे जननायक छत्रपती शाहू महाराज भेटायला आले होते.याच मुंबईतून बाबासाहेबांनी संपूर्ण जगात विद्वान म्हणून नाव लौकिक मिळविला होता.त्यामुळे या राजगृहाला देशातील प्रत्येक नेत्याने भेट द्यावी असे इथल्या भीम अनुयायी यांना वाटत आहे.परंतु इथली जातीय व्यवस्था इतकी भयंकर आहे की,माणूस म्हणून इथल्या प्रत्येक मानवाला जगायला शिकविणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेकडे जातीय नजरेने पहात आहे.परंतु भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभास मानवंदना देण्यास आलेल्या अलुतेदार यांचेवर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले.त्यामुळे इथला अलुतेदार आणि बलुतेदार त्यांच्याकडे वळला आहे आणि आता त्याच्या लक्षात आले की,इथल्या जातीयवादी कॉंग्रेसने वंचितांना नेहमी गृहीत न धरता राजकारण केले आहे.त्यामुळे आम्ही आहोत हे त्यानी कॉंग्रेसला दाखविण्यासाठी जे पाऊल उचलले ते स्वागतार्य होते म्हणून कॉंग्रेसला अखेर राजगृहावर यावे लागले.परंतु इथल्या भीम अनुयायी यांचे असे म्हणणे आहे की,नेहमी ज्यांनी मानवतावादी धर्माच्या विरोधात कार्य केले जातीयवादाचा विष नेहमी पेरण्याचे काम केले.जातीय दंगली\ना नेहमी बढावा दिला अशा मातोश्रीवर नेत्यांची नेहमी वर्दळ राहिली आहे.परंतु ज्यांनी जगाला मानवतेचा संदेश दिला.भारत देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार दिला अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर वर्दळ का नाही.परंतु सध्याचे राजकारण पहाता इथल्या भीम अनुयायी यांची मागणी आहे की,राजगुहावर नेत्यांची वर्दळ झाली पाहीजे आणि माझीही इच्छा आहे की,राजगृहावर मला नेत्यांची गर्दी पहायची आहे.

Wednesday, January 30, 2019

कॉंग्रेसचा ६ जागांचा प्रस्ताव धोकेबाजीच…..आता वंचित बहुजन आघाडीने गाफील राहू नये…! वंचितांचा विश्वास आता प्रकाश आंबेडकरच….! सकल मराठी समाज राजेश खडके

कोणत्या पक्षांनी कोणत्या पक्षा बरोबर युती करावी किंवाआघाडी करावी हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे.परंतु कॉंग्रेस ह्या पक्षाने नेहमीच वंचितांना अविकसित ठेवले आहे याची जाण आता इथल्या दलित-मुस्लीम-ओबीसीना झालेली आहे.त्यामुळे तो आता कॉंग्रेस पासून दूर गेल्याचे चित्र आपल्याला या उभ्या महाराष्ट्रात पाहयला मिळत आहे.आणि याच वंचित समाजाने आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे कॉंग्रेस घाबरलेली आहे.त्यामुळे काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सादर प्रस्तावा संदर्भात ३० जानेवारी रोजी पर्यंत कॉंग्रेस पक्षाला अल्टीमेटम दिल्यानंतर लगेचच वरिष्ठांची परवानगी घेऊन महाराष्ट्र कॉंग्रेस राजगृहाकडे जाऊन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन ६ जागांचा प्रस्ताव सादर करून महाआघाडीत येण्याविषयी विनंती केली होती.परंतु प्रकाश आंबेडकर यांना कॉंग्रेसचा २०१४ चा चांगला अनुभव नसल्यामुळे त्यानी लागलीच कॉंग्रेसला ठोकून सांगितले की,आमच्या वंचित बहुजन आघाडीचा १२ जागांचा प्रस्ताव होता आणि त्यात सोलापूरच्या जागेचा विषय होता.आता आम्ही आघाडीत येणार नसून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीत यावे लागेल आणि १२ जागा कोणत्या आहेत त्या मी ठरविणार आहे.त्यामुळे कॉंग्रेस जो ६ जागांचा प्रस्ताव सादर केला तो प्रस्ताव म्हणजे ६ जागा देऊन कॉंग्रेस त्या जागा पाडण्याच्या मनसुभ्यात आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कॉंग्रेसचा जर त्या ६ जागांचा प्रस्ताव आपण मान्य केला तर निश्चितच तो आपल्याला धोका देणार आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने गाफील राहून चालणार नाही.आता कॉंग्रेस नको आहे असा जनतेचा आवाज आहे.त्यामुळे कॉंग्रेस कितीही म्हणाली की,आघाडी बरोबर आमची बोलणी सुरु आहेत त्यावर विश्वास न ठेवता ठरलेल्या उभ्या महाराष्ट्रात २५ जागा लोकसभेच्या लढवाव्यात आणि त्या कशा जिंकून येतील त्याकडे लक्ष द्यावे असे जाणकार यांचे मत आहे.त्यामुळे कॉंग्रेसचा ६ जागांचा प्रस्ताव धोकेबाजीच असून आता वंचित बहुजन आघाडीने गाफील राहू नये असे आमच्या सकल मराठी सामाजाला वाटत आहे त्यमुळे वंचितांचा विश्वास आता प्रकाश आंबेडकरच आहेत असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे पाहून वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा द्यावा…! रिपब्लिकन चळवळीला चांगले दिवस येत आहेत….! सकल मराठी समाज राजेश खडके.

