Saturday, July 7, 2012

प्राचीन धातुमूर्ती........


सर्व भारताच्या दृष्टीने विचार केला तर त्यात धातू शिल्पांच्या बाबतीत महाराष्ट्राचा वाटा अगदीच नगण्य वाटतो, पण तरही या कलेच्या विकासास महाराष्ट्राने उल्लेखनीय हातभार लावला आहे.
शिल्पकलेने भारतात मुख्यत्वेकरून धर्माचीच सेवा केलेली दिसते आणि म्हणून भारतीय शिल्पकलेला मूर्तिकला असेच बऱ्याचदा संबोधिले जाते. परंतु या नांवास हरकत घेणाऱ्या टीकाकारांनी, भारतीय शिल्पकारांनी हाताळलेल्या निधर्मी विषयांकडे वारंवार बोट दाखवले आहे. तरीही धातुशिल्पाच्या बाबतीत मात्र “मूर्तिकला” किंवा “मूर्तिशिल्प” हेच नांव योग्य ठरते; कारण मूर्तींखेरीज इतर विषयांवरील धातू-शिल्पे सापडत नाहीत.
अशा परिस्थितीत धातू-शिल्पाचे नक्की स्थान काय समजायचे? प्रत्येक शिल्पाला दोन अंगे असतात : एक आकृतीचे आणि दुसरे प्रतिमात्मक. शिल्पाला कलाकाराने दिलेला, घडवलेला आकार हे शिल्पाचे आकृति-अंग. सर्व छोट्या-मोठ्या मूर्ती-आकृती या त्या त्या काळात व ठिकाणी प्रचलित असलेल्या कलाविषयाचे धातु-माध्यमातील एक रूप असणार. कलात्मक अभिव्यक्तीच्या ज्या शैली निरनिराळ्या काळात – उदा: कुशाण, गुप्त, पाल, चोल इ. – इतर शिल्पातून आढळतात त्याच शैली धातूच्या मूर्तीतही आकारलेल्या दिसतात; आणि त्याच पुन्हा मोठ्या अश्मशिल्पातही सापडतात. परंतु अश्मशिल्पे ही बहुधा एका संपूर्ण वास्तुशिल्पाचा अथव इमारतीचा अथवा प्रासाद-प्रांगणाचा एक भाग असतात, तर धातुशिल्पे केवळ एकेक मूर्ती म्हणुनच अस्तित्वात येतात.
त्यांच्या या वैयक्तिकतेतच त्यांचे प्रतीकत्वही समावलेले आहे. भारतातील अनेक धर्म सार्वजनिक, तसेच स्वतंत्र वैयक्तिक पूजा-अर्चाही मानतात. प्रत्येक व्यक्तीला ह्या धर्मांनी स्वतःच्या घरात, स्वतः दैवत मानलेल्या मूर्तीची पूजा करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. अशा मूर्तिपूजेचा हेतू पूजकाला देवतासन्निध पोचवण्याचा असल्याने त्या त्या मूर्तीला एअक पकारच्या वैयक्तिक उप-धर्माच्या दैवताचे स्थान प्राप्त होते. परंतु मूर्तीच्या या धार्मिक लक्ष्यामुळे त्यांच्या आकृती अथवा बाह्यरूपाच्या कलाकुसरीकडे पूजकाचे लक्ष नसून मूर्तीच्या दैवी अथवा आध्यात्मिक शक्तीकडे असते. धातूच्या मूर्ती अशा पूजा-कर्मासाठी विशेषकरून वापरल्या जाण्याचे मुख्य कारण त्या लहान व सुटसुटीत असून सहजगत्या इकडून तिकडे नेता येतात हेच आहे.
आराधनेचे स्वरूप जसे साधनेकडून मंत्राकडे व मंत्राकडून तंत्राकडे वळले तसतसे मूर्तीचे स्वरूपही साधासुध्या वा ओबडधोबड आकृतींकडून अतिशय बारकाव्याच्या व वास्तवदृश्य पुतळ्यांकडे व तिथून पुढे अनाकलनीय शिल्पाकृतींकडे वळले. या प्रक्रियेमुळे मूर्तीची योग, भोग, वीर अभिचारक अशी वर्गवारी करण्यात आली आहे. आपल्याला हवे ते लक्ष्य साधण्यासाठी पूजक यापैकी कुढल्या तरी वर्गातील मूर्ती पूजास्थान म्हणुन निवडू शकतो, तसेच मूर्ती शांत किंवा उग्र ही असतात. पण मूर्ती कशाच्याही, कुणाच्याही असोत; भारतीय शिल्पकारांनी आपल्या अभिजात सौंदर्यसृष्टीला अनुसरऊन तऱ्हेतऱ्हेच्या अगदी अनाकलनीय आकृत्यांमध्येसुद्धा जी सुबक आकर्षकता व प्रतिष्ठा निर्मिली आहे तशी जगात इतर कुठे सापडणार नाही.
भारतीय शिल्पकलेच्या सुरवातीस [बौद्ध किंवा जैन काळी] मूर्त स्वरूप दिले गेले ते कुणा एका व्यक्तीच्या अथवा देवतेच्या आकृतीस नव्हे, तर कुठल्या तरी तात्त्विक वा आध्यात्मिक सकल्पनेला. त्यामुळे कुरू, प्रेषित, द्र्ष्टा वगैरे मूर्ती तयार केल्या जाणे ओघानेच आले. परंतु त्या केल्या गेल्या त्या ध्यानमग्न योग्याच्या उभ्या किंवा कायोत्सर्ग रूपात किंवा बसलेल्या ध्यानमुद्रा या स्वरूपात होत्या. सर्व बारकाव्यांसहितचा परिकर मागाहून अस्तिवात आला. काही काळानंतर मूर्तिशिल्पाच्य संहितेत नेमून दिलेल्या नियमांचा प्रभाव मूर्तिकारांवर पडू लागला. अशा नियमावलींच्या जंत्र्या, बृहत्संहिता, विष्णूधर्मोत्तरपुराण, साधनमाला वगैरे ग्रंथातून आढळतात. वराहमिहिर म्हणतो की मूर्तीचे कपडे, दागिने, रूप वगैरे त्या त्या प्रदेशात मान्य असणाऱ्या चालीरीतींना धरून असावेत. या तत्वाला अनुसरूनमूर्तिकलेमध्ये भारतात अनेक प्रादेशिक फरक पडलेले दिसतात. या सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे सर्व देशभर पूजिल्या जाणाऱ्या मुख्य देवतांच्य मूर्ती व त्यांचे आपसातील पारंपारिक व पौराणिक लागेबांधे.
बदलत्या धार्मिक कल्पनांना अनुसरून मूर्तिकलेत निरनिराळ्या शैली उगम व अस्त पावताना दिसतात. सर्व भारतीय दैवते अमर असल्याने त्यांच्यातील बदल विशेषतः वार्धक्य वा विकलांगता दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. देवतांच्या मुर्ती नेहमीच तारुण्याचे प्रतीक असून कित्येकदा हे तारुण्य उघड-उघड उत्तान म्हणता येईल इतक्या भोगवादी दृष्टीकोनातून दाखवलेले आहे.
एकीकडे ही कामुक आकृती व एकीकडे अनाकलनीय गूढ शिल्प या दोन तोकांमध्ये सामावालेला हेतू मात्र पूर्ण आध्यात्मिकच आहे. भारतीय कलेतील ही बाह्य संदिग्धता प्रा. गॉम्ब्रिन यांनी नेमकी टिपली आहे ते म्हणतात: ‘सामान्य अधार्मिक माणसाला या ल्गूढ आकृतीत अलौकिक वा दैवी शक्तीचे रहस्य सामावलेले दिसते: तर धार्मिक आयुष्यात नुकताच प्रवेश करणारा त्यांना आपल्या दैवी साध्याकडे जाणाऱ्या जिन्याची पहिली पायरी समजतो.
