जेथे यंत्रणा पोहचण्यास काही वेळ लागतो, तेथे चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक पोहचत आहेत. याचा अनुभव परभणीत नुकताच आला. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय गौरव शिंदेला चाईल्ड लाईनच्या स्वयंसेवकांनी शोधून परिवाराच्या स्वाधीन केले. १८ वर्षांखालील संकटग्रस्त मुला-मुलींसाठी २४ तास कार्यरत असलेल्या चाईल्ड लाईनच्या परभणी शाखेचे उद्घाटन महिला व बालविकास तसेच आरोग्य राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी पालम तालुक्यातील केरवाडी येथे केले.
महिला व बालविकास मंत्रालय, दिल्ली यांच्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या चाईल्ड लाईनच्या परभणी शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पालम तालुक्यातील केरवाडी येथे पाच दिवसांचे शिबिर घेण्यात आले. यात स्वप्नभूमी स्वयंसेवी संस्था परभणी, युवाग्राम मंडळ बीड, परिवार सेवाभावी संस्था नांदेड, अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा आणि ब्ल्यू सीड्स स्वयंसेवी संस्था, वर्धा येथील स्वयंसेवक उपस्थित होते. चाईल्ड् लाईनचे कार्य कशाप्रकारे चालते, संकटकालीन मुलांना कशा प्रकारची मदत करायची आदी प्राथमिक बाबींची माहिती यावेळी स्वयंसेवकांनी जाणून घेतली.
१८ वर्षाखालील कुठलाही मुलगा-मुलगी ज्यांना मदतीची गरज आहे, अशा मुलामुलींसाठी चाईल्ड लाईन हा एक आधार आहे. आजच्या काळात मदत करणे ही संकल्पना संपुष्टात येत आहे. अशा विपरित परिस्थितीत चाईल्ड लाईनचे स्वेयंसेवक मुलांपर्यंत पोहचतात. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना दिलासा देतात, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे, अशा शब्दात राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी भावना व्यक्त करून स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. शासनाचा एक प्रतिनिधी थेट आपल्यात पाहिल्यावर दूरवरून आलेल्या स्वसयंसेवकांच्या चेह-यावरही आनंद झळकत होता.
संकटात सापडलेल्याव मुलांना तात्काळ मदत पोहचविण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशात एकच संपर्क क्रमांक असावा, अशा संकल्पानेतून १९९६ मध्ये मुंबईत चाईल्ड लाईन या संस्थे्ची स्था्पना झाली. मुंबई येथील टाटा समाज विज्ञान संस्थेचे काही विद्यार्थी ‘फिल्ड वर्क’ करण्यासाठी प्रत्यक्षात जेव्हा मागासलेल्यां भागात गेले, तेंव्हा त्यांना स्थानिक मुलांच्या समस्या जाणवल्या यात कुणाचे शोषण झालेले, कुणाला वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न झालेला तर काही मुलींना चक्क शरीर विक्री करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले. त्यांमुळे अशा समस्या् या विद्यार्थ्यांच्या कानावर पडल्या.
जोपर्यंत फिल्ड. वर्क होते, तोपर्यंत त्यांना स्थांनिक पातळीवर हे विद्यार्थी मदत करायचे. मात्र घरी गेल्या्नंतर काय, या मुलांच्या समस्या कोण सोडविणार, आदी प्रश्नी टाटा समाजविज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांना पडले. त्यातूनच मग संकटग्रस्त मुलांसाठी एक संपर्क क्रमांक असावा, अशी संकल्प ना पुढे आली. यातून मग संकटग्रस्त मुलांना मदत करणारी आपत्कालीन सेवा ‘चाईल्ड लाईन’ चा जन्म झाला. मग १०९८ हा क्रमांक अशा मुलामुलींचा आधार बनला. सद्यस्थितीत देशातील २१० शहरात सुरू असलेल्या या संघटनेसोबत ५०० च्या जवळपास स्वयंसेवी संस्था संलग्न झाल्या आहेत.
परभणीतही स्वप्नभूमी ही स्वययंसेवी संस्थां या कार्याशी जुळली असून या माध्यमातून परभणीतील संकटग्रस्त मुलांच्या समस्यांची सोडवणूक होणार आहे. चाईल्ड लाईनचे हे कार्य मुलांच्या जीवनात आशेचा नवीन किरण ठरणार आहे.
No comments:
Post a Comment