Thursday, January 24, 2019
प्रकाश आंबेडकर यांचा अखेर….कॉंग्रेसला दणका १२ जागा द्या अन्यथा स्वबळावर लढल्यास १७ जागेवर विजयी होऊ…! राजेश खडके सकल मराठी समाज
सध्याचे महाराष्ट्रातील वातवरण पहाता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी मास्टर स्ट्रोक दिल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.त्याचे कारण असे की,गेल्या वर्ष भरापासून प्रकाश आंबेडकर अहोरात्र कष्ट करून या महाराष्ट्रातील एक एक वंचित घटक जोडताना दिसत आहेत.एकंदरीत पहाता मराठा मूक मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी शिवारायंचा मराठा जोडला आहे आणि याचे फलित लवकरच आपल्याला पाहयला मिळणार आहे.भीमा कोरेगावच्या माध्यामतून त्यांनी अलुतेदार आणि बलुतेदार आपल्याकडे वळविल्याचे चित्र २०१९ च्या भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ येथे पहायला मिळाले आहे.छगन भुजबळांच्या बाबतीत घेतलेली भूमिका पहाता माळी समाज जुडलेला दिसत आहे.ओवीसी यांच्या माध्यमातून इथला मुस्लीम समाज जुडलेला दिसत आहे.धनगर ,आदिवासी इत्यादी समाज जुडलेला दिसत आहे.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी संसदीय राजकारणाला लागणारी राजकीय समीकरणे जोडली आहेत.त्यामुळे मतांची टक्केवारी पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीची वाढलेली दिसत आहे आणि त्यातच शिवसेनेची होणारी राजकीय पिचेहाट पहाता तसेच भाजपची संपूर्ण खेळी हि जनते समोर उघडी पडलेली आहे.तसेच नुसते संविधान आम्ही वाचविणार आहोत असे म्हणून संविधानच संपविण्यास निघालेली कॉंग्रेस आता लोकासमोर आलेली आहे.रिपब्लिकन घटक पक्षाच्या नेत्यांची लाचारी आता जनतेसमोर आलेली आहे त्यामुळे कॉंग्रेसने कितीही यांचे माध्यमातून डाव टाकायचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही असे दिसून येते.त्यामुळे विदर्भ ,खानदेश तसेच मराठवाडा येथील जनता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्याचे चिन्ह दिसत आहे.त्यामुळे कॉंग्रेसकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सादर केलेला १२ जागांचा प्रस्ताव योग्य आहे आणि तो प्रस्ताव कॉंग्रेसने मान्य केल्यास त्यांचा फायदा होणार आहे.त्यामुळे जे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी पक्षश्रेष्ठी यांचेकडे साकडे घातले आहे की,कोणत्याही परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घ्यावे.परंतु कॉंग्रेस पुढे असे आव्हान आहे की,१२ जागांचा प्रस्ताव कसा मान्य करायचा..? त्यामुळे नांदेड मधून राहुल गांधी यांची भीती दाखविण्याचा आणि राष्ट्रीय स्तरावर प्रियांका गांधी यांची भीती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु आता मतदार हा हुशार झालेला आहे त्यामुळे अशा गोष्टीना तो घाबणार नाही तो एकदिलाने आणि एकमताने प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहील असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
ReplyDeleteअगदी बरोबर आहे. आता फक्त वंचित बहुजन आघाडी जयभीम �� जय शिवराय
ReplyDeleteआता फक्त भिमाच रक्त
ReplyDeleteजय भीम
जय मीम
जय भारत
आता फक्त भिमाच रक्त
ReplyDeleteजय भीम
जय मीम
जय भारत
आता वंचित बहुजन समाजाची सत्तेकडे वाटचाल सुरू
ReplyDeleteफक्त आणि वंचित बहुजन आघाडी
जयशिवराय!!जयभीम!!जय मिम!!
जय भारिप
लांडगा आला रे आला.... आता खुप झालं.... आम्ही खरा लांडगा ओळखला आहे
ReplyDeleteRight sir
ReplyDeleteRight sir
ReplyDeleteराजेश खाडकेजी,,,
ReplyDeleteआपले आभार,,,
या विजयात आपला खूप मोलाचा वाटा असेल,,
नांदेड मध्ये सर्व बहुजन वंचित मंडळी राहुल गांधी यांना सुद्धा धोबीपछाड देण्यास कमी करणार नाही. घराणेशाही करु बंद आता,आणू बहुजनांची सत्ता.
ReplyDeleteजय भिम
ReplyDeleteआता फक्त वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवारास निवडुन देणार!
ReplyDeleteआदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे बाहू मजबूत करुया !
जय भारिप ।जय वंचित बहुजन आघाडी।
जय भीम! जय मीम!