Monday, January 21, 2019

ओवीसी यांच्या कुर्बानीचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल काय…? कॉंग्रेस एक निचपत पडलेला अजगर….! राजेश खडके सकल मराठी समाज


                          महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे लपलेले विचार आणि समाधी शोधून त्यांनी लिहिलेले स्वराज्याचे संविधान आपल्या पर्यंत आणून सोडले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे समतावादी आहे याचे आपल्याला दर्शन घडविण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ मध्ये केली आहे.त्यानंतर बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी १८८४ मध्ये हिंदू महासभेची स्थापना केली आणि त्या हिंदू महासभेचे पुढे कॉंग्रेसमध्ये रुपांतर झालेले आहे.१९१५ मध्ये बळीराम हेगडेवार आणि १९१६ मध्ये मोहन करमचंद गांधी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.टिळकांच्या १९२० मध्ये मृत्यू झालेनंतर कॉंग्रेसची सूत्रे गांधी यांनी आपल्या हातात घेतली होती.महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय जीवनाला सुरुवात केली होती.यासाठी त्यानी समता हे प्रमुख ध्येय ठेऊन २४ सप्टेंबर १९२४ साली समता सैनिक दल सुरु करून १९२७ ला समतावादी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेऊन जातीयवादी पेशवाईचे अंताचे ठिकाण भीमा कोरेगाव येथील महार शूर वीरांना अभिवादन करून महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मानव धर्माला अडचण असणारी मनुस्मृती रायगडच्या परिसरात दहन करून समतावादी लढ्याला सुरुवात केली.ब्रिटीश राजवटीने भारतला स्वतंत्र देण्याची घोषणा करून सायमन कमिशनची स्थापन करून गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.असूउद्दीन ओवीसी यांचे पूर्वज यांनी १९२७ साली एमआयएमची स्थापना केली होती.या गोलमेज परिषदेला मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्यामुळे कॉंग्रेस गांधी यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून विरोध करून त्यांचेवर हल्ले करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी अमान्य करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात वातावरण तयार करून त्यांना मजबूर करून पुणे करार यशस्वी करून घेतला.त्यानंतर एमआयएमने १९३७ ला मुस्लीम धर्मासाठी शरयत नावाचा अकबर यांचा धार्मिक कायदा जतन करण्यास सुरुवात केली.त्यानंतर भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचे संविधान लिहिण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुढे आले आणि २६ नोव्हेंबर १९४९ ला भारत देशास प्रधान केले आणि २६ जानेवारी १९५० ते लागू झाले.१९५२ ला हिंदू कोड्वील आणले याला यांचा विरोध होता.१९५६ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायी यांचे सोबत बौध्द धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचे महापरिनिर्वाण झाले.वास्तविक पहाता हे सगळं होत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेस हे जळते घर हे आपल्याला सांगून गेले आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस राजकारणात सक्रीय होऊ नये याची त्यांनी तजवीज करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेल्या चळवळीला वेगळी दिशा देऊन चळवळ एकसंघ एका नेतृत्वाखाली राहू नये यासाठी वारसांना सक्रीय राजकारणातून बाहेर काढण्यासाठी रिपब्लिकन नावाने अनेक गट निर्माण करून वेगवेगळ्या प्रकारे या निचपत पडलेल्या अजगराने ही प्रामाणिक चळवळ गिळंकृत केली होती.साल १९८४ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर राजकारणात सक्रीय झाले.भीमा कोरेगावच्या २०० वर्षापुर्ती दिनांनिमित्त सत्य इतिहास बाहेर आल्याने त्याठिकाणी दहशत माजविण्यासाठी हल्ला करण्यात आला.आणि हाच विषय प्रकाश आंबेडकर यांनी उचलून धरला आणि संपूर्ण देशामध्ये याचे लोन पसरले आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी प्रकाश आंबेडकर प्रकाश झोतात आले.भीमा कोरेगाव अलुतेदार आणि बलुतेदार यांनी लढलेला इतिहास सांगून त्यांनाच आज वंचित ठेवले असल्याची घोषणा करून यांना न्याय देण्यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून इथला अलुतेदार आणि बलुतेदार उभा करून कॉंग्रेसकडे लोकसभेच्या १२ जागांचा प्रस्ताव सादर करून आपली भूमिका जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली.परंतु कॉंग्रेस हाअजगर असल्यामुळे तो वेळेची वाट बघत बसला आणि पाच राज्यातील जशा निवडणुकीचा निकाल लागला तो तयार झाला आणि त्याने पहिला फुसकारा सोडला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीतील एमआयएम या पक्षावर आणि त्याने सांगितले की,जोपर्यंत एमआयएम वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे तो पर्यंत आंबेडकर यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करता येणार नाही.निवडणुकांची वेळ जवळ येऊ लागली वंचित बहुजन आघाडीच्या मंचकावरून ओवीसी गायब झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या मात्र आंबेडकर एक एक उमेदवार जाहीर करीत चालले होते..शेवटी नांदेड येथील सभेत ओवीसी हजर झाले आणि त्यांनी स्वत:ची कुर्बानी देत असे सांगितले की,जर प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी कॉंग्रसला माझी अडचण होत असेल तर तर त्यांचा सन्मान होण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे.त्यामुळे या निचपात पडलेल्या काँग्रेसी अजगराने असूउद्दीन ओवीसी यांचेवर हल्ला करून त्यांना आपल्या विळख्यात जखडून ठेवला आहे.त्यामुळे एकंदरीत घडामोडी पहाता सकल मराठी समाजाला अस प्रश्न पडला आहे की,ओवीसी यांच्या कुर्बानीचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार आहे काय….?
      

No comments:

Post a Comment