समतापर्व २०१८ निमित्त ज्यांनी
ज्यांनी “महार योध्दा” रथ काढण्यासाठी १ महिन्यापासून मेहनत करीत होते.....आणि मला
आर्थिक मदत करीत होते अशा महार योद्ध्यांचे तसेच मराठा योद्ध्यांचे आणि मातंग योद्ध्यांचे
मनपूर्वक जाहीर आभार.....!
राजेश खडके
सकल मराठी समाज
गेल्या एक वर्षापासून शहाजीराजे
संकल्पित स्वराज्य माता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी स्थापित केलेले
समतावादी स्वराज्य आणि त्या समतावादी स्वराज्याचे संरक्षण करणारे समतावादी स्वराज्य
रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यात महार योद्ध्यांचे योगदान शोधण्याचे
कार्य गेल्या तीन वर्षापासून सुरु होते.ज्या महार योद्ध्यांचे इतिहासात संदर्भ –
पुरावे सापडले ते जतन करून सकल मराठी समाजाची स्थापना करण्यात येऊन १ जानेवारी
२०१८ समतापर्व साजरा करण्याचा निश्चय घेण्यात येऊन त्या महार योद्ध्यांची माहिती
रयते समोर घेऊन येण्याचा प्रयत्न आमच्या सकल मराठी समाज यांनी केला होता.यामध्येच
आम्हाला शहाजीराजे यांनी जो लाल महाल १६१६-१७ मध्ये राशींनच्या बांगर पाटलाकडून
बांधण्यात येऊन “नागरवास” म्हणजे आजचे तुळापुर येथे स्वराज्य संकल्पित केले.स्वराज्यासाठी
प्रचंडगडाचा महार राजा याने आपला गड स्वराज्यासाठी शिवरायांकडे स्वाधीन केला
त्यांचे नामकरण शिवरायांनी तोरणगड असे केले.पासलकर वाड्यातून स्वराज्य कारभार सुरु
केला स्त्रीची बेअबदा झाली म्हणून शिवरायांच्या आदेशावरून खंड्या महार याने गुजर
पाटलाचे हातपाय कलम केले.
पुरंधर किल्ल्याची प्रमुख
अधिकारी म्हणून येसाजी नाईक (महार) याने जबाबदारी सांभाळली.छत्रपती संभाजी महाराज
यांनी समतावादी स्वराज्य रक्षक म्हणून जबाबदारी सांभाळून समतावादी धर्म प्रसारित
करण्याचे कार्य कायस्थ प्रभू कवी कलश यांचे बरोबर जोरात सुरु केले.त्यामुळे वैदिक
धर्म पंडितांनी त्यांचे गुलाम स्वराज्याचे गद्दार यांना बरोबर घेऊन संगमेश्वर येथे
औरंगाजेब याचे बरोबर हातमिळवणी करून त्याचा सरदार मुखर्बखान याला छत्रपती संभाजीराजे
यांचा ठावठिकाणा सांगतात.येथे संभाजीराजांना वाचविण्यासाठी अर्जुना महार (कवठेकर)
वीरगतीला प्राप्त होतो. संभाजीराजांना
वाचविण्यासाठी बहादूरगड याठिकाणी रायप्पा महार वीरगतीला प्राप्त होतो.संभाजीराजांवर अंत्यसंस्कार वढू
येथे गोविंद महार (गायकवाड) करतात आणि संभाजीराजांच्या हत्येचा बदला स्वराज्याचा
सरदार सिद्ध्नाक महार घेतो.ही अस्मिता महार समाजामध्ये निर्माण करण्यासाठी “महार
योध्दा” रथाचे आयोजन सकल मराठी समाज यांचे कडून केली जाते.याठिकाणी काही मराठा
योद्धा – मातंग योद्धा पुढे येऊन मदत करतात स्वराज्यातील “महार योद्धा” यांचे वंशज
आर्थिक मदत करतात.आणि सकल मराठी समाज यांचे बरोबर “महार योद्धा” रथ तयार करतात
अशांचे मनपूर्वक आभर सकल मराठी समाज यांचे वतीने करण्यात येत आहे.परंतु फुले शाहू
आंबेडकर विचारावर काम करणारा कार्यकर्ता आणि बहुजन मराठा या महार योद्ध्यांच्या
अस्मितेसाठी उभा केलेल्या “महार योद्धा” रथ काढण्यासाठी सकल मराठी समाज यांचेपासून
