डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
महात्मा ज्योतिबा फुले समजून घेतले....आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती
शिवाजी महाराज शोधून समजून घेतले आणि त्यांचे विचार रयते समोर घेऊन आले.हिंदू हा
शब्द सिंधू मधून आला असल्याचे आपल्या सर्वांना माहित आहे....आणि महाराष्ट्र हा
महार या शब्दातून आला असल्याचे इतिहासकार संशोधक विश्वास पाटील यांनी त्यांच्या
लिखणात मांडले आहे.आणि महार हा इतिहासातील लढवय्या जमात असल्याचे ब्राह्मणी
इतिहासकारांनाही नाकारता आलेले नाही.आणि याचे जिवंत काही उदाहरणे द्यायची झाली तर
असे देता येईल की,लाल महालाची जागा महार समाजाची
आहे,तोरणागड हा महार राजाचा होता,संभाजीराजे यांचा बालपणीचा मित्र रायप्पा महार आहे.तर
संभाजीराजांना वाचविण्यासाठी अर्जुना महार
याचे बलिदान आहे.तर रायप्पा महार यानेही बलिदान दिले आहे.तर छत्रपती संभाजी महाराज
यांचा अंत्यसंस्कार गोविंद महाराने केला आहे....तर त्यांच्या हत्येचा बदला
सिद्धनाक महार याने घेतला आहे.या सर्व बाबी आर्य सनातनी लोकांनी दुर्लक्षित केल्या
नसून त्यावर त्यांनी विचार विनिमय करून धूर्त पध्द्तीत महार लढवय्या संपविण्याचे
कटकारस्थान केले.प्रथम पेशवाई निर्माण करून “महार योद्धा” यांना अस्पृश्य महार
घोषित करून अठरा अलुतेदारापासून वेगळे करण्यात आले.इंग्रजी राजवटीमध्ये या महार
समाजाचे जमीन क्षेत्र काढून घेण्यात आले.आणि वतन म्हणून त्याचा साडेबारा टक्के
परतावा देण्यात आला आहे.आज महार समाज त्याला “गावचा नोकर वतन” म्हणतो.परंतु तो हे
समजत नाही की,मातंग समाजही गावचा नोकर
होता.परंतु त्याला इंग्रजांनी कोणतेही वतन दिलेले नाही याचा अर्थ सरळ आहे की,महार वतन हे नोकर वतन नसून तो काढून घेतलेल्या
जमिनीचा साडेबारा टक्के परतावा आहे.मग असे का झाले.....? याचा विचार महार समाज का करीत नाही असा माझा खडा
सवाल आहे...आणि त्याचा जबाबाही मीच देणार आहे.तो म्हणजे वैदिक धर्म पंडितांना
त्यांचा आर्य सनातनी धर्म प्रसारित करण्यात येत असलेल्या “अडचणी” होय.महार समाज
पूर्वीपासून बौध्द उपासक आहे आणि जोपर्यंत त्याच्यातील “महार योद्धा” ही अस्मिता
संपणार नाही तो पर्यंत आपण यशस्वी होणार नाही याची कल्पना वैदिक धर्म पंडितांना होती.म्हणून
“महार योद्धा” यांच्या वंशजाच्या मानसिकते मध्ये असे बिंबविले की,तुम्ही अपृष्य महार आहात आणि त्याचा प्रसार आणि
प्रचार गावपातळी इतका केला की,इतर वर्ग
“महार योद्धा” यांना अस्पृश्य महार म्हणू लागले.याचा परिणाम इतका परिणाम भयानक
झाला कि,”महार योध्दा” आपल्या स्वत:चे
ऐतिहासिक अस्तित्व विसरून गेला.आपण स्वराज्याचे जनक आहोत शिवरायांचे मावळे आहोत
याचे भानच त्याल राहिले नाही.गावातील महार वाड्याच्या शेजारी मांग वाडा वसविला
गेला त्या मांग समाजाच्या गळ्यात गाडगे मडके नव्हते तो अस्पृश्य मांग नव्हता.फक्त
अस्पृश्य होते ते फक्त “महार योद्धे”....! परंतु मांग अस्पृश्य नाही हे जरी सत्य
असले तरी तो आज “मागास” आहे हे पण विसरून चालणार नाही.मग महार समाजाला अस्पृश्य
समजणारा आर्य सनातनी धर्म कोण स्वीकारेल....! असा माझा थेट प्रश्न आहे.त्यामुळे
आपण कधीही आपले “बौध्दत्व” सोडले नाही.....आणि आपल्या पूर्वजांची मान्यताही कधी
आपण सोडलेली नाही.आजही आपण आपल्या गावी आपल्या शेतात आपल्या पूर्वजांचे पूजन
करायला जात असतो.पूर्वजांचे पूजन बंद करू शकत नाही.....याचा अर्थ आपण “हिंदू
धर्मीय” होतो असा बिलकुल होत नाही.आपण कधी आर्य सनातनी हिंदू धर्म स्वीकारला
नाही....आणि तो स्वीकारल्याचे कुठेही पुरावे उपलब्ध होत नाही.मग हा ठपका आपल्याला
कसा लागला याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घ्यावे लागेल आणि हे कार्य करीत
असताना त्यांना काय वेदना भोगाव्या लागल्यात याचाही विचार आपण समर्पक पद्धतीत केला
पाहिजे.महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ मध्ये झाला आहे....आणि
