संभाजीराजांच्या आज अटकेचा १२
वा दिवस होता.औरंगांजेब अकलूज येथून संभाजीराजांना आपल्या पाच लाखाच्या सैन्या
बरोबर घेऊन बहादूरगडाकडे निघाला होता. महाराणी येसूबाईनी आज राजाराम यांचा
राज्याभिषेक केला होता.त्यामुळे राजाराम आता स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले होते.छत्रपती
राजाराम महाराज यांनी दरबार भरविला आणि रायप्पा महार याला दरबारात उपस्थित
राहण्याचे आदेश दिले होते. छत्रपती राजाराम महाराज यांच्या आदेशा नुसार रायप्पा
महार दरबारात हजर झाला होता.छत्रपती राजाराम महाराज यांनी रायप्पा महार याला आदेश दिले
की,औरंगांजेबाची भेट घेऊन संभाजीराजे
यांना सोडविण्यासाठीच्या वाटा घाटीच्या बोलणी करून तशी माहिती घेऊन यावे.त्यानुसार
रायप्पा महार बहादूरगडाकडे औरंगांजेबाची भेट घेण्यासाठी निघाला होता.रायगड ते बहादूरगड
असा चार दिवसांचा प्रवास होता.आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की,संभाजीराजे छत्रपती असताना राजाराम छत्रपती कसे झाले.जर
राजाराम छत्रपती झाले तर संभाजीराजे छत्रपती होते काय ....? तर ही एक संभाजीराजांना सोडविण्यासाठीची महाराणी
येसूबाई यांची राजनीती होती.त्याचे कारण असे आहे की,स्वराज्यात मोठ्या प्रमाणात बंड उभे राहिले
होते.वैदिक धर्म पंडित स्वकीय बरोबर स्वराज्य गिळकृत करण्यास बसलेच होते.छत्रपती
शिवरायांनी येसूबाईना स्वराज्याचे कुलमुखत्यार दिले होते त्यामुळे स्वराज्याची
जबाबदारी आत्ता त्यांचेवर आली होती.त्यांच्या असे लक्षात आले की,जो पर्यंत छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यात परत येत
नाही तो पर्यंत स्वराज्याची गादी रिकामी ठेऊ शकत नाही.आणि औरंगाजेबाला फक्त
स्वराज्य पाहिजे होते.त्यामुळे संभाजीराजे यांच्या जीवाला धोका रहाणार नाही.त्यामुळे
येसूबाई यांचा निर्णय योग्य होता असे मला एक विश्लेषक म्हणून वाटत आहे.या
निर्णयामुळे वैदिक धर्म पंडित आणखी भांबविले त्यांच्या असे लक्षात आले की,आता स्वराज्याचे छत्रपती संभाजीराजे राहिले नाहीत
त्यामुळे औरंगाजेब आता संभाजीराजांची हत्या करणार नाही.
No comments:
Post a Comment