विषय असा आहे की,१२ फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती राजाराम महाराज
झाले होते.त्यामुळे संभाजीराजे आता महाराज नव्हते.त्यामुळे राजकीय सत्ता कारणात जो
राजा नसतो त्याचे वैर इतर राजकीय सत्ते बरोबर नसते.त्यामुळे आता औरंगाजेबाची
संभाजीराजेना कैद बेकायदा होती.राज सत्तेचा नियम हे सांगतो की,जो राजा नसतो त्याला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार
नसतो.परंतु वैदिक धर्म पंडितांचा संभाजीराजे यांचे बरोबर वैयक्तिक वैर
होते....कारण ते शाक्त धर्माचे अनुयायी होते.त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार कायस्थ
प्रभू कविकलश यांचे बरोबर स्वराज्यात मोठ्या प्रमाणात सुरु केला होता....वैदिक
धर्म पंडितांना हे रुजणारे नव्हते.स्वराज्यात ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी
गणपती यांना थारा नव्हता.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या
सर्व वैदिक पंडित यांच्या देवांना मानीत असल्याचे कोठेही पुरावे उपलब्ध होता
नाही.खंडोबा – ज्योतिबा – जगदंबा – अंबाबाई अशा आपल्या कुलदैवतांचे पूजक होते.....म्हणजेच
सिंधू संस्कृतीचे पूजक होते.आजही अठरा अलुतेदार यांचे पूजन करीत असतो.त्यामुळे छत्रपती
संभाजी महाराज यांच्या वैदिक धर्म पंडितांना पुन्हा सिंधू संस्कृती उभा राहत असल्याची
कल्पना झाली होती.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संभाजीराजांना जिवंत सोडायचे नाही
आणि त्यांची हत्या आपल्या धार्मिक कार्यात कशी जोडता येईल याचे ते कल्पना करीत
होते.रायगडला आज याबाबतची कल्पना मिळाली होती,संभाजीराजे यांचे औरंगाजेबाने डोळे
फोडून त्यांना अपंग केले आहे.पण आता काय करायचे याबाबत चर्चा मसलत सुरु होत्या.संपूर्ण
रायगड आज शोकाकुल झाला होता....वैदिक धर्म पंडितांची चाल अजून रायगडाच्या लक्षात
आलेली नव्हती.
No comments:
Post a Comment