Sunday, January 27, 2019
कॉंग्रेस बरोबर आघाडीची बोलणी समाप्त…..? प्रकाश आंबेडकर आणि ओवीसी यांची वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या २५ जागा लढणार…? राजेश खडके सकल मराठी समाज
आंबेडकर आणि ओवीसी जोडीने महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षाला हादरा देण्यास सुरुवात केली आहे...आणि त्यांना हादरे बसत असल्याचे चित्र आता सर्वत्र स्पष्टपणे दिसत आहे.यामुळे कॉंग्रेस आणि भाजपा दलालांची भामेरी उडालेली आहे असे आता सर्वांनाच जाणवत आहे.एकंदरीत आंबेडकर-ओवीसी जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात जो सभांचा धडाका लावलेला आहे आणि त्या सभेतील दोघा नेत्यांचे भाषण ऐकले असता असे दिसून येते की,जवळ जवळ वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे.ओवीसी यांच्या नांदेड येथील भाषणा नंतर कॉंग्रेसने राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर करून आम्हाला वंचित बहुजन आघाडीची गरज नसून फक्त प्रकाश आंबेडकर यांचीच गरज असल्याचे दाखवून दिले आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला ठोकून सांगितले आहे की,इथला दलित-मुस्लीम-ओबीसी यांच्या हिताचे राजकारण मी करीत असून त्यांच्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे.मी माझ्या खासदारकीसाठी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही.त्यामुळे कॉंग्रेसचा खेळ हा बदमाश लोकांचा खेळ आहे.कॉंग्रेसकडे लोकसभेसाठीचे उमेदवार दिसून येत नाही असे असताना कॉंग्रेस ज्या ठिकाणी पडलेली आहे आणि भविष्यात पुढे पडणार आहेत त्याच जांगाची मागणी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसकडे केली होती.त्यांनी असे सांगितले की,एमआयएम पक्षाला बाजूला ठेवा तेव्हाच आघाडीची बोलणी पुढे होऊ शकते.त्यामुळे ओवीसी दोन पावले मागे येत त्यांनी कॉंग्रेसला असे सांगितले की,तुम्ही प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करा मी महाराष्ट्रात एकही उमेदवार उभा करीत नाही.मात्र कॉंग्रेस एक निचपत पडलेला अजगर असल्यामुळे त्त्याने ओवीसी आणि आंबेडकर यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच या जोडीने कॉंग्रेसला ३० जानेवारी पर्यंतचे अल्टीमेटम देऊन त्यांचा प्रस्ताव निकाली काढला असून महाराष्ट्रात २५ जागी लोकसभेचे उमेदवार देण्याची तयारी जोरदार सुरु केली असून त्याची घोषणा प्रकाश आंबेडकर ३१ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.आणि या २५ जागेतून कमीत कमी १७ उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील असे पोलीस गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे आणि हेच म्हणणे खरे ठरणार असून येणारे सरकार हे वंचित घटकांसाठीचे असेल असे आमच्या सकल मराठी समाजाचे ठाम मत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सर नक्की परिवर्तन घडवून येणार आहे
ReplyDeleteआपण परिवर्तन घडविण्यासाठीच एकत्र आले आहोत.
DeleteRight
ReplyDeleteअचूक विश्लेषण आनी अचूक अंदाज. या वेळेस वंचित आघाडी नवे समीकरण मांडनार यात शंका नाही.
ReplyDeleteएकदम बरोबर बोललात
DeleteAgdi barobar
ReplyDeleteभावनिक होत आहोत आपण..!
ReplyDelete४८ लोकसभा जागा लढवणार
ReplyDeleteJay bhim Jay bharip
ReplyDeletejay bhim
ReplyDeleteमी सर्वप्रथम ओविसी सरांना आणि बाळासाहेब आंबेडकर सरांना मनापासून सल्यूट करतो. या दोन्ही नेत्यांचे विचार सर्व भारतीयांसाठी मोलाचे आहेत. येणाऱ्या निवडणूक काळात 2019 ला या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. आपण सर्वांनी आपल्या मतांच्या बळावर भारिप बहुजन वंचित आघाडीला विजय करूया. जय शिवराय जय भिम.
ReplyDeleteआपल्या कार्यकर्त्यांनी कॅडर बेस काम केले तर पंचवीस च्या पंचवीस जागा निवडून येतील. प्रत्येकाच्या घराघरात जाऊन प्रचार प्रसार केला तर नक्कीच आपल्या संपूर्ण जागा बहुमताने निवडून येतील.
ReplyDeleteRight
Delete