अकोला जिल्हा मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेल्या जनुना गाव गावात पारंपरिक पध्दतीने शेती व्यवसाय केला जात असे पारंपारिक शेतीतून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते म्हणून या गावक-यांनी नव्या पिकाचा शोध सुरु केला.कारल्याच्या रुपाने हा शोध पूर्ण करण्यात या गावक-यांना यश आले. महान या सिंचन प्रकल्पामुळे जनुना गावाचा जन्म झाला.तब्बल १५ वर्षापूर्वी वसलेले हे गाव दळणवळणाच्या सोयीसुविधेपासून कोसो दूर होते.
आज गावातून दळणवळण वाढले आहे. ६० कुटुंब आणि ३५० लोकसंख्या असलेल्या या गावात १९१ हेक्टर शेतीचे क्षेञ आहे. मूग,कापूस,सोयाबीन आणि उडीद या पारंपारिक पिकातून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नाही. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालण्याची कसरत फार मोठी होती,असे सांगणारे शेतकरी कारल्यानेच तारले,असे अभिमानाने सांगतात.
जनुना गावात पारंपरिक पध्दतीने शेती करण्यात येते. पारेपरिक शेती करणा-या जनुना गावातील जीवन खंडारे एक कर्तबगार शेतकरी. जीवनरावांना पत्नी लताबाईची मोठी साथ आहे. २ एकर शेती असणारे जीवन खंडारे यांनी कारल्याची शेती जंगला लगत आहे. वन्यप्राण्यांचा मोठा ञास असल्याने जीवनराव राञ अन् दिवस शेतीवरच राहतात. ३० गुंठे क्षेञात पहिल्याच वर्षी खंडारे यांना १ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले.
खंडारे यांच्या कारला शेतीतल्या यशानंतर गावात कारल्याची चळवळच उभी राहीली.संघटन वाढत गेले आणि आज तब्बल २२ शेतकरी कारला शेतीतले यशस्वी मॉडेल ठरले आहेत. यात गजानन ढाकोळकार ३० गुंठे,संतोष भवाने ३० गुंठे,नितीन भवाने ३० गुंठे, श्रीकृष्ण बोळे ३० गुंठे , सिंधूताई येवले ३० गुंठे, केशव जामोदकार २० गुंठे , अरुण उमक ३० गुंठे, देविदास येवले ३० गुंठे, हरिचंद्र ढाकोलकार ३० गुंठे, भास्कर मोकाळकर २० गुंठे , भिमराव येवले २० गुंठे, सुधाकर भवाने २० गुंठे, शालीकराम येवले २० गुंठे, सीताराम उमक २० गुंठे,अनिल जामोदकार २० गुंठे, बाळकृष्ण जामोदकार २० गुंठे, मधुकर जामोदकार २० गुंठे, सुभाष चोपडे २५ गुंठे, अशा तब्बल २२ शेतक-यांनी कारल्याच्या शेतीत यश संपादन केले आहे. यावर्षी शेतक-यांना या क्षेञात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरु आहे.
जनुना गावात शेती आणि गावातील एकूणच विषयावर चर्चा होते. चर्चेतून नियोजन ठरते.चर्चेतून पर्याय शोधला जातो. कारल्याबाबत शेती कार्यशाळाही भरविण्यात येतात तालुका कृषी अधिकारी अरुण गावंडे तंञज्ञान व्यवस्थापक व्ही.एम.शेगोकार,मंडळ कृषी अधिकारी िवनय चव्हाण,कृषी पर्यवेक्षक एस.जे. गावंडे यांच्या मार्गदर्शन महत्वाचे ठरते.
शेतीत आधुनिक तंञज्ञानाचा वापर करीत जनुनावासीयांनी हायटेक शेतीला दिशा दिली आहे. शेतीत आधुनिक अवजारांचा वापर करणा-या जनुना गावात शेतीतल्या कामांचीही विभागणी करण्यात आली आहे. आधुनिक अवजारांचा वापर करीत शेतकरी कमी श्रमात भरघोस उत्पादन घेत आहेत.
पाण्याचे महत्व जाणून असलेल्या जनुनावासीयांनी लोकसहभागातून पाणी अडवा,पाणी जिरवा हे अभियानंच राबविले आहे. गावातील शेती ओलिताखाली आहे. शेतीत पाण्याचा योग्य वापर व्हायला हवा, यासाठी शेतक-यांनी ठिबक व स्प्रिंकलरचा वापर केला आहे. या वापरामुळे पिकाला योग्य त्या प्रमाणात पाणी देण्यात शेतक-यांना यश मिळाले आहे. शेतक-यांचा हा पाण्याचा ताळेबंद उन्हाळयातही कारल्याच्या शेतीसाठी चांगलाच फायदेशीर ठरला आहे. जनुना गावात एकविचारातून शेतीतून झालेली क्रांती अनेक गावांसाठी नवी प्रेरणा देणारी ठरणार आहे.
No comments:
Post a Comment