Tuesday, February 13, 2018

आज अटकेचा चौदावा दिवस (१४) १४ फेब्रुवारी १६८९ रायप्पा महार बहादूरगडाच्या दोन दिवसांच्या अंतरापर्यंत पोहचला आहे....! महाराणी येसूबाई रायगडावर रायप्पा महार यांच्या निरोपाची वाट पहात आहेत....!



संभाजीराजांच्या आज अटकेचा १४ वा दिवस होता.औरंगांजेब अकलूज येथून संभाजीराजांना घेऊन बहादूरगडाकडे वाटेला लागला होता त्याला याची जाणीव होती की,जो पर्यंत संभाजीराजांना बहादूरगडावर नेत नाहीत तो पर्यंत काहीही होऊ शकते.तो त्याबाबत कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हता.त्याचे कारण असे होते की,बह्दूरगड गाठले की संभाजीराजांना एकदा कैदेत टाकले काळजी कमी होईल. रायप्पा महार याला बहादूरगडाकडे लवकरात लवकर कसे पोहचता येईल याची तो घाई करीत आपला घोडा वेगाने दौडत निघाला होता.इकडे औरंगांजेबा कडून मुखर्बखानाचे कौतुक सारखे सारखे करण्यात येत होते.

No comments:

Post a Comment