अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. या योजनांची माहिती.
अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटांसाठी पॉलिहाऊस तयार करणे : (प्रति महिला बचतगट रु. 5.59 लक्ष प्रमाणे ) लक्षाक : 02, तरतूद : 11.18 :
1) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची शेतजमिन लाभ क्षेत्रात असावी व त्याचे नावे 7/12 उतारा व 8 अ उतारा, जमिनीचा चुर्तुसिमा नकाशा असावा.
2) लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा दारिद्र्य रेषेखाली असावा. तसेच आदिम जमाती (कातकारी), विधवा महिला, परितक्या स्त्रिया प्राधान्य देण्यांत यावे.
3) लाभार्थ्यांचे रहिवाशी दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, जातीचा दाखला व 2 फोटो अर्जासोबत सादर करावेत.
4) सदर योजनेसाठी शेतकऱ्याकडे किमान 10 गुंठे सपाट जमिन असणे आवश्यक आहे. तसेच पाणी, वीज यांची उपलब्धता असावी.
5) योजने अंतर्गत करण्यांत आलेल्या उत्पादन विक्रीसाठी टेम्पो जाण्यांसाठी रस्ता उपलब्ध असावा. 6) सदरचे पॉलीहाऊस तयार झाल्यानंतर सदर पॉली हाऊस इतर व्यक्तीस विकता येणार नाही.
अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड कार्यक्रम : (प्रति लाभार्थ्यी जास्तीत जास्त 2 एकर ) ( प्रती शेतकरी रु. 1.00 लक्ष प्रमाणे ) लक्षांक : 17, तरतूद : 17.00:
1) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची शेतजमिन लाभ क्षेत्रात असावी व त्याचे नावे 7/12 उतारा व 8 अ उतारा, जमिनीचा चुर्तुसिमा नकाशा असावा.
2) लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा दारिद्र्य रेषेखाली असावा. तसेच आदिम जमाती (कातकारी), विधवा महिला, परितक्या स्त्रिया प्राधान्य देण्यांत यावे.
3) लाभार्थ्यांचे रहिवाशी दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, जातीचा दाखला व 2 फोटो अर्जासोबत सादर करावेत.
4) सदर योजनेसाठी शेतकऱ्याकडे किमान 2 एकर जमिन असणे आवश्यक आहे.
अनुसूचित जमतीच्या शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड कार्यक्रम : (प्रति लाभार्थ्यी जास्तीत जास्त 2 एकर ) (प्रती शेतकरी रु. 1.00 लक्ष प्रमाणे ), लक्षांक : 15, तरतूद :30.00:
1) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची शेतजमिन लाभ क्षेत्रात असावी व त्याचे नावे 7/12 उतारा व 8 अ उतारा, जमिनीचा चुर्तुसिमा नकाशा असावा.
2) लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा दारिद्र्य रेषेखाली असावा. तसेच आदिम जमाती (कातकारी), विधवा महिला, परितक्या स्त्रिया प्राधान्य देण्यांत यावे.
3) लाभार्थ्यांचे रहिवाशी दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, जातीचा दाखला व 2 फोटो अर्जासोबत सादर करावेत.
4) सदर योजनेसाठी शेतकऱ्याकडे किमान 1 एकर जमिन असणे आवश्यक आहे.
अनुसूचित जमातीच्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य : (प्रती संस्था रु. 3.00 लक्ष प्रमाणे ) लक्षांक : 3, तरतूद : 9.00:
लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांचे सर्व सभासद आदिवासी असणे व त्यांचेकडे जातीचे दाखले असणे आवश्यक राहील.
2) नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय करणारी सहकारी संस्था असणे आवश्यक आहे.
3) लाभार्थ्यांने योजनेचा लाभ मिळणेसाठी रहिवाशी दाखला, दादिद्र्य रेषेखालील दाखला, जातीचा दाखला व 2 फोटो अर्जासोबत सादर करावेत.
वन कायद्या अंतर्गत अथवा स्वाभिमान योजने अंतर्गत जमिन मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची जमिन ओलीता खाली येण्यासाठी विहिर बांधकाम करणे व तेलपंप व एचडीपीई/ पीव्हीसी पाईपचा पुरवठा करणे. (प्रती विहिर रु. 3.00 लक्ष प्रमाणे ) लक्षांक : 18, तरतूद : 54.00
1) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची शेतजमिन लाभ क्षेत्रात असावी व त्याचे नावे 7/12 उतारा व 8 अ उतारा, जमिनीचा चुर्तुसिमा नकाशा असावा.
2) लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा दारिद्र्य रेषेखाली असावा. तसेच आदिम जमाती (कातकारी), विधवा महिला, परितक्या स्त्रिया प्राधान्य देण्यांत यावे.
3) लाभार्थ्यांचे रहिवाशी दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, जातीचा दाखला व 2 फोटो अर्जासोबत सादर करावेत.
4) सदरची योजना कार्यान्वित झाल्यानंतर ओलीताखाली आलेली जमिन लाभार्थ्यास विकता येणार नाही.
5) पाणी उपलब्धतेबाबत भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचा दाखला घेणे आवश्यक राहिल.
तरी वरील प्रमाणे पात्रता धारक इच्छुक आदिवासी लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि.रायगड या कार्यालयाकडे दिनांक 15/08/2012 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. त्यासाठी विहित नमुन्यातील छापिल अर्ज या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि.रायगड यांनी आवाहन केले आहे. तसेच सदर योजना राबवू इच्छिणाऱ्या नामांकित स्वयंसेवी संस्थांनी देखील त्यांचे प्रस्ताव या कार्यालयास सादर करावेत.
सुहास जी. नेवासकर, प्र. जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग
No comments:
Post a Comment