Wednesday, January 30, 2019

कॉंग्रेसचा ६ जागांचा प्रस्ताव धोकेबाजीच…..आता वंचित बहुजन आघाडीने गाफील राहू नये…! वंचितांचा विश्वास आता प्रकाश आंबेडकरच….! सकल मराठी समाज राजेश खडके

कोणत्या पक्षांनी कोणत्या पक्षा बरोबर युती करावी किंवाआघाडी करावी हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे.परंतु कॉंग्रेस ह्या पक्षाने नेहमीच वंचितांना अविकसित ठेवले आहे याची जाण आता इथल्या दलित-मुस्लीम-ओबीसीना झालेली आहे.त्यामुळे तो आता कॉंग्रेस पासून दूर गेल्याचे चित्र आपल्याला या उभ्या महाराष्ट्रात पाहयला मिळत आहे.आणि याच वंचित समाजाने आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे कॉंग्रेस घाबरलेली आहे.त्यामुळे काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सादर प्रस्तावा संदर्भात ३० जानेवारी रोजी पर्यंत कॉंग्रेस पक्षाला अल्टीमेटम दिल्यानंतर लगेचच वरिष्ठांची परवानगी घेऊन महाराष्ट्र कॉंग्रेस राजगृहाकडे जाऊन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन ६ जागांचा प्रस्ताव सादर करून महाआघाडीत येण्याविषयी विनंती केली होती.परंतु प्रकाश आंबेडकर यांना कॉंग्रेसचा २०१४ चा चांगला अनुभव नसल्यामुळे त्यानी लागलीच कॉंग्रेसला ठोकून सांगितले की,आमच्या वंचित बहुजन आघाडीचा १२ जागांचा प्रस्ताव होता आणि त्यात सोलापूरच्या जागेचा विषय होता.आता आम्ही आघाडीत येणार नसून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीत यावे लागेल आणि १२ जागा कोणत्या आहेत त्या मी ठरविणार आहे.त्यामुळे कॉंग्रेस जो ६ जागांचा प्रस्ताव सादर केला तो प्रस्ताव म्हणजे ६ जागा देऊन कॉंग्रेस त्या जागा पाडण्याच्या मनसुभ्यात आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कॉंग्रेसचा जर त्या ६ जागांचा प्रस्ताव आपण मान्य केला तर निश्चितच तो आपल्याला धोका देणार आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने गाफील राहून चालणार नाही.आता कॉंग्रेस नको आहे असा जनतेचा आवाज आहे.त्यामुळे कॉंग्रेस कितीही म्हणाली की,आघाडी बरोबर आमची बोलणी सुरु आहेत त्यावर विश्वास न ठेवता ठरलेल्या उभ्या महाराष्ट्रात २५ जागा लोकसभेच्या लढवाव्यात आणि त्या कशा जिंकून येतील त्याकडे लक्ष द्यावे असे जाणकार यांचे मत आहे.त्यामुळे कॉंग्रेसचा ६ जागांचा प्रस्ताव धोकेबाजीच असून आता वंचित बहुजन आघाडीने गाफील राहू नये असे आमच्या सकल मराठी सामाजाला वाटत आहे त्यमुळे वंचितांचा विश्वास आता प्रकाश आंबेडकरच आहेत असे जाणकारांचे म्हणणे आहे.

4 comments:

  1. वंचित बहुजन समाज यांनी एकजुटीने काम केले तर काहीही शक्य आहे. प्रा. विनोद जगताप सर 9422513314

    ReplyDelete
  2. बहुजनातील माळी व धनगर समाज हा लाक्षनिय आहे परंतु हा समाज कँग्रेस,राष्ट्रवादीकँग्रेस,भाजपा,शिवसेना या पक्षातच आहेत, खासकरुन या दोन समाजाने व त्यांच्या नेत्यांनी वंचीत बहुजन आघाडीसोबत येवुन समाजाला न्यायहक्क मिळवुन दिले पाहीजेत.वरील पक्षांची लाचारी पत्कारुन समाजाला झुलवत ठेवणे बंद करायला पाहीजे व आपला खरा मिञ कोण व शञु कोण ओळखले पाहीजे.

    ReplyDelete