Tuesday, January 22, 2019
EVM मशिन केली गोपीनाथ मुंडे यांची हत्या….त्यांना भगवानबाबा शिक्षा करेल काय…? माझे मत माझी मालमत्ता आणि तिला चोरणारा गुन्हेगारच…! राजेश खडके सकल मराठी समाज
माझे मत माझी मालमत्ता आणि तिला चोरणारा गुन्हेगारच…! असे मत आमच्या सकल मराठी समाजाचे आहे.गोपीनाथ मुंडे हे भगवानगडच्या भगवानबाबा यांना खूप मानीत होते.अतिशय सरळ आणि प्रामाणिक असा दिलेल्या शब्दाला जागणारा नेता होता.त्यांची ओळख फक्त वंजारी समाजातच नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होती.ज्याठिकाणी ते उभे राहयचे त्या ठिकाणी गर्दी असायची त्यामुळे त्यांची लोकनेते म्हणून ओळख निर्माण झालेली होती आणि त्यांना प्रत्येक पक्षात मान सन्मान होता हे सर्वश्रुत आहे.अचानक देशात माहिती पसरते की,गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू हार्ट अॅटयक ने झाल्याची खबर पोहती न पोहते तोच त्यांचे पोस्टमार्टम करून बॉडी तयार करून ठेवली होती.दिल्ली ही सामाजिक आणि बहुजन व्यक्तीसाठी घातक आहे हे आता जवळ जवळ सगळ्यांनाच माहित झालेले आहे.गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू सहज होऊ शकत नाही याची कल्पना सर्वांना आल्यामुळे मोठ्या प्रमाणात एक आवाज उठविला गेला होता.परंतु व्यावस्था इतकी भयानक आहे की,हा झालेला मृत्यू आजही संश्यास्पद असल्याची भावना वारंवार उठत आहे.परंतु जो पर्यंत घरचे लोक तक्रार करीत नाही काही बोलत नाही या आरोपाला गंभीर स्वरूप प्राप्त होत नाही असे कायदा सांगतो आणि त्यात पंकजा मुंडे काहीच बोलत नाही.यातच लंडन मध्ये EVM मशिन हॅकर सय्यद शुजा याने व्हिडीओ पत्रकार परिषदेमध्ये असा गंभीर आरोप केला आहे की,सद्याचे जे मोदी सरकार निवडून आलेले आहे ते जनतेच्या चोरलेल्या मतावर निवडून आलेली आहे.आणि ह्या चोरीमध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग होता आणि याची कल्पना गोपीनाथ मुंडे यांना झाली असल्यामुळे त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते त्यामुळे त्यांची हत्या होणे गरजेचे होते म्हणून त्यांची हत्या झालेली आहे त्यामुळे हा अपघात नसून मत चोरी प्रकरण दडपण्यासाठी केलेली हत्याच आहे अशी साक्ष या सय्यद शुजाने पत्रकार परिषद घेऊन केली आहे.त्यामुळे भारत सरकारने या सय्यद शुजाला अटक करून त्याला ताब्यात घेऊन प्रथक EVM मशिन हॅक प्रकरणी गुन्हा नोंद करून गोपीनाथ मुंडे यांच्या हत्ये प्रकरणी साक्षीदार करून त्याची एफआयआर नोंद करून तपास सुरु करावा अशी सकल मराठी समाजाची मागणी करीत वंजारी समाजाला अशी भावनिक साद घालीत आहे की,या समाजाला गोपीनाथ मुंडे पिता समान होते आणि त्यांची भगवानबाबा जवळ श्रध्दा होती त्यामुळे हा वंजारी समाज एक होऊन भगवानबाबाकडे साद घालेल काय…? आणि त्यांची श्रद्धा म्हणून त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा करेल काय…?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment