Tuesday, January 29, 2019

अखेर पाऊले निघाली राजगृहाकडे….स्वाभिमानाने भीमसैनिकांची छाती फुगली…! एमआयएमची साथ सोडणार नाही...अखेर आंबेडकर यांनी कॉंग्रसला ठणकावले…! सकल मराठी समाज राजेश खडके


चलो राजगृह…! चलो राजगृह…!! हा कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणायला कांही हरकत नाही.मिडीयाच्या माध्यामतून नेहमी ऐकायला यायचे की,मुंबईमध्ये मातोश्रीवर हा अमुक आला तो तमुक आला….अशा प्रकारे आपल्या राजगृहावर अमुक आला तमुक आला अशा काही गोष्टी कानावर आल्या नाहीत.परंतु ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून वंचिता मधला एक एक घटक अहोरात्र कष्ट करून जोडण्याचे काम केले. अशा घटकांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी उभी करून ज्या प्रकारे सभा घेण्याचे सत्र पुढे मागे न बघता सुरु ठेऊन स्पष्टपणे ३० जानेवारी पर्यंत कॉंग्रेस पक्षाला अल्टीमेट्म दिले त्याचे फलित म्हणून आज २९ जानेवारी रोजी महाराष्ट्र कॉंग्रेसला राजगृहावर यावे लागले.हे फलित इथल्या स्वाभिमानी जनतेचे आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे. कॉंग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण सोबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांना बरोबर घेऊन लेखी प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांचेकडे सादर केला आहे.आपल्याला माहित असेल की,या अगोदरच छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील उमेदवारीला आबेडकर यांनी पाठींबा जाहीर केलेला आहे.त्यामुळे कॉंग्रेस किती भयभीत झाले याचे चित्रण स्पष्टपणे जाणवत आहे.यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे कॉंग्रेसला ठणकावून सांगितलेले आहे की,वंचित बहुजन आघाडीचा १२ जागांचाच प्रस्ताव आहे….आणि त्या १२ जागेमध्ये सोलापूरची जागा हवीच आहे...आणि एमआयएमची साथ आम्ही सोडणार नाही.त्यामुळे कॉंग्रेसने अल्टीमेटमला घाबरून आघाडीची बोलणी यापुढेही चालूच राहणार आहे असे मिडीयाला सांगितले आहे.या सर्व गोष्टीवर भीमसैनिक लक्ष ठेऊन होता त्याला सगळ्यात जास्त आनंद झाला...आणि तो मनातल्या मनात पुटपुटला...अखेर पाऊले निघाली राजगृहाकडे…! त्यामुळे स्वाभिमानाने भीमसैनिकांची छाती नक्कीच फुगली असेल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

1 comment:

  1. आपल्या थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर लिहितात "हा ग्रंथ हिंदूंच्या मनावर हि गोस्ट ठसविण्याचा प्रयत्न करतो कि ,ज्यांची भारतावरील निष्ठा संशयास्पद आहे ,ते मुसलमान हिंदुस्थानात राहून शत्रुत्व करीत राहण्यापेक्षा हिंदुस्थान बाहेर राहून शत्रुत्व करीत राहिले तरी चालेल .आपसातील यादवी ऊध्ये नाहीशी करण्यासाठी जशी तुर्कस्तान ग्रीस बल्गेरिया या देशातील यच्चयावत विधर्मीय लोकांची जशी अदलाबदल केली ,तशी हिंदुस्थानातून मुसलमानांची व संकल्पित पाकिस्तानातून हिंदूंची अदलाबदल करावी .शांतता प्रस्थापित करण्यासाठी व एकजिनसी राष्ट्र निर्माण होण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे "
    आंबेडकर पुढे म्हणतात "मुसलमानांच्या मनावर लोकशाहीचा प्रभाव पडत नाही मुसलमानांना जर कशाविषयी प्रबळ आस्था वाटत असेल तर ती धर्माविषयी .त्यांचे राजकारण हे मुख्यतः धर्मनिष्ठ असते .इस्लामचे बंधुत्व हे सर्वव्यापक नाही सार्वत्रिक नाही ते बंधुत्व मुसलमान समाजाच्या अनुयायांपुरतेच मर्यादित असते. मुसलमानेतरांविषई त्यात तिरस्कार आणि शत्रुत्वच असते,मुसलमानांची राज्यनिष्ठा मुसलमान राज्य करीत असलेल्या देशशीस असते .ज्या देशावर मुसलमान राज्य करीत नाही ती त्याची शत्रुभूमी .म्हणून मुसलमानांचा हिंदुस्थान हि मातृभूमी आहे नि हिंदू हा आपला इष्टमित्र आहे असे विचारही त्याचा मनास शिवू देणार नाही ,असे या ग्रंथाचे म्हणणे आहे .आक्रमक वृत्ती हि मुसलमानाला मिळालेली नेसर्गिक देणगी आहे ते हिंदूंच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन झोडगिरीचा अवलंब करतात "(संदर्भ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लेखक धंनजय किर चौथं आवृत्ती सातवे पुनर्मुद्रण पान न ३६९ व ३७०)
    आणि आता प्रकाश आंबेडकर MIM या कट्टर मुस्लिम संघटनेबरोबर युती करून (जी संघटना रझाकारांची होती ज्यांनी हिंदूंवर अन्याय व अत्याचार केले होते ज्यात मुख्यतेवकरून दलित बहुसन्ख होते अशा) बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करीत आहेत
    ज्या MIM चा अकबरुद्दीन ओवेसी उघडउघड म्हणतो कि १५ मिनिटे पोलीस बाजूला सारा २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना ठार मारतील असा ओवेसींच्या पक्षाबरोबर युती करून बाबासाहेबांबरोबर गड्डरी आणि देशद्रोह करीत आहेत .हा MIM हा पक्ष कासीम रिझवी याने स्थापन केली ज्यांचे म्हणणे होते कि हैदराबाद संस्थान (ज्यात मराठवाडा ,कर्नाटक मधील काही भाग आणि अंधार प्रदेश ) पाकिस्तानात विलीन करा अशी मागणी असलेला हा पक्ष या पक्षाविरुद्ध काँग्रेस पक्ष तर लढलाच पण अगदी क्रांतीसिंह नाना पाटील जी डी बापू लाड यांनी सशस्त्र संघर्ष केला MIM या पक्षाबरोबर युती करणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा खून करण्यासारखे आहे

    ReplyDelete