Thursday, August 23, 2012

कहाणी जिद्दी उद्योजक शेतक-याची

'अशक्य' हा शब्द ज्यांच्या जवळ नसतो तेच विजेते होतात... उराशी बाळगलेले मोठे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने ते धावत असतात... कमालीचे दारिद्र, त्यांना रोखत नाही... ते धावतात एका ध्यासाने एका ध्येयाकडे... आणि एक दिवस तो विजयाचा आनंद त्यांच्या कवेत येतो. अशाच एका जिद्दी तरुणाची हि कहाणी... मोहोळ तालुक्यातील अनगर येथील विष्णु रामदास थिटे या तरुणाने दहावीत असताना आपण दुस-याची गुलामी करण्यापेक्षा उद्योजक होऊ दुस-याकडे नोकरी करण्यापेक्षा आपण इतर लोकांना नोकरी देऊ असे स्वप्न पाहिले... आणि जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, योग्य नियोजन करत आज ते स्वप्न 'लोकनेता ट्रक्टर नागर कारखाना' या स्वरुपात साकार झाले आहे. विष्णु थिटे याने किमान 25 लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

असे स्वप्न पाहताना आपण अनेकदा वास्तवाचा विचार करतो पण अशक्य वाटणारे हे स्वप्न पाहताना विष्णु थिटे यांनी आपल्या दारिद्रयाचा विचार केला नाही. घरची प्रचंड गरिबी. आई वडील दोघेही शेत मजूर. झोपडीत राहणार विष्णु मात्र आपल्या मनाला मोठा 'उद्योजक' बनणार असे ठामपणे सांगत असे. विष्णूला दोन भाऊ एक ब्रम्हदेव आणि दुसरा महेश. ब्रम्हदेव गॅरेजमध्ये काम करत असे तर महेश शिक्षण घेत होता. विष्णु ने दहावी नंतर सोलापूर येथील आय.टी.आय मध्ये सुतार कामाचा ट्रेड पूर्ण केला. हा आय.टी.आय पूर्ण करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. जेवणासाठी पैसे नसत त्यावेळी घरुन सहा दिवसाच्या गुळाच्या पोळया करुन तो आपल्या बरोबर घेऊन यायचा. शिक्षण पूर्ण करत असताना गरिबीमुळे अनेक चटके सहन करावे लागत होते. आई वडील शेतात काम करत असत पण तेवढ्या पैश्यात घरचे भागत नसे. विष्णु ने एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला. आय.टी.आय. मध्ये असताना तो उद्योगाचा विचार करु लागला होता. आपला एखादा उद्योग असावा असे त्याला वाटू लागले. पण उद्योग करण्यासाठी जागा, मशिनरी, भांडवल लागते आणि त्यासाठी आपल्याजवळ एवढा पैसा नाही याचीही जाणीव विष्णूला होत असे. पण हे सारे असताना तो उद्योजक होण्याची स्वप्ने पाहत होता. ती साकार करण्यासाठी तो काही नियोजनही करत असे पण पैश्याचे सोंग घेता येत नाही हे तो विसरत नसे.

एका वर्षानंतर तो घरी आला. सुतार कामापेक्षा दुसरा काही उद्योग करता येईल का असा विचार त्याच्या मनात येत होता. एक दिवस वडिलांनी आपल्या बरोबर त्याला शेतीच्या कामावर नेले. शेतातील कामानंतर त्याला जाणीव झाली की दुस-याची गुलामी आपणाला करायची नाही आणि पुण्यातील राजगुरु नगर येथे जाऊन एखादा नवीन उद्योग शिकण्याचा निर्णय घेतला. वडिलांना त्याने आपला निर्णय सांगितला. काही पर्याय नसल्याने वडिलांनी होकार दिला. विष्णु पुण्याला गेला. एका वेल्डिंग वर्कशॉप हेल्पर म्हणून तो काम करू लागला. विष्णूचे मन त्याला गप्प बसू देत नव्हते. वेल्डिंग चे काम शिकण्याची त्याने सुरुवात केली. हळू हळू त्याला वेल्डिंग काम जमू लागले. विष्णूला त्या ठिकाणी पगार मिळत नव्हता फक्त जेवणावर त्याने आपले शिक्षण सुरु केले. कोणताही गुरु नसताना एकलव्य प्रमाणे त्याने आपली विद्या घेण्यास सुरुवात केली. त्याची उद्योजक बनण्याची साधना सुरु झाली होती. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्याला इतर लोकही मदत करू लागले. त्याच्या काम शिकण्याची धडपड पाहून सर्व कामगार अचंबित होत.त

