Tuesday, January 22, 2019
साहेब दलित-मुस्लिम-ओबीसीना गिळंकृत करणाऱ्या काँग्रेसी अजगरला मारून टाका….आणि वंचितांचे भले करा…! राजेश खडके सकल मराठी समाज
इतिहास साक्षीला आहे काँग्रेसी अजगराने नेहमी दलित-मुस्लिम-ओबीसीना भाजपाची भीती दाखवून नेहमी गिळंकृत करीत आलेला आहे.या अजगराने नेहमी उभारत्या चळवळी गिळंकृत करून इथल्या सामन्य माणसाला संपविण्याचे कटकारस्थान तो करीत आलेला आहे.भीमा कोरेगावच्या हल्ल्या संदर्भात कॉंग्रेसने गेल्या वर्षभरात कधीही आ अक्षर सुध्दा काढलेले नाही.तुम्ही तो लढा योग्य रीतीने हाताळून इथली भयानक होणारी परिस्थिती हाताबाहेर जाऊन दिली नाही.मराठा मूक मोर्चाच्या माध्यमातून पुढचा धोका पाहून प्रतीमोर्चे होऊ दिले नाहीत.हिंदू-मुस्लिम दंगल रोखण्यास तुमचा मोठा पुढाकार आहे.इथला अलुतेदार आणि बलुतेदार यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या न्याय हक्काची लढाई म्हणून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे.त्यामुळे विश्वासाने इथला वंचित घटक आपल्या नेतृत्वाखाली एकवटला आहे.त्यातच तुम्ही मुस्लीम समजाच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या एमआयएम पक्षाची हातमिळवणी करून जी समीकरणे आखली आहेत ती समीकरणे अतिशय योग्य आहेत.यातच आपण कॉंग्रेसकडे जो १२ जागासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे तो त्यांच्यासाठीचा पराभूत असलेल्या जागा आहेत आणि त्या जागा वंचित बहुजन आघाडीला देणे संबधित त्यांना काहीच अडचण नाही.परंतु पूर्वीपासून पुरोगामीपणाचा ढोंग करून नेहमी दलित-मुस्लिम समाजाला स्वत:ची वोट बँक म्हणून स्वत:च्या फायद्यासाठी वापर करीत आलेली आहे.परंतु वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाला आणि आघाडीमध्ये सामील होणेसंदर्भात त्यांनी आपल्या मार्फत एमआयएमला गिळंकृत करण्याचा डाव टाकलेला होता.परंतु आपण आणि ओवीसी यांनी या दलित-मुस्लीम विरोधी कॉंग्रेसची खेळी ओळखून त्यांना एक चांगल्या प्रकारे राजकीय रणनीती दाखवून ओवीसी साहेबानी वंचित घटकासाठी आणि प्रकाश आंबेडकर म्हणून त्यांच्यासाठीची कुर्बानी देण्यास मागेपुढे न पहात लाखो लोकासमोर “नारे तकदीर अल्ला हु अकबर" अशी घोषणा देऊन ओवीसी यांनी सांगितले आहे की,इथली कॉंग्रेस ही मुस्लिम समाजाचे भले बघत नाही.त्यामुळे एकदिलाने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम एकवटले पाहिजे असे असताना देखील कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव मान्य करायला तयार आणि केवळ दलितांची दिशाभूल करण्यासाठी वारंवार सांगतात की,अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना खासदार करायचे आहे आता त्यांना खासदार इथला वंचित घटक करणार आहे.परंतु नांदेडच्या सभेने इथला दलित-मुस्लिम समाज कॉंग्रेसपासून दूर गेल्याचे लक्षात येताच कॉंग्रेसकडून राहुल गांधी नांदेड मधून निवडणूक लढविणार असे म्हणून गांधी कार्ड चालविण्यात आले आहे.यातच प्रकाश आंबेडकर यांना रोखण्यासाठी कॉंग्रेसने जुनी चाल खेळली आहे आणि ती म्हणजे इतर दलित संघटना आणि पक्ष एकत्र करून त्यांना वंचित बहुजन आघाडी विरोधात प्रचार करून आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ कशी होईल याची ते आखणी करीत आहे.आजची परिस्थिती पहाता अशा कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठी आणि वंचितांचे भले करण्यासाठी साहेब दलित-मुस्लिम-ओबीसीना गिळंकृत करणाऱ्या काँग्रेसी अजगरला मारून टाकले पाहिजे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे त्यामुळे आता कॉंग्रेस बरोबर आघाडी नको असा जन सामन्यांचा आवाज आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
होय खरंच आहे. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे.
ReplyDelete