अहमदनगर जिल्ह्यात दैमाबाद येथे सापडलेल्या चार मूर्ती.
बैलाचा रथ (उंची १५.४ से.मी.), हत्ती (उंची ३६.५ से,मी.), म्हैस (उंची २७.५ से. मी.), गेंडा (उंची २८.५ से.मी.) ख्रि.पू. १६०० च्या आसपास.
मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात आहेत.
बैलाचा रथ (उंची १५.४ से.मी.), हत्ती (उंची ३६.५ से,मी.), म्हैस (उंची २७.५ से. मी.), गेंडा (उंची २८.५ से.मी.) ख्रि.पू. १६०० च्या आसपास.
मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात आहेत.
या चार मुर्तीच्या उत्खननापासून भारतातील धातू ओतण्याच्य कामाच्या इतिहासात क्रांती झाली आहे. चाल्कोलिथिक संस्कृतीच्या घरातून या मूर्ती अपघातानेच सापडल्या. उत्खननात या थरानंतर व मनुष्यवस्तीच्या इतर आणखी खुणा सापडल्या नाहीत.
बैलांचा रथ, हत्ती, म्हैस आणि गेंडा या त्या चार मूर्ती असून त्या अशा एका संचात एकमेकांबरोबर फक्त सिंधू नदीच्याकाठच्या संस्कृतीतचह आढळतात; परंतु संपूर्ण हडाप्पा उत्खननातही अशा धर्तीच्या, चकीत करून सोडणाऱ्या मूर्ती सापडल्या नव्हत्या.
विशेषतः बैलांचा रथ हे एक कोडेच आहे. जे दोन बैल रथ ओढताहेत त्यांच्या शरिराची घडाण फारच विचित्र आहे. त्यांचे पार्श्वभाग घोड्यांसारखे असून शिंगे त्या काळातल्या एकाद्या “युनिकॉर्न” सारखी सरळ पुढे आलेली आहेत. या रथासारखा रथ तर संपूर्ण उपखंडात कुठेच बघायला मिळत नाही. दोन उभ्या व एका आडव्या दांड्यावर बसवलेला एक उघडा पाट आहे. त्याच्या चाकांचा आस त्यातील दोन भोकांतून ओवला आहे आणि तो चाकांबरोबर फिरतो. जोखडाचा दांडा एकुण रथाच्या आकाराच्या मानाने फारच लांब आहे आणि तो गुरांच्या मानेवर नुसता ठेवला आहे, बांधलेला नाही. त्यावर एक कुत्रा उभा आहे. पाटावर सारथी उभा असून त्याच्या हातात एक चाबूक आहे. त्याचे कमरेवरील शरीर वास्तव असएल तरी कमरेखालील भाग फारच ओबडघोबड आहे. अशी मनुष्यकृती आजवर तरी सापडलेली नाही.
गेंड्याची आकृती वास्तव नसून नुसती भासली तशी, केवल गेंड्याच्या आकृतीची आठवन करून देणारी आहे. त्याचे कवच जवळजवळ खोगिरासारखे दिसते. फक्त हत्ती व म्हैस मात्र अगदी वास्तवावर आधारित आहेत.
सर्व मूर्तींना चाके आहेत (हत्तीची गळालेली दिसतात). परंतु त्यांचे वजन बघता त्या खेळणी म्हणून बनवल्या असतील असे वाटत नाही. सर्वांचे मिळून ६० किलो वजन आहे. तेव्हा त्या मिरवत नेण्यासाठी घडवल्या असाव्यात असे वाटते. अशा लाकडाच्या मूर्ती अजूनही मिरवणुकीत वाजत गाजत नेताना महाराष्ट्रात आढळतात.
No comments:
Post a Comment