शिव-फुले-शाहू-आंबेडकर जनतेचा मूड सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे पाहून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदावर पहाण्याचा आहे.त्यामुळे त्यांना आता रोखणे कठीण झालेले आहे.त्याचे कारण असे आहे की,गेल्या ७० वर्षामध्ये अशी संधी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकार्त्यच्या हातामध्ये आली नव्हती ती २०१९ च्या माध्यमातून आलेली आहे त्य्यामुळे तो ही संधी सोडेल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत नाही.एकंदरीत मायवती यांचे उत्तर प्रदेश मधील राजकारण पहाता त्यांनी प्रधानमंत्री कसे होता येईल याचीच रणनीती आखलेली आहे.त्यामुळे त्यानी अखिलेश यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे वचन दिलेले आहे.त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मायावती यांना वंचित बहुजन आघाडीची गरज म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची गरज दिल्लीमध्ये लागणार आहे.त्यांमुळे मायावतींचा कल हा महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील हे पाहण्याचा आहे.त्यामुळे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री व्हावेत असेच आश्वासन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेले आहे..त्यामुळेच त्यानी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा दिल्याचे चित्र महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्टपणे दिसत आहे.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन जनतेसाठी मोठा त्याग केला आहे यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही..परंतु त्या त्यागापोठी त्यांनी सत्तेची फळे चाखली असल्याचे सर्वांनाच माहित आहे.आता रिपब्लिकन जनतेने आठवले यांना असे आवाहन केले आहे की,२०१९ हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीचे साल आहे आणि याची जाण इथल्या आंबेडकर अनुयायी यांना झालेली आहे.त्यामुळे जसा मायावती यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा दिलेला आहे तसा पाठींबा रामदास आठवले यांनी द्यावा.त्यामुळे एकही रिपब्लिकन पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जाईल असे वाटत नाही.जर तसा कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी जनता त्याला माफ करेल असे वाटत नाही.त्यामुळे रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे पाहून वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा द्यावा असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.;

Tuesday, January 29, 2019

आठवले आणि कवाडे सोडून वंचित बहुजन आघाडीस मायावती आणि मेश्राम यांचा बिनशर्त पाठींबा….? आंबेडकरी चळवळीला येणार चांगले दिवस….! सकल मराठी समाज राजेश खडके


आंबेडकरी चळवळीच्या पक्षांचे एकंदरीत राजकारण पहाता २०१९ ची केंद्रीय निवडणूक अतिशय भयंकर आणि रिपब्लिकन पक्षासाठीची चांगले दिवस आणणारी निवडणूक आहे असे सकल मराठी समाजाचे स्पष्ट म्हणणे आहे.त्याचे कारण असे आहे की,मायावती यांनी कोणत्याही परिस्थितीत दिल्ली गाठण्याचा मनसुभा केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे विरोधी असणारा अखिलेश यांच्या पक्षाशी हातमिळवणी करून त्यांच्या बरोबर युती करून कॉंग्रेसला बाजूला सारून निवडणुकीची समीकरणे आखली आहेत.अखिलेश याने उत्तर प्रदेश सांभाळायचा तर मायावती यांनी दिल्ली सांभाळायची आहे अशी समीकरणे या दोघांनी जमवली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर याना बिनशर्त पाठींबा देण्याची तयारी बहन मायावती यांनी केली असल्याची माहिती सकल मराठी समाजाला समजली आहे.वामन मेश्राम हे आंबेडकरी चळवळीचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्याही लक्षात असे आले आहे की,इथली रिपब्लिकन जनता यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभी आहे आणि केंद्रीय राजकारण आपण करू शकत नाही.त्यामुळे मेश्राम ह्यांनीही प्रकाश आंबेडकर यांना पाठींबा दिला असल्याचे लक्षात येत आहे.त्यामुळे घडत असलेली राजकीय समीकरणे कोणीही नाकारू शकत नाहीत.कावडे सर हे कॉंग्रेसचे चांगले मित्र आहेत त्यांना यावेळी रिपब्लिकन जनतेचा मूड लक्षात का येत नाही…? असा आमचा प्रश्न आहे.कवाडे सर जर स्वत:ला खरेच आंबेडकरवादी म्हणत असतील तर त्यांनी बिनशर्त वंचित बहुजन आघाडीला पाठींबा दिला पाहिजे.यातच रामदास आठवले म्हणतात की,प्रकाश आबेडकर यांच्या बद्दल मला आदर आहे त्यांच्या बोलण्याचे मी काहीच वाईट मानत नाही….जर असे असेल तर आठवले यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुतिसुमने गाण्याचे बंद करून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.आपण आता सत्ता भरपूर प्रमाणात भोगल्या आहेत जो त्याग केला होता त्याची फळे भरपूर प्रामाणात चाखली आहेत.आता एक आंबेडकरवादी म्हणून आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना बिनशर्त पाठींबा दिला पाहिजे.त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पहाता आठवले आणि कवाडे सोडून वंचित बहुजन आघाडीस मायावती आणि मेश्राम यांचा बिनशर्त पाठींबा….? आंबेडकरी चळवळीला येणार चांगले दिवस….! असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

