विषय असा आहे की, संभाजीराजांच्या आज अटकेचा ६ वा व ७ वा दिवस होता
निसटून गेलेला संताजी घोरपडे याचा अजून काही मागसुम लागला नव्हता.निंबाळकर –
जाधवराव – महाडिक – कंक अशी बरेच मोठ मोठे
सरदार घराणे गप्प का....? होते.अडीच
हजाराची सेना स्वराज्यातून संभाजीराजांना जेरबंद करून चालली होती....कराडच्या धनगर
वाड्यातून ते जात होते.धनगर वाड्यातील लोकांनी त्या सेनेवर हल्ला चढविला होता.याचा
सरळ अर्थ असा निघतो की,संभाजीराजांची
अटक स्वराज्याला माहित झाली होती.गनिमी काव्यातून निर्माण केलेले छत्रपती
शिवरायांचे स्वराज्य मावळ्याच्या रक्त मासांनी उभे केलेले स्वराज्य आणि त्या
शिवरायांचा मुलगा आपला राजा छत्रपती संभाजी महाराज जेरबंद करून चालवला आहे.हे सर्व
माझ्या समोर येत आहे...माझे मन कासावीत होत आहे.औरंगाजेबाच्या कैदेतून सुखरूपपणे
स्वराज्यात सुटून येणारे छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजीराजे...! मोगलांच्या
लाखोच्या सेनेला सळो की, पळो करून
सोडणारे छत्रपती संभाजी महाराज आज फक्त अडीच हजाराच्या सेनेत अटक झाले होते.ज्या
स्वराज्यात गनिमी काव्यानी लाखोंची सेना उध्वस्त केली तेथे फक्त अडीच हजार सेनेचे
आपण काहीच का..? करू शकलो नाही.म्हणून मी आपल्या
पूर्वजांच्या वतीने करतोय माता जिजाऊ चरणी एक दिवसांचे आत्मक्लेश.....!
No comments:
Post a Comment