दूर का रहिले असा याठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे.ते समतावादी स्वराज्याचे
माता जिजाऊ आणि शिवराय यांचे तसेच समतावादी विचार प्रचार आणि प्रसारित करणारे समतावादी
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार दोनशे वर्षापासून लपून राहिले
होते ते शोधण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. आणि सत्यशोधक धर्म
स्थापन करून पुन्हा एकदा समतावादी विचारांचा भगवा ध्वज तुमच्या आमच्या समोर दिलेला
आहे.महात्मा फुले यांचे विचार पाहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरू
मानले आणि २४ सप्टेंबर १९२४ साली समता सैनिक दल स्थापन केले आहे.समतेच्या भगव्या
विचारांचा ध्वज घेऊन संघर्षाची निळी टोपी समता सैनिक दलाच्या सैनिकाच्या डोक्यावर धारण
करून मनुस्मृती दहन करून वढू आणि भिमा कोरेगावचा महार योद्ध्यांचा इतिहास उजागर
करून १९४२ मध्ये सेनेत “महार बटालियन” सुरु केली. “महार योध्दा” कालही बौध्द होता
आणि आजही बौध्द आहे याची जाण चळवळीच्या कार्यकर्त्यांना का होता नाही असा माझा सरळ
सरळ प्रश्न आहे.स्वाभिमानाने आज आपण जातीच्या नावावर शिक्षणात – नोकरीत आणि
राजकारणात आरक्षण घेतो.आपल्या स्वाभिमानासाठी जातियवादी शक्तींच्या विरोधात लढतो
मग त्या महार बटालियन असणाऱ्या महार योद्ध्यांच्या सन्मानासाठी
निघालेल्या “महार योध्दा” रथ
अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शेनागावकर स्वत:ची ताकद बेकायदा वापरून छत्रपती शिवाजी
महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्याचे प्रतिक असणारा गौतम बुद्धापासून
– सम्राट अशोकापासून – वारकरी संप्रदाय यांचे पासून स्वराज्यात आलेला भगवा ध्वज
ज्याच्यावर शहाजीराजे यांनी सिहाची छाप (मोहर) बसविलेले होती तो ध्वज “महार योध्दा”
च्या रथाच्या निमित्ताने बाहेर येतो.१९ फेब्रुवारी २०१८ च्या शिवाजयंती निमित्त समतापर्व
२०१८ जाहीर होते.अशी शिवजयंती साजरी करण्यासाठी महात्मा फुले वाडा ते जगातील पहिला
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत निघणाऱ्या “महार योध्दा” रथास १८ फेब्रुवारी
२०१८ रोजी रात्री ८.३० मिनिटानी श्री शेनागावकर यांच्या बेकायदा आदेशावर रथ
काढण्यास परवानगी नाकरली जाते.रातोरात सकल मराठी समाज यांचे कार्यकर्ते बेकायदा जेरबंद
केले जातात. “महार योद्धा” रथ ताब्यात घेऊन श्री शेनागावकर यांचे आदेशावर
स्वराज्याचा भगवा ध्वज ज्यावर “महार योद्धा” लिहीले आहे तो ध्वज आणि जो संघर्षाचा
अशोक चक्र असलेला निळा ध्वज जप्त करण्यात येतो याचा अर्थ काय....? मराठा समाजातील कार्यकर्ते स्वत:ला स्वराज्यचे मावले
म्हणवितो स्वत:ला माता जिजाऊ आणि शिवराय यांचे बरोबर बहुजानाचे नाते जोडतो तो गप्प
का होता.तो महार समाजाच्या सन्मानासाठी पुढे का नाही आला...? म्हणून मी म्हणतो चळवळीच्या कार्यकर्त्यानी आणि
बहुजन मराठा यांनी साथ दिली असती....तर “महार योध्दा” रथ निश्चितपणे यशस्वी झाला
असता...!
No comments:
Post a Comment