Thursday, January 17, 2019

कॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीला तीन जागा न दिल्यास महाराष्ट्रातून होणार कॉंग्रेसचा सुपडा साफ....! राजेश खडके सकल मराठी समाज




               बरेच दिवसापासून ओवीसी येणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि त्यांची बऱ्याच सभांना गैरहजेरी स्पष्टपणे दिसत होती.परंतु नांदेडच्या सभेत ओवीसी यांची हजेरीमुळे कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे हे मात्र निश्चित आहे.नेमका बाळासाहेबांचा प्रस्ताव काय आहे त्याचा मागसुम कालच्या नांदेड येथे झालेल्या सभेमध्ये दिसून आला आहे. बाळासाहेबांचे नेमके राजकारण काय आहे याचे अवलोकन कोणाला काय होत नव्हते ते काल झाले आहे.बाळासाहेबानी आता वंचित बहुजन आघाडीमध्ये इतरांना बरोबर घ्यायचे हे टाळलेले दिसत आहे.कारण छगन भुजबळ यांना जामीन मिळविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यामुळे माळी समाजात त्यांची प्रतिमा उंचाविली गेल्याचे स्पष्टपणे जाणविले गेले आणि त्याचा स्पष्टपणा जाणवला तो भुजबळ यांची भेट घेऊन नाशिकमध्ये सभा झाल्यावर बाळासाहेबांनी भुजबळ यांना पाठींबा दिला आहे.बाळासाहेबांनी भुजबळांना पाठींबा दिल्यावर राष्ट्रवादी पक्षाकडून कोणीच काही बोलले नाही म्हणजे जाहीर समर्थनही केले नाही आणि विरोधही केला नाही.परंतु कोणाला पाठींबा द्यायचा आणि कोणाला विरोध करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.या पाठींब्यामुळे कॉंग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे.यातच मराठा नेत्यांच्या भेटी घेऊन बाळासाहेबांची बहुजन रणनीती मजबूत झालेली आहे.एकंदरीत वंचित बहुजन आघाडीच्या सभा आणि जाहीर होत असलेले उमेदवार यांचे अवलोकन केल्यास ज्या मतदार संघातून बाळासाहेबांनी उमेदवार जाहीर केले आहेत ते मतदार संघ कॉंग्रेस महाआघाडीकडे मागित आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बाळासाहेबांची ही एक दबावतंत्राची राजकीय रणनीती आहे हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.मग बाळसाहेब ही राजकीय रणनीती का खेळत आहेत तर त्यांना लोकसभेच्या तीन जागा हव्या आहेत.एक जागा अकोला मतदार संघ.दुसरी जागा औरंगाबाद मतदार संघ आणि तिसरी जागा मुंबई मतदार संघ अशा तीन जागेंचा प्रस्ताव असल्यामुळे या त्यांच्या प्रस्तावाला ओवीसी यांनी नांदेड मध्ये केलेल्या भाषणातून समर्थनच केले आहे.ओवीसी यांचे भाषण बाळासाहेबांच्या प्रस्तावाला भावनिक समर्थनच होते कारण आजची वेळ पुन्हा येणार नाही.त्यामुळे कॉंग्रेसचे महराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की,आम्हाला अकोल्यातून बाळासाहेबांना निवडून आणायचे आहे.याचा अर्थ कॉंग्रेसच्या लक्षात आले आहे की,सध्या तरी बाळासाहेबांना जाहीर डावलणे योग्य नाही.मुस्लीम मतदार हा कॉंग्रेसचा पारंपारिक मतदार असल्यामुळे त्यांना एमआयएम पक्षाची अडचण होत आहे.त्यातच ओवीसी म्हणाले जर कॉंग्रसला माझी अडचण होत असेल तर मी महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविणार नाही.त्यामुळे बाळासाहेबांचा प्रस्ताव तुम्ही मान्य करा असाच त्यांचा एकंदरीत सूर होता.त्यामुळे कॉंग्रेसची प्रमुख अडचण काल नांदेडमध्ये ओवीसी यांनी दूर केली आहे.त्यामुळे कॉंग्रेसला आता बाळासाहेबांचा प्रस्ताव मान्य केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.जर कॉंग्रेसने प्रस्ताव नाकारल्यास कॉंग्रेसच्या उमेदवार यांच्या विरुध्द वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहतील आणि महाराष्ट्रातून कॉंग्रेसचा सुपडा साफ होईल.

No comments:

Post a Comment