महाराष्ट्रातील धातुशिल्पात निरनिराळ्या शैली व संस्कृतीचे सरमिसळ झालेली आहे. १९७४ साली अहमदनगर जिल्ह्यात, श्रीरामपूर तालुक्यात दैमाबाद येथे ज्या चार मूर्ती सापडल्या त्यांच्यामुळे या कलेच्या इतिहासात एक क्रांती घडून आली. या चार मूर्ती अशा: एक बैलाचा रथ, एक म्हैस,एक हत्ती व एक गेंडा. ही चार जनावरे अशा तऱ्हेने एका संचात फक्त हडाप्पा संस्कृतीतच आढळतात. याच दैमाबाद उत्खननात हडाप्पानंतरच्या चाल्कोलिथिक संस्कृतीचे इतरही अवशेष सापडले. आणि तरीही या मूर्तीच्या निर्मितीचा काल, त्याइथे कशा व कुठून आल्या, त्याकुणी निर्मिल्या असाव्या याबद्दल तज्ज्ञात संपूर्ण अज्ञान आहे. फार तर त्या ख्रिस्तपूर्व १६०० वर्षे इतक्या जुन्या असाव्या एवढेच सांगता येणे आज शक्य आहे.
या चार मूर्तीनंतर ते ख्रिस्तोत्तर काळातील दुसऱ्या शतकापर्यंत महाराष्ट्रात कुठलेही धातुशिल्प नाही. इ,स. २००-३०० मधील मूर्ती कोल्हापूर येथे सापडल्या आहेत, तसेच एक निधि-शॄंग ठाणे येथे. इ, सनाच्या चौथ्या शतकातील बौद्ध मूर्ती रामटेक येथे सापडल्या आहेत; तसेच नवव्या शतकातील मूर्ती सोपारा येथील बौद्ध स्तूपामध्ये आढळल्या. इ,सनाच्या नवव्या व दहाव्या श्तकातील २७ जैन मूर्ती अकोला जिल्ह्यातील राजनापूर किंकिणी येथे एका भिंतीत पुरलेल्या मडक्यात सापडल्या. तसेच ऋषभनाथाची नवव्या शत्कातील चौविसी व बाहुबलीची मोठी मूर्ती जळगाव जिल्ह्यात चाहर्डी येथे सापडल्या . या सर्व धातुमूर्तीच्या अभ्यासाचा महाराष्ट्रातील सांस्कृतिक आयुष्याच्या अभ्यासास मोठा हातभार लागतो.
नवव्या शतकातील या सर्व मूर्तींना राष्ट्रकूटा कालातील मूर्ती म्हणता येईल. परंतु ठामपणे राष्ट्रकूट अम्हणता येईल अशा मूर्ती महाराष्ट्रात फारच थोड्या आहेत. याचे कारण सोमदेवाच्या यशोश्तिलकात सापडते. तेथे त्याने मूर्ती वितळवून सोने करणाऱ्या प्र्धानांना बोललावला आहे. ह्या कारणांमुळे म्हणा की आणखी कुठल्या कारणाने म्हणा, पण पुढे पुढे धातुमूर्ती ओतण्याचे काम महाराष्ट्रात थंडावलेच. ज्या ज्य मूर्ती ओतल्या गेल्या त्यांची शैली हिणकस होती व त्यांच्यातुन पूर्वीच्य मूर्तीची मोहक गतिमानता जाऊन एअक टठर, दगडीपणा आलेला दिसतो. किंबहुना धातुमूर्तींनाही या काळातील इतर शिल्पांप्रमाणेच अवकळा आली असे म्हणावे लागेल.
कदाचित दक्षिण भारतातून मोथ्या ओतीव मूर्ती आणणे सहज शक्य होते म्हणूनही महाराष्ट्रात या कलेला ओहोटी लागली असेल. महाराष्ट्रातील अनेक देवळातून सापडणाऱ्या धातुमूर्ती या दक्षिणी आयातीच्या साक्षी आहेत. या आयातीचा दोन कारणे असावीत. एक तर दाक्षिणात्य स्थपती मूर्ती घडवण्याच्या कलेत अधिक निपुण असेल आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रात लोप पावलेली धातू ओतण्याची कला दक्षिणेकडे अधिक जोमाने तग धरून असेल

No comments:

Post a Comment