Friday, February 16, 2018

ऐतिहासिक लाल महालच्या भूमीत माता जिजाऊ यांच्या साक्षीने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी “रायप्पा महार वीरगती दिन” १६ फेब्रुवारी १६८९ घोषित


लाल महालाच्या ऐतिहासिक भूमीत माता जिजाऊ चरणी आत्मक्लेश केल्यानंतर त्याठिकाणी मला असा बोध झाला की,जे मावळे छत्रपती संभाजी महाराज यांचे बरोबर स्वराज्यासाठी लढले त्यांचेसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे मराठा योद्धा महार योद्धा आणि अठरा अलुतेदार यांना शोधून त्यांचा सन्मान केला पाहिजे.इतिहासातील सत्य पाने उघडली पाहिजे त्यासाठी कोण सुखावत आहे आणि कोण दुखावत आहे ते पहायचे नाही.मग तो मोठ्यातील मोठा व्यक्ती असो वा छोट्यातील छोटा व्यक्ती असो जो स्वराज्याच्या गद्दार असेल त्याला रयते समोर उघडे केले पाहिजे.आणि हा संघर्ष खूप मोठा आहे यामध्ये प्राण जाण्याची आणि चरित्र हनन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वेगवेगळ्या प्रकारे स्वराज्याचे गद्दार आजू बाजूला राहून तुमच्या मध्ये शिरून बदनाम करण्याचे षड्यंत्र करू शकतात.अशा मित्र मंडळी पासून सावध राहणे गरजेचे आहे.ते तुमच्या बरोबर राहून तुमच्या लिखणात अडचण निर्माण करू शकतात.तुमच्या चाललेल्या कामात अडथळा निर्माण करू शकतात.मग माध्यम कोणतेही असेल सोशल मिडीया असेल नाहीतर ज्या ठिकाणी तुम्ही कार्य करीत आहेत तेथील लोकांना भ्रमित करून तुमच्या इतिहासाच्या शोधकार्यात बदल करण्याचाही ते प्रयत्न करू शकतात.त्यांना स्वराज्यासाठी माफ करायचे नाही.मग ते तुम्हाला आम्ही खरे वंशज आहोत हे सांगून भ्रमित करू शकतात.त्यांचा खरा इतिहास शोधून तो रयतेसमोर मांडला पाहिजे ते किती खरे सांगतात याचाही आभ्यास केला पाहिजे आणि मगच ते जाहीर केले पाहिजे.नाहीतर उगाच खोटे लोक आम्ही स्वराज्यातील अमुक मावळा आहे असे सांगून तुम्हाला भ्रमित करू शकतात.स्वराज्याच्या कार्यात कोण आपले आणि कोण परके बघायचे नाही.त्यामुळे सत्य शोधल्या नंतर माझ्या टीमला बह्दूरगड येथील खरा इतिहास समोर आला वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबाच्या माध्यमातून संभाजीराजे यांची “धिंड” काढली.ते पाहून त्यांचा बालपणीचा सखा आणि स्वराज्याचा “महार योध्दा” रायप्पा महार त्या औरंगाजेबाच्या फौजेवर तुटून पडला.लढता लढता तो बहादूरगड याठिकाणी वीरगतीला प्राप्त झाला म्हणून सकल मराठी समाजाच्या वतीने १६ फेब्रुवारी १६८९ हा दिवस संघटनेच्या वतीने ऐतिहासिक लाल महालच्या भूमीत माता जिजाऊ यांच्या साक्षीने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी “रायप्पा महार वीरगती दिन” १६ फेब्रुवारी १६८९ घोषित करण्यात आला.



राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज
 

No comments:

Post a Comment