Tuesday, January 24, 2012

उमलू द्या कळ्यांना.


बाप म्हणे लेकी तु गं साखरेचं पोतं. . .
परि तुझ्या नशिबाला जामीन कोण होतं ? असं समजून मुलीच्या जन्माचा जामीन नाकारण्याच्या वृत्तीमुळे आज सामाजिक विषमतेची दरी रुंदावतांना दिसत आहे.

जनगणना २०११ मधून स्पष्ट झालेलं वास्तव समजून घ्यायचे असेल तर यातील सांख्यिकीय माहितीकडे केवळ आकडेवारी म्हणून आपल्याला आता दुर्लक्ष करता येणार नाही. यातून स्पष्ट होणारी सामाजिक विषयमतेची दरी आणि त्यातून भविष्यात निर्माण होणारा गंभीर सामाजिक प्रश्न याकडे आपल्याला आत्ताच लक्ष द्यावे लागेल.

काय आहे वास्तव जाणून घेऊया !
जनगणना २०११ प्रमाणे भारताची लोकसंख्या १,२१०,१९३,४२२ इतकी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या ६२३,७२४,२४८ तर स्त्रियांची लोकसंख्या ५८६,४६९,१७४ इतकी आहे. यामध्ये १ हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९४० आहे. यातील ग्रामीण महिलांचे प्रमाण ९४७ तर शहरी भागातील महिलांचे प्रमाण ९२६ इतके आहे.

देशामध्ये केरळ राज्य हे लिंग गुणोत्तर सर्वात वरच्या स्थानावर असून तिथे १ हजार पुरुषांमागे १०८४ महिला आहेत. येथे ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण १०७७ आणि शहरी भागात १०९१ इतके आहे.

चंदीगढ च्या ग्रामीण भागात हे प्रमाण ६९१ इतके कमी आहे तर दमण आणि दीव मध्ये नागरी भागात लिंग गुणोत्तराचे प्रमाण देशात सर्वात कमी असून ते १ हजार पुरुषांमागे ५५० स्त्रिया इतके आहे.

देशातील आठ राज्यांनी ग्रामीण भागात लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात घट दर्शविली असून यामध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, महाराष्ट्र कर्नाटक, आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे तर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांने ही नागरी भागात स्त्रियांच्या प्रमाणात घट दर्शविली आहे.

२०११ च्या जनगणनेमध्ये शून्य ते सहा या वयोगटातील बालकांच्या लिंग गुणोत्तरात लक्षवेधी घट झाल्याचे दिसून आले आहे.२००१ च्या जनगणनेनुसार देशात या वयोगटात १ हजार मुलांमागे ९२७ मुली होत्या. त्यामध्ये ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण ९३४ इतके होते तर शहरी भागातील मुलींचे प्रमाण ९०६ इतके होते. २०११ मध्ये १ हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण कमी होऊन ९१४ इतके झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील प्रमाण ९१९ तर शहरी भागातील प्रमाण ९०२ इतके आहे.

म्हणजेच ग्रामीण भागात या वयोगटातील मुलींची घट ही १५ पॉईंटची आहे तर शहरी भागात ही घट ४ पॉईंटची आहे. मागील दशकात म्हणजे २००१ ते २०११ मध्ये १ हजार बालकांमागे दिल्ली राज्यात ग्रामीण भागात मुलींची संख्या सर्वात कमी झाली असून ती ८०९ इतकी आहे तर नागालँडमध्ये नागरी क्षेत्रात या वयोगटात लिंग गुणोत्तराचे सर्वात अधिक प्रमाण नोंदविण्यात आले असून ते १ हजार मुलांमागे ९७९ इतके आहे.

महाराष्ट्राची ग्रामीण आणि शहरी भागातील स्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला २०११ च्या जनगणनेनुसार समोर आलेली आकडेवारी अभ्यासावी लागेल.

या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या एकूण ११,२३,७२,९७२ इतकी आहे. यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण ६,१५,४५,४४१ तर शहरी भागाची लोकसंख्या ५,०८,२७,५३१ इतकी आहे. यामध्ये पुरुषांची लोकसंख्या ५,८३,६१,३७९ इतके आहे. ती ग्रामीण भागात ३,१५,९३,५८० इतकी आहे तर शहरी भागात २,६७,६७,८१७ इतकी आहे. राज्यात महिलांची एकूण लोकसंख्या ५,४०, ११,५७५ इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची लोकसंख्या २,९९,५१,८६१ तर शहरी भागातील महिलांची लोकसंख्या २,४०,५९,७१४ इतकी आहे.

दशकामध्ये राज्याच्या लोकसंख्येत १५.९९ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागाची टक्केवारी १०.३४ तर शहरी भागाची २३.६७ टक्के इतकी आहे.या वाढीत पुरुषांची टक्केवारी १५.८० तर महिलांची टक्केवारी १६.२१ टक्क्यांची आहे.

राज्यात शून्य ते सहा वयोगटात एकूण लोकसंख्या १,२८,४८,३७५ इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या ७४,४५,८५३ तर शहरी भागातील लोकसंख्या ५४,०२,५२२ इतकी आहे.

यामध्ये मुलांची एकूण लोकसंख्या ६८,२२,२६२ इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या ३९,६१,४२० तर शहरी भागातील लोकसंख्या २८,६०,८४२ इतकी आहे.

यामध्ये मुलींची एकूण लोकसंख्या ६०,२६,११३ इतकी आहे. ग्रामीण भागातील या वयोगटातील मुलींची लोकसंख्या ३४,८४,४३३ तर शहरी भागातील लोकसंख्या २५,४१,६८० इतकी आहे.

महाराष्ट्राची एकूण साक्षरतेची टक्केवारी ८२.९१ टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण ७७.०९ तर शहरी भागाचे प्रमाण ८९.८४ टक्के इतके आहे.

एकूण साक्षरतेत पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी ८९.८२ टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी ८६.३९ तर शहरी भागातील साक्षरतेची टक्केवारी ९३.७९ टक्के इतकी आहे.

एकूण साक्षरतेत महिलांची साक्षरतेची टक्केवारी ७५.४८ टक्के इतकी असून यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण ६७.३८ टक्के तर शहरी भागाचे प्रमाण ८५.४४ ट

No comments:

Post a Comment