Friday, January 25, 2019
आज प्रजासाताक दिवस....आठवण होते मला शिवरायांचे संविधान दिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांची...! राजेश खडके सकल मराठी समाज
२६ जानेवारी आली की,मला माझ्या हक्काची आणि शिवरायांच्या स्वराज्याचे आठवण होते….आणि ही आठवण होते ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून लिहिलेल्या संविधानामुळे आणि याच संविधानामुळे मी स्वतंत्र असल्याची मला जाण होते.मला हे माहित नाही की,डॉ बाबासाहेब आंबेडकर कोण कसे बघते...आणि शिवराय यांना कोण कसे बघते.पण मी एक याठिकाणी नक्की सांगेन हे संविधान स्वतंत्र भारताला प्रदान होत होते तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसेदेत केलेल्या भाषणात म्हणाले होते की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य मला समजले म्हणून मी संविधान लिहू शकलो आहे.बाबासाहेबांचे हे म्हणणे सत्य आहे..त्याचे कारण असे आहे की,स्वतंत्र भारताचे संविधान लिहिण्याची धमक बाबासाहेब सोडले तर कोणातही नव्हती कारण स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकासाठी संविधान लिहायचे होते..कोण काय लिहिणार…? असा प्रश्न होता मी म्हणत नाही या देशात दुसरे कोणी तज्ञ नव्हते म्हणून….होते परंतु त्यांचेवर वैदिक धर्म पंडितांचा पगडा होता.हजारो वर्षापासून त्यांनी मनूचा कायदा वापरला होता….परंतु छत्रपती शिवरायांनी हा मनूचा कायदा मोडीत काढून स्वराज्याच्या रयतेसाठी संविधान बनविले होते...त्यामुळे वैदिक धर्म पंडित वेडे झाले होते..रागविले होते….आणि यातच छत्रपती शंभूराजे यांनी याच संविधानाचे संरक्षण करण्यासाठी वैदिक धर्म पंडितांना हत्तीच्या पायी देऊन मृत्यू दंडाची शिक्षा दिलेली आहे.नंतरच्या काळात याच वैदिक धर्म पंडित यांनी दुश्मना बरोबर संधान बांधून हे साविधानिकी स्वराज्य बुडविले असल्याचे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेले आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिवाय आपल्याला म्हणजे भारतातील नागरिकांना स्वतंत्र मिळणे कठीण होते...त्यामुळे या फुलेंचे आपण उपकार आपण कधीही विसरू शकत नाही...आणि फेडू शकत नाही.बरेच लोक आपल्याला छत्रपती शिवराय यांच्या ३२ मन सोन्याच्या सिहासानाची आठवण करून देतात...मात्र हेच स्वराज्यासाठी तयार केलेल्या संविधानाची आठवण करून देत नाही.त्याची प्रत आज कोठे आहे हे कोणी सांगत नाही.मात्र त्यांच्या संविधानाची प्रत कोल्हापुरचे छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिली होती आणि त्याची साक्ष आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्नेह संबधातून मिळते...दुसरी साक्ष २४ सप्टेंबर १९२४ मध्ये स्थापन केलेल्या समता सैनिक दल..तिसरी साक्ष भीमा कोरेगाचा येथील विजयस्तंभ देतो...आणि चौथी साक्ष रायगडाच्या परिसरात जाळलेली मनुस्मृती देत आहे.अशा बऱ्याच प्रत्यक्ष घडलेल्या घटना आणि बाब आहेत.परंतु हे आपण कशी कोणाला ठासून सांगत नाही ही आपली शोकांतिका आहे...भीती आहे.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांच्या वारसांनी याच संविधानाच्या विरोधात एक मोठा वर्ग तयार केलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे...आणि तो वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.त्यामुळे आपल्या सर्वावर मोठी जाबाबदारी आहे की,डॉ बाबासाहेब आंबेडकर दिलेले हे आपल्या हक्काचे संविधान याचे संरक्षण करायचे आहे...म्हणून आज प्रजासाताक दिवस आहे....त्यामुळे आठवण मला शिवरायांचे संविधान दिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment