Saturday, January 26, 2019

वंचित बहुजन आघाडीला १२ जागा न दिल्यास कॉंग्रेसचा होणार धुव्वा….! आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदार संघातून होणार विजयी…! राजेश खडके सकल मराठी समाज


  महाराष्ट्रातील कॉंग्रेसची वाढलेली घमेंड उतरविण्याची जबाबदारी ही आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे हे आपण सर्वानी लक्षात घेतले पाहिजे.त्याचे कारण असे की,जातीयवादी चेहरा म्हणून कॉंग्रेस आता आपल्या समोर आलेली आहे.इथला दलित-मुस्लीम-ओबीसी समाज संपविण्याचा घाट या उभ्या महाराष्ट्रामध्ये घातला गेलेला आहे.भाजप आणि कॉंग्रेस या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामध्ये कॉंग्रेस म्हणजे छापा तर भाजपा हे काटा आहे या दोघांनी प्रादेशिक पक्ष संपविण्यासाठी आणि संविधान बदलाण्यासाठीचे कार्य सुरु केले आहे.तसे नसते तर वंचित बहुजन आघाडीचा घटक एमआयएम मधून वगळल्याशिवाय आम्ही आघाडीची बोलणी करणार नाही अशी अट कॉंग्रेसने प्रकाश आंबेडकर यांचे समोर ठेवली होती परंतु ही अट साफपणे आंबेडकर यांनी नाकरली.परंतु नांदेडच्या सभेत ओवीसी यांनी सांगितले की,कॉंग्रेसने प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान ठेवल्यास आमचा पक्ष महाराष्ट्रात लोकसभेचा एकही उमेदवार उभा करणार नाहीत.परंतु कॉंग्रेस प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करताना दिसत नाही.ओबीसी नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला आहे.इतर घटक पक्ष आंबेडकर यांचा सन्मान करीत आहे….परंतु कॉंग्रेस सन्मान करताना दिसत नाहीत.ज्या नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची लाखोची सभा झाली त्याठीकाणी वंचित बहुजन आघाडीला आव्हान म्हणून नांदेड लोकसभेमधून राहुल गांधी निवडणूक लढविणार असे आव्हान देण्यात आले त्यामुळे कॉंग्रेसला घमेंडी आलेली आहे ती आपण सर्वानी पुढे येऊन उतरविली पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.कॉंग्रेस हे विसरलेली आहे की,हा महाराष्ट्र गांधींचा नसून माता जिजाऊ,छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे.त्यामुळे या महाराष्ट्रात कितीही गांधी आले तरी ते टिकणार नाही.आणि वंचितांचे नेतृत्व याच महापुरुषांनी केले आहे त्यामुळे या उभ्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचाच विजय होणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आजचे राजकीय समीकरण सांगते की,उद्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर असतील यात काही कोणाचे दुमत असयाचे कारण नाही.यातच लक्ष्मण माने यांनी सांगितले आहे की,विधानसभेसाठीच्या २८८ पैकी २५ जागा या धनगर समाजासाठी आणि १०० जागा ह्या भटक्या विमुक्त जातीसाठी वंचित बहुजन आघाडीत आरक्षित राहतील.आणि त्याची जर खरी मोठ बांधायची असेल तर प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदार संघातून निवडणूक लढविली पाहिजे.एक अकोला मतदार संघातून तर दोन सोलापूर मतदार संघातून त्यामुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रामाणात वाढतील असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे...आणि त्यामुळे वंचितांची विधानसभेत जाण्यासाठीची दरवाजे मोठ्या प्रमाणात उघडतील असेही आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

No comments:

Post a Comment