अखेर पाऊले निघाली राजगृहाकडे….स्वाभिमानाने भीमसैनिकांची छाती फुगली…! एमआयएमची साथ सोडणार नाही...अखेर आंबेडकर यांनी कॉंग्रसला ठणकावले…! सकल मराठी समाज राजेश खडके


चलो राजगृह…! चलो राजगृह…!! हा कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणायला कांही हरकत नाही.मिडीयाच्या माध्यामतून नेहमी ऐकायला यायचे की,मुंबईमध्ये मातोश्रीवर हा अमुक आला तो तमुक आला….अशा प्रकारे आपल्या राजगृहावर अमुक आला तमुक आला अशा काही गोष्टी कानावर आल्या नाहीत.परंतु ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून वंचिता मधला एक एक घटक अहोरात्र कष्ट करून जोडण्याचे काम केले. अशा घटकांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी उभी करून ज्या प्रकारे सभा घेण्याचे सत्र पुढे मागे न बघता सुरु ठेऊन स्पष्टपणे ३० जानेवारी पर्यंत कॉंग्रेस पक्षाला अल्टीमेट्म दिले त्याचे फलित म्हणून आज २९ जानेवारी रोजी महाराष्ट्र कॉंग्रेसला राजगृहावर यावे लागले.हे फलित इथल्या स्वाभिमानी जनतेचे आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे. कॉंग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण सोबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांना बरोबर घेऊन लेखी प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांचेकडे सादर केला आहे.आपल्याला माहित असेल की,या अगोदरच छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील उमेदवारीला आबेडकर यांनी पाठींबा जाहीर केलेला आहे.त्यामुळे कॉंग्रेस किती भयभीत झाले याचे चित्रण स्पष्टपणे जाणवत आहे.यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे कॉंग्रेसला ठणकावून सांगितलेले आहे की,वंचित बहुजन आघाडीचा १२ जागांचाच प्रस्ताव आहे….आणि त्या १२ जागेमध्ये सोलापूरची जागा हवीच आहे...आणि एमआयएमची साथ आम्ही सोडणार नाही.त्यामुळे कॉंग्रेसने अल्टीमेटमला घाबरून आघाडीची बोलणी यापुढेही चालूच राहणार आहे असे मिडीयाला सांगितले आहे.या सर्व गोष्टीवर भीमसैनिक लक्ष ठेऊन होता त्याला सगळ्यात जास्त आनंद झाला...आणि तो मनातल्या मनात पुटपुटला...अखेर पाऊले निघाली राजगृहाकडे…! त्यामुळे स्वाभिमानाने भीमसैनिकांची छाती नक्कीच फुगली असेल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

Monday, January 28, 2019

Tv9 ला दिली ५०० कोटीची नोटीस….म्हणून Tv9 करते वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात प्रचार आणि दंगल भडकाविण्याचे काम….? राजेश खडके सकल मराठी समाज


