Thursday, February 15, 2018

आज अटकेचा सोळावा दिवस (१६) १६ फेब्रुवारी १६८९ रायप्पा महार बहादूरगडाच्या येथे पोहचला होता त्याने संभाजीराजे यांना भेटण्याची औरंगाजेबाकडे विनंती केली....! वैदिक धर्म पंडितांच्या सांगण्यावरून औरंगजेब याने काढली संभाजीराजे यांची “धिंड”....! रायप्पा महार हा विरगतीला प्राप्त झाला....? म्हणूनच मी करतोय १६ फेब्रुवारी २०१८ रोजी लाल महल येथे माता जिजाऊ चरणी एक दिवसांचे आत्मक्लेश....!



संभाजीराजांच्या उद्या अटकेचा १६ वा दिवस होता रायप्पा महार बहादूरगडाच्या येथे पोहचला होता.त्याने संभाजीराजे यांना भेटण्याची औरंगाजेबाकडे विनंती केली.परंतु वैदिक धर्म पंडितांच्या सांगण्यावरून त्याच्या सैनिकांना खुश करण्यासाठी औरंगाजेबास संभाजीराजे यांची धिंड काढण्यास सुचविले.त्या वैदिक पंडितांची सूचना औरंगाजेबाला आवडली त्याने संभाजीराजे यांचा पेहराव बदलून उंटावर उलटे बसवून धिंड काढण्याचे आदेश दिले.एक राजा एका राजाची अशा प्रकारे हेटाळणी करू शकतो हे इतीहासापुढे पहिल्यांदाच आले होते.अशी धिंड यापूर्वी कोणत्याही राजाची काढली नव्हती.स्वराज्यात जर स्वार्थ उभा राहीला नसता तर स्वराज्यातून छत्रपती संभाजी महाराज यांना कोण असे घेऊन गेले असते.मुखर्बखान याची अडीच हजाराची सेना स्वराज्याला जड झाली होती.ज्या मुखर्बखानाला स्वराज्य नवीन होते त्याला स्वराज्यातील वाटा माहित नव्हत्या असा मुखर्बखान स्वराज्यात येतो आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सहज घेऊन जातो हे काही मनाला पटत नसले तरी सत्य घटना नाकारता येऊ शकत नाही.कारण ज्या देशात गद्दारांची संख्या वाढते त्या देशात काहीही होऊ शकते.हे छत्रपती संभाजी महाराज यांना जेरबंद केल्यानंतर स्वराज्या समोर आलेले आहे.त्यामुळे त्या मुखर्बखान याचे जास्तीत जास्त कौतुक होईल असे औरंगाजेबास वैदिक धर्म पंडितांनी सुचविले होते.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची “धिंड” निघाली होती.आपल्या राजाची ही अवस्था पाहून तडजोडीसाठी आलेला रायप्पा महार याला बघविले नाही लागलीच त्याने तलवारीला हात घातला आणि त्या सैनिकावर तुटून पडला.एकटा माणूस किती लढणार अखेर तो १६ फेब्रुवारी १६८९ मध्ये विरगतीला प्राप्त झाला. म्हणून १६ फेब्रुवारी हा रायप्पा महार याचा वीरगती दिन आहे या दिनाचे औचित्य साधून मी राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज माता जिजाऊ यांच्या चरणी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी स्वराज्यातील अठरा अलुतेदार आणि स्वराज्याच्या मराठा सरदार आमचे पूर्वज चुकले काय....? यासाठी आत्मक्लेश करण्यासाठी बसणार आहे.

No comments:

Post a Comment