एक ते दीड वर्षाचा कालावधी गेला. विष्णूला वेल्डिंग उद्योगाची माहिती झाली. पण दुर्दैवाने तो ज्या ठिकाणी काम करत होता तो उद्योग बंद झाला. विष्णू घरी आला. पुन्हा दुस-याच्या शेतावर काम करावे लागेल. पुन्हा ती गुलामी या विचाराने विष्णू विषन्न झाला. अचानक एक दिवस त्याने राहिलेली वेल्डिंग काम कोल्हापूर येथील एम.आय.डी.सी. येथे जाऊन चांगल्या वर्क शॉप मध्ये घ्यायची असे त्याने ठरिवले. पण नात्याचे अथवा जवळचे असे कुणीही कोल्हापूर येथे नव्हते. तरीही उद्योगासाठी जायचेच असे पक्के ठरवून विष्णु ने लागणारे कपडे, भाकरीचे पीठ, स्टोव्ह, असे सामान घेऊन कोल्हापूरला गेला. दोन दिवस बस स्थानकावर राहून तिथेच स्वयंपाक करून विष्णू कामाचा शोध घेत होता. एका चांगल्या वर्क शॉप मध्ये त्याला काम मिळाले. पण पुन्हा तशाच प्रकारे फक्त जेवण आणि राहण्याच्या अटीवर. इकडे घरी न सांगता आलेल्या विष्णूवर घरातील सगळेच रागावले होते.े

इकडे विष्णू वर्क शॉप मधील काम करत होता आणि संध्याकाळीीबाहेर मार्केट यार्ड येथे हमाली करत होता काही पैसे भावाच्या शिक्षणाला पाठवत असे. कोल्हापूर येथे वेल्डिंग आणि इतर शिक्षण परिपूर्ण झाल्यानंतर एक वर्ष नंतर विष्णू आपल्या गावी आला. पुरेसे पैसे नसल्याने विष्णू गावातील छोट्या दुकानात काम करू लागला. थोडे पैसे जमवून त्याने एक वेल्डिंग करण्याचे मशीन घेतले. घरी छोटा उद्योग उभा राहिला आणि एक संधी अचानक विष्णूच्या जीवनात आली. अनगर येथील माजी आमदार राजन पाटील साहेबबयांच्या ट्रक्टरचा डबल पलटी नांगररतुटला तो दुरुस्तीला पंढरपूरला जात होता पण विष्णूने आलेली संधी ओळखली नांगर अनगर येथेचचदुरुस्त करून दिला. आमदार साहेबांनी विष्णूला बोलावले. उद्योगासाठी मदत केली. गावातील रस्त्याच्या बाजुची जमीन विष्णूला उद्योगासाठी दिली. शिवाय बँक स्तरावरून लागणारे भांडवल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. विष्णू बँकेत आला. देणााबँक ने विष्णूला सोलापूर येथील खादी ग्रामुधोग मंडळाचा पत्ता दिला. मंडळाने विष्णूची जिद्द धडाडी पाहून मार्जिन मनी या योजनेतून प्रकरण मंजूर केले.

शासनाचे अनुदान आणि मदत मिळाल्याने विष्णू खुश झाला. देना बँक आणि खादी ग्रामोद्योग यांच्या मदतीने विष्णू थिटे हा गरीब तरुणाची स्वप्ने साकार झाली. विष्णूने आपला उद्योग सुरु केला. छोट्या स्वरुपात सुरु झालेला हा उद्योग आज मोठे रुपात उभा राहिला आहे. लोकनेते ट्रक्टर नांगर, लोकनेते ट्राली असे उत्पादन सुरु झाले आहे.विष्णूने तयार केलेले नांगर तुटत नाहीत. त्याच्या अवजारांचा दर्जा खूप चांगल असतो असे ग्राहकांचे मत आहे. त्याची उत्पादने सांगली, उस्मानाबाद, पुणे, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात जातात. अनेक शेतकरी त्याचा नांगर मिळावा यासाठी प्रतीक्षेत असतात. विष्णू आपल्या उद्योगाची कहाणी सांगत असताना त्याचे डोळे पाणावले होते. पण एक अश्यक्य प्राय वाटणारे स्वप्न साकार झाल्याचा आनंद त्याच्या चेह-यावर लपत नव्हत

रुपाली गोरे,जि.मा.का.सोलापूर

No comments:

Post a Comment