पुणे :-
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण मुळा-मुठेच्या संगमावर वसलेले, एके काळी पेशव्यांची राजधानी असणारे हे शहर आज महाराष्ट्र्रीतील महत्वाचे शैक्षणिक सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र मानले जाते. लोकसंख्येचा विचार केला तर पूणे नागरी संकुल हे देशातील आठव्या क्रमांकाचे नागरी संकुल असून राज्यातील दुसर्या क्रमांकाचे दशलक्षी शहर आहे.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या या पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र्र राज्याचे विभागीय माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र्र राज्य पाठयपुस्तकनिर्म्ािती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच अनेक सामान्य शिक्षण महाविद्यालये आहेत. पुणे हे पुणे विद्यापीठाचे व भारती अभिमत विद्यापिठाचे मुख्य ठिकाण आहे. येथील राजा केळकर वस्तुसंग्रहालय व महात्मा फुले वस्तुसंग्रहालय प्रसिध्द आहेत.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ चित्रपट आणि दुरचित्रवाणी शिक्षण केंद्र आकाशवाणी केंद्र भारत इतिहास मंडळ राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी राष्ट्रीय स्फोटके प्रयोगशाळा, मध्यवर्ती जल व शक्ती संशोधन केंद्र उष्ण कटिबंधीय मान्सून प्रयोगशाळा वेधशाळा भारतीय अन्वेषण मंडळ इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरॉलाजी इ. संस्था पूणे व परिसरात आहेत. पुण्याजवळ भोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था ही एड्ससंदर्भात संशोधनकार्य करणारी राष्ट्रीय स्तरावरील महत्वपूर्ण संस्था आपले मौलिक कार्य पार पाडीत आहे. पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिद्यांची समाधी आहे. हे ठिकाण शिद्यांची छत्री म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून जवळच बालेवाडी येथे क्रिडासंकुल उभारण्यात आले आहे. पुण्याजवळच पानशेत व वरसगाव येथील जलाशयांच्या परिसराचा क्रिडाकेंद्र व पर्यटनस्थळ म्हणून विकास होत आहे. पुण्याजवळ निगडी येथे अप्पूघर हे करमणुकीचे होत आहे.
पुणे हे महत्वाचे औद्योगिक केंद्र असून पिंपरी चिंचवड भोसरी हडपसर, पर्वती व गुलटेकडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. जवळच थेरगाव येथे कागद गिरणी आहे. पुणे हे महत्वाचेक रेल्वे जंक्शन व बाजारपेठ असून पुण्याजवळ लोहगाव येथे विमानतळ आहे. पुणे-मुंबई अंतर रेल्वेने १९२ कि. मी. असून सडकेने १७० कि. मी. आहे.
जुन्नर :-
जुन्नर तालुक्याचे मुख्य ठिकाण येथून जवळच सातवाहन काळातील शिवनेंरी हा किल्ला आहे येथेच छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. गडावर शिवाई देवीचे मंदिर आहे. जुन्नरपासून जवळच माणिकडोह व येडगाव ही धरणे आहेत.
भीमाशंकर :-
आंबेगाव तालुक्यात राजगुरुनगरपासून ६० कि. मी. अंतरावर, सह्याद्रीच्या कुशीत हे ठिकाण वसले आहे. येथूनच भीमा नदीचा उगम होतो. येथील महादेवाचे देवस्थान बारा ज्योतिलिंगांपैकी एक मानले जाते येथील देवालय नाना फडणविसांनी बांधले आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही भीमांशंकर प्रसिध्द आहे. येथे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.
आळंदी :-
पुण्यापासून जवळच असलेले हे तीर्थक्षेत्र खेड तालुक्यात मोडते. इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या या ठिकाणी संत ज्ञानेश्र्वरांनी संजीवन समाधी घेतली आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला ज्ञानरायांच्या समाधीचे दर्शन घेण्यास लाखो भाविक येथे गर्दी करतात.
पुणे जिल्ह्यात मांजरी येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते.
देहू :-
पुण्यापासून जवळच हवेली तालुक्यात वसलेले तीर्थक्षेत्र. हे स्थान संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओखळले जाते. फाल्गुन वद्य. द्वितीयेला तुकारामबीज येथे मोठी यात्रा भरते येथून पाच कि.मी. अंतरावर भंडारा डोंगर आहे. तेथे एकांतात तुकाराम महाराजा चिंतन करीत असत, असे म्हटले जाते.
राजगुरुनगर :-
खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण हुतात्मा राजगुरुचे जन्मस्थान म्हणून प्रसिध्द.
चाकण :-
खेड तालुक्यात कांद्याची मोठी बाजरपेठ येथील भुईकोट किल्ला प्रसिध्द. येथे औद्योगिक वसाहत असून या परिसरात अनेक मोठे उद्योग उभे राहिले आहेत.
लोणावळे :-
पुण्यापासून ६० कि.मी. अंतरावर पुणे-मुंबई हमरस्त्यावर असलेले हे थंड हवेचे ठिकाण मावळ तालुक्यात मोडते येथे धरण आहे. लोणावळयाच्या पूर्वेस ८ कि. मी. अंतरावर कार्ले भाजे व बेडसा येथे प्राचीन लेणी आहेत. कार्ले येथील लेणी ख्रिस्तपुर्व दुसर्या शतकातील आहेत.
सासवड :-
पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण येथे सोपानदेवाची समाधी आहे. जवळच असलेले कोठीत हे गाव आचार्य अत्रे यांचे जन्मस्थान आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे.
उरुळी -कांचन :-
हवेली तालुक्यात येथिल निसर्गोपचार केंद्र प्रसिध्द आहे. १९८२ च्या रॅमन मॅगसेस पुरस्काराने मानकरी व थोर गांधीवादी कार्यकर्ते मणिभाई देसाई यांनी स्थापन केलेली भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेश ही संस्था आहे. जवळच भुलेश्र्वर हे श्रीशंकराचे देवस्थान व सहलीचे ठिकाण आहे.
जेजुरी :-
पुरंदर तालुक्यात येथील गडावर महाराष्ट्र्राचे कुलदैवत खंडोबाचे देवस्थान आहे. सोमवती अमावस्येस येथे मोठी यात्रा भरते.
बनेश्र्वर :-
पुण्यापासुन ३० कि. मी. अंतरावर नसरापूरजवळ हे स्थान वसले आहे. येथील शिवमंदिर प्रसिध्द आहे. निसर्गरम्य परिसरामुळे सहलीसाठी लोक येथे येतात.
खेड शिवापूर :-
हवेली तालुक्यात येथील कमरअली दरवेशाचा दर्गा अनेक हिंदु-मंस्लिमांचे श्रध्दास्थान आहे.
वढू :-
हे गाव शिरुर तालुक्यात भीमा कोरेगावपासून ३ कि. मी. अंतरावर आहे. येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.
भाटघर :-
हे भोर तालुक्यात असून नीरेची उपनदी वेळवंडीवर बांधलेले लॉईड धरण येथे आहे. या धरणाच्या जलाशयास आता येसाजी कंक जलाशय असे नाव
वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था ही सहकारी क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था पुणे येथे आहे.
देण्यात आले आहे. पुण्यापासून ४० कि. मी. अंतरावर असलेले हे स्थळ आता पर्यटनकेद्र म्हणून विकसित होत आहे.
आर्वी :-
हे ठिकाण जुन्नर तालुक्यात असून येथे विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
वालचंदनगर :-
हे ठिकाण इंंदापुर तालुक्यात असून येथे प्लॅस्टिकचा कारखाना, वनस्पती तुपाचा कारखाना व वालचंदनगर उद्योगसमूहाचा अभियांत्रिकी उत्पादनांचा कारखाना आहे.
पिंपरी चिंचवड :-
पूर्वी पूणे शहराची उपनगरे समजली जाणार्या या ठिकाणी आता स्वतंत्र महानगरपालिका आहे. पिंपरी आणि चिंचवड येथे औद्योगिक वसाहत असून या वसाहतीमध्ये व परिसरात अनेक उद्योगंधदे स्थापन झाले आहेत. चिंचवड येथे श्रीमोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे.
बारामती :-
बारामती तालुक्याचे ठिकाण कर्हा नदीकाठी वसले आहे. तालुक्यात माळेगाव व सोमेश्र्वरनगर येथे सहकारी तत्वावरील साखर कारखाने कार्यरत आहेत. येथे बारामती ग्रेप इंडस्ट्रीजचा मद्यनिर्म्ािती प्रकल्प कार्यरत आहे. येथील औद्योगिक वसाहतीत अनेक लहान मोठे कारखाने उभे राहिले आहेत.
भोर :-
भोर तालुक्याचे मुख्य ठिकाण. भोर परिसरात अलीकडील काळात लहान - मोठया अनेक उद्योगंधंद्याचे केंद्रीकरण झाले असून येथील रंगाचा व रेक्झीनचा भोर इंडस्ट्रीज कारखाना प्रसिध्द आहे.
याशिवाय पौंड (मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण जवळच मुळशी येथे धरण ), शिरुर ( शिरुर तालुक्याचे मुख्य ठिकाण घोडनदीकाठी वसले आहे. ), इंदापूर ( इंदापुर तालुक्याचे मुख्य ठिकाण. सहकारी तत्वावरील साखर कारखाना ), तळेगाव ( मावळ तालुक्यात. काच कारखाना प्रसिध्द ), वडगाव ( मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण ), ही जिल्ह्यातील अन्य महत्वाची स्थळे होत.
