विषय असा आहे की,जेव्हा छत्रपती संभाजी महाराज खेळण्यावरून देसाई
वाड्यात आले तेव्हा त्यांचेकडे एक खबरी बातमी घेऊन आला की “महाराज मुखर्बखान
तुम्हाला जेरबंद करण्यासाठी अनुस्कुरा घाटातून येतोय” संभाजीराजांनी ती बातमी ऐकली
त्यांना असे वाटले की, मुखर्बखानाला
घाट चढू येणे शक्य नाही...परंतु स्वराज्याचे गद्दार त्यांचे बरोबर आहेत याची
कल्पना त्यांना नव्हती.पहिला खबरी जातो न जातो लागलीच दुसरा खबरी येतो आणि म्हणतो
“महाराज मुखर्बखानाने अनुस्कुरा घाट पार केलाय” संभाजीराजांना पहिली व दुसरी खबर
मिळती ना मिळती लागलीच तिसरा खबरी खबर घेऊन येतो आणि संभाजीराजांना म्हणतो
““महाराज मुखर्बखान वाड्याच्या जवळ आलाय” हे एकूण संभाजीराजे उसंत घेतच आहे की,वाड्यामध्ये “अल्ला हु अकबर” असे नारे एकू
येतात.शत्रू तर आणखी लांब आहे मग तो वाड्यात शिरे पर्यंत संभाजीराजांना गाफील कोणी
ठेवली...? म्हालोजी घोरपडे संभाजीराजांना
वाचवायला शृंगारपुरात आले तेव्हा त्यांचे बरोबर संताजी घोरपडे होता.म्हालोजी
घोरपडे ध्रारातीर्थ पडले शिर्केचा सरदार अजूना महार याला अचानक धाबा मारून पेंढ्यात
जाळून मारले.शिवरायांचा जावई गणोजी शिर्के हा मारला गेला.संभाजीराजे आणि त्यांचा
सहकारी कविकलश याला जेरबंद करून आज गगनबावडा घाटातून दुसऱ्या दिवसाचा अटकेचा प्रवास
सुरु झाला.
यातून उपस्थित झालेले प्रश्न
१ जर मुखर्बखान संभाजीराजान
पासुन खूप लांब आहे मग वाड्यात वाड्यामध्ये “अल्ला हु
अकबर” असे नारे कोणी.....?
२ म्हालोजी घोरपडे यांना मुखर्बखान
अटक करायला येतोय याची खबर कोणी दिली...?
३ शिर्केंचा सरदार अर्जुना महार
आणि शिवरायांचा जावई गणोजी शिर्के आणि म्हालोजी घोरपडे
मारला जातो
संताजी घोरपडे निसटून जाण्यास यशस्वी होतो मग देसाई वाड्यातील देसाईचे
काय झाले....?
No comments:
Post a Comment