शाहू, फुले, आंबेडकर दलितवस्ती विकास व सुधारणा अभियान सन २००९-१० मध्ये विभागीय स्तरावर पुणे विभागात प्रथम पुरस्कारासाठी विडणी, ता. फलटण या गावाची निवड करण्यात आली. या निवडीनंतर विडणी गावात फटाके वाजवून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान विडणी ग्रामस्थांनी आता राज्यस्तरीय पुरस्कार मिळवण्याचा निर्धार केला आहे.
शाहू-फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियानात सहभागी झालेल्या व सन २००८ -२००९ ला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावलेल्या विडणी (बौध्दनगर), ता. फलटण या भागाची नुकतीच औरंगाबादचे विभागीय उपायुक्त सुरेश वेदमुथा यांच्या नेतृत्वाखालील समितीने पाहणी करुन बौध्दनगरमधील विकासकामाविषयी समाधान व्यक्त केले होते. या विभागस्तरीय मूल्यांकन समितीने पुणे विभागातील ५ जिल्ह्यामधील १० गावांची तपासणी केली होती. यामध्ये पुणे विभागात विडणी गावाला प्रथम क्रमांकाचे १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
क्रांती दिनाच्या निमित्ताने वेदमुथा यांनी पुणे विधानभवनात हा निकाल जाहीर केला. यावेळी पुणे विभागाचे विकास उपायुक्त भारत शेडगे, आस्थापना शाखेचे उपायुक्त पी. डी. कासार, सहाय्यक आयुक्त (विकास) शालिनी कडू-धोटे आणि विभागातील विविध गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान,आता विडणी ग्रामस्थांनी यापुढील राज्यस्तरावरील पुरस्कार मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
फलटण तालुक्यात महाड-पंढरपूर महामार्गावर विडणी गाव असून शेती क्षेत्राबरोबरच गावाने शासकीय विविध योजना राबवून लोकांची एकी व सहकार्यातून यशस्वी करुन दाखविल्या आहेत.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गावाने जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवले आहेत. विविध योजना राबवून तालुका व जिल्हास्तरावर विडणी गावाने ठसा उमटवलेला आहे.
सुमारे २ हजार लोकसंख्या असलेल्या बौध्दनगरमध्ये गेल्या १५ वर्षापासून ग्रामपंचायत १५ टक्के अनुदानातून संपूर्ण समाजमंदिराची भव्य इमारत तसेच भव्य असे तक्षशिला बुध्द विहार उभारण्यात आले आहे. या ठिकाणी शासकीय फंडातून अंतर्गत रस्ते, शौचालये, घरकुले, गटारे स्मशानभूमी व यासारखी विविध विकासकामे करण्यात आली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.
या ठिकाणी संघमित्र तरुण मंडळामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुध्द जयंती उत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक कार्य करण्यात येतात.या ठिकाणी सरकारमान्य प्रबुध्द ग्रामीण वाचनालय असून येथे ज्ञानार्जनासारखी महत्वपूर्ण काम केले जाते. विविध महिला बचतगटही या ठिकाणी कार्यरत आहेत.
शाहू, फुले, आंबेडकर दलितवस्ती विकास सुधारणा अभियान यशस्वी करण्यात संघमित्र तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, बौध्दनगरमधील सर्व उपासक, उपासिका, विडणी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी तसेच पंचायत समिती फलटणच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.
दलित वस्ती सुधारणेत विडणी विभागीय स्तरावर प्रथम-
शाहू, फुले, आंबेडकर दलितवस्ती विकास व सुधारणा अभियान सन २००९-१० मध्ये विभागीय स्तरावर पुणे विभागात प्रथम पुरस्कारासाठी विडणी, (ता. फलटण) या गावाची निवड करण्यात आली असून निवडीनंतर विडणी गावात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शाहू-फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियानात सहभागी झालेल्या व सन २००८ -२००९ ला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावलेल्या विडणी, बौध्दनगर (ता. फलटण) या भागाची नुकतीच औरंगाबादचे विभागीय उपायुक्त सुरेश वेदमुथा यांच्या नेतृत्वाखालील समितीने पाहणी करुन बौध्दनगरमधील विकासकामाविषयी समाधान व्यक्त केले होते.
या विभागस्तरीय मूल्यांकन समितीने पुणे विभागातील पाच जिल्ह्यामधील १० गावांची तपासणी केली होती. यामध्ये पुणे विभागात विडणी गावाला प्रथम क्रमांकाचे १० लाख रुपयांचे बक्षीस क्रांती दिनाच्या निमित्ताने वेदमुथा यांनी पुणे विधानभवनात हा निकाल जाहीर केला. यावेळी पुणे विभागाचे विकास उपायुक्त भारत शेडगे, आस्थापना शाखेचे उपायुक्त पी. डी. कासार, सहाय्यक आयुक्त (विकास) शालिनी कडू-धोटे आणि विभागातील विविध गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.
विडणी गावाला शाहू, फुले, आंबेडकर दलितवस्ती विकास व अभियानामध्ये विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक जाहीर झाल्यानंतर विडणी गावात व संपूर्ण बौध्दनगर परिसरात मोठया प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येवफन मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आता विडणी ग्रामस्थांनी यापुढील राज्यस्तरावरील पुरस्कार मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
फलटण तालुक्यात महाड-पंढरपूर महामार्गावर विडणी गाव असून शेती क्षेत्राबरोबरच गावाने शासकीय विविध योजना राबवून लोकांची एकी व सहकार्यातून यशस्वी करुन दाखविल्या आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गावाने जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवले आहेत. विविध योजना राबवून तालुका व जिल्हास्तरावर विडणी गावाने ठसा उमटवलेला आहे.
सुमारे २ हजार लोकसंख्या असलेल्या बौध्दनगरमध्ये गेल्या १५ वर्षापासून ग्रामपंचायत १५ टक्के अनुदानातून संपूर्ण समाजमंदिराची भव्य इमारत, वेश तसेच भव्य असे तक्षशिला बुध्द विहार उभारण्यात आले आहे. या ठिकाणी शासकीय फंडातून अंतर्गत रस्ते, शौचालये, घरकुले, गटारे स्मशानभूमी व यासारखी विविध विकासकामे करण्यात आली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.
या ठिकाणी संघमित्र तरुण मंडळामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुध्द जयंती उत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक कार्य करण्यात येतात. याठिकाणी सरकारमान्य प्रबुध्द ग्रामीण वाचनालय असून येथे ज्ञानार्जनासारखी महत्वपूर्ण कामे केली जातात. तसेच विविध महिला बचतगटही या ठिकाणी कार्यरत आहेत.
शाहू, फुले, आंबेडकर दलितवस्ती विकास सुधारणा अभियान यशस्वी करण्यात संघमित्र तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, बौध्दनगरमधील सर्व उपासक, उपासिका, विडणी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी तसेच पंचायत समिती फलटणच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.
No comments:
Post a Comment