हवामान :-
जिल्ह्यातील हवामान वर्षातील बराचसा काळ कोरडे व आल्हाददायक, असते. उन्हाळयात तुलनात्मकदृष्टया हवामान उष्ण असते. में महिन्यात तापमान ४१से .ची मर्यादा ओलांडते काही वेळा मे महिन्यात तापमान त्याहीपेक्षा अधिक वाढलेले आढळून येते. र्हिवाळयात तापमान ६से. पर्यतही खाली येते. इंदापूर दौंड बारामती या पूर्वेकडील तालुक्यातींल हवामान तुलनात्मकदृष्टया कमी आढळते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मोसमी वार्यापांसून पाऊस पडतो घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक म्हणजे ३०० ते ४०० से. मी. पर्यत असते. घाटमाथ्याकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. जिल्ह्यात पूर्व भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो . येथील पावसाचे वार्षिक प्रमाण सर्वसाधारणत: ७० ते १२० सें मी. पर्यत असते. सुखटणकर समितीच्या शिफारशींनुसार जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर व हवेली या तालुक्यांचा समावेश्या अवर्षणप्रवण क्षेत्रात केला गेला. असून १९७४ -७५ पासून या तालुक्यामध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे. आता. डॉ. सी. एच. हनुमंतराव समितीच्या शिफारशींच्या आधारे भोर, मुळशी, व मावळ या तालुक्यांचाही नव्याने अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश करण्यात आला. असून येथेही १९९४-९५ पासून अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
इतिहास :-
पूणे शहराच्या नावावरून जिल्ह्यासही पूणे जिल्हा असे नाव पडले. इसवी सनाच दुसर्या शतकात होऊन गेलेल्या टॉलेमी याच्या लिखाणात पूण्याचा पुन्नटा असा उल्लेख केला जाई. पुण्य या शब्दावरुन पूणे हे नाव पडले असावे, अशीही एक उपपज्ञ्ल्त्;ाी मांडली जाते. मूळा व मुठा या नद्यांच्या संगमावर वसलेले पुण्यस्थळ म्हणून हे नाव पडले. असावे मोगल राजवटीत या गावाचा कसबे पूणे असा उल्लेख आढळतो.
आंध्र चालुक्य व राष्ट्रकुटांच्या प्राचीन राजवटी पूण्याने पाहिल्या. मध्ययुगातील यादवांचा अंमलही पुण्याने पाहिला बहामनी, निजामशाही व आदिलशाही राजवटीही पुण्याने भोगल्या. शिवाजी माहराजांचे बालपण येथेच पार पडले. हिंदवी स्वराज्याचे बीज येथेच त्यांच्या मनात रुजले. मराठा राजवटीत पूणे हे एक महत्वाचे राजकीय केंद्र होते. पुढील काळात पेशव्यांनी आपली राजधानी येथे वसविली. इ. स. १८१८ मध्ये मराठेशाहीचा अस्त झाला व पूण्याच्या शनिवारवाडयावरील भगव्या झेंडयाची जागा युनियन जॅक ने घेतली स्वातंत्र्य आंदोलनातही पूणे अग्रभागी राहिले. आद्य क्रांतिकाराक वासुदेव बळवंत फडक्यांनी कर्मभूृमीही पूणे हीच होती. पूण्याच्या गणेशंखिंडीतच २२ जून १८९७ रोजी चापेकर बंधंूनी रॅंड या जूलमी प्लेग कमिशनरचा वध केला. अनेक क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्य सेनानींनी पुण्यास आपली कर्मभूमी मानले होते. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पूण्याच्या शनिवारवाडयावरील युनियन जॅक जी जागा भारताच्या तिरंगी झेंडया ने घेतली.
नद्या :-
भीमा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी होय. ती पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यात सह्य पर्वतरांगांमध्ये भीमाशंकर येथे उगम पावते. ती प्रथम काही अंतर जिल्हयाच्या मध्यातुन व नंतर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरुन वाहते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह आंबेगाव, खेड, शिरुर या तालुक्यामधुन व दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमावर्ती भागातून होतो. दौंड आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमांवरुन वाहताना तिने काही काळ पुणे व अहमदनगर आणि पुणे व सोलापूर या जिल्हयांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमांवरुन वाहत जाऊन ती पुढे नीरा नदीचा प्रवाह आपल्या पोटात घालूनच सोलापूर जिल्ह्यात प्रवेशते. इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, व नीरा, या भीमेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या आहेत.
इंद्रायणी ही भीमेची उपनदी जिल्ह्याच्या मध्ये भागातून वाहते. ही नदी लोणावळयाच्या नैऋत्य सह्य रांगांमध्ये कुरवंडे घाटाजवळ उगम पावते. हवेली तालुक्यातील तुळापूर येथे ही भीमेस मिळते. नीरा नदी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरुन पश्चिम-पूर्व अशी वाहते आपल्या या प्रवासात तिने पुणे व सातारा आणि पूणे व सोलापूर या जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. कर्हा ही नीरेची जिल्ह्यातील प्रमूख उपनदी होय. ती बारामती तालुक्याच्या सीमावर्ती भागात निरेस मिळते. बारामती तालुक्यातील आहुपे गावाजवळ हिचा उगम होतो. दौंडच्या वायव्येस पाच किलोमीटर अंतरावर सांगवीनजीक ती भीमेस मिळते आंबेगाव, घोडेगाव, वडगाव, व शिरुर ही तिच्याकाठची प्रमुख गावे होत. कुकडी नदी जुन्नर तालुक्यातून होतो. पुढे ती शिरुर व नगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्यांच्या सीमेवरुन वाहते. या सीमावर्ती भागातच ती घोड नदीस मिळते. मीना ही घोड नदीची आणखी एक उपनदी होय.
No comments:
Post a Comment