बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच महिलांना संघटित करण्याचे काम महाड तालुक्यातील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या हिरवळ दिलासा या संस्थेने कृषी दिनाचे औचित्य साधून महिलांना एक महिला, एक झाड हा संदेश दिला. संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमास महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.
तालुक्यातील २५ पेक्षा अधिक बचत गटातील महिलांनी प्रत्येकी एक तरी झाड लावले पाहिजे, या उपक्रमाचा शुभारंभ हिरवळ दिलासा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर धारिया यांच्या हस्ते करण्यात आला. पर्यावरण चिंतन करतांना केवळ उपदेश न करता निसर्गाचा एक घटक म्हणून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
आपल्या घरासमोर एक झाड लावून त्याचे चांगले संगोपन केल्यास पर्यावरणाचा समतोल साधण्यास मोलाचे सहकार्य मिळणार आहे. महाड तालुक्यात २५ हजार झाडे लावण्यात येणार असून त्याचे संगोपन महिला बचत गटांकडून केले जाईल.
आपल्या घराच्या मागील भागामध्ये परसबाग तयार करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. त्यासाठी आवळा सप्तपर्णी, कडूलिंब, कडीपत्ता, काजू, बदाम, अशोका,ॲकेशिया, मॅजियम याच बरोबर भेंडी, मिरची, काकडी, वांगी, यांची रोपे व बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment