आपण आपल्या शेतीत नव्या प्रयोगातून काही नव नवीन घडवू शकतो असा निर्धार केला तर यशाची व्दारे सदैव उघडी राहतील याच संकल्पनेतून मत्स्य व्यवसाय , मत्स्य शेती करणे , त्याची विक्री व्यवसाय बघणे हे एक आव्हानच आहे. शासनाच्या विविध योजना मत्स्योत्पादनासाठी माशांची उपलब्धता तसेच मोठया प्रमाणात होणारे संशोधन मत्स्यबीजांची उपलब्धता या कारणांने या क्षेत्रात वाढ होत आहे. त्या विविध मत्स्य बीज संस्था मत्स्य बीज पुरविते त्यामुळे ही शेती शक्य झाली आहे. यासाठी माशांचे संगोपन , संवर्धन या तंत्रज्ञानाची योग्य व सखोल माहिती असावी लागते.
मत्स्यशेती करताना मुबलक पाणी, साठवून ठेवणारी अशी उत्तम जमीन , मत्स्य बीजांची उपलब्धता या तीन गोष्टी आवश्यक आहे. माशांच्या कोंळबीच्या योग्य जातीची निवडही तेवढीच महत्वाची असते. माशांचे गाढे अभ्यासक, संशोधक, यांचे मते मानवी शरीराची योग्य वाढ होण्यासाठी प्राणीज प्रथीनांचा योग्य पुरवठा अत्यंत अल्प खर्चात करण्याच्या आवश्यक आहे.
नाशिक मध्ये चणकेश्वरी आदिवासी सहकारी संस्था ही मत्स्य व्यवसाय करीत आहे. सहकारी तत्वावर तलाव भाडयाने घेवुन ६६५ हेक्टरवर हे मत्स्य पालन करत आहेत. यासाठी त्यांना शासनाची मदत मिळते. या तलावात जवळपास २० लाख कोळंबी ,१५ लाख मत्स्यस बीज टकतात. राऊ करला, कोबडा, तसेच लोकल व्यहारायटीमध्ये मरळ, कटयारना पाबदा, असे मासे पाळतात . यासाठी दरवर्षी मार्च महिन्यात मत्स्यबीज खरेदी करुन त्यांचे संगोपन करतात. या तलावात मत्स्य बीज निर्मिती , मासे पालन तसेच इथूनच विक्रीही करता येते.
तसेच जवळपास ५०० लोक एका वेळेस येथे काम करतात. ४०० ते ५०० रुपये रोज त्यांना मिळतो. यामुळे जिल्हयातील अनेक लोकांना येथे रोजगार उपलब्ध झाला आहे. जवळ जवळ ५०० कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न यामुळे सुटलाय.
मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त. यु. पी. बनसोड यांनी याबाबत सांगितले की, आदिवासींसाठी सहकार तत्त्वावर चालवलेली ही संस्था आज नाशिक जिल्हयात उत्कृष्ट काम करते आहे. मत्स्य व्यवसाय हा नाशिक जिल्हयात चांगला विकसित होत आहे. जिल्हयात छोटे-मोठे ३००-४०० शेत तलाव निवडताना काय काळजी घ्यावी माहिती सांगताना ते म्हणाले की, ब-याच ठिकाणी पडिक जमीन किंवा चोपण जमिन असतांना ज्यात कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही अशा जमिनीत तलाव तयार करुन माशांचे संगोपन चांगल्या प्रकारे करता येते.. काही बेरोजगार युवकांनी छोटे तलाव तयार करुन तेथे माशांचे संगोपन चांगल्या प्रकारे करता येते. काही बेरोजगार युवकानी छोटे तलाव तयार करुन तेथे मासे, झिंगे यांचे संगोपन करुन त्यावर रोजगार मिळविला आहे. नाशिक जिल्हयाच्या स्थानिक बाजारात माश्यांना चांगली मागणी आहे. मुंबई सारख्या ठिकाणीही माल पाठवून त्यातुन सुध्दा नफा मिळतो. याप्रमाणे नाशिक जिल्हयात मत्स्य शेती हा व्यवसाय यशस्वी झाला आहे.
No comments:
Post a Comment