मृत्यू त्यांचा २८ नोव्हेंबर १८९० मध्ये झाला आहे.तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा
जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला आहे.त्यांचे वडील रामजी सपकाळ हे इंग्रजी सैन्यात
सुभेदार होते म्हणजे लढवय्या “महार योद्धा” होते हे आपण याठिकाणी लक्षात घेतले
पाहिजे.त्यामुळे बाबासाहेबांचा थेट लढवय्या घराण्यात जन्म झाला आहे.जे “लढवय्ये”
होते ते “अस्पृश्य” होते याठिकाणी आपण हे समजून घेतले पाहिजे.छत्रपती शिवाजी
महाराजांना वैदिक धर्म पंडित “शुद्र” म्हणायचे हेही आपणाला विसरून चालणार
नाही.कारण याठिकाणी मी तुमचे लक्ष वेदू इच्छितो की,वैदिक धर्म पंडितांनी देवगिरीचा राजा रामदेवराव जाधव
याच्या माध्यमातून वर्णाश्रम धर्माची स्थापना केली होती.या धर्मा प्रमाणे
चातुर्वर्ण व्यावस्था प्रस्थापित करण्याचा वैदिक धर्म पंडितांचा डाव होता.मग
चातुवर्ण व्यावस्था म्हणजे काय तर ब्राह्मण – क्षत्रिय – वैश्य – शुद्र होय.परंतु
ही चातुर्वर्ण व्यावस्था प्रस्थापित होऊ शकली नाही...कारण याठिकाणी बौध्द विचार
प्रगल्भ होते.आणि येथील कोणताही राजा हा “जैन” किंवा “बौध्द” धर्मीय उपासक होता.त्यामुळे व्दिवर्ण व्यवस्थेवर वैदिक धर्म
पंडितांना समाधान मानवे लागले होते.मग ही व्दिवर्ण व्यावस्था काय...? तर एक “ब्राह्मण” आणि दुसरा “क्षत्रिय” होय.आणि जो
राजा हा वर्णाश्रम धर्म स्वीकारेल तो “क्षत्रिय” असेल आणि बाकी सगळे “शुद्र” असेल
अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती.शिवरायांचा पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर
वर्णाश्रम व्यावस्था राबविण्याविषयी वैदिक धर्म पंडितांचा जोर छत्रपती शिवाजी
महाराज यांच्यावर वाढू लागला.त्यानी तो राबविण्यास थेट नकार दिल्यामुळे वैदिक धर्म
पंडितांनी त्यांना “राजा” मानण्यास नकार दिला.तेव्हा शिवरायांनी त्यांचा दुसरा
राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत केला.याठिकाणी सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की,छत्रपती शिवाजी महाराज आर्य सनातनी धर्म मानीत
नव्हते.पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेड नावाची संघटन उभारून मराठा
समाजामध्ये असे प्रबोधन केले की,मराठा ही जात
नसून लढवय्या वर्ग आहे आणि तो अठरा अलुतेदार यांचा वर्ग आहे याला मान्यता निवृत्त
न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटलांनीही दिली आहे.त्यामुळे तो स्वराज्यातील “मराठा
योद्धा” आहे.....असे असताना हा वर्ग जात म्हणून का पुढे येत आहे.जसा “मराठा
योध्दा” तसा “महार योध्दा” असे समीकरण असताना अस्पृश्य महार हे समीकरण का तयार होत
आहे...? असा माझा सरळ सरळ प्रश्न
आहे.त्यामुळे इतिहास काळातील “महार योध्दा” हा “बौध्द” उपासक होता.पेशवाई मध्ये
अस्पृश्यतेला मजबूत करण्याचे कार्य जोरात सुरु होते......आणि याला वेग १८०२ पासून
आलेला होता.आणि हा वेग कमी करण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले
होते.आर्य सनातनी वर्णाश्रम धर्माचा प्रचार रोखण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले
यांनी १९ फेब्रुवारी १८६९ मध्ये पहिली छत्रपती शिवाजी माहाराज यांची जयंती उत्सव
सुरु करून २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना
केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्व बाबींचा आभ्यास करून विचार विनिमय करून
बौध्द धर्मीय असलेल्या स्वराज्याच्या रयतेला आणि स्वत:चे कुटुंब बौध्द धर्मीय
असल्याचा अनुभव जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना झाला. तेव्हा ते म्हाणाले की, “हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून
मरणार नाही” मग याठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की,जर पूर्वी आपण बौध्द धर्मीय होतो तर बाबासाहेबांनी “हिंदू”
म्हणून असे उदगार का.....? काढले.तर वैदिक
धर्म पंडितांनी सनातनी धर्मातून स्वामी दयानंद सरस्वती यांच्या गुजरात येथील