एकंदरीत पहाता लोकशाही मजबूत राहवी म्हणून चौथा खांब म्हणून पत्रकारिता करणाऱ्या मिडीयावर प्रामणिक जबाबदारी आहे.परंतु जसे इलेक्ट्रोनिक मिडीयाचा बाजार सुरु झाला तसे या क्षेत्रात व्यवसायाने मोठ्या प्रामाणात तोंड घातले आहे.पत्रकारिता हा क्रांतीचा खूप मोठा पर्याय आहे याची जाणीव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला करून दिलेली आहे.त्यामुळे आपल्या स्वत:चे पत्रकारिता माध्यम उभे करा असे त्यांनी स्वत: प्रात्यक्षिक करून दाखविलेले आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुध्द भारत पुन्हा सुरु करून त्याचा लाईव्ह बेब चायनल सुरु करून त्यांची स्पष्ट भूमिका जनतेपर्यंत पोहचवत आहेत.त्यामुळे Tv9 हे मिडीया माध्यम लोकांच्या समोर उघडे पडत चालले आहे.आता प्रश्न असा पडलेला आहे की,Tv9 असे वागत आहे...तर त्याचे कारण असे आहे की,या भाजप सरकारने या Tv9 ला ५०० कोटी दंड करून तो भरण्यास सांगितलेला आहे.त्यामुळे एक मध्यम मार्ग म्हणून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार रोखण्याचे काम Tv9 ला मिळाले आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या विरोधातील जास्तीत जास्त खोट्या बातम्या प्रसारित करण्याचे कार्य या Tv9 ने सुरू केले असल्याचे आता स्पष्टपणे जाणवत आहे.यातच देशात दंगल घडवून पुन्हा एकदा भाजपा सरकारला सत्तेत यायचे आहे.त्यामुळे भाजपा या Tv9 चा उपयोग करीत आहे….? असा आमच्या सकल मराठी समाजाचा प्रश्न आहे त्यामुळे भिवंडी शहर हे संवेदनशील असून समाज शांतता बिघडवून कायदा सुव्यावस्था बिघडविण्याचे काम हे Tv9 चायनल करीत असल्याचे दिसून येते.त्यामुळे वेळीच Tv9 च्या खोट्या प्रसारित होणाऱ्या बातम्या संदर्भात आवाज उचलणे गरजेचे आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

Sunday, January 27, 2019

कॉंग्रेस बरोबर आघाडीची बोलणी समाप्त…..? प्रकाश आंबेडकर आणि ओवीसी यांची वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या २५ जागा लढणार…? राजेश खडके सकल मराठी समाज


आंबेडकर आणि ओवीसी जोडीने महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षाला हादरा देण्यास सुरुवात केली आहे...आणि त्यांना हादरे बसत असल्याचे चित्र आता सर्वत्र स्पष्टपणे दिसत आहे.यामुळे कॉंग्रेस आणि भाजपा दलालांची भामेरी उडालेली आहे असे आता सर्वांनाच जाणवत आहे.एकंदरीत आंबेडकर-ओवीसी जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात जो सभांचा धडाका लावलेला आहे आणि त्या सभेतील दोघा नेत्यांचे भाषण ऐकले असता असे दिसून येते की,जवळ जवळ वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे.ओवीसी यांच्या नांदेड येथील भाषणा नंतर कॉंग्रेसने राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर करून आम्हाला वंचित बहुजन आघाडीची गरज नसून फक्त प्रकाश आंबेडकर यांचीच गरज असल्याचे दाखवून दिले आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला ठोकून सांगितले आहे की,इथला दलित-मुस्लीम-ओबीसी यांच्या हिताचे राजकारण मी करीत असून त्यांच्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे.मी माझ्या खासदारकीसाठी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही.त्यामुळे कॉंग्रेसचा खेळ हा बदमाश लोकांचा खेळ आहे.कॉंग्रेसकडे लोकसभेसाठीचे उमेदवार दिसून येत नाही असे असताना कॉंग्रेस ज्या ठिकाणी पडलेली आहे आणि भविष्यात पुढे पडणार आहेत त्याच जांगाची मागणी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसकडे केली होती.त्यांनी असे सांगितले की,एमआयएम पक्षाला बाजूला ठेवा तेव्हाच आघाडीची बोलणी पुढे होऊ शकते.त्यामुळे ओवीसी दोन पावले मागे येत त्यांनी कॉंग्रेसला असे सांगितले की,तुम्ही प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करा मी महाराष्ट्रात एकही उमेदवार उभा करीत नाही.मात्र कॉंग्रेस एक निचपत पडलेला अजगर असल्यामुळे त्त्याने ओवीसी आणि आंबेडकर यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच या जोडीने कॉंग्रेसला ३० जानेवारी पर्यंतचे अल्टीमेटम देऊन त्यांचा प्रस्ताव निकाली काढला असून महाराष्ट्रात २५ जागी लोकसभेचे उमेदवार देण्याची तयारी जोरदार सुरु केली असून त्याची घोषणा प्रकाश आंबेडकर ३१ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.आणि या २५ जागेतून कमीत कमी १७ उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील असे पोलीस गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे आणि हेच म्हणणे खरे ठरणार असून येणारे सरकार हे वंचित घटकांसाठीचे असेल असे आमच्या सकल मराठी समाजाचे ठाम मत आहे.