Monday, February 19, 2018

मा.अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शेनगावकर यांचा जाहीर निषेध करून पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवरायांना अखेर “महार योध्दा” च्या वतीने पुष्पहार अर्पण....!



विषय असा आहे की, मा.अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शेनगावकर यांचे बेकायदा असे म्हणणे होते की,तुम्ही महार योद्ध्यांच्या वतीने महात्मा फुले वाडा ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालण्यासाठी “महार योध्दा” रथयात्रा काढू शकत नाही.त्यासाठी त्यांनी समर्थ पोलीस  स्टेशन येथे दिनांक १७/२/२०१८ रोजी सायंकाळी ७.०० वाजता मोठी बैठक बोलाविली होती.त्या बैठकीमध्ये मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ – १ श्री तेली साहेब,मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ – २ श्री मुंडे तसेच मा.पोलीस साहाय्यक आयुक्त श्री उगिले, मा.पोलीस साहाय्यक आयुक्त जयश्री गायकवाड आणि इतर पोलीस साहाय्यक आयुक्त,पोलीस निरीक्षक उपस्थित होते.त्या बैठकीमध्ये त्यांनी मला बोलाविले.सायंकाळी ७.०० वाजल्या पासून ते रात्री ९.०० वाजेपर्यंत बैठक सुरु होती.सदर बैठकीमध्ये मा.अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शेनगावकर यांचे असे म्हणणे होते की, “महार योद्धा” हा शब्द लावून रथयात्रा काढू नये.त्याचे कारण असे आहे की, “महार” हा शब्द जातीवाचक आहे आणि तुम्ही भोई समाजाचे आहात.मी त्या बैठकीमध्ये असा मुद्दा उपस्थित केला की, साहेब इतिहासात “महार” हा शब्द जातीवाचक नव्हता त्याला जातीवाचक हा वैदिक धर्म पंडित आणि पेशवाईने यांनी केलेला आहे.,,आणि जर हा शब्द जातीवाचक असेल तर आपल्या भारतीय सेनेमध्ये आजही मराठा बटालियन,शीख बटालियन,जाट बटालियन तसेच महार बटालियन अस्थित्वात आहेत “परंतु हा शब्द वापरत असताना तुमचा उद्देश चांगला असला पाहिजे त्यात जातीयव्देष नसला पाहिजे आणि तो जर असेल तर तुम्ही जातीयतेचे आरोपी ठरू शकता” आणि नव्यानेच आरआरएस चे संघचालक श्री मोहन भागवत यांनी “ब्राह्मण बटालियन” अशी मागणी केली आहे.जर राजेश खडके यांचा मुद्दा चुकीचा असेल तर श्री मोहन भागवत यांना नोटीस देण्यात यावी....आणि त्याची नक्कल आमच्या सकल मराठी समाज यांना देण्यात यावी आम्ही “महार योद्धा” रथ काढीत नाही.त्यानी ती नोटीस देण्यास नाकरले ते म्हणाले तुमची परवानगी तयार आहे परंतु “महार योद्धा” रथ काढीत नसलेबाबत तुम्ही आम्हाला लेखी लिहून द्यावे.मी त्यांना म्हणालो की,शेंगावकर साहेब कायद्याने तुम्ही “महार योद्धा” रथयात्रा काढू शकत नाही अशी मला लेखी समज द्या मी रथ काढीत नाही.त्यावर शेनागावकर यांची बोलती बंद झाली आणि सदरची बैठक संपली.शेनगावकर यांनी मला “महार योद्धा” रथयात्रा तुम्ही काढू नये अशी कोणतीही नोटीस दिलेली नाही.कारण ती देण्याचा कोणत्याही कायद्याला अधिकार नव्हता व नाही.परंतु ते शेनगावकर होते त्यामुळे त्यानी बरोबर आपली अक्कल लढवीत कायदा सुव्यावस्थेचा प्रश्न पोलीस खात्या समोर उपस्थित करून संपूर्ण शहरात वातावरण अशांत कसे आहे हे दाखविण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली.मला १८/२/२०१८ पासून शहरातील पोलीस सारखे फोन करीत भेटायला येत होते.रातोरात सकल मराठी समाज कार्यकर्ते कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली डांबून ठेवण्यात आले.सकाळी ६.०० वाजता “महार योध्दा” रथ आणि स्वराज्याचा भगवा ध्वज आणि संघर्षाचा निळा ध्वज पोलिसांनी जप्त करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचाही रथ जप्त करण्यात आला.सकाळी ६.३० मिनिटानी मला माझ्या राहत्या घरी म्हणजे वडगाव शेरी येथे “नजरकैद” करून टाकले.मला पोलिसाकडून सांगण्यात आले की,तुम्ही शिवाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायला देखील जाऊ शकत नाही.मी त्यांना म्हणालो मी छत्रपती शिवरायांना महार योद्ध्यांचे वतीने पुष्पहार अर्पण करणार म्हणजे करणार परंतु शेंगावकर यांच्या बेकायदा आदेशावर माझ्या घरात - माझ्या दारात ४० ते ५० पोलीस पिंजरा लावून बसविले होते.चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब माझ्या घरात बसून होते.त्याचा फायदा घेत मी संपूर्ण इतिहास त्यांच्या समोर मांडला आणि त्यांच्यातील स्वराज्यातील “मराठा योध्दा” जागरूक केला.जेव्हा मी सांगितलेला इतिहास त्यांना पटला तेव्हा त्यानी “महार योद्ध्यांच्या” वतीने मला चंदननगर येथील भाजी मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी स्वत: पोलीस बंदोबस्त्तात घेऊन गेले.यावेळी माझ्या बरोबर तोरणागडाचे महार योध्दा विश्वनाथ भागुजी गायकवाड,पुणे शहरातील महार योध्दा शशिकांत कांबळे,अजय धेंडे,संजय सोनविणे,गणेश भोसले,सिद्धांत सुर्वे,सागर चौधरी,मातंग योध्दा विकास सातारकर,दत्ता कांबळे,विजय लोणके इत्यादी उपस्थित होते यावेळी मा.अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शेनगावकर यांचा जाहीर निषेध करून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.


राजेश खडके
सकल मराठी समाज
 

No comments:

Post a Comment