Saturday, January 19, 2019

असुउद्दीन ओवीसी यांचे वंचित बहुजन आघाडीच्या मंचका वरील अखेरची भाषण...? कॉंग्रेस असे का वागतय....आणि आम्ही कॉंग्रेसची वाट का बघतोय...! राजेश खडके सकल मराठी समाज


        

                          नारे तकदीर अल्ला हु अकबर....! असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव मान्य करा आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करा...माझे मोठे भाऊ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी मी कॉंग्रेस बरोबर तडजोड करायला तयार आहे.असे म्हणत संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यासाठी मी कुर्बानी द्यायला तयार आहे असे आवाहन उपस्थित लोका समोर ओवीसी यांनी नांदेडमध्ये केले आहे.आमच्या सकल मराठी समाजाला असा प्रश्न पडला आहे की,संपूर्ण राज्यातील आदीवासी-धनगर-माळी-दलित-मुस्लीम-मराठा समाज आज बाळसाहेब आंबेडकर यांच्या सभेमध्ये उतरला आहे.असे असताना वंचित बहुजन आघाडीला कॉंग्रेसची वाट का....? बघावी लागत आहे....कॉंग्रेस असे का....? वागत आहे.या प्रश्नाचे उत्तर शोधताना आमच्या सकल मराठी समाजाच्या अशा लक्षात आले आहे की,सध्या संपूर्ण महाराष्ट्रात इतर दलित नेत्यांना इथल्या चळवळीने स्पष्टपणे नाकरले आहे.त्यामुळे सध्याच्या परीस्थितीचा फायदा घेऊन एक नवी समीकरणे उभारण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करीत असताना दिसत आहे....आणि हा बाळासाहेबांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे जाणकार यांचे म्हणणे आहे...त्यांचे असे म्हणणे आहे की,असुउद्दीन ओवीसी मातबबर चाणाक्ष असे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या माध्यमातून देशातील राजकीय रणनीती प्रकाश आंबेडकर यांची ओळखली आहे...आणि असा नेता भविष्यात आपल्या बरोबर असणे फार गरजेचे आहे असे त्यांना वाटत आहे.जर भविष्यात प्रकाश आंबेडकर आपल्या बरोबर असतील तर पुढची आपली राजकीय वाटचाल चांगली असेल...नाहीतर भविष्यातील राजकारण आपल्याला अंधारात चाचपडावे लागेल आणि ते आपल्यासाठी योग्य नाही.या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन सभामध्ये सतत गैरहजर असणारे ओवीसी यांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या मंचकावर उपस्थित राहून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आपला प्रामाणिकपणा दर्शविलेला आहे.त्यांनी भाषण करीत असताना आपल्या मुस्लीम समाजाचा कट्टरवाद जतन करण्यासाठी "नारे तकदीर अल्ला हु अकबर" अशा घोषणा देऊन आम्ही कट्टरवादी हिंदुच्या विरोधात असून अशी भूमिका प्रस्थापित करून इथला मुसलमान हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंचकावरून "जय भीम"चा नारा द्यायला ते विसरले नाहीत. एकंदरीत पहाता असूउद्दीन ओवीसी यांनी लोकसभेसाठीचे हे शेवटचे भाषण केले असल्याचे जाणकार म्हणत आहेत.त्याचे कारण असे आहे की,त्यांनी असे सांगितले की,बाळासाहेब यांची मागणी पूर्ण करा मी महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविणार नाही याचा अर्थ  ओवीसी यांना जे सांगायचे आहे ते त्यांनी सांगितलेले आहे.त्यामुळे पुढील सभेत ते उपस्थित राहतील काय...? असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे.त्यामुळे कॉंग्रेसला आता नेमके बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण समजले असून त्याप्रमाणे ते पुढील राजकारणाची आखणी करित आहे  हे मात्र निश्चित...!

2 comments:

  1. कदाचीत तुम्ही नांदेडमधील ओविशीचे पुर्ण भाषन नाही ऐकले म्हणुनच तुम्ही शेवटचा भाषन आसा उल्लेख करताय कृपया दुसर्यांच्या (दलाल) निकसावरुन लेख लिहु नका..

    ReplyDelete
  2. असुऊद्दीन अवैसी यांनी कॉग्रेस ला चेतावनी दिली की तुम्हाला जर मी बिजेपी ची बी टीम वाटत असेल तर मागिल तेलंगना मध्ये बिजेपी आनी कॉग्रेस ह्या दोघांनाही तेलंगना मध्ये तेथील जनतेने स्विकारले नाही. पन महाराष्ट्रात पुरोगामी मी तुम्हाला म्हनजेच कॉग्रेस यांना वाटत नसेल तर कॉग्रेस नी बाळासाहेब आंबेडकर यांना स्वाभीमानाने सिटा द्या सन्मान द्या. मी कॉग्रेसच्या कोनत्याही मंचावर भाषन देनार नाही. त्यांनी मुस्लिम दलित व बहुजन आंबेडकरांना साथ द्या. अशी घोषना केली. त्यांनी कुठेही अस म्हटल नाही. की बाळासाहेब आंबेडकर यांची साथ देनार नाही म्हनुन

    ReplyDelete