टंकारा गावात त्यांच्या आश्रमात महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक
चळवळीचा मारण्यासाठी साल १८७५ मध्ये आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना करून तो
धर्म लादण्याचे आणि इंग्रजी राजवटी मध्ये कागदावर नोंदविण्याचे कार्य “कुळकर्णी” यांनी
जोरात सुरु केले.परंतु त्यांच्या कार्याच्या वेगाला थांबविण्याचे कार्य महात्मा
ज्योतिबा फुले यांनी केली आहे.तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर असे म्हाणाले की, आभ्यासांती माझ्या लक्षात असे आले की, हिंदू धर्माशी माझा व माझ्या पूर्वजांचा काही संबध
नाही. “हिंदू धर्म” मी किंवा माझ्या पूर्वजांनी कधीही स्वीकारलेला नाही.....तो लादलेला
धर्म होता.मी हिंदू धर्माचा अनुयायी होतो अशी कोठेही नोंद नाही.इतिहास काळात हिंदू
धर्म व्यवस्था कधीही स्थापित झालेली नाही.सम्राट अशोकानी कधीही हिंदू धर्म
स्वीकारल्याची नोंद नाही.त्यामुळे लादलेल्या हिंदू धर्मात माझा जन्म जरी झाला असला
तरी मी लादलेल्या धर्मात मरणार नाही.त्यामुळे एकंदरीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
महार हा शब्द कधीही नाकारलेला नाही.इंग्रजी राजवटीमध्ये महार समाजाला सैन्यात घेऊ
नये असा आर्य सनातनी यांनी जोर लावून महार समाजाची सैन्य भरती बंद केली.तेव्हा डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजी राजवटीला असे सुनाविले होते की, “आमच्या पूर्वजांनी शिपाईगिरीच केली आहे” तेव्हा
त्यांनी १९२७ साली भीमा कोरेगावचा महार समाजाच्या शौर्याचा “विजयस्तंभ” दाखविला.आणि
सैन्यात पुन्हा एकदा महार समाजाची सैनिक भरती सुरु झाली...आणि आम्ही स्वराज्यातील “महार
योद्धा” कसे आहोत यासाठी स्वराज्याची राजधानी रायगडाच्या परिसरात महार समाजाला
अस्पृश्य समजणारी मनुस्मृती दहन केली.आणि महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रही
आंदोलनात सात्याग्रहांच्या हातामध्ये स्वराज्याचा भगवा ध्वज देऊन छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजी
राजवटीला जे निवेदन दिले त्या निवेदनाच्या लेटरहेडवर “जय भवानी जय शिवाजी” असे
नमूद केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ मध्ये सैन्यामध्ये “महार बटालियन”
सुरु केली.जशी “मराठा बटालियन” तशी “महार बटालियन” आजही भारतीय सेनेमध्ये आहे हेही
आपणाला विसरून चालता येणार नाही.तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले की, “जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही”
त्यामुळे वाचन फार महत्वाचे आहे.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा “अस्पृश्य”
शब्दाच्या विरोधात होता “महार” या शब्दाच्या विरोधात नाही.त्यामुळे महार या शब्दाच्या
नावाखाली जी पिळवणूक झाली त्या विरुध्द आणि वर्णाश्रम धर्माच्या नावखाली “ब्राह्मण”
व “क्षत्रिय” नावाखाली जी इतर समाजाची शुद्र म्हणून जी पिळवणूक झाली आणि त्यांना सप्तबंदीच्या
नावाखाली अविकसित ठेवण्यात येवून त्यांचे मुलभूत अधिकार जे हिरावून घेण्यात आले
त्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा होता.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
२६ नोव्हेंबर १९४९ साली जे स्वतंत्र भारताला संविधान दिले त्यामध्ये ते स्पष्ट असे
नमूद करतात की, “इंडिया” म्हणजेच “भारत” आहे “हिंदुस्थान”
नव्हे.आणी या देशातील सर्व धर्म समान आहेत असे नमूद करून प्रत्येक भारतीय
नागरिकाला धर्म अनुकरण करण्याचे अधिकार दिले.”शुद्र” समजणाऱ्या जातीला समानता
मिळावी म्हणून आरक्षण देण्यात आले.आजही आपण सर्व जन शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये
समान दर्जा प्राप्त करीत आहे.त्यामुळे आपण इतिहासा काळापासून बौध्द धर्मीय “महार”
होतो आणि आजही बौध्द धर्मीय “महार”
आहेत.स्वराज्यात आपल्याला मानाचा दर्जा प्राप्त होता म्हणून आपण स्वराज्यातील “महार
योध्दा” आहोत.
राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज
No comments:
Post a Comment